भाग २ रा-संपत्तीचीं अमूर्ती कारणें

विकिस्रोत कडून
भाग दुसरा.
संपत्तीचीं अमूर्त कारणें.

 देशांतील संपत्तीची उत्पति व वाढ करणारें पहिलें अमूर्त कारण मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा होय. संपत्तीची व्याख्या करतांना संपत्ति ही कोणाच्या तरी मालकीची असली पाहिजे, अर्थात तिच्यामध्यें अधीनता हा गुण असला पाहिजे हें मागें सांगितलेंच आहे. आतां या संपत्तीच्या गुणाचा व संपत्तीच्या पहिल्या अमूर्त कारणाचा निकट संबंध आहे. कारण देशामध्यें खासगी मालकीचा हक्क प्रस्थापित होऊन त्याला स्थैर्य आल्याखेरीज खासगी मालकी हा गुण संपत्तीत येऊं शकणार नाहीं. अर्थात् मालमत्तेचा व जीविताचा सुराक्षितपणा हा मालकीहक्क प्रस्थापनेचा पायाच आहे. हा सुरक्षितपणा देशांत स्थापित करून तो सतत टिकविणें हें सुधारलेल्या राज्यपद्धतीचें पहिलें व प्रमुख कर्तव्यकर्म समजलें जातें. ज्यामध्यें समाजव्यवस्था व सुयंत्रित राज्यव्यवस्था सुरू झालेली नसते अशा अगदीं रानटी स्थितीमध्यें "बळी तो कान पिळी" हा न्याय असतो. अशा स्थितींत खासगी मालकीहक्क मानला जात नाहीं, व यामुळे अशा स्थितींत संपत्तीची वाढ होऊं शकत नाही; कारण आपल्या श्रमाचें फळ आपल्याला उपभाेगण्यास मिळेल अशी खात्री नसते. आज आपण मोठे श्रम करून एखादी वस्तु तयार केली तर उद्यां एखादा शिरजोर माणूस येऊन ती वस्तु आपल्यापासून हिरावून नेईल अशी भीति सर्वांस असते. यामुळे संपात्ति उत्पन्न करण्याचे श्रम घेण्यास कोणीही धजत नाहीं. वरील विवेचनावरून या अमूर्त कारणाचें स्वरुप ध्यानांत येईल. मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा हा संपत्तीच्या वाढीचा मूळ पाया आहे, व राखणें हें आपलें आद्य कर्तव्यकम समजतें. देशांतील प्रचंड सैन्यें व आरमारें, देशांतील पोलिसखातें व न्यायखातें, व देशांतली दळणवळणाचीं सुधारलेलीं साधनें वगैरे सर्व गोष्टींनीं हा सुरक्षितपणा स्थापन केला जातो व राखला जातो. कारण हा सुरक्षितपणा सार्वत्रिक होण्यास देशांत नेहमी शांतता पाहिजे. तेथें लढाया होतां कामा नयेत, आपसांत मारामाऱ्या दंगधोपे होतां कामा नयेत, व्यक्तीच्या हक्काचें उत्तम त-हेनें संरक्षण झालें पाहिजे, व्यक्तीव्यक्तीमध्यें न्याय उत्तम मिळाला पाहिजे. सारांश, देशामध्यें कायद्याचें साम्राज्य पाहिजे. व्यक्तीचे हृक स्पष्टपणें निर्दिष्ट होऊन त्याप्रमाणें राज्यव्यवस्था सारखी चालली पाहिजे. अशी जेव्हां सुधारलेली राज्यपद्धति देशांत प्रचलित असेल त्याच वेळीं मालमत्तेला व जीविताला उत्तम सुरक्षितपणा आला आहे, अशी मनुष्याच्या मनाची खात्री होते व मग मनुष्याला श्रम करण्यास स्फुरण येतें व त्यामुळे संपत्तीची झपाट्यानें वाढ होते. कारण या स्थितींतच आपण केलेल्या श्रमांचे चीज होऊन आपल्याला व आपल्या मुलाबाळांना आपल्या श्रमाचा फळें उपभोगण्यास सांपडतील अशी खात्री समाजांतील व्यक्तीच्या मनांत उत्पन्न होते.
 मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा व संपत्तीची वाढ यांचा कार्यकारण संबध आहे हें जगांतील निरनिराळ्या देशांच्या इतिहासावरून सिंद्ध करतां येतें व या याेगें या अमृत कारणाच्या सत्यतेबद्दल
 शंका राहात नाहीं. इतिहासावरून आपल्याला असें दिसून येतें कीं, ज्या ज्या राज्यामध्यें हा सुराक्षितपणा उत्तम प्रकारानें प्रस्थापित झाला आहे, तेथें तेथें संपत्तीची वाढ व देशाची भरभराट झालेली आहे. जेथें जेथें हा सुरक्षितपणा प्रथमपासूनच स्थापित झाला नाहीं तेथें तेथें संपत्तीची वाढ होऊं शकली नाहीं. सुरक्षितपणा व संपत्तीची वाढ यांचा कार्यकारणभाव दाखविणारीं हीं अन्वयव्यतिरेकाचीं निरनिराळ्या देशांचीं उदाहरणें देतां येतात; इतकेंच नाहीं, तर आपल्याला एका देशाच्या निरनिराळ्या स्थित्यंतराचें उदाहरण देतां येतें; म्हणजे जोंपर्यंत देशामध्यें मालमतेचा सुराक्षितपणा स्थापित होऊन तो टिकलेला असतो तोंपर्यंत देशाची सांपत्तिक भरभराट होत असते व ती टिकते. परंतु सुधारलेली राज्यपद्धति जाऊन हा सुरक्षितपणा नाहीसा झाल्याबरोबर सांपत्तिक भरभराटीलाही उतरती कळा लागून तो देश दारिद्र्याच्या खोल दरींत बुडतो. हा सिद्धांत प्रस्थापित करण्याकरितां आतां आपण थोडीशीं ऐतिहासिक उदाहरणें घेऊं व प्रथमतः जुन्याकाळांतील मोठया प्रमाणावरील दोन दाखले घेऊ. पहिला रोमन पादशाहीचा व दुसरा पर्शियन पादशाहीचा.
 जुन्या जगांत रोमन पादशाहीच्या इतकें चिरस्थाई असें दुसरें साम्राज्य झालें नाहीं. परंतु त्याच्या या चिरस्थाईपणाच्या मुळाशीं रोमन लोकांचा कायदा होता असें दिसून येतें. रोमन साम्राज्य हें कायद्याचें साम्राज्य होतें व या कायद्यानें व्यक्तीच्या हकांचें उत्तम रक्षण केल जात असे व यामुळे या साम्राज्यांत मालमत्तेला व जीविताला उत्तम तऱ्हेची सुरक्षितता असे. या व्यक्तीच्या हक्कांच्या पवित्रपणामुळें व मालमत्तेच्या सुरक्षितपणामुळेंच रोमन पादशाहीमध्यें लोक फार सुखी होते व त्या साम्राज्याची कित्येक शतकेंपर्यंत सांपत्तिक भरभराट होत होती. रोमन राज्यपद्धतीमध्यें मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा किती होता व व्यक्तीच्या हक्कांचे रोमन कायदा किती उत्तम त-हेनें रक्षण करीत असे हें दाखविणारी एक आख्यायिका रोमन इतिहासकार सांगत असतात. ही आख्यायिका रोमन राज्याचा जेव्हां फारसा विस्तार झालेला नव्हता तेव्हांची आहे. अशा त्या राज्याच्या बाल्यावस्थेमध्यें सुद्धां राज्यांतील व्यक्तीमध्यें रोमन कायद्याच्या अंमलानें व्यक्तीच्या हक्काबद्दल व करारपालना बद्दल केवढा विश्वास उत्पन्न केला होता हें त्या अख्यायिकेवरुन् दिसून् येतें व असा विश्वास जेव्हां सार्वत्रिक दिसून येतो तेव्हां मालमत्ता व जीवित यांचा सरक्षितपणा पूर्णपणें स्थापन झालेला आहे, असें ह्मणतां येईल व अशा सार्वत्रिक विश्वासाने