महाबळेश्वर/ बंगले.

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchबंगले.
----------

 या महाबळेश्वरच्या हवापाण्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच आहे यांत कांहींच संशय नाही; हें केवळ आम्हीच म्हणतों असें नाहीं. परंतु याची सत्यता श्रीमान युरोपियन व नेटिव कामगार व - विद्वान डाक्तर लोकांच्या चिकित्सेनें चांगल्या आरोग्य वर्धनीय ठरलेल्या हवेचा अनुभव घेतलेले इतर सधन लोक यांच्या कृतीवरूनही उघड दिसत आहे. कारण या सानिटेरियमच्या सुखकर जागेवर येऊन राहण्याचे सोयीसाठीं कसलें तरी बरें वाईट, "हट किंवा काटेज” नवीन बांधून ठेवण्याचा किंवा पूर्वी बांधलेले असेल तें या ठिकाणच्या अतिवृष्टीपासून सुरक्षित राखण्याचा क्रम फार दिवसापासून चालला आहे. त्याचें पाऊल दिवसेंदिवस पुढेंच पडत आहे. यांचे मालक कोणी विलायतचे, कोणी मुंबई, पुणेंं; इंदूर; मिरज, जमखिंंडी, असे दूरचे प्रदेशांतील राह णारे असतांही त्यांनीं व आमचे मुंबई सरकार यांनीं येथें हजारोंच्या हजारों रुपयांचा खर्च करून या भयंकर जंगलांत वसाहात करून टाकिली आहे. असा हा लांब लांब ठिकाणच्या श्रीमान लोकांच्या मनावर जो परिणाम घडला तो वस्तुस्थिति तदनुरूप असल्याशिवाय घडणार नाहीं हें आतां कोणीही कबूल करील.

 या बांधलेल्या इमारतींत मालकांस प्रतिवर्षीच्या थंड व उष्ण काळांत जरी राहण्यास झालें नाहीं तरी त्यांच्या इमारती भाडयाने देण्याची त्यांची खुषी असल्यास त्या रिकाम्या राहत नाहींत एवढेंच नाहीं, परंतु त्यांचें चांगलेंच रेलचेल भाडे मालकास मिळतें. हें पुढील लिस्टावरून दिसेल. या प्रमाणें येथील बंगले, घरें, खोपटें इतर जमीनजुमल्याप्रमाणेंच उत्पन्नाच्याबाबीं झाल्या आहेत. अशा हवापाण्याचे सौख्योपभोगाकरितां दरसाल शेकडों रुपयांचा येथें येण्यानें चुराडा झाला तरी याची कांहीं फिकीर वाटत नाहीं. असें समजूनच बडेबडे साहेब लोक, महाराज छत्रपति कोल्हापूर,  महाराज होळकर, महाराज गायकवाड, कच्छचे राव, महाराज भावनगर, मिरज, कुरुंदवाड, व अक्कलकोट वगैरे ठिकाणचें सरदार, मारवाड उत्तर हिंदुस्थान वगैरे ठिकाणचे राजे लोक, लिमडीचे संस्थानिक, मोठमोठे जज्ज, वकील, बारिस्टर यांची येथें बरीच गर्दी झाल्यामुळें थोडे दिवस शहराची रोषनाई येऊन अगदीं जणूं कांहीं घटोत्कचाचा बाजारच बनून जातॊ.

