बालमित्र भाग २/यमामुलगी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

यमा मुलगी. २११ णी खरा, परंतु ह्या तुझ्या उत्तम वागणुकेने आमचे जन्म सफळ झाले. असें ह्मणून तिघेही रडली. त्या काळी रामा शुद्धीवर आला होता, ह्मणून त्याने आई. बापांस प्रार्थना केली की, मी आजपर्यंत केवळ दुरा- चरणी होतो, परंतु इतःपर माझी वर्तणूक पाहून तु. झांस अतिशयित आनंद होत जाईल. इतक्यांत शेजारीण मातारीही काहीं अन्न घेऊन आली, तिने रामाचे उत्तम आचरण पाहिले, तेणेकरून तिचाही कंठ सद्गदित झाला, आणि तिनें रामास आ- शीर्वाद दिला. मग त्या चौघांनीही एके पंगतीस बसून भोजन केले. असें भोजन त्यांनी पर्वी कद्धीही केले नव्हते. त्यादिवसचा जो आनंद त्याच्या योगेकरून त्या उ- भयतांची प्रकृति दिवसें दिवस चांगली होत चालली, तेणेकरून रामासही अतिशयित सुख मिळं लागले. आणि त्यादिवसापासून त्याचे शेजारी पाजारी त्याज- वर पुत्रापेक्षा अधिक ममता करूं लागले. यमामुलगी. यमा पांच वर्षांची मुलगी होती; ती आपले आई . वर फार प्रीति ठेवीत असे, व सदा सर्वदा तिजपाशी रहावयास इच्छी; आईचा क्षणमात्र वियोग तिला सो. २१२ बाळमित्र. सावयास कठीण पडे. एकेदिवशी यमाची आई बाजा. रांत जावयास निघाली, ते समयीं यमाने आईपाशी भारी छंद घेतला की, मला बरोबर बाजारांत ने; तेव्हां तिची आई ह्मणाली, तूं बाजारांत माझा पायगोंवा करशील; तूं कांहीं येऊं नको. यमा ह्मणाली. मी तु. ला कांहीं एक उपद्रव देणार नाहीं; ह्याप्रमाणे तिने अतिशयित आग्रह केला ह्मणून यमास आईने बरोबर घेतलें. मग उभयतां मायलेकी बाजारांत जावयास समागमें निघाल्या. त्यांचे घरापासून बाजार फार लांब होता. त्या रस्त्याने मनुष्यांची दाटीही फार होती, त्यामुळे अ- सें झालें की, यमाने आईचा पदर धरला होता तो हातचा सुटला, तेव्हां पुढे जातां जातां बाजाराजवळ पोहोंचे पर्यंत यमा आपले आईस चुकून मागे राहिली, तथापि यमाने आईस सहजांत आटोपले; पण तो बा. जारचा घोळका मोठा त्यांत तिनें सावधपणे चालावे ते न करितां माकडांचा तमाशा होत होता तो पाहण्याचे नादास लागून तेथेच उभी राहिली, मग पुढे वळून जों पाहते तों आई कोठे नाही; तेव्हां लौकर पुढे धावून गे- ली तरी आई दृष्टीस पडेना; तेव्हां एके उमाठ्याचे जा- ग्यावर उभी राहून पांचचार वेळां हाका मारल्या तरी आई ओ देईना, मग कावरी बावरी होऊन आईला इ. कडे तिकडे पाहूं लागली, पण आई कोठेही दृष्टीस प. डेना, व तिचा शब्दही कानावर येईना; मग तर फा२१३ यमा मुलगी. रच घाबरी झाली. लोकांच्या दाटीमध्ये जावयास तिला धैर्य होईना, तव्हां ती एकीकडे उभाराहून आ- ई आई ह्मणून अतिशयेंकरून रडूंलागली. त्या वाटेने जाणारे येणारे लोकांनी तिला पाहिलें, त्यांतून एकजण ह्मणाला, पहा, ही मुलगी संकटांत पडून धायमाय माकलन रडते आहे. दुस-या कोणका- ने विचारले, मुली, तुला काय झाले? यमाने उत्तर दि- ले की, आईची व माझी चुकामूक पडली, तव्हां तो ह्मणाला, मुली चिंता करूंनको, तुझी आई तुला लौ- करच भेटेल. तिसरा ह्मणतो, मुली, उगीच कां रडतेस ? तुझ्या ओरडण्याने आई येते की काय ९ याकरितां उगी ऐस. ह्या प्रमाणे बहुतेक लोक तिजशी एक दोन शब्द बोलून जात. असें होता होतां अकस्मात् प्रारब्ध यो- गाचे बळे करून त्याच वाटेने एक लंगडी गवळण जात होती तिने यमास त्या क्लेशांत पाहिले, तेव्हां तिचे मनांत कळवळा आला, आणि उभी राहून ती यमास ह्मणते, मुली, जेव्हां आईची तझी चकामूक झा- ली तेव्हां तुझी आई कोठे जात होती १ यमाने उत्तर केले की, ती बाजारांत कापड ओळीकडे जात होती; तेव्हां गवळण ह्मणाली की, मुली, रडूंनको, मा बा- जारांतच जाते, तिकडे तुझी आई सांपडेल. असे ऐ. कतांच यमानें त्या गवळणीचा पदर बळकट धरिला, आणि दोघीजणी लौकरच बाजारांत गेल्या; तेथें यमा२१४ बाळमित्र. ने आईस पाहतांच मोठ्या आनंदाने हाक मारली; ती हाक आईचे कानी पडतांच लगबगीने धावून ये. ऊन तिने यमास पोटाशी धरले, आणि ह्मणाली की, तूं मजपासून चुकून कोणीकडे गेलीस ह्यामुळे मी फार काळजीत पडले होते. मग यमाने रडतरडत सारे वर्त। मान आईस सांगितले की, मी तेथें माकडांचा तमाशा पहावयास उभी राहिले, आणि पुढे पाहातें तंव तूं कोठे दिसेनाशी झालीस; तेव्हां तुझें नांव घेऊन म्यां पुष्कळ हाका मारल्या, तरी तुझा ठिकाणा कोठे नाही; शेवरी ह्या गवळणीने मजवर दया करून लोकांचे दा. टींतून संभाळून आणून मला तुजजवळ पोहोंचते केले. हे ऐकून यमाचे आईने त्या गवळणीचा मोठा उपकार मानिला, आणि तिची फार फार स्तुती करून तिजज- वळ जें बाकी लोणी राहिले होते ते घेऊन तिने मागितल्यापेक्षा अधिक पैसे तिला दिले. उभयतां मा. यलेकींनी घरी पोहोंचे पर्यंत त्या गवळणीचे उपका. रा शिवाय दुसरी कांही एक गोष्ट काढली नाही. कितीएक दिवसांनंतर यमाने त्या गवळणीचे घरी जाण्याविषयी आईला विचारून एक चोळी लुगडे घे- ऊन तीस नेऊन दिलें, व तिचे सामर्थ्य होते त्याप्र. माणे तिने त्या मातारीचा समाचार घेतला. पुढें को. णतेही एखादें संकट त्या मातारे गवळणीस प्राप्त झालें असतां तिला त्यांतन सोडविण्याविषयी यमा अति आ. नंदानें सहाय होई. अशी प्रीति परस्परांची एकमेकीवर