सांपत्तिकदृष्टया श्रम करण्याची व उद्योग करण्याची हुरूप लोकांमध्यें उत्पन्न होते. ही आख्यायिका हानिबालच्या काळची आहे. हानिवालानें आपल्या मोठ्या सैन्यानिशीं इटालीच्या एका भागामध्यें तळ दिला होता. रोमन राज्यकर्ते त्याचा प्रतिकार करण्याच्या तयारीत् होते; परंतु कोणत्या पक्षाचा जय होईल हें सांगणें कठिण होतें. अशा निश्चित व आणीबाणीच्या प्रसंगांत देशाचे सरकार असतांना दोन रोमन गृहस्थ ज्या जागेवर हानिबालच्या सैन्याचा तळ पडला होता त्या जागेसंबंधीं विक्रीच्या उद्योगांत गुंतलेले होत व एक गृहस्थ आपल्या मालकीची ती जमीन कांहीं किंमतीला दुस-याला विकण्याचा करार करीत होता. या आख्यायिंकेवरुन रोमन कायद्यानें लोकांच्या खासगी व्यवहारावर् केवढा परिणाम केलेला होता हें फार चांगल्या त-हेनें दिसून येतें. यामध्यें रोमन लोकांची आपल्या सरकारची सरशी होणार ही खात्री तर दिसून येते. पण याच्याहीपेक्षां जास्त महत्वाची गोष्ट ही की, या युद्धाचा परिणाम कांहींही झाला तरी आज जे आपण करार करीत आहोंत व आज जी आपण मालकीहककाची अदलाबदल करीत आहोत, त्यामध्यें रतिभरही राज्यक्रांतीनें सुद्धां बदल होणार नाहीं, कायदा आपले नवे संपादित हक पवित्र मानील अशी दृढ समजूत बहुजनसमाजामध्ये रोमन कायद्यानें उत्पन्न करून दिली होती, असें या आख्यायिकेवरून दिसून् येतें.
 या कायद्याच्या अंमलामुळेंच व त्यानें उत्पन्न केलेल्या व्यक्तीच्या मालकाहकावठ्ठलच्या दृढविश्वासानेंच रोमन साम्राज्य इतकीं शतकें टिकलें व जरी कालांतरानें रानटी टयूटन लोकांच्या हल्याखालीं रोमन पादशाहीचा हळू हळ -हास झाला व त्याचे जागी नवीं राष्ट्रॅ निर्माण झाली, तरी या नव्या राष्ट्रांमध्यें रोमन कायदा व त्याची न्यायपद्धति यांचा अंमल कायमच राहिला.
 याच्या उलट उदाहरण ह्मणजे पांशयन साम्राज्यार्च आहे, हे साम्राज्यही स्थापन झालें त्या वेळीं रोमन साम्राज्याप्रमाणे विस्तृत् व ज्या राजांनीं हें प्रथम स्थापन केलें. त्यांचे काळीं त्या साम्राज्यांत सुयंत्रित राज्यव्यवस्था होती व म्हणूनच साम्राज्यांत सांपत्तिक भारभराटही झाली.या साम्राज्याखालीं असणारे प्रांतही फार सुपीक असून सृष्टीदेवीचे जणूं कांहीं आवडते होते. इतकी विपुल स्वाभाविक संपत्ति व सृष्टीशक्ती या प्रांतांत होती. परंतु अशा प्रकारच्या संपत्तीच्य वाढीस अनुकूल सर्व स्वाभाविक गोष्टी असतांना हें प्रांत हजारों वर्षें ओसाड पडले व बहुतेक निर्जन बनले.या सांपत्तिक ऱ्हासाचें कारण पुढील राजांची अनियंत्रित सत्ता व त्याच्या योगानें लोकांना लागलेल्या वाईट संवयी होत.परंतु या सर्व गोष्टींचे पर्यवसान मालमत्तेची व जीविताची सुरक्षितता नाहींसें करण्यांत झालें.कारण या सर्व साम्राज्यांत सुयांत्रित राज्यव्यवस्था राहिली नाहीं.सरदार लोक व जमीनदार आपआपसांत तंटेवखेडे करीत;त्यांना आपल्या शेजारच्या लोकांना लुटून आपली तुमडी भरण्याची संवय लागली.