 महाबळेश्वरीं येण्यांत खर्चाची मुख्य रक्कम ह्मटली म्हणजे घरभाडे होय. मोठमोठया साहेब व इतर बडे लोकांचे बंगले मालकमपेठेच्या वस्तीपासून दूर आहेत. त्यांपैकीं कांहीं बंगल्यांत मात्र मालकाखेरीज कोणी लोक भाडयानें राहत नाहींत. त्यांस पुढील यादींत आदमासिक भाड़े सांगितलें नाहीं. ज्यांचे भाडें दाखल केलें आहे तेसुद्धां त्यांच्या मालकांस नकोसें असतील तेव्हांच दुसऱ्यास मिळतात. अशा भाडयानें मिळणाऱ्या एकेका बंगल्याचें भाडें हिवाळ्याकरिता व उन्हाळ्याकरितां निरनिराळे ठरवावें किंवा दोही ऋतूंचें एकदम ठरवावे. त्याचा साधा  रण मगदूर किती आहे हें आम्ही पुढील कोष्टकांत दिले आहे. या ठिकाणीं भाडे म्हटले म्हणजे आठ दिवस राहिलें तरी सीजनचेंच भाडें दयावें लागतें. कारण घरवाल्यांना वर्षांचे भाडे आठ महिन्यांत वसूल करून घ्यावें लागतें. कदाचित् कोणास वाटेल कीं इतकालें भाडे घेतात त्याअर्थी घरवाल्यांची चैन असेल; परंतु ही समजूत खोटी आहे; कारण, साधारण बंगला बांधण्यास देखील पैसा व श्रम फार लागतात. या दुःखासही घरवाले इतके भीत नाहींत. परंतु पावसाळ्यामध्यें घरें जतन करण्याचें काम फार कठीण असतें. कारण पाऊस फार अवखळ व वादळेंं फार असल्यामुळे घरांचा खुळखुळा होऊन जातो व बांधण्याच्या खर्चापेक्षां डागडुजींतच पुष्कळ पैशाचें नुकसान होतें. इतकेंही असून हे बंगले महालासारखे मोठे विस्तीण किंवा सोईचे असतात असें नाहीं. त्यांना बहुधा " हट " अगर ‘ काटेज ” अशी संज्ञा असते व त्याचप्रमाणें त्यांचें स्वरूप असतें. मुख्य सुख इतकेंच कीं हरएक बंगल्यासभोंवार सुखप्रद, रमणीय आणि गर्द झाडी असते, तेणेंकरून  पूर्वीच्या ऋष्याश्रमाची किंवा पर्णकुटिकेची कल्पना मनांत येते. नामदार गव्हरनरसाहेब, डेविड सासून व सर दिनशा पेटिट यांचे बंगले राजकीय आहेत; परंतु अशा घरांची संख्या मोजण्यास हाताचीं बोटे देखील फार आहेत. मध्यम प्रतीच्या गृहस्थास मालकमपेठेत वाण्याउदम्याचीं रिकामीं घरें व दुकाने राहण्यास मिळतात. कित्येक झोंपडया मोकळ्या जागेवरही आहेत. त्यांस मात्र भाडे बेताचें पडतें.

 या पुढें दिलेल्या यादींत दोन्ही ऋतूंचें प्रत्येक बंगल्याचें साधारणपणें पडणारें भाडे दाखवून त्याच्या कंपौडाचें क्षेत्र व त्याचें भुइभाडेही सरासरीने दिलें आहें, तें अशाकरितां कीं यांपैकीं एखादा बंगला खरेदीच घेण्याचे कोणाच्या मनात आलें तर हें पुस्तक संग्रहीं ठेविल्यानें त्यासंबंधी सर्व माहिती त्यास काढीत बसण्याची बहुतेक तसदी पडू नये.

 या सर्व बंगल्यांना तबेले व नोकर राहण्याच्या सोई केलेल्या आहेत यामुळे येथें येऊन राहण्यांत गाडया घोडयाची हयगय होण्याची काळजी पडत  नाहीं. व कोठे कोठे बंगल्यांत विहिरीही काढलेल्या असतात.

 बंगला लहान किवा गैरसोईचा असल्यास आणखी नजीकच चालचलाऊ गवती छपरे करून घ्यावीं लागतात. येथें हाटेलांतून उतारूंची गर्दी होऊन गेली म्हणजे असले गवती तंबु लोक राहण्यास नेहमीं करितात. हल्लींंच्या पत्र्यांच्या घरांना व बंगल्यांनासुद्धां पूर्वी असेंच गवती आच्छादन असे. परंतु त्याची जळून खाक होण्याची किंवा वावटळानें वावडी उडण्याची फार धास्ती करीत बसूनही पुन्हां तें दर दोन वर्षानीं पावसानें कुजलेमुळें जुनें काढून नवें करावें लागेच; या सर्व कारणांमुळे आतां जिकडे तिकडे पत्र्याच्या इमारती झालेल्या दिसतात, तथापि पूर्वीचा नमुनाही कोठे कोठे नजरेस येतो.

