बलसागर

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
बलसागर (Balsagar).pdf
बलसागर


हिंदी, हिंदू आणि भारतीय राष्ट्रवाद
या विषयावरील लेखांचा संग्रहश्री. ग. माजगावकर
राजहंस प्रकाशन, पुणे


प्रकाशक
दिलीप माजगावकर
राजहंस प्रकाशन
१०२५ सदाशिव पेठ
पुणे ४११ ०३०


मुद्रक
सुरेश स. जगताप
जनसेवा मुद्रणालय
१९२ शुक्रवार पेठ
पुणे ४११ ००२


प्रथमावृत्ती
१४ जानेवारी १९८४
(मकरसंक्रमण)

© सर्व हक्क लेखकाधीन

मुखपृष्ठ
संजय पवार

मूल्य
तीस रुपये________________

नव्या भारतीय राष्ट्रवादाचे हे शब्दरूप. ते प्रत्यक्ष कृतीत आणणारे मिरज-म्हैसाळचे दलितमित्र' श्री. मधुकरराव देवल यांना | हा संग्रह सप्रेम व सादर भेट. लेखक ________________

लेखानुक्रम 5 6 W w Om w O W ७० ७६ ८० स्वातंत्र्य जेव्हा मिळाले स्मरण कच्छ करार सीमोल्लंघन सावरकर पर्व मुक्काम श्रीनगर एकविसाव्या शतकाचे महाद्वार ! विजय माध्यान्ह ! आसाम | शिवाजी । खैबर मोरादाबाद आणि मल्लापुरम् मीनाक्षीपुरम् । हिंदुत्व | भारतीयत्व जन्मशताब्दी : एका आधुनिक चार्वाकाची स्वतत्त्व आणि सुतत्त्व दंगली केव्हा थांबतील ? राष्ट्रीय एकात्मता की राष्ट्रीय पुरुषार्थ ! काश्मिर : अधिक हिरवे ! खड्गहस्त रा. स्व. संघाचे महाशिबिर श्रीगुरुजी अखंड भारत मणिकांचन हा प्रवाह आला कोठून ? आणला कोणी ? सामर्थ्य आहे चळवळीचे एकात्म मानव ८७ ९७ १०१ १०५ ११० ११४ ११७ १२२ १३५ १४६ १५२ १५६ १६३ ० लेखांची प्रथमप्रसिद्धी : साप्ताहिक माणूस ________________

| स्वातंत्र्य जेव्हा मिळाले भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे दोन-चार विभूतींच्या प्रयत्नांचे व पराक्रमांचे गौरवगान, असे समीकरण आज जवळजवळ रूढ आहे. मग कोणी आपापल्या पूर्ववयातील संस्कारांमुळे वा अनुभवांनी झालेल्या मतांप्रमाणे * वासुदेव बळवंत ते सुभाषचंद्र' या सशस्त्र क्रांतिकारकांची गीते गातील, तर कोणी साबरमतीच्या संताला मनोभावे शरण जातील. जणु समाज म्हणजे एक निर्जीव मातीचा गोळा होता आणि जो आकार त्याला देण्याचा या विभूतींनी प्रयत्न केला, तो आकार त्याने निमूटपणे बिनतक्रार धारण केला. या व्यक्तिप्रधान विभूतिपूजक मांडणीमुळे इतिहासाची चाके पक्षपाताच्या व वैयक्तिक गणदोषदिग्दर्शनाच्या ठराविक चाकोरीत रुतून बसतात व विशिष्ट घटनेपासून जो काही बोध वा समज भावी पिढ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा असते, ती सफल होत नाही. गांधी, नेहरू, वल्लभभाई या व इतर व्यक्तींचा मोठेपणा व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली कामगिरी कमी लेखण्याचा मुळीच हेतु नाही. परंतु एक गोष्ट जाणवते की, स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या आणीबाणीच्या व महत्त्वपूर्ण कालखंडांत या व्यक्ती व एकंदरीत त्यावेळचे आमचे सर्वच नेतृत्व अगतिकपणे, येईल त्या परिस्थितीचा स्वीकार करीत होते. तसे पाहिले, तर देशाची फाळणी यांपैकी कोणालाच नको होती. नेहरू, गांधीजींनी शेवटपर्यंत तिला विरोधच केला. मग मनापासून नको असलेली फाळणी या नेत्यांना को मान्य करावी लागली ? जीनांनी दिलेले यादवी युद्धाचे आव्हान स्वीकारून, फाळणीची योजना धिक्कारून टाकण्याचे धैर्य या नेत्यांना त्या ऐतिहासिक क्षणी का दाखविता आले नाही ? ।। बलसागर ।। १ ________________

इथेच नेत्यांच्या वैयक्तिक गुणावगुणांपेक्षा त्यांच्या मागच्या सामाजिक शक्तींचा मागोवा घेण्याची गरज भासू लागते. कारण गांधी, नेहरू जसे फाळणीच्या भवितव्यतेला अगतिकपणे शरण गेले, तसेच देशातील इतर पक्ष, त्यांचे नेते व अनुयायी, या सर्वांना फाळणी अमान्य असूनही, कोणीही तिच्याविरुद्ध ब्र काढला नाही, ही वस्तुस्थिति आहे. देशात त्यावेळी कम्युनिस्ट पक्षाची क्रांतिकारक संघटना होती; अखंड भारताचा उद्घोष करणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटनाही चांगल्याच जोरावल्या होत्या. मग यांपैकी कोणी फाळणीविरुद्ध आवाज उठवू नये, आंदोलने, सत्याग्रह, सशस्त्र प्रतिकार इत्यादी मार्गांनी आपला विरोध व्यक्त करू नये, याचा अर्थ काय ? आमचे बेचाळीसचे क्रांतिवीर आणि प्रतिसरकारांचे संस्थापक त्यावेळी कोठे होते ? काँग्रेस नेत्यांच्या अगतिक शरणागतीएवढीच काँग्रेसेतर संघटनांची ही निष्क्रीयताही दोषास्पद नाही का ? तसे पाहिले, तर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या देशासमोर काही जगावेगळी भयंकर संकटे उभी होती असे म्हणवत नाही. आफ्रिकेतील नवस्वतंत्र राष्ट्रांना कोणत्या दिव्यातून पार पडावे लागत आहे ते आपण आज पाहतच आहोत. एवढासा चिमुकला अल्जेरिया ! जगाच्या इतिहासात तोड नाही एवढा प्रखर व रक्तरंजित स्वातंत्र्य संग्राम या शूर देशाने लढवला ! पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या ऐन क्षणीच या दवीयुद्धाचे सांवट त्यावर पसरले गेले. इतके की, आपला पहिलावहिला स्वातंत्र्योत्सवही बिनघोरपणे या देशाच्या नागरिकांना साजरा करता आला नाही. आठ दिवस साजरा होणारा विजयोत्सव दुस-याच दिवशी बंद ठेवावा लागला. आणि एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर पुढेही अशा त-हेची संकटे देशासमोर येत नाहीत असे थोडेच आहे ? शंभर वर्षे स्वातंत्र्याचा उपभोग घेणा-या अमेरिकेसमोर १८६७ साली अंतर्गत यादवीचे अरिष्ट उभे राहिलेच ना ? त्यावेळी दक्षिणेकडील संस्थानांच्या बंडाळीला शरण जाऊन अमेरिकेची फाळणी करण्यात आली असती, तर आजची अमेरिका जगाला दिसली असती काय ? जो विवेक जे धैर्य लिंकन दाखवू शकला, ते, आमचे गांधी, नेहरू का दाखवू शकले नाहीत असा प्रश्न आहे. कायदेआझमांनी पिस्तुल चालवण्याची धमकी दिली. प्रत्यक्षात कलकत्त्याचे हत्याकांड पेटवून आपण काय करू शकतो याचे प्रात्यक्षिकही त्यांनी काँग्रेसनेत्यांसमोर ठेवले. पंजाबमधील परिस्थिती तर इतकी भयानक होती की, ती पाहून पंडितजी हतबलच झाले व पंजाबची फाळणी मागण्याशिवाय त्यांना काही पर्यायच सुचला नाही. एकदा पंजाबची फाळणी मागितल्यावर त्याच नात्याने देशाची फाळणी त्यांच्या-काँग्रेसच्या गळ्यात बांधणे जिना-माउंटबॅटन यांना मुळीच जड गेले नाही. एवढ्या घिसाडघाईने व तडकाफडकी के चिरफाडीचे काम उरकण्यात आले की, साधा शिपीदेखील एखादा सूट बेतून ।। बलसागर ।। २ ________________

फाडताना यापेक्षा अधिक काळजीपूर्वक हात चालवतो. सिमल्याच्या व्हाइसरीगल लॉजमध्ये व्हिस्कीची एक जोरदार चषक ठोकून चार तासात व्ही. पी. मेनन फाळणीची योजना कागदावर उतरवतात काय, माऊंटबॅटन घाईघाईने योजनेला नेहरूंची संमती घेतात काय आणि अॅटलीसाहेब अवघ्या पाच मिनिटात तिच्यावर शिक्कामोर्तब चढवतात काय ? आकाशातून भगवान् शंकराच्या मस्तकावर, तेथून हिमालयावर, तेथून सपाट भूप्रदेशावर, तेथून अनेक मुखांनी सागराकडे वहात जाणा-या भागिरथीप्रमाणेच, आमच्या पूज्यस्थानी असणा-या या नेत्यांचा ‘राष्ट्रीय अधःपात' टाळण्याची एकच संधी व वेळ हीच होती. पेटलेल्या कलकत्त्याचे आणि धुमसणा-या पंजाबचे आव्हान स्वीकारणे ! स्वातंत्र्य कोठेही जात नव्हते. ब्रिटिश सरकार पेचात सापडले होते. स्वातंत्र्य देण्याशिवाय त्यांना गत्यंतरच नव्हते. ही परिस्थिती त्यावेळच्या सर्व मुत्सद्यांना पूर्णपणे समजलेली होती. हुकमाचे पान काँग्रेस नेत्यांच्या हातात पडण्यास फार तर थोडा अवधी लागला असता एवढेच ! परंतु फाळणी आणि त्यामुळे घडून आलेल्या कत्तली निश्चित टाळता आल्या असत्या. भारताने अहिंसेने स्वराज्य मिळविले' या आत्मप्रौढीला सत्याचा थोडा तरी आधार मिळाला असता ! आणि फाळणी पत्करून कोणते प्रश्न सुटले ? कोणत्या समस्या हातावेगळया केल्या ! काश्मिरच्या सीमेवर पाकिस्तानी आक्रमण थोपवून धरण्यासाठी देशाच्या तिजोरीतून रोज काही लाख रुपये खर्ची पडत आहेत. महाराष्ट्राच्या तृतीय पंचवार्षिक योजनेला केन्द्रीय सरकार जेवढी मदत करणार आहे, त्यापेक्षा अधिक रकमेचा-पाचशे कोटी रुपयांचा भूर्दड पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी भारताला सहन करावा लागला आहे. देशात मुस्लिम लीगचे भूत जिवंत आहे ते आहेच. भारतातील कोट्यवधी मुसलमानांचा भारताच्या निधर्मी राजवटीवर विश्वास नाही तो नाहीच. सिंधू नदीचे पाणी द्या, वर कोट्यावधी रुपयांची दक्षिणा द्या; मंगला धरणाखाली गावे जाऊ द्यात, त्रिपुरात पन्नास हजार पाकिस्तान्यांचे तळ पडू द्यात-आणि तरीही फाळणीने हिंदु-मुसलमानांचा प्रश्न मिटला, या समाधानात आम्हाला राहू द्या! तेव्हा भेडसावणारे सर्व प्रश्न आजही कायम आहेत, ही गोष्ट कोणालाही नाकारता येत नाही. मग तेव्हाच हा सारा पुढचा विवेक पाहून फाळणी धिःकारली का गेली नाही ? जे लिंकनला साधले, ते आम्हाला का साध नये ! शीखांच्या स्वतंत्र भाषिक राज्याची मागणी फेटाळून लावताना नुकतेच पं. नेहरू गरजले, " देश यादवी युद्धाच्या खाईत लोटला गेला तरी चालेल, पण देशाचे यापुढे तुकडे मी होऊ देणार नाही." हीच भाषा, पंडीतजी, १५ वर्षापूर्वी उच्चारली असतीत तर ! तर साक्षात् नगाधिराज हिमालयालाही आपल्या उत्तुंग महिमानाचा हेवा करावासा वाटला असता ! ।। बलसागर ।। ३ ________________

पंधरा वर्षांपूर्वी देशातील राष्ट्रवादी शक्ती कमजोर होत्या, हेच या ऐतिहासिक पराभवाचे मूळ सामाजिक कारण आहे. राष्ट्रवाद हे आधुनिक काळातील उदयोन्मुख भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे राजकीय तत्त्वज्ञान आहे. या तत्त्वाच्या यशासाठी जे संघर्ष खेळावे लागतात, त्यासाठी जुन्या सरंजामशाही युगातील धार्मिक व जातीय निष्ठांना मागे टाकून शुद्ध राष्ट्रीय जाणीवा धारण करणारा नवा वर्गच समाजात प्रभावी व्हावा लागतो. हा औद्योगिक क्रांतीमुळे पुढे आलेला, स्वदेशी कारखानदारीवर वाढलेला व पोसलेला नवा वर्गच प्रसंगविशेषी कणखर राष्ट्रीय नीती आचरू शकतो व जुन्या निष्ठांच्या उद्रेकांशी समोरासमोर सामना देण्यास समर्थ असतो. औद्योगिक क्रांतीतून जन्मास आलेला समाजच राष्ट्रवाद समजू शकतो, पेलू शकतो, त्याच्या यशासाठी झगडू शकतो. कारण त्या समाजाच्या भौतिक विकासाआड जुन्या, धार्मिक व जातीय निष्ठा येत असल्याने त्यातून बाहेर पडण्याकडे त्याची स्वाभाविक अंतःप्रवृत्तीच असते. लिंकनच्या मागे उत्तर अमेरिकेची औद्योगिक क्रांती व त्यानुषंगाने पुढे आलेला कारखानदारवर्ग व पांढरपेशा समाज उभा होता. म्हणूनच तो निग्रोंच्या गुलामगिरीवर जगणा-या अमेरिकेतील दक्षिण संस्थानांच्या यादवीला तोंड देऊ शकला, तिचा बीमोड करून अमेरिकेतील नवी औद्योगिक क्रांती स्थिरावू शकला. आमच्या गांधी-नेहरूंच्या किंवा सरदारांच्या मागे कोण होते ? भांडवलदार जरूर होते; पण औद्योगिक क्रांती नव्हती. खरी भांडवलशाही अर्थव्यवस्थाही नव्हती. औद्योगिक क्रांती घडून येण्यास देशातील साधनसामुग्री गतिमान करणारा कल्पक, धाडसी व कष्टाळू असा कारखानदारवर्ग पुढे यावा लागतो. भारत ही ब्रिटिशांची एक वसाहत असल्याने येथे अशा प्रकारची स्वदेशी कारखानदारी वाढूच शकलो नाही. कच्चा माल परदेशी पाठवून पक्क्या मालाची आयात करणारा व दोन्ही जंनी नफा उकळून केवळ धनाची रास वाढविणारा एक पूंजीपती मध्यस्थ दलालवर्गच येथे अस्तित्वात येऊ शकला. यामुळे जुनी अर्थव्यवस्था कोलमडली खरे; पण नवी आली ती उपरी, अर्धवट व अंधानुकरणावर आधारित, न दबळी होती. तिच्याजवळ या भूमीची स्वयंप्रेरणा नव्हती. त्यामुळे येथे पंजीपती निर्माण झाले, उद्योगपती अस्तित्वातच नव्हते. आर्थिक परिवर्तन झाले, क्रांती येऊ शकली नाही. । आर्थिक क्रांती दुबळी म्हणून त्याबरोबर येणारी मानसिक व सामाजिक क्रांतीही तशीच निःसत्व व उपरी. औद्योगिक क्रांतीवरोवर येणारे देशाभिमान, व्यवसायनिष्ठा, उद्योगप्रवणता, धडाडी, वैज्ञानिक दृष्टी, हवकांची व कर्तव्यांची जाणीव हे मानसिक सद्गुण येथे वाढीस लागूच शकले नाहीत. येथे | ।। बलसागर ।। ४ ________________