या सवयींमुळें स्वतः श्रम करण्याची बुद्धि कमी झाली व इतर लोकांमध्यें मालमत्तेची सुराक्षितता नाहींशीं झाली.यामुळें संपत्तीचा सर्व झराच मुळीं आटून गेला व हे अत्यंत सुपीक प्रांत ह्लांत व दारिद्र्यांत राहणाऱ्या लोकांचे वस्तीचे प्रांत बनले. तेव्हां पर्शियन साम्राज्याच्या ताब्यांत असलेल्या प्रांताच्या सांपत्तिक अवनतीचें मूळ मालमत्तेच्या व जीविताच्या सुरक्षितपणाच्या आभावांत आहे व हा आभाव अंदाधांदीचा व मोंगलाई राज्यपद्धातीचा परिणाम होय. कारण या हजारों वर्षे बहुतेक ओसाड बनलेल्या प्रांतांत जेथें जेथें सुयांत्रित राज्यपद्धति सुरु होऊन मालमत्तेला व जीविताला सुरक्षितता आलेली आहे तेथें तेथें पुन्हा हे भाग सांपत्तिक भरभराटीच्या मार्गाला लागलेले दृष्टोत्पत्तीस येतात.
 या सिद्धांताचें समर्थक असें अर्वाचीन काळांतील उदाहरण म्हणजे आयर्लेंड देशाचें आहे. त्या देशांत बहुत काळपर्यंत सुव्यावास्थित राज्यपद्धति सुरु झाली नाहीं व तेथील लोकांमध्ये लुटारूपणाची प्रवृत्ति फार काळ राहिली व हा देश रोमन लोकांच्या ताब्यांत कधींच न गेल्यामुळें तेथें रोमन कायद्याची पद्धति युरोपच्या इतर प्रांतापेक्षां फार मागाहून सुरु झाली. खरोखरीं आयार्लेंडात इंग्रजांनीं रोमन कायदे नेले. आयरिश लोकांमध्ये आपआपसांत तंटे करण्याची प्रवृत्ति फार होती. तसेंच अंतःकलह व द्वेष हे फार होते. यामुळें मालमत्तेला व जीविताला विशे षसा सुरक्षितपणा आला नाहीं व ह्मणून त्या देशाची सांपत्तिक स्थिति सुधारली नाहीं. कारण संपत्तीच्या वाढीचा झराच मुळीं फार कालपर्यंत दूषित राहिला.
 हिंदुस्थानचा संगतवार असा इतिहास उपलब्ध नसल्यामुळें इकडील उदाहरणें फारशीं देतां यावयाचीं नाहींत. तरी पण मालमत्तेचा व जीविताचा सुरक्षितपणा व सांपत्तिक भरभराट याचा कार्यकारणसंबंध सिद्ध करतां येण्यासारखीं पुष्कळ उदाहरणें देतां येतील. अयोध्याप्रांताचें एक उदाहरण आहे. हा प्रांत फार सुपीक असून कांहीं कांहीं नबाबांच्या कारकीर्दींत तो फार भरभराटींत होता. परंतु पुढील नबाबांची कारकीर्द फार जुलुमी व अंदाधुंदीची झाल्यामुळें राज्यांत सुनियंत्रित राज्यपद्धति नाहींशी झाली व त्यामुळेंच त्या प्रांताची भरभराट नाहींशी होऊन तो प्रांत कांहीं कालपर्यंत उजाड पडल्यासारखा झाला. अकबराच्या कारकीर्दीमध्यें राज्यव्यवस्था फार चोख असल्यामुळें व जिकडे तिकडे उत्तम शांतता नांदत असल्यामुळें त्या कारकीर्दीत लोक सुखी होते व एकंदर देशामध्यें सुबत्ता नांदत होती. परंतु अवरंगजेबाच्या कारकीर्दीपासून अंदाधुंदीस व अंतःकलहास सुरुवात झाली व अकबराच्या काळीं प्रस्थापिंत झालेली शांतता व त्यायोगानें उत्पन्न होणारा सुरक्षितपणा कमी झाला व त्याचा परिणाम देशांतील सांपत्तिक स्थितीवर झाल्याखेरीज राहिला नाहीं असें इतिहासावरून दिसून येतें.
