Jump to content

मग तो दिवा कोणता ? (नाट्यछटा)

विकिस्रोत कडून

<poem> सखे ! दुसरा दिवा आणतेस ना ? - अरेरे ! या माझ्या दिव्यांत कितीतरी किड्यांचा बुजबुजाट झाला आहे ! माझ्या तेलाची घाण झाली ! - घाण झाली !! - काय ? काजळाचा बर्फ पडत आहे ! - सखे ! अग सखे ! येतेस ना लवकर ? - अग, माझ्या खोलींत जिकडेतिकडे हा दिवा काजळ उधळीत आहे ! अरे दिव्या ! माझ्यावर जितका काजळाचा वर्षाव करावयाचा असेल तितका कर ! - पण माझ्या या शेक्सपीअरवर व ब्राउनिंगवर एक कणसुद्धां टाकूं नकोस ! - हाय ! हें तेल किती स्वच्छ होतें ! पण आतां ! - हे किडे उसळून उडया मारायला लागले म्हणजे हेंच तेल, निळें, पिंवळें, हिरवें, तांबडे लाल ! - पहा, पहा ! कसें आतां काळें झालें आहे तें !

- दिवा भडकला ! 

- काय म्हटलेंस ? दुसरा दिवा नाहीं ? तुला कोणीं धरुन ठेवलें आहे ! - हाय ! माझ्या तुळईला आग लागली ! - माझें घर पेटलें !

- धांवा ! धांवा !! 

मी भाजून मेलों ! मला कोणी तरी वांचवा हो !

काय हा आगीचा डोंब ! 

देवा ! देवा !!

- हं ! 

येथें तर कांहीं नाहीं ! शांततेच्या मांडीवर काळोख तर स्वस्थ घोरत आहे ! आग नाहीं, कांही नाहीं ! मग, तो दिवा कोणता बरें भडकला होता ? ....


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.