राष्ट्रवादाची भाषा होती. पण 'राष्ट्रीय समाज' येथे निर्माण होत नव्हता. त्यामुळे भाषा आणि कृती, निष्ठा आणि व्यवहार यात कुठेच कुणाचा मेळ बसण्याची शक्यता नव्हती. आणीबाणीच्या प्रसंगी आमचे नेते विशुद्ध राष्ट्रीय भूमिकेवर आरूढ होऊन तत्त्वशुद्ध निर्णय घेण्यास आणि कणखर कृती करण्यास असमर्थ ठरत होते; आणि जनताही नेत्यांच्या तत्त्वभ्रष्टतेबद्दल उदासीन होती. त्यांना जाब विचारण्याएवढी जागृत नव्हती. केवळ काँग्रेस नेत्यांच्याच बाबतीत हे। घडत होते असे नाही. राष्ट्रनिष्ठेची जोपासना करणा-या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कृतीत आणि उक्तीत तरी कुठे मेळ होता ! सामाजिक प्रवाहांशी निष्ठेचा संबंध नसल्याने प्रवाहाला वळण देण्याची तिची शक्तीही ऐनवेळी सुप्तच राहिली. तीच दशा आमच्या साम्यवाद्यांची. चीनचा साम्यवादी हा प्रथम ‘चिनी' होता. रशियाचा साम्यवादी हा प्रथम · रशियन' होता. आमचा साम्यवादी प्रथम केवळ माक्र्स-लेनिनचा भक्त होता. चांगला साम्यवादी प्रथम चांगला राष्ट्रवादी असतो. परंतु येथे औद्योगिक क्रांती, त्यातून निर्माण होणा-या नव्या राष्ट्रीय जाणीवा, या जाणीवा कामगारांपर्यंत पोहचविणारे वर्गलढे, ही सर्वच नैसर्गिक वाढ खुरटलेली असल्याने येथे ' भारतीय ' साम्यवादी पक्ष उभा होण्याऐवजी मॉस्को वा पेकिंगची एखादी शाखाच काम करीत असल्यासारखा सर्व प्रकार होता. रशिया महायुद्धात दाखल झाल्याबरोबर या साम्राज्यशाही युद्धाचे लोकशाहीयुद्धात रूपांतर होते, या गौड ' बंगाला' ची एरव्ही संगतीच लावता येत नाही. | वैयक्तिक गुणदोष दिग्दर्शनाऐवजी ही सामाजिक कारणपरंपरा ध्यानात घेतली गेली असती, तर फाळणीच्या प्रमादानंतर तरी आम्ही सावध झालो असतो. गांधीजींची हत्या येथे घडली नसती आणि नवभारताच्या उभारणीला राष्ट्रीय जाणीवेचे भावनात्मक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा आम्ही प्रथमपासून प्रयत्न केला असता. स्वतंत्र झाल्यावर पंधरा वर्षांनी आम्हाला ' राष्ट्रीय एकात्मता मंडळ स्थापावे लागावे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग पंधरा वर्षे जे प्रकल्प रचले, योजना आखल्या त्यातून साधले काय ? समाज राष्ट्रीय दृष्ट्या संघटित होण्याऐवजी तो कमजोरच होत असेल, तर उभारणी पायाशुद्ध नाही हे स्पष्ट आहे. उभारणी म्हणजे देश आपल्या पायावर, आपल्या साधनसामुग्रीच्या बळावर स्वयंपूर्ण व स्वावलंबी करणे. या उलट आज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र उधारउसनवारीचा दिवाळखोर मामला सुरू आहे. विकास थोडा सावकाश चालेल, पण न पेलणारी व न पचणारी परकीय मदत घेऊन नवी आर्थिक गुलामगिरी पत्करणे धोक्याचे आहे. जुन्या परंपरागत संस्कार केन्द्रांना आवाहन करून नव्या काळाच्या प्रेरणा व विचार जनतेच्या ।। बलसागर ।। ५ ________________

अंत:करणामार्फत पोहोचविण्याचे प्रयत्न का होत नाहीत ? अराष्ट्रीय व असामाजिक प्रवृत्तींचा कणखरपणे बिमोड होत आहे का ! या दिशेने आमचे प्रयत्न झाले तरच निर्गुण, निराकार जनतेतून सगुण, साकार असा ‘राष्ट्रीय समाज स्वाभाविकपणे विकसित होईल. असा स्वाभाविक विकास हाच आजच्या सामाजिक विघटनेवरील व राजकीय दौर्बल्यावरील एकमेव तोडगा आहे. आँगरट १९६२ ।। बलरागर ।। ६ ________________

स्मरण “ प्रत्यक्ष यशाचा आणि राजकीय मुत्सद्देगिरीचाच फक्त निकष लावला तर स्टॅलिनच्या आसपास त्याच्या कालखंडातील क्वचितच कोणी व्यक्ती पोहोचू शकेल, याबद्दल मला शंका नाही. “ मी अर्थातच असे मानीत नाही की, यश हा एकच निकष राजकारणात मानण्यात यावा. साधनांची शुचिता राजकारणात अवश्य पाळली गेली पाहिजे. सामान्य नीतितत्त्वे राजकारणात पायदळी तुडविली जाणे नेहमीच संभवनीय असते, कारण ' अस्तित्वासाठी सतत चढाओढ' हे त्याचे नित्याचे स्वरूप असते. पण मी त्याच राजकीय पुढा-यांना आणि मुत्सद्यां ना थोर समजतो की, जे व्यवहार आणि ध्येयवाद यांची सांगड घालू शकतात व मूलभूत नीतिमूल्यांची योग्य ती कदर ठेवूनही आपल्या ध्येयाकडे निश्चित वाटचाल करू शकतात .. –मिलोव्हन जिलास-Conversations with Stalin पंडित नेहरूंच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या चरित्राचे व कार्याचे यथायोग्य मूल्यमापन होण्यास अद्याप बराच कालावधी जावा लागेल. खूप माहिती व घटना अप्रकाशित आहेत व अवश्य ती वस्तुनिष्ठताही इतक्या जवळच्या काळात धारण करणे अनेक कारणास्तव शक्य नसते. त्यातून पं. नेहरूंचे जीवन हे एकसुरी व समन्वित जीवन नव्हते. निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रेरणांचा, विचारांचा पगडा त्यांच्या मनावर असे आणि या सर्व विविध प्रेरणांचा आणि विचारांचा समन्वय साधणे त्यांना अखेरपर्यंत जमू शकले नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की, त्यांचा स्वतःचा किंवा सत्याचा शोध शेवटपर्यंत अखंडपणे चालूच । बलसागर ।। ७ ________________

राहिला होता. ते सतत विकसित होणारे, प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करणारे एक ओजपूर्ण जीवन होते. नेहरू पूर्णमानव नव्हते. त्यांना तसे होणे कदाचित आवडलेही नसते. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्यातच धन्यता मानणारे ते एक श्रेष्ठ मानवी जीवन होते. वर दिलेल्या जिलासच्या अवतरणातील अखेरचा भाग पंडितजींना जेवढा लागू पडतो, तेवढा त्यांच्या समकालीनात इतर कोणासही लागू पडत नाही. पंडितजींची अनेक धोरणे फ सली; त्यांची शत्रुमित्रपारख चुकली; त्यांचे अनेक निर्णय इतिहासाने निखालस चुकीचे ठरविले. हे सर्व जरी सत्य असले, तरी * मूलभूत नीतिमूल्यांची योग्य ती कदर ठेवून ते आपल्या ध्येयाकडे निश्चित वाटचाल करीत होते, यात तिळमात्र शंका नाही. यश व निश्चित फलप्राप्ती हा एकच निकष मानला, तर पंडितजींचा वारसा इतरांच्या तुलनेने कदाचित कमी भासेल; पण राजकारणाच्या कलहसष्टीत वावरत असतानाही त्यांनी बाळगलेले नैतिकतेचे भान हा त्यांनी मागे ठेवलेला फार मोठा वारसा आहे-प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा असा. नेहरूंच्या भारतीयत्वाचा, हिंदुत्वाचा हा अस्सल अंश होता, असे म्हटले तरी चालेल. हा अंश, हे भान विसरा आणि रामायण-महाभारतात किंवा एकूणच भारतीय संस्कृतीत काय शिल्लक उरते ते पाहा. जणू हा महाभारतकालीन धर्मराजच नव्या रूपाने आधुनिक काळात वावरत होता. | या धर्मराजास, या आधनिक राजर्षीस सहस्र प्रणाम. । मे १९६५ ।। वलसागर ।। ८ ________________

कच्छ करार | पृथ्वीराज चव्हाणाने महंमद घोरीला पकडून सोडून दिल्यापासून थेट आजतागायत आपल्या राज्यकर्त्यांची औदार्याची घातक चटक काही कमी झालेली दिसत नाही. आपल्या शूर जवानांनी कच्छसीमेवर पाकिस्तानला चांगलेच पाणी पाजले. त्यांना थोडी अधिक सवड व अधिकार दिले गेले असते, तर आपला ज्यावर संपूर्ण हक्क आहे असे राज्यकत्र्यांना वाटते, त्या सर्व मुलखातून पाकिस्तानला काढता पाय घ्यावा लागला असता आणि नंतर सीमाआखणीचे काम कटकटीवाचून भारताला पार पाडता आले असते. ' आमचे नीतिधैर्य उत्तम आहे. शत्रूला खडे चारण्यास आम्ही उत्सुकच आहोत, पण दिल्लीतील राज्यकर्त्यांनी नेहमीसारखा आमचा अवसानघात करू नये म्हणजे मिळविली-' अशा अर्थाचे उद्गार सैन्यातील काही अधिका-यांनी दिल्लीतील पत्रकार कच्छसीमा-पाहणीसाठी गेले असता त्यांचेजवळ काढल्याचे वृत्तपत्रात येऊन गेलेच आहे. सैन्य सज्ज आहे, राज्यकर्ते कच खातात असाच आजवरचा अनुभव आहे, हे काही खोटे नाही. काश्मिरात काय घडले ? १९४७ साली टोळीवाल्यांनी आक्रमण केले. आपल्या सैन्याने टोळीवाल्यांना पिटाळण्यास सुरूवात केली. टोळीवाले पळू लागले आणि दिल्लीहून टोळीवाल्यांचा पाठलाग थांबवण्याचा एकदम हुकूम आला. असे म्हणतात की, हा हुकम चार आठ तास उशिरा आला असता तर संपूर्ण काश्मिर आपल्या हातात आले असते. काश्मिरचा प्रश्न शिल्लकच उरला नसता. पण सैन्याचे पाय राज्यकत्र्यांनी मागे ओढले, युनोकडे त्यांनी धाव घेतली, युद्धबंदीचा घोळ घातला आणि गेली अनेक वर्षे या प्रश्नावर भारताचे रक्तशोषण चालू आहे. कोट्यवधी । बलसागर ।। ९ ________________

= =

=[संपादन]

रुपये वर्षाकाठी खर्ची पडत आहेत. सैन्य अडकून राहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची बदनामी चालूच आहे. सैन्याला पाठलाग थांबवण्याचा हकूम दिला गेला ती चूक झाली. सैन्यबलाच्या जोरावर काश्मिरप्रश्न त्याचवेळी निकालात काढला असता तर बरे झाले असते, असे, इतरांप्रमाणे माझेही त्यावेळी मत होते-' अशा आशयाचे उद्गार श्रीमती इंदिरा गांधींनी चारसहा महिन्यांपूर्वी न्ययॉर्क येथे काढले होते. पण मागाहून बोलून काय उपयोग ! वेळ एकदा निघून गेली ती गेलीच. नकतीच घडलेली कारगिलची कथा अशीच. ही पाकिस्तानी ठाणी भारतीय जवानांनी मोठ्या शर्थीचा पराक्रम करून जिंकून घेतली. पुन्हा आम्ही यूनो निरीक्षकांवर भरवसा टाकून ठाणी परत करण्यास तयार ! हे यूनो निरीक्षक काश्मिर युद्धबंदीरेषेवर इतकी वर्षे आहेतच. त्यांची कितीशी पत्रास पाकिस्तानने बाळगली आहे ? या निरीक्षकांच्या डोळ्यांदेखत पाकिस्तान ने अनेकदा गोळीबार केले. या गोळीबारांची झळ निरीक्षकांनाही काही वेळा लागली, तरी पाकिस्तानची दांडगाई कमी नाही. आणि यू. नो. च्या आश्वासनांवर विसंबून कारगिलची ठाणी सोडायची होती, तर एवढा आटापिटा करून ती जिंकून घेण्याची तरी काय गरज होती ! जवानांचा सारा पराक्रम मातीमोलच झाला म्हणायचा ! अशा परिस्थितीत ती मरणोत्तर वीरचक्रे आणि गौरवपदके हा सारा पोकळ व अर्थशून्य देखावा वाटू लागतो. एकीकडे रणगीतांचा देशावर भडीमार आणि दुसरीकडे रणशूरांच्या पराक्रमाचे हे खच्चीकरण ! राज्यकत्र्याच्या हेतूविषयी संशय यावा, अशीच ही विरोधी वस्तुस्थिती आहे. कच्छबावत वाटाघाटींचे गु-हाळ आता सुरू होईल, तेव्हा सैन्याने मिळविलेले राज्यकत्र्यांनी किती राखले ते कळून येईलच. पण सकृद्दर्शनी तरी ' पाकिस्तानचा दरोडा' पचलेला दिसतो. कच्छसीमेबाबत कोणताही आणि कसलाही वाद नाही, ही भारताची मूळ भूमिका आज सुटलेली आहे. सरदार ठाणे व बियारबेट ही आमचीच ठाणी आम्ही खाली केली आहेत. कच्छमधील आमच्या मुलखातून पाकिस्तानने बेकायदा बांधलेल्या सोळा मैल रस्त्याचा वापर करण्यास पाकिस्तानला मुभा दिली गेली आहे. हा रस्ता पाकिस्तान बांधीत - होते, तेव्हा आमचे राज्यकर्ते काय करीत होते ? अक्साई-चीनमधून चीन रस्ता बांधीत असताना जे केले तेच. त्यावेळी नेहरू-मेनन होते. यावेळी शास्त्री-चव्हाण आहेत इतकाच फरक. माणसे बदलली तरी गाफीलपणा कमी झाला नाही. अशी सारी वस्तुस्थिती असता पाटण्याच्या सभेत संरक्षणमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांनी विरोधकांना व कच्छ कराराच्या टीकाकारांना पराभूत मनोवृत्तीचे', 'न्यूनगंडाने पछाडलेले' अशी दूषणे दिलेली आहेत. आपले तुटलेले ।। बलसागर ।। १० ________________

शेपूट लपविण्यासाठी सर्वांच्या धड शेपटांना कमी ठरवण्याचा हा उद्योग अजबच म्हटला पाहिजे. देशात एक बोलणारे आणि परदेशात जाऊन दुसरेच ठरवून येणारे ‘पराभूत मनोवृत्तीचे ' व 'न्यूनगंडाने पछाडलेले ' की, “ जे बोलता ते खरे करून दाखवा, त्यासाठी पडेल ती किंमत द्यायला, हवा तो त्याग करायला देश तुमच्यामागे उभा आहे', असे कंटशोष करून ओरडणारे विरोधक · पराभूत मनोवृत्तीचे ?, न्यूनगंडाने पछाडलेले' ? यशवंतरावांचा राजकीय बचावाचा हा आक्रमक पवित्रा त्यांच्या मुत्सद्देगिरीवर प्रकाश टाकणारा असला, तरी सत्य त्यामुळे लपणार नाही. शास्त्रीजींनीच हे सत्य हैद्राबादच्या आपल्या भाषणात सांगून टाकले आहे. पाकिस्तानशी युद्ध करण्याची कल्पनाच मला अशक्यप्राय वाटते. इतर कोणत्याही देशाशी होणा-या युद्धापेक्षा पाकिस्तानशी होणारे युद्ध हे अधिक भयंकर आणि गुंतागुंतीचे झाले असते. शास्त्रीजींचे हे उद्गार पुरेसे बोलके आहेत. पराभूत कोण आणि खंबीर कोण याचा यावरून कोणालाही चटकन् बोध होऊ शकेल. | पाटण्याच्या आपल्या भाषणात यशवंतराव पुढे असेही म्हणाले की, * जगात आज सर्वत्र एक शांततावादी देश म्हणून भारताची प्रतिष्ठा उंचावली आहे. याउलट एक ‘मारका बैल' म्हणून पाकिस्तानची जगात नाचक्की झालेली आहे; तेव्हा विरोधकांनी एखादा करमणुकीचा कार्यक्रम चालू असल्याच्या सुरात सरकारवर टीका करू नये. आपण कोण हे जाणून घेण्यासाठी इतरांची ज्यांना मदत घ्यावीशी वाटते, आपल्याविषयी जग काय बोलते याकडे ज्यांचे सारखे लक्ष असते, अशा व्यक्ती न्यूनगंडाने पछाडलेल्या व पराभूत मनोवृत्तीच्या असतात, अशी माहिती मानसशास्त्रावरच्या प्राथमिक पुस्तकात सापडते. कच्छकराराच्या विरोधकांना वाटते- 'जग आपल्याला काय वाटेल ते म्हणो; आपल्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल, आपल्या राष्ट्रीय स्वार्थाला बाधा येईल, असे काहीही राज्यकर्त्यांनी करू नये. देशातील पौरुष आणि स्वाभिमान जागृत असणे, हे जागतिक कीर्तीच्या बुडबुड्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे व मोलाचे आहे. परदेशी कोडकौतुकापेक्षा आपल्या सामथ्र्यावर विश्वास ठेवा' असे सांगणारे विरोधक ' न्यूनगंडाने पछाडलेले' की, मौंटबॅटन-विल्सन इत्यादींची गोरी कातडी पाहून विरघळणारे व आपल्या प्रदेशावर पाणी सोडायला तयार होणारे आमचे राज्यकर्ते * न्यूनगंडाने पछाडलेले', याचा निर्णय आता आमच्या ‘साहेबांनीच करावा. | आणि ‘ भारताची प्रतिष्ठा फार वाढली', ही यशवंतरावांची समजूत तरी कितपत खरी आहे ? कच्छ आक्रमणाचे वेळी पाकिस्तानने अमेरिकन रणगाड्यांचा वापर केला आपल्या वैमानिकांनी जीव धोक्यात घालून हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा केले. अमेरिकेने पाकिस्तानच्या निषेधाचा एक शब्द तरी उच्चारला ! ।। बलसागर ।। ११ ________________