 या पुढील लिस्टाचा अनुक्रम सरकारी बंगला ( गव्हरमेंट हौस ) येथें असलेल्या सर्व बंगल्यांत अप्रतीम असल्यामुळे मूळारंभीं धरून एकंदरीचीं यादी केली आहे. 
महाबळेश्वर येथील बंगल्यांच्या नांवाचें लिस्ट.
बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
बेलाव्हिस्टा. सरकारी.
टरेसिस. "
पार्कहाल. मि. तुळशीदास केशवदास. मुंबई ११ σ ७ १५० ६५० ३९
वेस्टवुड. मनमोहनदास रामजी. ११ σ ७ २०० १००० ३९
राकडेल. नसरवानजी धनजीशहा. १५ σ३३ २०० ८०० ४७
जिजीलाज व धनकाटेज मि० फेरोजशा बोमनजी ९ σ३० २०० १००० ३१

हरमिटेज. भाईशंकर नानाभाई, ५ σ७ १० ४०० १०३
मोनेस्टरी. भाईशंकर नानाभाई, १५० ७००
मिथिबाई काटेज. मि. केरावाला. १०० ४००
१० एलफिन्स्टनकोटज. मि. केरावाला. १५ ४७ १३
११ ब्रायर्स. श्री. पंतसचीव भोर, ७ σ७ १०० ५०० ३८ १०
१२ परिवेर व्हिला. मि० केरावाला १५० ८००
१३ ईगल्सनेस्टे. मूलराज खटाव. ११ σ२५ १५० ६०० ३७ १०
१४ सिडनीहौस. अहमद हबीबभाई. ४ σ१३ १५० ७०० ४५ १५
१५ हरूनव्हिला. मि० हाजी इभ्राहिम. ४ σ२२ २०० ८०० ४८
१६ वुडकॉन एच. वकील. १४ σ२४ ३०० १६०० ४६
१७ न्युजन्टलाज. शेख अहमद इमाम. २०० १००० ४२ १२
१८ क्रेग. छत्रपति कोल्हापूर. ३३ σ३९ ३६० १५
१९ हिलस्टोन. धनजीशा जमशेटजी. ५ σ२४ १५० ६०० २९ १२
२० केन्हिलवर्थ, मि. हिरजीभाई धनजीशा ८ σ२० २०० १००० १३
२१ एलफिन्स्टनलाज. जयशंकर रामनाथ. ५ σ६ १०० ६०० ५१
२२ व्हॅलेंटाइनलाज. जयशंकर रामनाथ. १०० ४००
२३ विश्रामहाल. गोपाळराव गायकवाड ५ σ२४ १५० ८०० १७ १३

बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
२४ सीव्ह्यू. खा.बहादूर रतन मंचरजी २ σ३० २०० ८०० १२
२५ बेलमान्ट हौस. शेट त्रिभुवनदास. ४ σ४ २१ १२
२६ आयर्नरूफ. मि. लक्ष्मणसिंग. ५ σ३३ ६१ १४
२७ लाडविकलाज. मि. माणिकजी बोमनजी. १०० ५००
२८ ग्वालियरलाज हजीअदम सुलेमान. ७ σ३१ १५० ७०० २४
२९ म्यु.गव्ह.बंगलें नं. १ सुपरिटेंडेंट महाबळेश्वर. १५० ६००
३०    नं. २ युरोपियन लोकांस
३१    नं. ३ म्युनिसिपालिटी
३२    नं०४ भाड्याने देते.
३३    नं० ५.
३४ वेव्हरली,अनबाई व्हिला मि. हिरजीभाई धनजी शहा १५० ८०० ४२
३५ व्हॅॅलीव्ह्यू. हजीअदम सुलेमान. ६ σ२४ १५० ७०० २१
३६ इव्हॅनो. बाळकृष्ण सायन्ना. ५ σ३३ ३०० १००० ६१ १४
३७ ग्लेंगरी. मि. जे माॅॅकडोनल, १३ σ८ २०० ८०० १४०
३८ क्लिफ्टन काटेज. मि. मंचरजी रस्तमजी. ४ σ१४ १५० ६०० ४७
३९ न्यू क्लिफ्टन लाज. श्री. संस्थान मुधोळ. ४ σ१२ १५० ७०० १४
४० बर्डसनेस्ट. म. एदलजी दिनशा. १५० ६०० ६३ १२
४१ बारचेस्टर. मि. जे. बी. मर्झबान. ७ σ५ १०० १००० ७५
४२ बेलाव्ह्यू. ६ σ२४ २०० १०००
४३ फाउन्टन हाटेल आणि बेलव्हिडरी. मि. कुंवरजी कावसजी. २०० ८००
४४ बोनीव्ह्यू. डी. मूर. ६ σ७ १२० ५०० ६५
४५ जुबिली काटेज. मि. डी आरिआ. ८ σ१ १०० ४००
४६ रोज काटेज. मि. कर्सनदास, मुंबई. ३ σ१० ३४
४७ मलबरी काटेज. मि. रणछोडदास त्रिभुवनदास, मुंबई. ७५ ३००

बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
४८ सनीसाईड. मि. ना. वि. मंडलिक, मुंबई. २२ σ३२ १०० ५०० १४
४९ सनीकाटेज. मि. ना. वि. मंडलिक, मुंबई. २२ σ३२ ५० १७५ १४
५० सनीलाज. मि. ना. वि. मंडलिक, मुंबई. २२ σ३२ ५० १७५ १४
५१ अपनाकाटेज. कुवरजी आरदेसर, २ σ२५ १०० ४०० २१
५२ स्प्रिंगफील्ड. मि. भगवानदास, मुंबई. ५ σ४ १६
५३ वाडियाकाटेज.( जुनी शाळा.) मि. रस्तमजी फ्रामजी वाडिया, मुंबई. २५०
५४ वाडियालाज. मि. धनजीशा जमशेटजी. ७५ ३००
५५ रिपन हाटेल. मि. खरशेटजी दादाभाई,सातारा. ५ σ२५ हाटेल. हाटेल. २९ १४
५६ स्टोन हाऊस. मि. नसरवानजी डोसाभाई, पुणे. २०० ८००
५७ वेस्ट लाज. मि. माणिकजी बमनजी. १ २७ २०० १०००
५८ रिट्रीट. मिस. वुइलसन. १०० २००
५९ पोस्ट आफिस. सरकारी.
६० टेलिग्राफ आफिस. सरकारी.
६१ सेंट क्लेअर व्हिला. मिस. वुइलसन. १५० ७००
६२ क्लिफटन हौस. मि. एच. ब्रामले. २०० ८००
६३ डुलसी डोमम्. मि. एच. ब्रामले. १५० ६००
६४ लिली काटेज प्रो. ओ. ही मूलर १२ २३ २३ १५
६५ सॉन्डहर्स्ट क्यासल दादाभाई हारमसजी डुबास ५०० २००० ७०
६६ नेलसन लाज. मि. दामोदरदास तापीदास ५ ३ १५० ७०० १६
६७ झोमर्स काटेज. मि. दामोदरदास तापीदास ५० १५०
६८ बोहिमिया. मि. एस. डी. सासून. २४ ३८ २०० १००० २६५
६९ माउंटडग्लस. अमेरिकन मिशन, ९ १७ ५०
७० व्हिक्टोरिया काटेज. मि. बाळाजी पांडुरंग. ५ २४ १७ १४

बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
७१ ग्लेन ओगल. मि. इ. डी. सासून. ७ ३१ २०० १००० ८२
७२ दि विलोज. मि. नसरवानी सोराबजी. १५० ८००
७३ रेडक्यासल, श्री. जमखिंडीकर. १५ २१ २०० ८०० ८२
७४ मुरारजी क्यासल. मि. धरमसी मुरारजी. १ १२ १३ १३
७५ निरा लाज. मि. आरनीसिम. ४ २७ ५०
७६ माउंट मालकम. मि. बमनजी दिनशा पेटिट ४२ १५ ४५०
७७ फाउंटन हाल. सर दिनशा पेटिट
७८ टेंपल हाल. मि. दादाभाई हारमसजी. ५ ११ ४०० १५०० २८
७९ प्रास्पेक्ट काटेज. मि. मंचरजी दोराबजी. २ ५ १५० ७०० २२
८० ग्रेस काटज. अमेरिकन मिशन,