 संपत्तीच्या उत्पत्तीचें व वाढीचें दुसरें अमूर्त कारण म्हणजे मानवी वासना व त्यांची वाढ हें होय. मनुष्याच्या सुखाचें खरें साधन वासनांची वाढ किंवा वासनांचा छेद हा एक नीतिशास्त्रांतील मोठा वादग्रस्त प्रश्र आहे; व सर्व देशांत दोन्ही प्रकारचीं मतें मोठमोठ्या तत्ववेत्यांनीं प्रतिपादन केलेलीं आहेत. हिंदुस्थानांत आमच्या तत्वज्ञानाचा बहुधा कटाक्ष वासनाछेदाकडेच दिसून येतो. 'जहीहि धनागमतृष्णाम्' हें आमच्या तत्वज्ञान्यांच्या उपदेशाचें पालुपद आहे. परंतु या ठिकाणीं या वादाशीं आपल्याला कांहीं एक कर्तव्य नाहीं. आपल्याला फक्त येथें अर्थशास्त्रदृष्ट्या वासनांचा विचार करावयाचा आहे, व या दृष्टीनें त्यांची वाढ ही संपत्तीस व समाजाच्या आधिभौतिक सुधारणेस अत्यंत आवश्यक आहे यांत कांहींएक संदेह नाहीं. मनुष्याच्या अगदीं  रानटी स्थितींत मनुष्य व पशु यांच्या वासनांत फारसें अंतर नसतें. दोघांचीही राहण्याची तऱ्हा व उपजीविकेचे उद्योग यांमध्येंही साम्य असतें. तरी पण मनुष्यामध्यें विचारशक्ति व कल्पना हे दोन गुण विशेष आहेत. मनुष्यस्वभावांतील हे दोन गुण संस्कृतामधील दोन प्रसिद्ध सुभाषितांमध्यें मोठ्या मार्मिक रीतीनें सांगितले आहेत. मात्र विचारशक्तीऐवजी पहिल्या सुभाषितांत धर्म हा मनुष्याचा विशेष म्हणून सांगितला आहे. परंतु खरा धर्म हा नेहेमींच विचारशक्तीपासून निष्पन्न होतो. मनुष्याला विचारशक्ति आहे म्हणून तो या अनंत विश्वाच्या गुढाचा विचार करूं लागतो व त्याचें जें उत्तर त्याला सयुक्कि दिसतें त्यालाच ताे आपला धर्म मानूं लागताे. म्हणून अर्वाचीन कल्पनेला अनुसरून या सुभाषितांत थोडा फरक करून ती खालीं देतों.