भारत आणि चीनचे शत्रुत्व आणि पाकिस्तान-चीनची युती. तरीही अमेरिकेची मदत (शस्त्रास्त्रांची व इतरही) भारतापेक्षा पाकिस्तानला अद्यापही जास्तचीन आणि अमेरिका यांचे हाडवैर असताना. व्हिएटनामविषयी शास्त्रीजींनी वक्तव्य केले. जॉन्सन सोडाच, त्याचा परराष्ट्रमंत्री डीन रस्क यानेसुद्धा ‘ मूर्खाची बडवड' यापेक्षा त्याला अधिक किंमत दिली नाही. ही झाली अमेरिकेतील आमची प्रतिष्ठा. रशियाने कच्छवाबत आपली भूमिका मानली का ? शास्त्रीजींचे भरघोस स्वागत केले. पण कच्छबाबत मौन. आफ्रिकेत तर आपल्याला अद्याप स्थानच नाही. आशियातील स्थान चीनने आक्रमण करून केव्हाच हिरावून नेले. एकूणएक भारतीयांची बिनदिक्कत हकालपट्टी करणा-या लंगोटीएवढ्या ब्रह्मदेशाला आपला धाक नाही, तर आम्ही प्रतिष्ठेच्या गोष्टी काय बोलाव्यात ! उलट आजवर अनुभव असा आहे की, 'मारका बैल' म्हणून जरी पाकिस्तान जगात ओळखले जात असले तरी त्याचीच कड सर्वांनी भारतापेक्षा अधिक घेतली आहे. काश्मिरबाबत तर भारताची भूमिका जगात कोणालाही मान्य होत नाही. आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत पाकिस्तानपेक्षा कमी, संघर्षाचे वेळी पाकिस्तानकडे सहानुभूत, अशी अवस्था असताना, ' आमची जगातील प्रतिष्ठा मोठी' या म्हणण्याला पुरावा काय ? उलट पुरावा येथे पाहा. इंग्लंडचे भारतातील सध्याचे वकील फ्रीमन हे वकील म्हणून या ठिकाणी येण्यापूर्वी ' New Statesman' या समाजवादी विचारसरणीच्या, इंग्लंडमध्ये भारदस्त व वजनदार म्हणून ओळखल्या जाणा-या साप्ताहिकाचे संपादक होते. फ्रीमन हे पं. नेहरूंचे चाहते, हिंदुस्थानच्या स्वातत्याचा फ्रीमन व त्यांचे स्टेट्समनपत्र यांनी जोरदार पुरस्कार केलेला. किंग्सले मार्टिन हे पं. नेहरूंचे असेच मित्र, चाहते, त्यांच्या ध्येयधोरणांशी सहमत असलेले, भारताविषयी आपुलकी बाळगणारे, स्टेट्समनपत्राच्या संपादक मंडळातील आणखी एक नामांकित पत्रकार. इतकी सारी मानसिक अनुकूलता असतानादेखील है वजनदार पत्र व विशेषतः किंग्सले मार्टिन कच्छबाबत भारताची बाजू मानायला तयार नाहीत. त्यांच्या हिशेबी भारत आणि पाकिस्तान सारखेच. 'न्यू स्टेट्समन' मधील त्यांच्या लेखातील या १-२ उता-यांवरून त्यांच्या हिशेबी आमची नैतिकता आणि पाकिस्तानची दांडगाई सारखीच असल्याचे कळून येते. ३० एप्रिल १९६५ या अंकात ते लिहितात

  • We are not living in a sane world. Fighting ( in Kutch ) has broken out on a considerable scale; both sides ( India and Pakistan) are massing troops and arms. The press and radio propaganda, both in Delhi and Karachi, is of a kind only too familiar in Europe : 'Our troops are defenders of our frontiers

।। बलसागर ।। १२ । ________________

and honour and the other side is cuncing and wicked and basely determined on our destruction......" “Reason has never played a notable part in Pakistan politics. But there now seems little to choose between the rival follies of this dispute......” “ There is now grave danger of communal outbreaks against the Muslims all over India......" | इत्यर्थ असा की, 'भारत आणि पाकिस्तान दोघेही युद्धखोर आहेत. पाकिस्तान थोडे अधिक भडक माथ्याचे असले तरी दोघेही मूर्खासारखे भांडत आहेत. भारतात मुसलमानांच्या कत्तली होण्याचा फार धोका नजीकच्या काळात संभवतो.' आमच्या निधर्मी तपाचरणाचे, सौजन्याचे, शांतताप्रेमाचे काय हे फलित ! मित्र म्हणवणा-या जाणकारांची आमच्याविषयी ही समजूत तर इतरेजनांची कथा काय ! आणि असल्या फसव्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या भाकडकथा सांगून कच्छप्रकरणातील राजकीय पराभव झाकला जातो, ते तर अधिकच खेदजनक ! शिवाजीचे उत्सव साजरे होत असले, तरी पृथ्वीराज चव्हाणाची परंपराच येथे जोरावर आहे, असे समजणे यावरून भाग पडते. जुलै १९६५ ।। बलसागर ।। १३ ________________

सीमोळंघन पंतप्रधान शास्त्रींची ताश्कंदवारीची तयारी सुरू आहे आणि भारत-पाक युद्धाचे पहिले पर्व समाप्त होत आहे. या सरत्या वर्षातील भारत-पाक युद्ध ही सर्वात महत्त्वाची घटना. रोमांचकारी आणि स्फूर्तिदायकही. शत्रूच्या प्रदेशावर आपण, थोडी का होईना, चाल करून गेलो आणि आमच्या विशीतिशीतल्या तरुण-तरुण अधिका-यांनी आणि सर्वसामान्य जवानांनी काही नेत्रदीपक पराक्रम गाजवून आमची मान उंच केली. सेबर जेट्स आणि पॅटन टॅक्स धुळीस मिळविणे ही काही सामान्य मर्दुमकी नव्हे. शत्रुच्या प्रदेशावर चाल करण्याचा आक्रमक पवित्रा आणि आमच्या जवानांची ही मर्दुमकी यामुळे देशात काही काळ एका वेगळ्याच तेजाचा संचार झाला. बाहूबाहुंना एक वेगळेच स्फुरण चढले. राष्ट्रीय चैतन्याच्या या स्वयंस्फूर्त आणि विराट दर्शनाने स्वकीय आणि परकीय-सारेच स्तिमित झाले, भारताचा सन्मान झाला, 'आनंदवनभुवना' चा किचित्सा किचित्काल साक्षात्कार झाला. । ' किंचितसाच, किंचित्कालच. कारण १८।१९ दिवस चालू असणा-या (दि. १ ते १९ सप्टेंबर १९६५) या संघर्षात आपण मिळविले काय आणि गमावले काय याचा आढावा आपल्या दृष्टीने फारसा समाधानकारक नाही. प्रश्न अर्थातच सेनादलाच्या पराकमाचा नसून राजकीय ध्येयधोरणांचा आहे. ही धोरणे नीट तपासून ठरवले पाहिजे की, या संघर्षाचे फलित काय ? या संघर्षातून काय साधायचे ठरले होते, ते कितपत साध्य झाले, जे ठरले होते तेच मुळात चूक की बरोबर ! बलसागर ।। १४ ________________

| 'पाकिस्तानची तसूभरही भूमी आम्हाला नको आहे; पाकिस्तानी आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानचे सैनिकी बळ (Military Power) खच्ची करणे, एवढाच मर्यादित उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय फौजांनी पाकिस्तानी प्रदेशात आगेकूच केली', असे आपल्याला सांगण्यात आले. ठीक आहे. हा हेतू साध्य झाला का, एवढाच प्रश्न प्रथम विचारात घेऊ. सैनिकी बळ दोन प्रकारचे. साधनसामग्री आणि मनुष्यशक्ती. साधनसामग्रीबाबत एवढे जरूर म्हणता येईल की, पॅटन टॅक्स आणि सेबर जेट्समुळे पाकिस्तानला जी एकप्रकारची अभेद्यता वाटत होती तिला आपण तडाखा देऊ शकलो. पण यामुळे पाकिस्तान नरमले, याला पुरावा काय ? पाकिस्तान शस्त्रास्त्रांच्या बाबतीत संपूर्णतया परकीय मदतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानात शस्त्रास्त्रांचे कारखाने चालू असते आणि ते आपण उध्वस्त करून पुरवठा बंद पाडला असता, तर पाकिस्तानला तडाखा जाणवला असता. कारखाने सुरू होऊन पुन्हा शस्त्रास्त्रांचा साठा जमा व्हायला दहा-पंधरा वर्षांचा कालावधी लागतो आणि अशा परिस्थितीत व एवढ्या कालापुरतेच पाकिस्तानचे लष्करी वळ खच्ची झाले आहे, असे समजून चालणे रास्त ठरले असते. पण परकीय मदतीचा ओघ पाकिस्तानकडे कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकतो. सेबर जेट्स आणि पॅटन टॅक्स निरुपयोगी ठरतात असे आढळून आल्यास आणखी काही प्रकार येतील, एवढाच फरक. मदतरूपाने, कर्ज म्हणून किंवा खरेदी करून पाकिस्तान आपले शस्त्रास्त्रांचे कोठार अल्पावधीत भरून काढील यात शंका घेण्याचे कारण नाही. अगदी भारत-पाक युद्ध चालू असतानाही तुर्कस्थानची लष्करी मदत पाकिस्तानकडे सुरूच होती. पाकिस्तानचा उघड उघड पराभव होऊ देणे इंग्लंड-अमेरिका किंवा रशिया-चीन यांपैकी कोणालाच मानवणारे नसल्याने एक नाही दुसरा, हा नाही तो, कोणीतरी पाकिस्तानला मदतीचा हात नेहमीच पुढे करीत राहणार, हेही आपण विसरून उपयोगी नाही. अशा परिस्थितीत आपण पाकिस्तानच्या लष्करी सामथ्र्याचा कणा मोडला हे समाधान बरेचसे काल्पनिकच ठरण्याचा संभव अधिक. | दुसरा मुद्दा मनुष्यहानीचा. याबाबत आपल्या बाजूची हानी कमी लेखन चालणार नाही. अद्याप मृतांच्या आणि बेपत्ता सैनिकांच्या याद्या प्रसिद्ध होतच आहेत. आपला अधिकारीवर्ग प्रमाणाबाहेर गारद झाला ही बाब तर विशेष चिता करण्यासारखी आहे. एवढे तर नक्की की, पुन्हा डोके वर काढता येणार नाही एवढी मोठी पाकिस्तानची मनुष्यहानी तर आम्ही करू शकलेलो नाही. ।। बलसागर ।। १५ ________________

- मग पाकिस्तानचे सैनिकी बळ खच्ची करण्याचे आपले उद्दिष्ट साध्य झाले या म्हणण्याला आधार काय ? साधनसामग्रीची हानी पुन्हा लगेच भरून काढता येईल. मनुष्यहानी दहशत बसावी एवढी मोठी नाही आणि पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी जिरली म्हणावी तर तेही नाही ! (भुत्तो-आयुब अजनही ताठ आहेत ! ) -मग हे आपले समाधान काल्पनिकच नाही का ? बळ खच्ची झाले असते तर पाकिस्तानने युद्धबंदी स्वीकारल्यावरही एक हजारांपेक्षा अधिक वेळा युद्धबंदीभंग केला असता ? बळ खच्ची झाले असते तर युद्धबंदी अंमलात असतानाच राजस्थान भागातील आपली ठाणी परत हिसकावून घेतली असती ? भारताच्या ताब्यात पाकिस्तानचा सातशे मैलांचा प्रदेश आहे, तर पाकिस्तानने भारताचा सोळाशे मैलांचा मुलुख काबीज केला आहे, असे दर्शविणारे नकाशे दिल्लीतील पाकिस्तान हायकमिशनतर्फे सर्रास वाटले जात आहेत, अशी वात आहे. ही खरी असेल तर, हे काय पाकिस्तानची खोड मोडल्याचे लक्षण आहे ? | ' आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी लष्करी बळ खच्ची करणे' हे साध्यच फसवे, अर्धवट व चुकीचे आहे हा याचा निष्कर्ष आहे. साध्य मर्यादित असायला हरकत नाही, पण ते सुस्पष्ट हवे, नेमके हवे. जे नकाशावर स्वच्छपणे दाखविता येईल असे हवे. कुठल्यातरी एका क्षेत्रात शत्रूचा निर्णायक पराभव' हेच उद्दिष्ट हुवे होते. आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त सवाई आक्रमणानेच होऊ शकतो, मर्यादित प्रतिकाराने नव्हे. लाहोर आज भारतीय सेनेच्या हाती हवे होते किंवा पूर्व पाकिस्तानवर दिल्लीची हुकमत प्रस्थापित व्हायला हवी होती. निदान पाकव्याप्त काश्मिर तरी मुक्त करायचा ? यांपैकी एखादीतरी गोष्ट घडून यायला हवी होती आणि मग शास्त्रीजींनी वाटाघाटींसाठी कुठेही जाण्यात मौज होती, शोभा होती, दिमाख होता. आज ताश्कंदला निघाली आहे ती केवळ अगतिकता आहे, निव्वळ असहाय्यता आहे, भीड आहे, दडपण आहे, दुर्बलता आहे. | आणि एखादे विजयाचे हुकमी पान हाती ठेवणे, पाकिस्तानचा एखाद्या ठिकाणी, एखाद्या क्षेत्रात निर्णायक पराभव करून युद्धविरामाच्या वाटाघाटींना बसणे अशक्य होते का ? मुळीच नाही. आपण सर्वदृष्ट्या पाकिस्तानच्या चौपट मोठे आहोत. हे जमले नसते तरच नवल. पण घाई झाली, नेतृत्व कुठेतरी कमी पडले, हेच खरे. दोष लष्कराकडे जात नाही. राजकीय नेतृत्वाकडेच जातो. लष्करातील काही अनुभवी व्यक्ती तर सांगतही आहेत की, युद्ध अचानक थांबविण्यात आपली चूक झाली. मेजर जनरल थोरात यांपैकी एक आहेत. परवाच पुण्याचे कॅप्टन जठार म्हणाले की, युद्ध अद्याप दहा दिवस तरी अधिक चाला ।। बलसागर ।। १६ ________________