८१ युनिअन हाऊस. धनबाई कुंवरजी. २०० ८००
८२ मरे हाऊस, अमेरिकन मिशन.
८३ पारसनेज. दादाभाई हारमसजी डुबास. २ ३१ ५०० १५०० १५
८४ श्रबेरी, मि. नरोत्तमदास मुरारजी १० ३८ २०० ८०० ३५
८५ खिस्तिचर्च.
८६ व्हिक्टोरियालाज. मि. धनजीशा जमशेटजी. १५० ७००
८७ आक्टेगान. मि. दादाभाई हारमसजी. १५० ६००
८८ वुडसाईड. सुपरिटेंडन्ट म्युनिसिपालिटी
८९ नानपरेलव्ह्यू. मि. मंचरजी दोराबजी. ५ ५ २०० ८००
९० मिनिएचरव्हिला. मि. मंचरजी दोराबजी. ५ ५ १५० ६००
९१ शापूर हाल. मि. शापुरजी एदलजी. ३ ३९ २०० १००० ४२
९२ माउंट युनिक. मि. खरशेटजी दादाभाई, ३०० १६००
९३ क्लिफ. अमेरिकन मिशनरी. ८ ६ ८६
९४ ग्रीन हिल्ल मिशनरी.
९५ सेक्रेटरीएट आ० सरकारी.
९६ नाहीम. आर. पी. वाइल्डर. १५० ७००
९७ आयोना. मिशनरी. ४२
बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
९८ आबरलिन काटेज. रेव्हरंडविनसर. १५० ७००
९९ न्यू हौस. एच. एच. आगाखान.
१०० फ्लॉरेन्स हाल. हिज हायनेस आगाखान.
१०१ साऊथव्ह्यू. मि. गोपाळराव लिंबाजी गायकवाड इंदूर. ३०० १०००
१०२ सिंडोला पार्क. श्री. मिरजकर
१०३ ब्ल्यूव्हॅॅलिहाल. मि० कमरुद्दिन तय्यबजी. ३०० १५००
१०४ तयबजी लाज नामदार तय्यबजी. १५० ८००
१०५ पॅॅरडाईज लाज, मि• आदरजी दोराबजी. ७ σ२१ १५० ५०० १५
१०६ लीजन लाज. बी. डी. डी. खंबाटा. ११ σ२ २०० ८०० ११५ १३

१०७ आलबर्ट व्हिला. मि. हिरजीभाई धनजीशहा. १५० ७००
१०८ क्वीन काटेज. मि. एफ. आर. १५० ७००
१०९ काकेट काटेज व बीहाइव्ह. मि० पी. माईट. १०० २००
११० फोर ओक्स. मि. दिनशा जमशेटजी, ८ σ९ ३०० ८०० ४३ ११
१११ मालकम काटेज. मि. रणछोडलाल छोटालाल ८ σ१९ १५० ५०० २७
११२ ओक्स. मि. रणछोडलाल छोटालाल ८ σ१९ २०० ७००
११३ दि ग्रोव्ह. जयशंकर रामनाथ निसबत इंदूर. ४ σ९ १५० ६००
११४ दि बावर. जयशंकर रामनाथ निसबत इंदूर. ४ σ९ १०० २५० ४२
११५ हीथ व्ह्यू. मि० गुलबाई कुवरजी. ६ σ२२ ३०० ८०० ३४ १२
११६ लँघम होस. हि. हा. अगाखान. ७ σ३४ महाब. हाटेल ८३
११७ लांघम लाज. हि. हा. अगाखान. ७ σ३४ महाब. हाटेल ८३
११८ होप काटेज. मंचरजी दोराबजी. १५० ६००
११९ इस्मायल हाउस मि. कासम साजन, १०० ६००
१२० स्टीव्हनसनकाज. मि. कासम साजन, १०० ४००
१२१ मर्फी काटेज. मि. इब्राहिमभाई हसनभाई ३०० १०००
१२२ हेझलडेन. मिस वुइलसन. १०० ४००
बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
१२३ माइट काटेज.
१२४ रेव्हिला. नूरमहंमद जयराम पीरभाई,
१२५ रेसव्यू. मि. हाजीकासम बद्धा. ३०० १५००
१२६ गेस्ट हाउस. मि. कासम साजन. १०० ३००
१२७ क्लबहाउस. मि. इभ्राहिम रहिमतुल्ला. १०० ४००
१२८ हासम काटेज. मि. कासम साजन, १०० ४००
१२९ रस्टमलाज. मि. बाटलीवाला. ३०० ८००
१३० आनंदाश्रम. श्री. आनंदराव खंडेराव रास्ते. १०० ५००
१३१ साजन व्हिला. मि. कासम साजन, २०० ८००