     “आहारनिद्राभयमैथुनं च । सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |
     मतिर्हि तेषांमधिको विशेषः । मत्या विहीनाः पशुभिः समानाः ॥”
     “ साहित्यसंगीतकलाविहीनः । साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
     तृणं न खादन्नपि जीवमानः । तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥”
 या दोन गुणांपासून मनुष्याच्या पशुतुल्य वासनांचें किती तरी निरनिराळ्या प्रकारांत रुपांतर होतें; व शिवाय या दोन गुणांपासून आणखीही नव्या नव्या हजारों वासना उत्पन्न होतात. पशूपक्षी घरट्यांत किंवा ढोलींत राहतात. मनुष्यें प्रथमतः पशूप्रमाणेंच ढोलींत राहत असली तरी त्यांना झोंपडी बांधण्याची वासना होते व अगदीं रानटी झोंपडी व सर्वांगसुंदर अर्वाचीन राजवाडा यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे व हें अंतर मनुष्याच्या विचारशक्तीचा व सौंद्र्यकल्पनेचा प्रभाव होय. इतर प्रा यांना थंडीवा-या- पासून संरक्षण करण्याकरतां केंस व लोकर हीं नैसर्गिक साधनें देवानें दिलीं आहेत. मनुष्याला आपलें संरक्षण करण्यास बाह्य साधने लागतात व पशूंच्या कातड्यापासून व झाडांच्या सालींच्या वल्कलांपासून तो हल्लींच्या हजारों ताऱ्हांच्या सुंदर कापडापर्यंत मानवी वासनांचें केवढें तरी रूपांतर झालें आहे. परंतु मानवी वासना निवळ विषयसुखाबद्दलच असतात असें नाहीं. मनुष्याच्या बुद्धीमुळे त्याच्यामध्यें किती तरी बौद्धिक वासना उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे मनुष्यास ज्ञानाची लालसा उत्पन्न हेातेा. त्याला पुस्तकाची व वाचनाची जरुरी लागते. सारांश, मनुष्याच्या वासनांची

वाढ अक्षरशः अमर्याद आहे. आतां वासनांची वाढ समाजाच्या आधिभौतिक सुधारणेचें मूळ होय, हें खालील विवेचनावरून ध्यानांत येईल.
 वासनाछेदाचें उद्दिष्ट जर मनुष्यानें आपल्यापुढें ठेविलें व त्याप्रमाणें जूर बहुजनसमूजावें खरोखरीच वर्तन होऊं लागलें तर संपत्तीच्या आधिभौतेिक सुधारणेची देोलेजंग इमारत ढांसळून पडलीच पाहिजे. समाजांतील सर्व व्यकी जर ग्रीक संन्याशी डायोजिनीसनपणें एका द्रोणांत राहूं लागल्या व त्यांच्या उपजीविकेला जर सृष्टींतील नैसर्गिक फळमुळेच पुरेशीं झाली तर सर्व उद्योगधंद्रे व त्यांबरोबरच समाजांतील अधिभौतिक सुधारणा रसातळास गेली पाहिजे. किंवा आमच्या इकडील खऱ्या. निवृत्त साधूंप्रमाणे सर्व लोक सर्वसंगपरित्याग करून रानांत राहून फळांमुळांवर उपजीविका करूं लागले तर सर्व शहरें व त्यांतील सर्व धंदे नाहींसे झाले पाहिजेत हें उघड आहे.
 मानवी वामना किंवा अर्थशास्त्रांतील शब्द 'मागणीˈ व ‘ख यावर संपत्तीची उत्पति अवलंबून आहे, हें विधान कांहीं अंशां विरोधाभासात्मक आहे. संपत्तीची उत्पति त्याच्या खपावर म्हणजे त्याच्या उपभोगावर अगर नाशावर अवलवून आहे असा अर्थ होतो. परंतु याच्या सत्यतेबद्दल सर्व मानवी सुधारणा साक्ष देईल. कारण सर्व मानवी सुधारणा ह्मणजे मनुष्याच्या वासनांची वाढ व त्या तृप्त करण्याच्या विपुल साधनांची वाढ होय. व जसजसें मानवी गरजा व वासना यांचें स्वरूप मनुष्याच्या ज्ञानवृद्धीनें त्याच्या