यला हवे होते. कॅप्टन चाफेकर यांनी तर युद्धविराम झाल्यावर लगेचच लेख लिहून आपल्या शंका प्रदर्शित करून ठेवल्या आहेत. साप्ताहिक 'माणूस'ने ही * १ ऑक्टोबर दसरा अंका' च्या मुखपृष्ठावरच त्या वेळी आपली प्रतिक्रिया नोंदवन ठेवली- * सीमोल्लंघन झाले. विजयादशमी ?' लाहोर घेतले असते तरच विजयादशमी. नाहीतर नुसतेच सीमोल्लंघन. । असे का घडले ? एक कारण तर उघडच आहे. अमेरिका व रशिया यांचे दडपण. अमेरिकेने मदत बंद करण्याचा धाक घातला, रशियाची काश्मिरबावत भूमिका डळमळीत झाली. आम्हाला या वड्यांचे दडपण झुगारून देणे जमले नाही. पण एक अंतस्थ कारणही संभवते. शत्रूवर निर्णायक चढाई करण्याचा व्यूह आखण्यास आपल्याला सवडच मिळाली नसावी. कशावरून? थोडी पाश्र्वभूमी पाहिली तर हे चटकन ध्यानात येईल. 'माणूस' १५ सप्टेंबर अंकातील * दिल्ली दरबार' या सदरात ही पाश्र्वभूमी दरवारीं' नी वाचकांना यापूर्वी कळविलेलीच आहे. त्यातील महत्त्वाचा भाग असा :

  • दिल्ली दरबारात गेल्या दोन सप्ताहात (दि. ७ ऑगस्टपासूनच ) जम्मू-काश्मिरचे महाराज श्री. करणसिंग यांनी बरीच व वेळीच जागृती निर्माण केल्यानेच भारत सरकारतर्फे काही भरीव उपाययोजना होत असून पाकिस्तानी आक्रमणाला पायबंद घातला जात आहे. अन्यथा ही कटकट हवी कशाला याच थाटात वा अंतर्गत धुसफुशीतच सारी शक्ती खर्च होऊन गेली असती. गेल्या दोन सप्ताहात काश्मिरमधील गंभीर परिस्थितीच्या वार्ता येथे येऊन थडकू लागल्यानंतरही येथे थंड डोक्याने चर्चा चालूच राहिली की, जम्मू-काश्मिरमध्ये एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही भारत सरकार दि. ८ ऑगस्टपर्यंत झोपलेलेच का राहिले होते ? हे सर्व जवळून पाहिले की, प्रसंगविशेषी वाट लागते की, या देशाचा जणु राष्ट्रीय गुण (?) असल्यागतच दिल्ली दरबारात चर्चा चालू होते की, याला जबाबदार कोण ? सर्व गंभीर परिस्थितीचा साकल्याने विचार करून त्या परिस्थितीवर काबू मिळविण्यासाठी तातडीचा महान प्रयत्न राहतो घटकाभर दूर व चर्चाच चालू होते की, गृहमंत्रालयाचे गुप्तचर (इंटेलिजन्स) याला जबाबदार की, संरक्षण मंत्रालयाचे गुप्तचर अकार्यक्षम ठरले....! ... दिल्ली दरबारच्या आसमंतात अशा गंभीर प्रसंगी वैचारिक गोंधळ व बुद्धिभेद घडवून आणण्याचे पवित्र (?) कार्य करणारी जी ‘कॉमरेड' मंडळी आहेत. त्यांनी सूर लावलेला आहेच की, यावेळी शास्त्रीसरकार सेनेला काश्मिरमध्ये धाडण्यास काही विशेष उत्सुक नव्हते. श्री. सादिकसाहेब होते म्हणून बरे झाले.

।। बलसागर ।। १७ ________________

त्यांनी आग्रहच धरला म्हणून मग शास्त्रीसरकारला भराभर पुढे पावले टाकावी लागली. अन्यथा काश्मिरचा कारभार आटोपलाच होता.' | आता शास्त्रीजींना महाराजा करणसिंगांनी जागे केले का सादिकसाहेबांनी केले हा वादाचा मुद्दा सोडला, तरी एक गोष्ट यावरून सरळ ध्यानात येते की, काश्मिरचा कारभार आटोपण्याच्या पंथाला लागण्याइतका पाकिस्तानी आक्रमणाचा डाव मोठा होता व या डावाची आम्हाला शेवटपर्यंत कल्पना नव्हती. पाकिस्तानी हल्लेखोर काश्मिरात सर्वत्र घुसलेले होते-थेट श्रीनगर विमानतळापर्यंत त्यांचा प्रवेश होता. त्यांची संख्या दहा हजारांच्या आसपास असावी. त्यांचेजवळ पाकिस्तानी शस्त्रास्त्रे होती. आत घुसविलेल्या या सशस्त्र हल्लेखोरांनी उठावणी सुरू करताच बाहेरून छांबकडून प्रचंड सैन्यानिशी चाल करून काश्मिर एका सपाट्यात मुक्त करण्याचा पाकिस्तानची साहसी डाव होता. हा डाव आम्ही वेळीच सावध झाल्याने उधळला गेला हे जरी खरे असले, तरी त्यामुळेच आमच्या उपाययोजनेला तात्कालिक संकटनिवारणाचे स्वरूप येणेही अपरिहार्य होते. लाहोर आघाडी आपण उघडली नसती, तर छांबवरची पाकिस्तानी मगरमिठी सुटत नव्हती. काही जाणकारांचे तर असे मत आहे की, फक्त ४८ तासच आम्ही उशीर केला असता, तर काश्मिरचा मामला खतम होता आणि पंजाबही काही सुरक्षित राहिला नसता. तेव्हा तात्कालिक संकट निवारण ' हेच आमच्या चढाईचे मुख्य उद्दिष्ट असावे, व ते साध्य झाल्यावर आम्ही युद्धविराम पत्करून स्वस्थ बसलो. पाकिस्तानचे सैनिकीबळ खच्ची करणे, ‘आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करणे - वगैरे कारणे मागाहून लोकांच्या समाधानासाठी पुढे केली गेली असावीत. काश्मिर वाचवण अगदी निकडीचेच होते, ते साधले, एवढेच या पहिल्या युद्धपर्वाचे फलित. बाकी पाकिस्तान आहे तिथेच आहे, आणि आपणही होतो तिथेच आहोत. किंचितसा बदल-किंचितशी जागृती-बस्स. डिसेंबर १९६५ ।। बलसागर ।। १८ ________________

सावरकर पर्व सावरकर गेले. सावरकर-पर्व सुरू झाले आहे. | एक जुना प्रसंग आठवतो. रत्नागिरीहून सावरकर सुटलेले होते . १९३७-३८ चा सुमार असावा. समाजवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी सावरकर-सत्काराचा एक कार्यक्रम योजला होता. प्रास्ताविक भाषण करताना सभेच्या संयोजकांनी सांगितले की, 'हा सत्कार १९०८ सालच्या सावरकरांचा आहे. ब्रिटिशांशी झुंजणारे १९०८ चे सावरकर आम्हाला मान्य आहेत. हल्लीचे, १९३८ चे हिदुत्वाचे पुरस्कर्ते सावरकर आम्हाला मान्य होण्यासारखे नाहीत ...' | आणि केतकीच्या वनातून सळकन बाहेर येणा-या पिवळ्याधमक नागाने फणा काढावा, तसे विषयाच्या ओघात, सत्काराला उत्तर देताना सावरकर चमकून म्हणाले, '१९०८ साली सावरकर जे कार्य करीत होते, ते त्या वेळीही कोणाला मान्य होत नव्हते. ' माथेफिरू' म्हणूनच त्या वेळीही त्यांची गणना होत असे. आज आपल्याला १९०८ च्या सावरकरांना मान्यता द्यावीशी वाटते. ठीक आहे. १९०८ चे सावरकर मान्य व्हायला, १९३८ साल उजाडावे लागले ! १९३८ चे सावरकर मान्य व्हायला, कदाचित १९६८ साल उजाडेल ! कोणी सांगावे ! मी आज जे सांगतो त्याची सत्यता १९६८ साली कदाचित आपल्याला पटेलही...' |६८ साल अद्याप दूर आहे. ३८ चे सावरकर काय होते आणि ते मान्य होणे याचा अर्थ काय होतो, हे नंतर पाहूच. पण १९०८ च्या सावरकरांना मान्यतः देणे, याचा तरी नेमका अर्थ काय आहे ? सावरकरांची प्रखर देश भक्ती व ।। वलसागर ।। १९ ________________

स्वातंत्र्यप्रीती मान्य असणे, याला तसा काहीच अर्थ नाही. अग्नीची उष्णता, सुवर्णाची कांती मान्य करण्यासारखेच हे प्राथमिक आणि अनावश्यक आहे. या उष्णतेची अधिक चिकित्सा हवी. धातूची पुढची परीक्षा हवी. सावरकरांनी देशस्वातंत्र्यासाठी जो सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला, त्याची इष्टानिष्टता, योग्यायोग्यता व यशापयश निश्चित करणे हा खरा ' मान्यते'चा अर्थ आहे. क्रांतिपक्ष व लोकपक्ष। याबाबत सावरकरांचा सशस्त्र क्रांतिपक्ष आणि गांधीजींचा अहिंसापक्ष या दोन्ही विरोधी पक्षांच्या आग्रही व एकांतिक भूमिका इतिहासाला मान्य होण्यासारख्या नाहीत. भारताला अहिंसेनेही स्वराज्य मिळालेले नाही आणि सशस्त्र युद्धात ब्रिटनचा पराभव झाल्यामुळे भारत स्वतंत्र झाला, हेही प्रतिपादन बरोबर नाही. सशस्त्र आणि नि:शस्त्र या दोन्ही मार्गांनी प्रथमपासून भारताचा स्वातंत्र्यलढा सुरू होता व महायुद्धामुळे खिळखिळया झालेल्या ब्रिटनला, आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या दडपणाखाली, भारताला स्वातंत्र्य देऊन निघून जावे लागले, असे एकूण आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचे स्थूल चित्र आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास काँग्रेस हा एकमेव संघटित लोकपक्ष देशात अस्तित्वात असल्याने स्वराज्याचे प्रत्यक्ष माप या पक्षाच्या पदरात पडणे स्वाभाविकच होते. यश कोणी हस्तगत केले, हा प्रश्न नाही. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढले कोण ? सत्ता गेली कोणाकडे ? असे नेहमीच घडत असते. जो हजीर तोच वजीर ठरत असतो. तेव्हा सशस्त्र क्रांतिपक्षाच्या वाट्याला वजिरी आली नाही, हा काही या पक्षाच्या चुकीच्या मार्गाचा पुरावा नाही. शेवटी यश हे संधीवर योग्य वेळी झडप टाकल्याने मिळत असते. प्रयत्नाशी त्याचे नाते असले, तरी ते गणिताइतके सरळ व अनिवार्य नसते. क्रांति पक्षाच्या पराक्रमामुळे व प्रयत्नामुळे स्वराज्य जवळ आले, पण हा पक्ष संघटित नसल्याने, त्याला लोकमताचा फारसा पाठिंबा नसल्याने, अंतिम वाटाघाटीत या पक्षाला स्थान मिळविता आले नाही. क्रांतिपक्ष आणि लोकपक्ष यांची टिळकांनंतर भारतीय राजकारणात झालेली पूर्ण फारकत याला कारणीभूत आहे. केवळ लोकपक्ष-जनतेचा केवळ नि:शस्त्र प्रतिकारी पक्षकितीही संघटित आणि बहुसंख्य असला, तरी केवळ आपल्या बळावर कधीही स्वातंत्र्ययुद्धाचा शेवट करू शकत नाही. अशा लोकपक्षाच्या सामथ्र्यावर व त्याने लढविलेल्या निःशस्त्र-अहिंसक लढ्यावरच केवळ गांधीजींची श्रद्धा; तर दुस-या टोकाला सावरकर-भगतसिंगादि क्रांतिकारकांचा निर्धारी अल्पसंख्येच्या पराक्रमावरच केवळ विश्वास ! सावरकरांनी हा ' अल्पसंख्येचा सिद्धांत या ।। बलसागर ।। २० ________________

शब्दात मांडला आहे. ते लिहितात, • प्रत्येक देशास पारतंत्र्यातून सोडवून स्वतंत्र करण्याचे कार्य अंती तेथील निर्धारी व वीर्यशाली अशा यथाप्रमाण अल्पसंख्येलाच करावे लागते. (समग्र सावरकर वाड्.मय, खंड ३, पृ. ६० ). या दोन्ही भूमिका अर्थातच एकांतिक आहेत. निर्धारी अल्पसंख्य ही आघाडीची, हल्ला करणारी तुकडी मानली, तरी मुख्य सैन्याने पाठोपाठ चाल ही केलीच पाहिजे. क्रांतिपक्षाला लोकमताचे पाठबळ नसले, संघटित लोकपक्षाची एक भूमिगत शाखा म्हणून क्रांतिपक्ष वावरत नसला, तर योगायोगाने स्वातंत्र्य लाभले तरी ते अस्थिरच राहते. वरचेवर राज्यक्रांत्या, उठाव आणि लष्करी बंडांचे घातचक्र देशात सुरू होते आणि क्रांतिपक्षाचे उग्र आंदोलन लोकपक्षाच्या पाठीशी नसले तर लोकपक्ष हा अखेरीस मवाळांचा मेळावा ठरून शत्रूवर योग्य तेवढे दडपण आणण्यास असमर्थ ठरतो. ही जोड जमवावीच लागते. ती जमल्याशिवाय कार्यसिद्धी होऊ शकत नाही. टिळकांजवळ ही समन्वयाची दृष्टी होती. वेळप्रसंग पाहून सर्व मार्ग हाताळण्याची चतुरस्रता होती. एकीकडे ते स्वच्छ म्हणत, " कोणतीही चळवळ लोकांच्या अनुकूलतेखेरीज सिद्धीस जात नाही. लोक अनुकूल नसल्यास एकटा पुढारी फशी पडतो. तर दुसरीकडे क्रांतिकारकांना पाठीशी घालण्याचे, खाडिलकरांना नेपाळात पाठवून बॉबच्या कारखान्याच्या दृष्टीने काही हालचाल करण्याचे, सैनिकीकरणाचा जोरदार पुरस्कार करण्याचे त्यांचे उद्योगही चालूच असत. मवाळांचे वाटाघाटींचे मार्गही त्यांनी कधी वर्त्य मानले नाहीत, तसेच वेळप्रसंगी लोकांची तशी ५० टक्के जरी तयारी दिसली, तर सशस्त्र बंडाचा पर्यायही नजरेआड केला नाही. शक्याशक्यतेचा विचार मात्र कधी सोडला नाही. “ साधनानामनेकता' हे नित्याचे सूत्र ; आणि अशी सर्व साधने कालमानाप्रमाणे वापरून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेत असता, अगदी शेवटी ब्रिटन एखाद्या संकटात सापडून ब्रिटिश साम्राज्यालाच जेव्हा बाहेरून धक्के बसतील, तेव्हाच या सर्व अंतर्गत चळवळींना यश मिळण्याची शक्यता आहे, हेही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे त्यांचे भान कधी सुटले नाही. कुठलीच एकांतिकता त्यांच्या स्वभावात नव्हती. व्यवहाराची मांड अगदी पक्की होती. टिळकांनंतर आपल्या स्वातंत्र्ययुद्धाची अशी व्यापक हाताळणी झालीच नाही. सशस्त्र आणि नि:शस्त्र वेगवेगळे लढले. त्यामुळे अखेरच्या क्षणी दोन्हीकडे कमजोरी दिसली, शत्रूचे फावले. पण फारकत पडली, यश एकाच पक्षाकडे गेले म्हणून क्रांतिपक्षाचा मार्ग ‘ चुकी' चा ठरत नाही, “ अनावश्यक' ठरत नाही. भारत हा ब्रिटिशांनी नि:शस्त्र करून सोडलेला देश असल्याने येथे सशस्त्र क्रांतिमागला वावच उरला नव्हता, हे प्रतिपादन टिकू शकत नाही. सावरकरांची सैनिकीकरणाची मोहीम, सुभाषचंद्रांची आझाद हिंद ।। बलसागर ।। २१ ________________