१३२ कँँडी व्हिला. मि. फजिलभाई मिरभाई चिनाई. १०० ४००
१३३ गॉल्फव्ह्यू. नारायणजी द्वारकादास. १५० ६००
१३४ चारलट व्हिला. कुवरजी आरदेसर. ४ σ१६ १५० ७०० ४६ १२
१३५ महाबळेश्वरलाज. मि. एच. बी. हस्कटेपी. १५० ७००
१३६ हेक्टरलाज. मि. कासम साजन. १०० ४००
१३७ एस्कडेल काटेज. जाफर सुलेमान. ६ σ५ १५० ६००
१३८ वेण्णालाज. मि पुरुषोत्तमदास. ६५
१३९ महाबळेश्वर मिशनहौस कासम साजन. १०० ७००
१४० एकार्न व्हिला. मि. डोसाभाई नसरवानजी मुंबई. ३ σ२५ ३०० १५०० ३६
१४१ आस्पेक्ट हाल. मि. विठ्ठलदास दामोदरदास २ σ१९ ३०० १२००
१४२ लेकव्ह्यू. गुलबाई कुंवरजी. २ σ७ १५० ५०० ३१
१४३ गुलजर (माउंट हासम.) मि. नुरमहंमद जैराजभाई. १५० ६००
१४४ पार्वती व्हिला. मि. नारायणजी द्वारकादास ५ σ२० ३०० ८०० २८
बंगल्याचे नांव. मालकाचे नांव. क्षेत्रफळ. भाडयाचे प्रमाण. लोकलफंडसहित
एकर गुंठे. थंडऋतु उष्णऋतु आकार.
१५आ. १५ मा. (अजमासे)
३१जा. १५ जून.
१४५ माणिक व्हिला. मि. नारायणजी द्वारकादास ३०० ८००
१४६ पी. डब्ल्यू.डी. बंगलो. सरकारी.
१४७ रोजरी. मि. दादाभाई डुबास. ३०० ८००
१४८ दुकान ट्रेचरकंपनी. ट्रेचर कंपनी दुकान.
१४९ सेन्ट जेम्स काटेज. मि दादाभाई हारमोसजी. ३०० १०००
१५० हास्पिटल. सरकारी.
१५१ क्लब फ्रियरहाल. सरकारी.
१५२ स्पेन्सर व्हिला. मि. नारायण आणि व्यंकूहरी शिंपी० १ σ३४ १५० ८०० १९ १२

 या सर्व बंगल्याच्या भाडयाची व दुसऱ्या तऱ्हेची माहिती पाहिजे असल्यास देऊन ते मिळवून देण्याची तजवीज कसोशीने होईल. बंगला, घर, फर्निचर, इतर सामान व जमिनी भाड्याने किंवा विकत घेण्यादेण्याचीही तजवीज ज्यांचे त्यांचे ऐपतीप्रमाण माफक कमिशनाने करण्यांत येईल,

 येथील बंगले, जमिनी, घरें किवा दुकानें बेचून टाकण्याची असल्यास त्यांस गिऱ्हाइके गाठून देण्याचे किंवा खरेदी घेणारांस यांपैकी कोणत्याही सोईवार मिळकती दाखवून देण्याचे कामही कमिशन घेऊन काळजीपूर्वक करूं, परंतु याबद्दल लेखी सूचना मात्र मिळाली पाहिजे,

D. K. DIXIT.