परिस्थितिभेदामुळें बदलत जातें तसतशी समाजांत उत्पन्न होणारी संपत्ति हिचें स्वरूपही बदलत जातें. उदाहरणार्थ, एका काळीं मनुष्याचें स्वसंरक्षणाचें साधन व लढाईचें व सैन्यातील शिपायाचें हत्यार म्हणजे तिरकमठा होता व तिरकमठा, तीर व भाता करण्याचा धंद्रा म्हणजे एक संपतेि उत्पादन करणारा धंदा होता. परंतु तो आतां कोठें गेला ? हजारों प्रकारचीं शस्त्रात्रे कोठे गेलीं? पूर्वींच्या काळच्या चिलखताचें काय झालें ? एखाद्या पदार्थसंग्रहालयांीिल शस्त्रागाराकडे दृष्टि फॅकली म्हणजे या बाबतींत केवढी क्रांति झाली आहे हैं दिसून येईल. म्हणजे मनुष्यांनीं केलेल्या नव्यानच्या शोथांनी मनुष्याच्या व राष्ट्राच्या संरक्षणाची गरज जरी कायम असली तरी त्याचे स्वरूपांत विलक्षण बदल झाला व यामुळें जसजशी मागणी बदलली तसतसे जुने धंदे नाहींसे होऊन त्याचे ठिकाणीं नवे धंदे आले. हाच प्रकार सर्वत्र दिसून येतो. हिंदुस्थानच्या एका शतकाच्या पूर्वीच्या व हल्लीच्या काळाकडे पाहिलें तरीही हेंच दिसून येईल. ज्या ज्या गरजांचें रुपांतर झालें आहे त्यासंबंधींचे जुने धनोत्पादक धंदे जाऊन त्याचे ठिकाणीं नव्या गरजा भागविणारे धंदे आले किंवा या गरजा परकी देशांतील मालानें भागवितां येऊ लागल्या.
 सारांश, संपत्तीच्या मागणीवर संपत्तीची उत्पत्ति अवलंबून आहे हें वरील विवेचनावरून उघड दिसून येईल. निवळ गरजा वाढून उपयोग नाहीं हे खरें. तर त्या गरजा तृप्त करण्यास लागणारें सांपत्तिक सामर्थ्यही लोकांमध्यें आलें पाहिजे हें निर्विवाद आहे. परंतु वासना उत्पन्न झाली म्हणजे मनुष्य ती तृप्त करण्याच्या उद्योगाला लागती व श्रम करून ती वासना तृप्त करण्याचीं साधनें म्हणजे संपत्ति मिळवू लागतो. आफ्रिकेंतील पुष्कळ नीग्रो जाती या श्रम करण्यास मुळींच तयार नसतात. कारण त्यांच्यामध्यें वासनाच उत्पन्न झालेल्या नसतात. परंतु निरनिराळे पदार्थ दाखवून व त्याचा उपयोग शिकवून त्यांच्या वासनाशक्तीला एकदां चालन दिलें म्हणजे अशा जाती श्रम करण्यास प्रवृत्त होतात असा पुष्कळ मिशनरी लोकांनीं आपला अनुभव लिहून ठेविला आहे. ज्या समाजांतील व्यक्तीमध्यें वासना व गरजा यांच्या अल्पतेमुळे समाधानी वृत्ती असते तेथें संपत्तीच्या वाढीस वावच नसतो. ही समाधानवृत्ति नाहींशी होऊन वासनांच्या व गरजांच्या वाढीने असमाधान किंवा असंतोष उत्पन्न होणें ही सांपत्तिक प्रगतीची पहिली पायरीच होय. ‘असंतोषःश्रियोमूलम् ? या संस्कृत म्हणीचे रहस्य यांतच आहे.
 मागणीचा संपत्तीच्या उत्पत्तीवर व वाढीवर कसा फलदायक परिणाम होतो यांचें ताजें उदाहरण हिंदुस्थानांतील गेल्या चार पाच वर्षांचा औद्योगिक इतिहास होय. कांहीं राजकीय व औद्योगिक कारणामुळे जी देशी मालाला मागणी उत्पन्न झाली त्याच्या योगानें गेल्या चार पांच वर्षांमध्यें हिंदुस्थानांत किती तरी झपाट्यानें संपत्तीची वाढू झाली आहे हे सर्व श्रुतच आहे. या मागणीमुळे जे लोक आपआपली धंदे टाकून नवीन धंद्याला लागू लागले होते ते लोक आपल्या पूर्वीच्या धंद्याला परत आले  व आपला धंदा फायदेशीर रीतानें करूं लागले. तसेंच किती तरी नवे उत्पादक धंदे आस्तित्वांत येऊ लागले आहेत.