सेना, ४५ चे नाविक बंड, हे सारे सशस्त्र क्रांतियुद्धातलेच टप्पे होते, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. इतकेच काय, अहिंसक म्हणवणा-या काँग्रेसने जे आंदोलन ४२ मध्ये केले, ते अहिंसक तर नव्हतेच, निःशस्त्रही नव्हते, तर चक्क भूमिगत, सशस्त्र क्रांतिकारक व दहशतवादी मार्गाचा अवलंब यात केला गेला, हेही कोणी नाकारू शकणार नाही. तरीही ज्यांना भारतात ' सशस्त्र क्रांती' झालीच नाही, भारताला अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले असे म्हणावयाचे असेल, ते खुशाल तसे म्हणोत. इतिहास या दोन्ही मार्गाचे अस्तित्व सिद्ध करील, फारकतीबद्दल दोन्ही मार्गाच्या अध्वर्युना दोषही देईल, श्रेयाची विभागणीही यथान्याय करील. आणि या मार्गाचे एवढे यशापयश नक्की झाले की, सावरकरांचे यातील स्थान हा वादातीत विषय आहे. ते तर क्रांतिकारकांचे मुकुटमणीच. ते आणि त्यांचा क्रांतिकारक पक्ष - सत्तावन ते सुभाष ही सारी परंपरा - म्हणजे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील एक गौरवशाली पर्व आहे, जे सुवर्णाक्षरांनीच लिहावे लागेल, लिहिले जाईल. राष्ट्रनिमतीची प्रक्रिया । १९३८ चे सावरकर ही १९०८ च्या सावरकरांची परिणती होती. ज्या देशस्वातंत्र्यासाठी १९०८ चे सावरकर झुंजत होते, तो देश कोणाचा, त्याची अस्मिता कोणती, हे मूलभूत प्रश्न राजकारणाच्या विचित्र वळणामुळे तेव्हा निर्माण होऊन बसले होते. जो जो या देशात राहतो, तो तो या देशावर स्वामित्व सांगू शकतो काय ? घरात किडेमंगी, पोपटमैना, नोकरचाकर, पैपाहणा ते थेट यजमान हे सर्वजण कमीजास्त काल राहतच असतात. पण घर कोणाचे हा प्रश्न उपस्थित झाला, तर बोट कोणाकडे दाखवायचे ? अगदी पिढ्या दोन पिढ्या राहिला तरी नोकर तो नोकरच आणि पाहुण्याने बराच काळ मुक्काम ठोकला तरी तो काही यजमान ठरू शकत नाही. यजमानाला हे यजमानपद अर्थातच परंपरेने आलेले असते. केव्हातरी हजारपाचशे वर्षांपूर्वी, यजमानाच्या पूर्वजांनी या वास्तूवर स्वामित्व मिळविलेले असते. त्यानंतरच्या पिढ्यानपिढ्यांनी या वास्तूचा उपभोग घेतलेला असतो. वेळप्रसंगी वास्तुच्या संरक्षणासाठी शेजा-यापाजा-यांशी व परक्यांशी संघर्ष खेळलेले असतात. तिच्या संवर्धनासाठी आपले तनमनधन अर्पण केलेले असते. अशा सर्व असंख्य पूर्वस्मृती त्या वास्तूबरोबरच त्या यजमानाकडे आलेल्या असतात आणि हा स्मृतींचा वारसा हीच त्याच्या यजमानपदाची मूळ कसोटी राहते. हा वारसा जे आज बाळगून आहेत, ते या देशाचे पुत्र, स्वामी, मूळ घटक. ज्यांच्याजवळ हा वारसा आज नाही, ते अल्पसंख्य, इतरेजन. नागरिकत्वाचे समान अधिकार, विकासाची समान संधी या अल्पसंख्याकांनाही येथे मिळेलच. पण हे राष्ट्र हिदंचे, हिंदुसमाज हा येथील राष्ट्रीय बलसागर ।। २२ ________________

समाज. कारण राष्ट्रीय अस्तित्वाची समान ऐतिहासिक स्मृती जतन केलेली आहे फक्त या बहुसंख्य समाजानेच. हेच सरळ सत्य रत्नागिरीहून सुटल्यावर सावरकर प्रतिपादू लागले. कर्णावतीच्या पहिल्याच हिंदुसभा अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी 'द्विराष्ट्रवाद' ही एक वस्तुस्थिती म्हणून दाखविलेली आहे. त्याचे समर्थन किंवा पुरस्कार केलेला नाही. त्यांनी हा धोका म्हणून सांगितला की, आज या क्षणी, या देशात, मुसलमानांचा पाच-सहा कोटी समाज असा आहे की, जो हिंदुस्थानचा समान ऐतिहासिक वारसा नाकारीत आहे; या वारशाशी ते आज समरस झालेले नाहीत व केवळ अल्पसंख्य म्हणूनही येथे सुखाने नांदण्याची त्यांची इच्छा नाही. इतकेच नव्हे, तर हिंदुस्थानात आपण एकेकाळी बहुसंख्य हिंदूंवर राज्य केलेले आहे, ते स्थान पुन्हा आपल्याला मिळाले पाहिजे; अल्पसंख्य म्हणून नव्हे, तर राज्यकर्ते म्हणून या भूमीचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे, अशी या (अपवाद वगळता) मुसलमान समाजाची आज धारणा आहे आणि त्या दृष्टीने स्वतंत्र राज्यनिर्मितीचे त्यांचे प्रयत्न ब्रिटिशांच्या मदतीने अव्याहत चालू आहेत. हिंदुसमाजाने हे प्रयत्न हाणून पाडावेत, मुसलमान समाजाच्या अडवणुकीला व धाकदपटशाला भीक न घालता केवळ आपल्या बळावर विसंबून राहावे. कारण यजमान या दृष्टीने या वास्तूच्या, या भूमीच्या मुक्ति भुक्तीची मुख्य जबाबदारी हिंदुचीच आहे. याच समाजाचा या भूमीशी अत्यतिक जिव्हाळ्याचा पिढ्यानुपिढ्यांचा इतिहाससिद्ध ऋणानुबंध आहे. | हाच तो हिंदुराष्ट्रवाद. मुळात राष्ट्रवाद ही विशिष्ट भूमीवर विशिष्ट समाजाची स्वामित्व प्रस्थापित करू पाहणारी प्रेरणा आहे. या प्रेरणेचा उगम आधुनिक आहे. पारलौकिक निष्ठेचा लोप झाल्यावर ऐहिकाचे अधिष्ठान शोधणा-या युरोपीय समाजाला फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो याने दिलेली ही देणगी आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जो इहवादी, औद्योगिक व नागर समाज युरोपात उदयास आला, त्याचे हे तत्त्वज्ञान. या नव्या समाजाच्या मूलस्थानी असणारी स्वामित्वाची, संचयाची प्रेरणाच राष्ट्रवादाच्याही मुळाशी असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच राष्ट्रवाद हा विशिष्ट भूमीवर विशिष्ट समाजाचे स्वामित्व सिद्ध झाल्यावरच उदयास येऊ शकतो. भूमीचा आणि राष्ट्रवादाचा संबंध अटळ आहे; कारण भूमी हाच स्वामिभावाचा सध्याच्या युगात तरी मुख्य आधार आहे. भूमीइतकी अन्य कशाच्या योगानेही समाजाची स्वामित्वधारणा व्यक्त होऊ शकत नाही. इतिहास, संस्कृती, भाषा आदि समान बंधनांनी जो समाज एकत्व पावलेला असतो, त्याचे विशिष्ट भूमीशी स्वामित्वाचे नाते जोडले जाणे, हीच राष्ट्रनिर्मितीची अखेरची प्रक्रिया आहे. एकत्वाचे सर्व घटक आहेत, समान परंपरा व समान आकांक्षा आहेत, पण भूमी नाही तोपर्यंत ज्यू हे राष्ट्र नाही. पॅलेस्टाईनची भूमी लाभली आणि ज्य-राष्ट्राचा जन्म ।। बलसागर ।। २३ ________________

झाला. आपली प्रक्रिया कोण ती ? राम, कृष्ण, बुद्ध, शिवाजी ही परंपरा जो आपली मानतो, असा समाज राष्ट्रीय समाज म्हणून ओळखणे व इतिहासाने त्याच्या म्हणून सिद्ध केलेल्या भूमीशी या समाजाचे स्वामित्वाचे नाते जोडणे; ही परंपरा आपली मानणारा भारतात आज फक्त हिंदू समाजच आहे, म्हणून हिंदुसमाज हा या देशात राष्ट्रीय समाज ठरतो. या समाजाच्या म्हणून मानल्या गेलेल्या 'आसिंधू सिंधुपर्यन्ता’ भूमीवर इतर कोणत्याही समाजाचा अधिकार पोहोचू शकत नाही. ही आजची वस्तुस्थिती. उद्या इतर समाज या राष्ट्रीय समाजाशी समरस होऊ लागतील, परंपरांची सरमिसळ होऊन ती अधिक समावेशक होईल. ती तशी होण्यासाठी एकत्वाचे, एकात्मतेचे संस्कार व प्रयोग करीत राहण्याची जबाबदारी. या आज राष्ट्रीय म्हणून गणल्या जाणा-या समाजाचीही आहेच; हे सर्व मान्यच. पण तशी परिस्थिती उद्भवल्यावरही, परंपरा अधिक व्यापक व आज तिच्यापासून दूर राहणा-यांना सामावून घेण्याइतकी समावेशक झाली तरी, तेव्हाही या राष्ट्राला 'हिंदुराष्ट्र म्हणण्यास प्रत्यवाय नसावा; कारण निदान सावरकरांनी तरी 'हिंदू' हा शब्द स्वच्छ राजकीय अर्थानेच योजलेला आहे ! धर्माशी या शब्दाचा सावरकरांनी संबंध जोडलेला नाही. राम-कृष्ण-बुद्ध-शिवाजी ही परंपरा मानणारा व या परंपरेने पुनित झालेल्या आसिंधूसिंधू भूमीशी इमान बाळगणारा तो हिंदू, ही सावरकरांच्या हिदुत्वाची व्याख्या आहे. उद्या या परंपरेत एखादा अकबरही येऊ शकेल. पण तेव्हाही ही परंपरा हिंदू या नामाभिधानाने ओळखण्यास हरकत नाही. 'गंगा' आणि ‘यमुना'चा संगम झाल्यावर पुढे वाहत जाते ती 'गंगा' असते; जरी तिच्यात यमुनेच्या पाण्याचा रंग मिसळलेला असतो. पण जर उद्या सर्वांनाच केवळ हे नावच परंपरासमन्वयाच्या आड येते असे खरोखरच वाटू लागले तर, त्यातही बदल करण्यास हरकत नाही. ही स्वाभाविक उत्क्रांतीही सावरकरांना अमान्य नव्हती. त्यांचा आग्रह होता आशयाचा. कोणती परंपरा या भूमीची बीज परंपरा आहे, हे सिद्ध करण्याचा. एकीकडे हिंदुराष्ट्रवादाचा आग्रहाने पुरस्कार करीत असतानाच, सावरकरांनी हिंदी राष्ट्रवादाचे स्वागत करण्याचीही अगदी प्रारंभापासूनच तयारी ठेवली होती. १९३६-३७ च्या सुमारास ' हिंदी राज्याचे नागरिक सर्वांआधी आम्ही होऊ' ही भूमिका मांडताना सावरकरांनी निःसंदिग्ध शब्दात सांगितले होते-- | “ संयुक्त हिंदी राज्याचे स्वप्न, जर पहिल्याने कोणाला पडले असेल, तर ते हिंदूनाच होय. आपल्या त्यागांनी आणि झगड्यांनी ते राज्य कोणी आजच्या व्यवहार्य राजकारणाच्या कक्षेत आणले असेल, तर तेही पुन्हा हिंदंनीच होय. आपल्या बलाबलाचा योग्य विचार करून, हिंदू हे एक समान नि संयुक्त हिंदी राज्य स्थापण्याच्या हेतूने चाललेल्या या सार्वलौकिक झगड्यात, आपल्या अहिंदूवर्गातील देशबांधवांची सहकारिता मिळविण्याला केव्हाही अनुकूलच होते व आहेत. हिंदुस्थानात आपली ।। बलसागर ।। २४ ________________

प्रचंड बहुसंख्या आहे, अहिंदु धर्म आणि विशेषतः मुसलमान, हे राष्ट्रीय झगडा चालू असताना कोठेच आढळत नाहीत नि झगड्याची फळे तोडण्याच्या वेळी मात्र नेमके आघाडीस असलेले आढळतात, आणि आपण एकटेच आजवर सर्व लढा लढत नि त्यातले आघात सोशीत आलो आहोत; या सर्व गोष्टींची जाणीव असूनसुद्धा ते एकीकडे ठेवून, हिंदू हे सर्वांचे संयुक्त हिंदी राष्ट्र बनविण्यास समुत्सुक आहेत, आणि आपले कोणतेही राखून ठेवलेले असे स्वतंत्र हक्क, वा सत्ता, वा अधिकार हिंदुस्थानातील अहिदुवर्गावर मुळीच लादू इच्छीत नाहीत.

 • पण ते हिंदी राज्य मात्र निर्भेळ हिंदीच असू द्या. त्या राज्याने मताधिकार, नोक-या, अधिकाराची स्थाने, कर यांच्या संबंधात धर्माच्या व जातीच्या तत्त्वावर कसल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना मुळीच थारा देऊ नये. कोणताही मनुष्य हिंदू आहे की, मुसलमान आहे की, खिस्ती आहे की, ज्यू आहे, इकडे लक्ष दिले जाऊ नये. या हिंदी राज्यातील सर्व नागरिक, सर्वसामान्य लोकसंख्येतील त्यांची धार्मिक किंवा जातीय शेकडेवारी विचारात घेतली न जाता, त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक गुणावगुणांनुसार वागविले जाऊ द्या. इंग्लंड किंवा अमेरिकेतील संयुक्त संस्थाने यांसारख्या जगातील इतर प्रत्येक राष्ट्रात असल्याप्रमाणे, देशातील प्रचंड वहुसंख्य लोकांना समजत असेल तीच भाषा नि तीच लिपी, त्या हिंदी राज्याची राष्ट्रीय भाषा नि राष्ट्रीय लिपी होऊ द्या......कोणतीही जाती किंवा पंथ, वंश किंवा धर्म विचारात न घेता ‘एक मनुष्य एक मत' असा सर्वसामान्य नियम होऊ द्या. अशा स्वरूपाचे हिंदी राज्य जर दृष्टीपुढे धरावयाचे असेल तर हिंदुसंघटनावादी, स्वतः हिंदुसंघटनांच्याच हितार्थ, त्या राज्याला अंतःकरणपूर्वक पहिल्याने आपली निष्टा अपतील.

यावरून स्वच्छ दिसते की, ध्येय म्हणून हिंदी राष्ट्रवाद सावरकरांना केव्हाच अमान्य नव्हता; परंतु वस्तुस्थितीकडे डोळेझाक होऊ नये, हा त्यांचा आग्रह होता. काँग्रेसप्रणित हिंदी राष्ट्रवाद अनुनयापोटी, भीतीपोटी जन्मास आला आहे, ही सावरकरांची टीका होती. त्यांना हिंदी राष्ट्रवादाची स्वाभाविक परिणती अभिप्रेत होती. पण परिणतावस्थेला पोहोचलेला हिंदी राष्ट्रवाद तर सोडाच, स्वाभाविक व सहजस्वरूप हिंदुराष्ट्रवादही त्या काळात बहुसंख्य जनतेला मानवणारा नव्हता. असे का असावे ? कुठल्याही मत्सरोत्तेजक भेदाभेदांना थारा न देणारा, व्यक्तीचे गुण हीच एकमेव कसोटी मानणारा, राष्ट्रवादाच्या मुळाशी असणारा आधुनिक ऐहिकनिष्ठ हिंदुसमाजच त्या काळी भारतात विकसित झालेला नव्हता. हिंदुस्थान हा शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांची वसाहत बनलेला देश होता. म्हणजेच येथील स्वतंत्र आथिक कर्तृत्व मारले गेले होते. स्वतंत्र कारखानदारी येथे वाढू शकत नव्हती. स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे आलेला स्वतंत्र बाण्याचा औद्योगिक समाज येथे अस्तित्वात येऊ ३ ।। बलसागर ।। २५ ________________

शकत नव्हता. असा समाजच आपल्या ऐहिक विकासाच्या आड येणारी जातीबंधने, धार्मिक रूढी इत्यादी भेदाभेदांची बंधने झुगारून, आपल्या प्रगतीची वाट मोकळी करून घेत असतो. केवळ अंगच्या कर्तृत्वावर व प्रयत्नांच्या बळावर पुढे येण्याची इर्षा बाळगू शकतो. 'गुण' हीच एकमेव कसोटी मानून आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनाची नवी घडी बसविण्याचा धीटपणा प्रकट करीत असतो. राष्ट्रवाद हे अशा स्वयंप्रज्ञ, गतिशील अशा नव्या मध्यमवर्गाचे तत्त्वज्ञान आहे व जोपर्यंत असा वर्ग सामाजिक जीवनात प्रभावी होत नाही, तोपर्यंत निर्भेळ राष्ट्रवादाचा अविष्कारही अपूर्ण व खंडितच राहत असतो. सावरकर जेव्हा हिंदुराष्ट्रवादाचा विचार मांडीत होते, तेव्हा तो ग्रहण करणारा असा गतिमान नवा मध्यम वर्गच देशात, मोठ्या प्रमाणावर, उदयास आलेला नव्हता; पारतंत्र्यामुळे तो येऊच शकत नव्हता. येथे होता तो परकीय नोकरशाहीने पोसलेला कमकुवत पांढरपेशा सुशिक्षित समाज-जो विचाराने जरी सावरकरांच्या मागे जाणारा असला तरी कोणतीही लढाऊ कृती करण्यास असमर्थ होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास आपल्या राष्ट्रीय क्रांतीतील हा कमकुवतपणा स्पष्ट झाला. देशाची फाळणी कोणीही टाळू शकले नाही. गांधी-नेहरू काय किंवा सावरकर-सुभाष काय, कोणालाच फाळणी मनापासून नको होती. मुसलमानांची अरेरावी व अराष्ट्रीय वृत्ती समजत होती. पण फाळणीचे संकट टाळायचे तर, या अरेरावी अल्पसंख्याकांनी फेकलेले अराजकाचे, रक्तपाताचे, जातीय व धार्मिक दंगलीचे आव्हान स्वीकारून, या अराष्ट्रीय प्रवृत्तीशी समोरासमोर झुंज देण्याइतका येथील राष्ट्रीय समाज प्रगल्भ व प्रखर असायला हवा. गांधी-नेहरू ब्रिटिशांच्या दडपणांना बळी पडले, लीगच्या अराजकाच्या व रक्तपाताच्या धमकावण्यांपुढे त्यांनी गुढगे टेकले, हे खरेच. पण हेही खरे नव्हे का की, सर्व हिंदुत्वनिष्ठ संस्थाही फाळणी घडून येत असता स्वस्थ राहिल्या ? सशस्त्र, निःशस्त्र, अहिंसक-कोणत्याही मार्गाने फाळणीविरुद्ध प्रतिकाराचे आंदोलन उभारणे यांना को अशक्य वाटले ? लढाऊ विचार असला, तरी लढाऊ कृती करणारा * राष्ट्रीय समाज या संघटनांच्या मागे तेव्हा नव्हता, हेच या अक्रियेच कारण असू शकते. लिकन जेव्हा दक्षिण अमेरिकेचे बंडाचे, यादवी युद्धाचे आव्हान स्वीकारतो, तेव्हा त्याच्यामागे उद्योगप्रधान उत्तर अमेरिकेचा प्रगत मध्यम वर्ग उभा असतो. आमच्याकडे हा वर्ग नव्हता, असा कृतिशील समाज नव्हता; त्यामुळे लिकन असूनही त्याला शेवटी नमावे लागले. हिंदुराष्ट्रवाद तात्त्विकदृष्ट्या अचूक असूनही व्यवहारतः अपयशी ठरला. हिदी राष्ट्रवाद तर अस्तित्वातच नव्हता, त्यामुळे त्याचा विचार करण्याचेच कारण नाही. गेल्या १७ वर्षात, स्वतंत्र भारतात औद्योगीकरणामुळे हा नवा प्रगत मध्यमसमाज उदयास येत आहे. सावरकरांच्या व्यावहारिक यशाची व मान्यतेची ही पायाभरणीच सुरू आहे. सावरकरपवे आता दूर नाही, कारण समर्थ भारत आता सर्वांचेच । बलसागर ।। २६ ________________

साध्य झालेले आहे. ३८ च्या सावरकरांनी दोन घोषणा दिल्या. राजनीतीचे हिंदुकरण आणि हिंदूचे सैनिकीकरण. पैकी उत्तरार्ध देशाने मान्य केला. शासनाने सैनिकीकरणाचा अवलंब केला. अगदी साधनशुचिताप्रिय समाजवाद्यांनीही त्याचा पुरस्कार मांडला. ३८ चे सावरकर मान्य नसणा-या या पोक्त आणि पुरोगामी मंडळींची काय ही दैना ! नुकत्याच घडलेल्या भारत-पाक संघर्षात भारतीय फौजा लाहोरमध्ये घुसविण्यात आल्या नाहीत, याबद्दल या मंडळींनी भारत सरकारवर कठोर टीका केली आहे ! चीनने आणखी आगळीक केल्यास, तिबेटमध्ये सैन्य घुसवा, असाही यांचा भारत सरकारला सल्ला आहे ! पाकिस्तानच नष्ट केले पाहिजे असाही या मंडळींचा नवा पवित्रा आहे. काळाने इतक्या लवकर आपला सूड उगवावा ! ६८ साल उजाडण्यापूर्वीच सावरकरांनी यांची अशी दांडी उडवलेली पाहून मोठी मौज वाटते, करमणूक होते. राहता राहिले सावरकरांचे हिंदुत्व. देश जसजसा स्वावलंबनाच्या दृष्टीने प्रगती करू लागेल, या भूमीच्या राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाला जसजसा आकार व आशय प्राप्त होऊ लागेल, तसतसा येथील जनमानसाच्या मुळाशी असणारा हिंदुत्वाचा मूळ संस्कारच प्रबळ होईल; किंबहुना या संस्काराची बीजभूमी घट्ट पकडल्याशिवाय या देशाचे स्वत्व जागेच होऊ शकणार नाही, स्वावलंबन आणि स्वयंपूर्णता या केवळ घोषणाच राहतील. हाच हिंदुत्वाचा वन्ही चेतवावा, हेच बीज फुलवावे, अशी धारणा वाढत जाईल. मग भले त्याला कोणी * भारतीय' हे नाव देवो किंवा हिंदी' या नावाने ओळखो. या नावांच्या आत दडले असेल-कधी सुप्तावस्थेत तर कधी प्रकट-ते सावरकरांचे हिंदुत्व'च असेल. शंका आहे सावरकरांचा बुद्धिवाद, सावरकरांची विज्ञाननिष्ठा, येथे कितपत रुजेल याची. सावरकरांचे निर्भय पुरोगामित्व, विज्ञानाधिष्ठित बुद्धिवाद येथे रुजला नाही तर त्यांचे सैनिकीकरण, त्यांचे हिंदुत्व, येथील सनातनी प्रतिगाम्यांच्या कोठडीत बंदिस्त होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून सावरकरांचा हा बुद्धिवादी वारसा, त्यांची सामाजिक समतेची आणि स्वातंत्र्याची आकांक्षा येथे प्रज्वलित राहण्याची नितांत आवश्यकता आहे. बाकीचे सर्व सावरकर मान्य होतील, तोफांच्या चौघड्यांनी त्यांच्या शताब्दया भावी पिढ्या साज-या करतील-कदाचित त्यांना प्राणाहून प्रिय असणा-या त्या सुरसरिता सिंधूच्या विस्तीर्ण तीरावरही हे घडून येईल. पण तेव्हा विजयाच्या त्या अत्युत्कट क्षणी, आमच्या एका हातातील धगधगत्या अग्निगोलकांबरोबरच आमच्या दुस-या हातात सामाजिक समतेसाठी निर्भयतेने झुंजणारी सावरकरी बुद्धिवादाची तळपती असिलता चमकत असेल काय ? ती तशी त्या वेळी असेल तर सावरकरांचे जीवन सर्वार्थाने धन्य झाले, कृतार्थ झाले असेच म्हणावे लागेल. मार्च १९६६ । बलसागर ।। २७ ________________

वून नेण्यात आले आहे. तिचा शोध काढून, तिला परत आपल्या स्वाधीन करण्यात यावे, अशी धनवतीची मुख्य मागणी होती. | दिनांक ५ ऑगस्टला कुमारी परमेश्वरी तिच्याच दुकानात कॅशिअर म्हणून काम करणा-या गुलाम रसूल कांथ या तरुणाच्या घरी सापडली. | पोलिसांनी आईच्या हवाली करण्याऐवजी किंवा पुढील चौकशीसाठी रैनावारी पोलीस चौकीवरच ठेवून घेण्याऐवजी परमेश्वरीला महाराजगंज या दुस-याच विभागातील एका पोलीस ठाण्यावर हलवली, जो मुसलमान वस्तीचा भाग आहे. येथून पोलिसांनी मुलीला एका स्त्री-डॉक्टरकडे तपासणीसाठी पाठवून तिचे वय वीस आहे असे सटफिकेट मिळवले व मुलगी गुलाम रसूलच्या स्वाधीन करून टाकली. पळवण्याच्या आरोपावरून पकडल्या गेलेल्या गुलाम रसूलला जामिनावर आधीच सोडून देण्यात आले होते. शालेय नोंदीप्रमाणे मुलीची जन्मतारीख २८ जुलै १९५० ही दिसत असताना व यावरून आज ती १७ वर्षांची अज्ञान आहे हे पुरेसे स्पष्ट होत असताना, डॉक्टरी तपासणीचा हा बेभरंवशाचा आडमार्ग कशासाठी ? । संशयाला येथून सुरुवात झाली. डॉक्टरी सर्टिफिकेट हाती पडताच पोलिसांनी आईला असेही सांगून टाकले की मुलीने वीस जुलैलाच इस्लाम धर्माचा स्वीकार केला असून अठ्ठावीस जुलैला गुलाम रसूलबरोबर तिचा रीतसर निकाही लागलेला आहे संशयाची जागा संतापाने घेतली. गेले सहा महिने परमेश्वरीच्या बाबतीत अशा संतापजनक गोष्टी वरचेवर घडत होत्या. दुकानात तिचे हिशेब चूक असल्याचे ब-याचदा दाखवले जाई, कॅश कमी पडे, मॅनेजरची बोलणी तिला खावी लागत; कधी कमी पडलेली रक्कम तिच्या नावावर टाकली जाई, कधी कॅशियर गुलाम रसूलच रकमेची भरपाई करी किंवा मॅनेजरसमोर तिला जामीन राही. तिचे हिशेब सर्वात शेवटी घेतले जात व काहीतरी खुसपट काढून तिला दुकानात ब-याच उशीरापर्यंत थांबवले जाई. तोपर्यंत तिच्या घराकडे जाणारी शेवटची बस निघून गेलेली असे आणि दुकानापासून घरापर्यंतच्या साडेचार मैलांच्या रस्त्यावरून रात्रीची सोबत करण्याची संधी गुलाम रसूल सहसा सोडीत नसे. मॅनेजर गिरिधारीलाल वत्त : (Watt) परमेश्वरीच्या घराशेजारीच राहत असल्याने कित्येकदा तेच परमेश्वरीला सोबत करीत, ही गुलाम रसूलची अडचण लवकरच दूर झाली–केली गेली असे म्हणतात. श्री. वत्त यांची बदली झाली व त्यांच्या जागेवर श्री. हृदयनाथ हे नवीन गृहस्थ आले. हेही टिकले ।। बलसागर ।। ३० ________________

नाहीत आणि शेवटी गुलाम हसन यांना या जागेवर आणून बसवण्यात आले. जाळे बरोबर पसरले गेले, परमेश्वरीला अधिकच उशीर होऊ लागला, तीन हजारापर्यंत रक्कम तिच्या नावावर बाकी चढली, गुलाम रसूलचे औदार्यही वाढत गेले, त्याच्याही हाती त्याचा नसलेला बराचसा पैसा खेळू लागला. सोबतही रंगू लागली. असा जाहीर आरोप गुलाम हसन आणि गुलाम रसूल या कंपनीवर करण्यात आला आहे की, ऑडिट रिपोर्टात गुलाम रसूलकडे अठरा हजार रुपयांची रक्कम येणे बाकी काढण्यात आली, व तेरा हजार रुपये काही चतुर पद्धतीने जमा दाखवून गुलाम हसन यांनी, आपल्या नात्यातल्याच असणा-या गुलाम रसूलची सुटका करून घेतली. जय सरकार ! जय सहकार ! मुलगी सापडली. गुलाम रसूलच्या ताब्यात ती परत दिली गेली. पोलिसांना वाटले, प्रकरण मिटले. नेहमीचा अनुभवही काही वेगळा नव्हता. | पण धनवती यावेळी एकटी नव्हती. पोलिसांनाही कल्पना नव्हती की, या वेळचा मामला काही वेगळाच होता. अर्थात् अगोदर कसली काही कल्पना करता आली, तर ते पोलीस कसले ? । | ६-७ ऑगस्टलाच निषेधाचे सूर उमटू लागले. काश्मिरातील पंडित समाजाचा असंतोष, त्वेष, राग लहानसहान सभांतून प्रकट होऊ लागला. मुलगी आईला परत मिळावी, फार तर चौकशी पूर्ण होईपर्यंत तिला एखाद्या त्रयस्थाच्या स्वाधीन करावी, एवढीच सुरुवातीची मागणी होती. पण या जोडीला इतरही मागण्या हळूहळू वाढू लागल्या. आंदोलन पसरू लागले. वीस वर्षे दडपला गेलेला आवाज बाहेर पडू लागला. आता किती सहन करायचे ? कायमचे नाहीसे होण्यापूर्वी, एकदा किंकाळी फोडली पाहिजे असा संकल्प आकार घेऊ लागला. कोणी नेता नव्हता, कोणी राजकीय पक्ष नव्हता; पण कोठारच इतके ठासून भरले होते की, एक ठिणगी पुरेशी होती. परमेश्वरी ही ठिणगी ठरली आणि कोठार धुमसू लागले. प्रतिपक्षाला हे अनपेक्षित होते; पण संधी सापडताच पंडितांचा हा आवाज गळयासकट दाबून टाकण्याची कारस्थाने रचली जाऊ लागली. पंडितही मरावा आणि मुख्यमंत्री सादिकही उडावा असे ज्यांना वाटत होते तो मंडळी पुढे सरसावली आणि घाव घालण्याची संधी हुडकू लागली. दहा-बारा ऑगस्टपासूनच सभांचे रूपांतर हळूहळू मिरवणुकात होऊ लागले होते. भारत भाग्य विधाता,' ‘भारत झिदाबाद', अशा घोषणा देत पंडितांचे लहानमोठे जथे, स्त्री-पुरुषांचे, विद्यार्थी-विद्यार्थिनींचे घोळके, श्रीनगरच्या रस्त्यांतून हिंडू लागले होते. दंगली, रक्तपात झाल्यावर शांततेची आवाहने करणा-या आणि पोकळ फतवे काढणा-या कुणाकुणाचेही याकडे लक्ष जात नव्हते. मुख्यमंत्री सादिक । बलसागर ।। ३१ ________________

स्वस्थ होते, कदाचित डोळेझाकही करीत असतील, कोणी सांगावे ? पण दिल्ली ! लाख लाख पलटणी काश्मिरात आणि श्रीनगरात खड्या असताना, गुप्तचरांचे खाते हाताशी असताना, सादिक सरकारलाच काय, प्रत्यक्ष भारतीय शासनालाच हादरा देणा-या एका काळ्या कारस्थानाची गंधवार्ताही दिल्लीपर्यंत पोहोचू नये ? ऑगस्ट-सप्टेंबर हे काश्मिरच्या बाबतीत नेहमीच धोक्याचे महिने आहेत, याची पूर्वानुभवावरून कोणालाही जाणीव असू नये ? परमेश्वरीच्या निमित्ताने, पंडित समाज जो काही आवाज उठवत होता, त्याला काश्मिरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्त्व आहे, कणाकणाने आणि क्षणाक्षणाने हातातून चाललेल्या काश्मिरची ही एक आर्त हाक आहे, ही कोणालाही ऐकू येऊ नये ! कुणाचेही इकडे लक्ष असू नये ? | हो. कुणाचेच लक्ष नव्हते हे खरे आहे. सारे कसे शांत होते, थंडगार होते, मजेत होते. वेळीच सावध झाले, तर ते आमचे शासन कसले ? आमचा समाज कसला ? वैरी मात्र सावध होता. संधीची वाट पाहत होता. संधीही लवकर चालून आली. १५ ऑगस्ट. श्रीनगरातील रीगल चौकाला, इतिहासात प्रथमच, या दिवशी निरपराध भारतीय स्त्री-पुरुषांच्या रक्ताचा अभिषेक घडणार होता. त्यादिवशी सकाळी-१५ ऑगस्टला श्रीनगरमधील रीगल चौक मुलामाणसांनी, तरुणतरुणींनी, आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी नुसता फुलून निघाला होता. मिळणारे चारी रस्ते सारखे वाहत होते. सर्वांच्या मुखातून एकच घोष, एकच गर्जना निघत होती-' भारत भाग्यविधाता,' ' भारतमाता की जय', ' भारता जागा हो', भारतीय बांधवांनो, आम्हाला साथ द्या, आम्हाला आपल्याशिवाय कोणाचा आधार आहे !' श्रीनगरात हे नवीन होते, अप्रप होते. निदान गेल्या वीस वर्षांत हे शब्द, हा घोष, ही भारताविषयीची आत्मीयता येथल्या वातावरणाला अपरिचित होती. कुणालाही यात आव्हान नव्हते, कुठलाही आक्रमकपणा यात अभिप्रेत नव्हता. होता एक अविचल निर्धार, होती न्यायाची एक साधी सरळ मागणी. श्रीनगरातील भारतीय म्हणवणारे, पण भारतीयत्वाच्या खाणाखुणा पुसून टाकणारे, जवळजवळ स्वतंत्र कारभार करणारे, दिल्लीलाही वेळप्रसंगी झुगारून देणारे शासन आपल्यावर अन्याय करीत आहे, आपले उरलेसुरले अस्तित्वच काश्मिरातून नाहीसे करण्याच्या खटपटीत आहे हे पाहिल्यावर, या श्रीनगरातील पंडित समाजाने दिल्लीला जाग आणण्यासाठी, सा-या भारताचे लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्टच्या सुमुहूर्तावर रीगल चौकाचा-श्रीनगरातील या ।। बलसागर ।। ३२ ________________