 संपत्नीच्या उत्पत्तीची वर विवेचित अमूर्त कारणें यांकडे आभिमतपंथानें अगदीं कानाडोळा केला; किंवा यांचें अस्तित्व व महत्व हें त्यांच्या ध्यानांत नव्हतें व म्हणून त्यांनीं काढलेले पुष्कळ सिद्धांत खोटे व प्रत्यक्ष व्यवहाराला कुचकामाचे आहेत अशा प्रकारचे आक्षेप कांहीं आधुनिक ग्रंथकारांनीं काढलेले आहेत. रिकाडाच्या उदाहरणानें या शाखाला ज तर्किक स्वरुप आलें त्याचा परिणाम अर्थशास्त्रांतील कांहीं सिद्धांतांवर झाला खरा; परंतु हा आरोप अभिमतपंथाच्या जनकावर लागू करतां येत नाहीं. सर्व संपत्त्तीची अंतिम हेतु उपभोग किंवा व्यय आहे हें अडाॅम स्मिथ नें पुष्कळ ठिकाणी स्पष्टपणें सांगितलें आहे, इतकेंच नव्हे तर संपत्तीची वाढ ही खपावर किंवा मागणीवर अवलंबून आहे हेंही अॅडाम स्मिथला ठाऊक होतें व तें त्याच्या एका विधानावरून सिद्ध करितां येतें. अॅडम स्मिथनें आपल्या पुस्तकाच्या प्रथमारंभींच श्रमविभागाच्या तत्त्वाचा उहापोह केला आहे व या तत्वाचा संपत्तीच्या वाढीस केवढा मोठा उपयोग होतो हें सप्रमाण सिद्ध केलें आहे. परंतु श्रमविभागाचे तत्व अमलांत येणें हें बाजाराच्या परिघावर अवलंबून आहे असें त्यानें याच विवेचनांत सांगितलें आहे. म्हणजे कोणत्याही धद्यात श्रमविभागाचें तत्व अमलांत येणें न येणें हें खपावर किंवा मागणीवर अवलंबुन आहे. आतां श्रमविभागावर संपत्तीची वाढ अवलंबून आहे. अर्थात संपत्तीची वाढही खपावर किंवा मागणीवर अवलंबून आहे हे उघड झाले.
 यावरून अभिमतपंथाच्या प्रवर्तकांस हीं अमूर्त कारणें अश्रुतपूर्व होतीं व म्हणून त्यांची सर्व इमारत डळमळीत पायावर उभारलेली आहे, या आरोपास फारशी जागा नाहीं. वस्तुस्थािति अशी आहे की, हीं अमूर्तकारणे या पंथानें सुव्यवस्थित व प्रगतीच्या मार्गात असणाच्या समाजात असतात असें गृहीत धरून आपलें विवेचन केलें आहे. हीं अमृतकारणें स्पष्टपण सतत डोळ्यांपुढें न ठेवल्याकारणानें केव्हां केव्हां त्यांच्या विवेचनांत व विचारसरणींत चुक्या झाल्या आहेत, ही गोष्ट खरी वं अशा चुक्या दाखविणें निराळे व त्यांचे सर्वच ग्रंथ केराच्या टोपलीत  टाकण्याच्या योग्यतेचे आहेत असें म्हणणे वेगळे. या दुस-या म्हणण्याला तज्ञ मनुष्य कांहींच मान देणार नाहीं. परंतु हीं अमूर्तकारणें ह्मणजे सर्व कारणसर्वस्व नव्हे. संपत्तीच्या वाढीस पुष्कळ मूर्तकारणें हीं लागतात व त्याशिवाय नुसत्या अमूर्त कारणाच्या आस्तित्वानेंच संपत्ती उत्पन्न होणार नाहीं हेंही निर्विवाद आहे. तेव्हां पुढील भागांत या मूर्त कारणांचा विचार करु.