मध्यवर्ती स्थानाचा शेवटी आश्रय घेतला होता. नेहमीच जिथल्या सचिवालयावर भारतीय राष्ट्रध्वजाबरोबरच जम्मू आणि काश्मिर राज्याचा स्वतंत्र लालध्वज बेमुर्वतखोरपणे डोलत असतो,तेथे निदान १५ ऑगस्टला तरी, निखळ भारतीय निष्ठा प्रदशित करण्याचा कार्यक्रम सहज खपवून कसा घेतला जाणार ? काहीतरी तिखट, झणझणीत, कायमचा.लक्षात राहील असा जबाब पंडितांना दिलाच पाहिजे, जमल्यास सादिकही बदनाम झालाच पाहिजे. पंडितांची खोड मोडावी, राजकारणही साधावे. त्या दृष्टीने मग सर्व तयारी झाली, पोलीसदलाला आवश्यक त्या सूचना दिल्या गेल्या. । | तशी परमेश्वरी आंदोलनाला ११ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली होती. पाच-पाच पंडितांची एक एक तुकडी रोज सत्याग्रह करीत होती, त्यांना निरोप देण्यासाठी लोक जमत होते, सभा होत होत्या; या सभांवर व क्वचित होणा-या मिरवणुकांवर पोलिसांचे लाठीहल्लेही होत होते. पण १५ ऑगस्टचा रीगल चौकातला सत्याग्रह हे शासनाने आव्हान मानले व कोणतेही प्रक्षोभक कृत्य, एका न्याय्य मागणीसाठी जमलेल्या या हजारोंच्या जमावाकडून घडले नसताना पोलिसांनी जमाव हटवण्याच्या निमित्ताने निर्लज्ज वागणुकीची कमाल केली. माणुसकीला काळीमा आणणारी पोलिसांची ही संतापजनक वागणूक तेथे उपस्थित असणा-या कोणालाही विसरता येणे अशक्य होते. १५ दिवसांनंतर मी श्रीनगरात पोचलो व ज्याला ज्याला म्हणून या घटनेविषयी विचारले, त्याने कधी शरमेने मान खाली घातली, संतापाने भुवई वर चढवली, कधी त्याच्या डोळ्यात एकदम पाणी तरळले. एक अनभवी व दिल्लीतील एका नामवंत इंग्लिश वृत्तपत्राचा वार्ताहार मला सांगत होता* त्या दिवसापर्यंत मी या आंदोलनाविषयी तटस्थ होतो. पण त्या दिवशी पोलिसांनी केलेला रानटीपणा पाहून मीही हादरलो, हबकून गेलो. अखेर मीही एक माणस आहे. वस्तुनिष्ठ वार्ता देणे हे माझे कर्तव्य असले तरी मलाही काही भावना आहेत. न्याय-अन्यायाची चाड आहे. त्या दिवशी गरज नसताना पोलिसांनी केवळ निर्घण लाठीहल्लाच केला असे नाही, कच्चीबच्ची पोरे-स्त्रियांच्या अंगाखांद्यावर असलेली मुलेही–सडकून काढली असे नाही, हवेत अश्रुधूर सुटले, गोळीबार झाला असे नाही; हे मी एकवेळ समजू शकतो. पोलीस बेफाम बरेचदा होतात. पण त्या दिवशी१५ ऑगस्टच्या या राष्ट्रीय महत्वाच्या दिनी, सुप्रभाती, येथे-या रीगल चौकातभारतीय स्त्रीत्वाची जी विटंबना करण्यात आली ती मी समजूच शकत नाही. हे कृत्य पूर्वनियोजितच असले पाहिजे. ढकलाढकली, मारपीट तर काहीच नाही. पण कुणाचे केस ओढले गेले, कुणाची वस्त्रे टरकवण्यात आली, नको त्या अवयवांची SITETETUT FESTT TT. Even sexual organs were touched. I can't des । बलसागर ।। ३३ ________________

cribe. I can't describe. माझ्या शेजारीच एक पाकिस्तानी पत्राचा वार्ताहार हे सर्व दृश्य उभे राहून पाहात होता. तोही हात वर करून एकदम किंचाळला होता-' No. No. This is not in our culture.'_' हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. त्या दिवसापर्यंत अगदी तटस्थपणे पंडितांच्या आंदोलनाकडे पाहणारा मी एकदम त्याविषयी सहानुभूती बाळगणारा झालो, शासनाच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे अशी शंका त्या दिवसापासून माझ्या मनात घर करून बसली.' पाकिस्तानी वार्ताहारालाही जे पाहिल्यावर असभ्य, नीच, रानटी, माणुसकीला काळीमा आणणारे, मुसलमानी संस्कृतीतही न बसणारे असे वाटले ते आमच्या दिल्लीतील बड्या इंग्रजी पत्रातून कसे छापून आले माहीत आहे ? ‘Police mildly latthicharged- ‘पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी सौम्यसा लाठीहल्ला केला. ' | ' असे का चुकीचे छापून यावे ?' मी त्या वार्ताहाराला प्रश्न केला. तो हसला. एवढेच म्हणाला, “तुम्हाला माहीत तर आहे ? माझ्याकडून कशाला काढून घेता ?' वत्तपत्रे ही लोकशाहीच्या रक्षणाची हमी आहे, जनतेच्या हातातील ते एक महान शस्त्र आहे ... काय राव टिळक-आगरकरांच्या काळातल्या जुन्या बाता अजूनही मारता! वृत्तपत्रे, विशेषतः मोठी पत्रे, हा आज एक व्यवसाय आहे. बाजारात विकत घेण्याची आणि देण्याची ती एक वस्तू आहे. तिची किंमत मोजली का आपल्याला हवा तसा आणि तेवढाच आवाज तिथून निघेल, अशी व्यवस्था करता येते, एवढी साधी गोष्टही तुम्हाला माहीत नाही ? हजरतबल मशिदीतील पैगंबरांचा म्हणून मानला जात असलेला एक केस नाहीसा झाला तर याच गुलाबी काश्मिरने पाच-सहा वर्षांपूर्वी केवढा पेट घेतला होता ! दिल्ली केवढी हादरली होती ! आमच्या सौजन्यमूर्ती लालबहादुरशात्रीना श्रीनगरात केस सापडेपावेतो कसा तळ ठोकून राहावे लागले होते ! शमसुद्दीनसाहेबांच्या मंत्रिमंडळाची आहुती घेऊनच हे धडधडलेले कुंड तेव्हा कसे अखेर शात झाले होते, करण्यात आले होते ! आठवतो का हा सारा इतिहास ? | पंधराशे वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतलेल्या एका थोर प्रेषिताच्या केसासाठी काश्मिर पेटू शकत होते; पण १५ ऑगस्टच्या राष्ट्रीय दिनी, पाकिस्तानी पत्र । बलसागर ।। ३४ ________________

कारालाही अमानुष आणि रानटी वाटणाच्या पद्धतीने भारतीय स्त्रीची अन् । दिवसाढवळ्या, श्रीनगरातील भरचौकात लुटली गेली होती, तरीही, साधी चौकशीची मागणी सादिकसाहेब धूडकावू शकत होते आणि दिल्लीलाही हस्तक्षेप करण्याची गरज भासत नव्हती, की हिंमतच होत नव्हती ? पंडितसमाजाची हिंमत मात्र या प्रसंगानंतर खचण्याऐवजी अधिकच वाढली. त्यांचा निश्चय अधिकच कणखर झाला. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. भारतात ठिकठिकाणी पसरलेल्या पंडित समाजाकडून आर्थिक मदतीची आश्वासने येऊ लागली. सहानुभूती व्यक्त करणाच्या तारांचा पाऊस पडू लागला, पुढील कार्यक्रमांबाबत सूचना व प्रत्यक्ष भाग घेण्याची तयारीही पत्रांतून कळवली जाऊ लागली. पाच हजारांच्या तुकडीने श्रीनगर ते दिल्ली चालत जाऊन लोकसभेचे द्वार ठोठावावे, काहींनी अग्निसमर्पण करून घ्यावे, प्राणांतिक उपोषणे करावीत, शंभर शंभर कुटुंबांनी काश्मिरातून कायमसाठी बाहेर पडावे असे अनेक कार्यक्रम कृती समितीपुढे या वेळी विचारासाठी होते, यावरून पंडित समाज किती प्रक्षुब्ध झाला होता, जिवावर उदार होऊन आंदोलन यशस्वी करण्याचा त्याचा निर्धार किती तीव्र होता याची काहीशी कल्पना येऊ शकते. चळवळीची रोजची हकीकत, प्रगती पत्रकातून जनतेसमोर ठेवण्यात येत होती. भूमिका पुनः पुन्हा स्पष्ट केली जात होती. सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या आरोपांचे खंडन केले जात होते. चळवळीचे लोण हळूहळू इतरत्रही पसरू लागले होते. जम्मूत गडबड सुरू झाली होती, शेजारच्या पंजाब-हरियाना भागातही अस्वस्थता वाढत होती. श्रीनगरातील व एकूण काश्मिरातील बहुसंख्य मुसलमान समाजानेही या आंदोलनाबाबत अद्यापपर्यंत स्पृहणीय अलिप्तता राखली होती. जरी या आंदोलनाला काश्मिरातील सर्वसाधारण मुसलमान समाजाचा पाठिंबा होता असे म्हणता येत नसले तरी, १५ ऑगस्टला जे घडले ते वाईट आहे, अशीच समजूतदार मुसलमान समाजाची तरी मनोमन भावना होती, असा निर्वाळा पंडित समाजातील अनेक कार्यकत्र्यांनी व तटस्थ निरीक्षकांनी मला दिला, हेही येथे नमूद करणे अवश्य आहे. मात्र हे वातावरण फार तर आणखी एक आठवडाभरच टिकणार होते. त्यानंतर आंदोलनाला एक नवेच जहरी वळण लागणार होते. नवाच जातीय पीळ भरला जाणार होता. अद्यापपावेतो आंदोलन चालू होते, दिवसेंदिवस तीव्रता वाढत होती, पोलिसांचे अत्याचार सुरू होते-एवढीच आंदोलनाची व्याप्ती होती पण आठवड्याभराने चित्र पालटणार होते. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने शेजारी. ।। बलसागर ।। ३५ ________________

राहत असलेल्या हिंदूंच्या घरात मुसलमान गुंड घुसणार होते. जाळपोळी होणार होत्या, दंगली उफाळणार होत्या, लुटालूट होणार होती. आंदोलनाने हे जातीय वळण का घेतले ? याला जबाबदार कोण ? निमित्ताचा धनी कोण ठरला आणि खरी कारस्थाने कोणी रचली ? हजरत बाल मशिदीतून पैगंबरांचा मानला गेलेला केस नाहीसा झाल्याच्या प्रसंगावरून काश्मिरमध्ये पाच-सहा वर्षांपूर्वी जी दंगलीची प्रचंड लाट उसळली तेव्हापासून आपली, राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी दंगली घडवून आणण्याचे एक नवेच तंत्र महत्त्वाकांक्षी राजकारणी व्यक्तींच्या हाती गवसल्याने सारखे झाले. स्वाभाविक लोकक्षोभाचा उद्रेक वेगळा, जुनाट सामाजिक वैमनस्याचा स्फोट वेगळा आणि चार-आठ तासात काहीतरी अफवा पिकवून, ख-याचे खोट करून घडवून आणण्यात येणा-या दंगली वेगळ्या. परमेश्वरीच्या निमित्ताने, पंधरा ऑगस्टला रीगल चौकात आपल्या आया-बहिणींच्या शीलाचे निघालेले धिंडवडे सहन न होऊन, सात्त्विक संतापाच्या तिरीमिरीने दिवसेंदिवस उग्र होत चाललेले पंडितांचे आंदोलन वेगळे आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जातीय दंगलींनी पेटलेले श्रीनगर वेगळे. श्रीनगरचे हे आत्ताचे पेटणे आणि हजरतबालच्या निमित्ताने तेव्हाचे पेटणे, याची जात एकच आहे-राजकीय प्रतिपक्ष बदनाम करणे, उखडून टाकणे, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का देणे या राजकीय खेळात गार गरीब जनतेचा जीव गेला तरी पर्वा नाही. ती काय ! मकी बिचारी कुणीही, कशीही हाकावी ! फक्त हाकताना तोंडी भाषा जनताजनार्दनाची, लोकशाहीची ठेवली म्हणजे पुरे आहे. तेव्हा शमसुद्दीनसाहेबांचा बळी घेण्यासाठी बक्षीजी आतुर झाले होते, आता सादिकसाहेबांना उखडून टाकण्यासाठी कुण पीर गियासुद्दीन, कुणी मीर कासिम पुढे सरसावले. खेळ तोच, पात्रे नवीन. काश्मिरात तर या खेळाचे प्रयोग वारंवार होत असतात. निमित्त सापडण्याचाच काय तो अवकाश ! रॉकेलचे डबे, पलिते, दगड, सोडा वॉटरच्या बाटल्या आणि असंतष्ट जमाव (यालाच ' जनता ' असेही गोंडस नाव दिले जाते) ही सब सामग्री नेहमी तयारच असते. छुः म्हणायचे काय ते बाकी ! अनेक महत्त्वाकांक्षा राजकीय पुढा-यांपाशी असा ज्याचा त्याचा फौजफाटा जमलेला असतो, त्याची व्यवस्थित जपणूक केलेली असते आणि वेळप्रसंगी आपल्या पोशिंद्या मालकांच्या उपयोगी पडून त्याचे काम साधून देणे, हे या फौजफाटयाचे कर्तव्यच ठरते. मध्यपर्वत अरबांचा पराभव झाला त्याचा, आणि काश्मिरचा काही संबंध आहे का 7 या कारणावरून श्रीनगरमध्ये प्रचंड दंगल उसळली होती याचा आपल्याला इकडे पत्ताच नाही. गेल्या सात जूनला जमाव जमला, मिरवणुका निघाल्या, । बलसागर ।। ३६ ________________

इस्रायल-निषेधाच्या घोषणा झाल्या, “ पाकिस्तान झिदाबाद' झाले, दोन ख्स्तिी प्रार्थनामंदिरांना आगी लावण्यात आल्या, ख्यिस्ती शाळांवर दगडफेक झाली इतके भारतविरोधी वातावरण पेटले होते की, पं. नेहरूंच्या भगिनी कृष्णा हाथीसिंग या दिवशी तेथे होत्या-त्यांच्या मोटारीवर दगडफेक झाली, उद्योगपती टाटांच्या कुणी नातेवाईक स्त्रीलाही जमावाकडून असाच त्रास दिला गेला आणि हे सर्व पोलिसांच्या देखत; मंत्री आणि वरिष्ठ सरकारी अधिका-यांच्या निवासासमोर जमावाचे हे सर्व थैमान चालू होते. सादिक साहेबांनाही मग जमावाला शांत करण्यासाठी इस्रायलचा जाहीर निषेध करावा लागला. वास्तविक सादिक कोण, त्यांना या परराष्ट्रीय प्रश्नावर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार काय, हे प्रश्न उपस्थित व्हायला हवे होते; पण तसे काही झाले नाही. दिल्लीने हाही धक्का खपवून घेतला. न खपवून करते काय गरीब बिचारी दिल्ली ! काश्मिरातील एखादा साधा उंदीर खाण्याचे वाणही आता या ' बिल्ली 'त राहिलेले नाही. गेल्या वर्षी काश्मिरला आमच्या पंतप्रधानांनी भेट दिली तेव्हा स्वागतासाठी धरून पकडून माणसे उभी करावी लागली. अशी दिल्ली काय काश्मिरवर वचक वसवणार, हुकूमत प्रस्थापित करणार ? जूनच्या धक्क्यातून सादिकसाहेब आणि ही निःस्त्राण दिल्ली सावरते न सावरते तोच काश्मिरातून आणखी एक आरोळी उठली. आरोळी कसली धमकीच ती ! ‘सादिक सरकारने आपला कारभार सुधारला नाही तर काश्मिरी जनतेला (!) लवकरच आंदोलन उभारावे लागेल. हे आंदोलन ‘घेराओ' पेक्षाही भयानक (serious) असेल याची सादिक सरकारने याद राखावी.' आरोळी ठोकणारी व्यक्ती कुणी दुसरी-तिसरी नव्हती. काश्मिर काँग्रेसच्या अध्यक्षांचीच ही आरोळी होती. म्हणजे ज्या काँग्रेसचे मंत्रिमंडळ काश्मिरात राज्य करीत आहे त्याच काँग्रेसचा अध्यक्ष आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्याला जाहीर धमकी देतो आहे आणि इकडे कामराज आणि इंदिरा गांधी निमूटपणे ही काश्मिरी जुगलबंदी पाहत आहेत, ऐकत आहेत. एक आठवडा लोटला या पहिल्या धमकीला. दोन ऑगस्टला धमकीचे रूपांतर अंतिमोत्तरात आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मीर कासीम पुन्हा गरजले, ‘एक महिन्याची मुदत सादिक सरकारला आम्ही देत आहोत. या अवधीत कारभार सुधारा नाहीतर परिणामांना सिद्ध राहा.' पाच-सहा ऑगस्टला पंडितांचे आंदोलन एकीकडे सुरू झाले होते. कासिमसाहेबांचे डोळे लुकलुकले. दहा-अकरा ऑगस्टपासून पंडितांच्या सत्याग्रहाला सुरुवात झाली. ।। बलसागर ।। ३७ ________________

कासिमसाहेब सावध झाले. पंधरा ऑगस्टला श्रीनगरात, रीगल चौकात पंडितांना मारझोड झाली, स्त्रियांवर अत्याचार झाले. यामागे काही मंत्र्यांचा हात होता हे उघड बोलले जाऊ लागले. कासिमसाहेबांची चक्रे फिरू लागली. । कासिमसाहेबांना आता फार वेळ नव्हता. दोन ऑगस्टला सादिकसाहेबांना दिलेल्या अंतिमोत्तराची मुदत संपत आली होती. कदाचित् पंडितसमाज आणि सादिक सरकार यात काही तडजोड होऊन वातावरण निवळण्याची शक्यताही निर्माण होऊ लागली होती. पुन्हा अशी तयार भट्टी मिळते न मिळते ! आता मिळेल त्या संधीवर, निमित्तावर झडप घालून घाव घातला पाहिजे. कासिमसाहेब आणि इतर विरोधक आपला फौजफाटा गोळा करू लागले. जमवाजमव सुरू झाली. तसा खुद्द कासिमसाहेबांचाच फौजफाटा खूप मोठा आहे, असा काश्मिरात सर्वत्र समज आहे. होमगार्डसवर त्यांचे वर्चस्व आहे, पोलीस-खाते त्यांना सहज वश होऊ शकते, असा बोलबाला आहे. मुळात काश्मिरात पोलीस व्यवस्था खूपच गोंधळाची. सरकारी, निमसरकारी, केन्द्रीय, गुप्तचरीय अशी अनेक पोलीसदले तथ नेहमीच असंबद्ध कारभार करीत असतात. कुणावर कुणाचे वर्चस्व आहे, कोण कुणाच्या कच्छपी आहे, हेच कळेनासे व्हावे इतकी येथे या क्षेत्रातली गुंतागुत आहे. अशा गोंधळाचा राजकारणी व्यक्तींनी आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून न घेतला तरच नवल ! पंधरा ऑगस्टला थोडीशी चुणूक दाखवली. पण तव ढयाने काम भागत नाही, दिल्ली हालत नाही, सादिक गडगडत नाही, असे पाहिल्यावर आणखी एखाद्या संधीची वाट पाहणे भाग होते. सुदैवाने (की दुर्दैवाने) सादिकविरोधी गटांना फार वाट पाहावी लागली नाही. जनसंघाचे अध्यक्ष आमंत्रण द्यावे तसे श्रीनगरात उपस्थित झाले आणि ते करायला गेले एक आणि झाले भलतेच. प्रा. मधोक आले ते अगदी वेगळ्या कारणासाठी. दहा खासदाराचा तहडी लडाखला भेट देण्यासाठी निघाली होती, त्यात प्रा. मधोक या समावेश होता. श्रीनगरात मुक्काम पडला, तेव्हा साहजिकच आंदोलनाच्या की सर्वांचीच बातचीत झाली. प्रा. मधोक यांनी त्यातल्या त्यात विशेष लक्ष घालून मुख्यमंत्री सादिक यांचीही या प्रकरणी भेट घेतली. या मध्यस्थीला थोडेफार यश लाभण्याची शक्यता दिसत होती. सादिक यांनी काही आश्वा बलसागर ।। ३८ ________________

सने दिली होती, असे म्हणतात. सादिक-भेटीचा हा वृत्तांत सांगण्यासाठी म्हणून प्रा. मधोक यांनी लडाखला निघण्यापूर्वी दि. २२ च्या संध्याकाळी पंडितांची एक सभा घेतली. या सभेत बोलता बोलता ते एवढेच म्हणाले, ज्यांना या देशाशी प्रामाणिक राहायचे नसेल त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे. प्रा. मधोक यांच्या परिचयातल्या एका पत्रकाराने-जो तेथे उपस्थित होता- मला सांगितले की, यापेक्षा प्रा. मधोक काही जास्त बोलले नाहीत. आता यात चिडण्यासारखे काय आहे ? अशी विधाने तर खुद्द सादिकसाहेबांनीही अनेकदा केलेली आहेत. पण विपर्यास झाला, केला गेला. वार्ता अशा फैलावल्या गेल्या की, प्रा. मधोक यांनी आपल्या भाषणात साच्याच मुसलमानांना काश्मिरातून चालते व्हा म्हणून सांगितले. हे कसे सहन केले जाणार ? | चोवीस तारखेच्या सकाळपासूनच वातावरणाचा रंग पालटला. कुजबुजणारे घोळके रस्त्याच्या कडेकडेला दिसू लागले, दुकाने बंद ठेवण्यात आली, श्रीनगरच्या वेगवेगळ्या भागांतून लहानमोठ्या मिरवणुका ‘ Bloody Madhok get out अशा घोषणा देत मुख्य रस्त्याकडे जमू लागल्या. पाच ते तेवीस ऑगस्टपर्यंत पंडित समाज, पोलीस आणि सादिक सरकार या त्रिकोणातच आंदोलन फिरत होते-पण दिनांक चोवीसपासून त्याला वेगळीच-जातीय व हिंदूविरोधी कलाटणी उघडउघड दिली गेल्याचे स्पष्ट दिसत होते. दुपारनंतर जमावाच्या हालचालींना विशेष जोर चढला. गाव कदल, गणपत यार, काला खुद, हबकदल, बाना मोहल्ला, खानका मोहल्ला या हिंदू वस्त्यांवर गुंडांनी चाल करून तेथे बरीच मोडतोड, दगडफक व शिवीगाळ चालू केली. एके ठिकाणी तर शाळा-कॉलेजातून सुटलेल्या मुलींना गुंडांनी अडवले, त्यांचे वरचे कपडे फाडले, घड्याळे व आंगठ्या लुबाडून नेल्या. जमाव हटवण्यासाठी वा गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांनी कुठेही, काहीही हालचाल केली नाही. | जमावाचे आणखी एक उद्दिष्टही साध्य झाले. याच दिवशी धनवतीच्या अर्जाची न्यायालयात सुनावणी होणार होती व शक्यता होती की, परमेश्वरीला आपल्या आईच्या स्वाधीन केले गेले असते. १४४ कलम जारी असताना न्यायालयाच्या बाहेर आठ-दहा हजारांचा जमाव कसा जमू शकत होता, हे एक आश्चर्यच आहे. पण काश्मिरात अशी आश्चर्ये नेहमी घडत असतात. जमाव केवळ जमू शकला, त्याची पांगोपांग केली नाही-एवढेच नव्हे, तर त्याच्या मुक्तलीला चालू दिल्या गेल्या. घोषणा–आरडाओरडा, शिवीगाळ इतकी वाढली की, न्यायालयाला आपले काम शेवटी बंद करावे लागले. परमेश्वरी गुलाम रसुलच्या हातून निसटू नये म्हणून केवढा हा आटापिटा ! आणि सादिकसाहेबांची आवाहने सुरूच होती-शांतता आणि सुव्यवस्था बलसागर ॥ ३९ ________________

टिकली पाहिज, जातीय सलोख्याची काश्मिरची श्रेष्ठ परंपरा राखली पाहिजे वगैरे वगैरे. ज्याला आपल्या मंत्रिमंडळात सलोखा टिकवता येत नाही त्याचे हे अरण्यरुदन कोण ऐकणार ! सादिकसाहेबांचे हे अरण्यरुदन कोणी ऐकत नव्हते. एवढेच नाही, तर त्याच दिवशी त्यांच्या कळत वा न कळत सरकारी तिजोरीतील पैसा दगला घडवून आणण्यासाठी गुंडांना, समाजकंटकांना वाटला जात होता, तरी त्याचा काही मात्रा चालू शकत नव्हती, असा पुरावा आता बाहेर पडू लागला आह सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष, काही अधिकारारूढ मंत्री, अनेक पोलीसदलापका काही दले वा त्यातील काही विभाग हे सर्व पाठीशी असताना गुंडांना आता भय कुणाचे ? चोवीसचा दिवस त्या मानाने शांततेत गेला असे म्हणावे एवढया दंगली आता पंचवीसला उसळणार होत्या; त्यासाठी पुरेशा नवीन अफवा पिकविण्यात येत होत्या. चोवीसला श्रीनगरात फक्त गुंड- समाजकंटकांचे जमाव थैमान घालीत होते. पोलीस तटस्थ होते. आता पंचवीसला संयुक्त हालचाली आणि अत्याचारांचे नवे भीषण पर्व सुरू होणार होते. आतापर्यंत फक्त शरीरावर जखमा झाल्या होत्या, रक्त सांडले गेले होते, आता मृत्यूशीच गाठ पडणार होती. पंचवीसचा दिवस हा पंधरा ऑगस्टपेक्षाही या आंदोलनातील काळाकुट्ट दिवस म्हणून ओळखला जाणार होता. चोवीस ऑगस्टला दिवसभर तुरळक धरपकडी झाल्या पण रात्री पोलि सांना फारच चेव आला. संशयावरून, खाजगी वैमनस्यांवरून कुठल्याही घरावर रात्री-अपरात्री थाप मारावी, वॉरंट असो नसो, अंथरुणातून माणसे ओढून चौकीवर न्यावी, मारहाण करावी हा धुमाकूळ रात्रभर चालू होता. त्यामुळे पंचवीसच्या सकाळपासूनच वातावरण चिताग्रस्त होते. गडबडून, घाबरून गेलेल्या स्त्री-पुरुषांची आंदोलन समितीच्या कचेरीकडे सारखी रीघ लागून राहिली होती. समितीचे कार्यकर्ते तरी कुणाकुणाचे सांत्वन करणार, कुठकुठे धावणार ! त्यांच्यापैकीच पुष्कळजण रात्रीच्या धरपकडीला बळी पडून गजाआड डांबले गेले होते. पण वातावरणच इतके ताणलेले आणि तापलेले होत की, अनाहूत कार्यकर्ते घराघरातून, कचेन्या-कचे-यांतून आपणहून या आंदोलना स्वतःला झोकून घेण्यासाठी पुढे सरसावत होते. संघटना नव्हती, कुठल्याही राजकीय पक्षाचे नेतृत्व नव्हते; पण जनतेच्या चळवळीचे हेच वैशिष्ट्य असत की, चळवळीबरोबरच संघटना आपोआप उभी रहात जाते आणि चळवळ जप्त ।। बलसागर ।। ४० ________________

जशी पुढे पुढे सरकते, तसतसे नवे कार्यकर्ते आणि नेते यांचीही तिला कधी वाण पडत नाही. मात्र चळवळ म्हणजे कृत्रिम प्रक्षोभ किंवा केवळ भडकवाभडकी असता कामा नये. जनतेच्या जीवाभावाला ती खरोखरच स्पर्श करणारी असली पाहिजे. पंडित समाजाने गेल्या वीस वर्षांत काश्मिरमध्ये, त्यांच्या हक्काच्या घरामध्ये खरोखरच खूप सोसले होते, सर्व क्षेत्रातील जुलुम आणि पक्षपात मान खाली घालून सहन केला होता. या समाजाची काश्मिरातील संख्यात्मक ताकद ती किती ? शेकडा एक टक्का देखील नाही. तरीपण अन्याय जिव्हारी झोंबला असेल तर एवढी लहानशी आणि कुठल्याही क्षणी सहज चिरडून टाकता येण्याइतकी किरकोळ संख्याही केवढा प्रखर आणि तेजस्वी प्रतिकार करू शकते याचे हे एक अनुकरणीय उदाहरणच येथे घडत होते. | ज्या ठिकाणी आंदोलन समितीची मुख्य कचेरी होती ते शीतलनाथ मंदिर व त्या सभोवतालचे आवार काही फारसे मोठे नव्हते. एकीकडे कचेरीबाहेर आवारात गर्दी वाढतच होती आणि दुसरीकडे त्या दिवशीच्या पाच जणांच्या तुकडीच्या सत्याग्रह कार्यक्रमाची जमवाजमवही सुरू होती. आदल्या दिवशीच्या व रात्रीच्या घरपकडीचा व अत्याचारांचा निषेध व सत्याग्रही तुकडीला निरोप, यासाठी दुपारी दीडला आवारातच सभा योजली होती. आवाराकडे येणा-या सर्व वाटा अगदी अरुंद व एका बाजूला तर घाण पाण्याचे डबके! सभेला लोकांनी जाऊ नये म्हणून सर्व वाटा पोलिसांनी अडवलेल्या होत्या. तरी लहान मुले, स्त्रिया, म्हातारी माणसेदेखील सभेला लोटतच होती. समोरच्या डबक्यातूनही काही उत्साही तरूण पोहून सभास्थानी येत होते. यावरून एकदर वातावरणाची सहज कल्पना येऊ शकते. सभा सुरू झाली आणि सहस्रसहस्र मुखातून घोषणा दिल्या जात होत्या-'हिंदुस्थान झिदाबाद, हिंदु-मुस्लिम युनिटी झिदाबाद, परमेश्वरीको छोड़ दो...' तीन-साडेतीनच्या सुमारास सभा संपली, सत्याग्रही तुकडी अटक करून घेण्यासाठी नियोजित स्थळाकडे निघालो, लोकही त्यांच्या मागोमाग लोटले आणि आता पोलिसांनी या पाचजणाना मोटारीतून घालन घेऊन जायचे! गेल्या वीस दिवसांचा हा ठरलेला कार्यक्रम होता. पण या वेळी भलतेच झाले. सत्याग्रहींना अटक करण्याऐवजी पोलिसांनी बेदम मारझोडीला एकदम सुरुवातच केली. अनपेक्षित, अकल्पित, अचानक. सर्व रस्ते रोखले गेले होते. एकच वाट-तीही अगदी अरुंद-बाहेर पडण्यासाठी मोकळी ठेवण्यात आली होती आणि जवळजवळ तीस-चाळीस हजारांचा जनसमुदाय - लहान मुले, स्रिया, तरुण विद्यार्थी - विद्यार्थिनी, म्हातारेकोतारे. पोलिसांनी पुरी कोंडी केली आणि हत्यार चालू केले. लाठीहल्ला आणि अश्रुधूर तर खरेच; पण पोलिसांनी दगडफेक करावी! हे कधी ऐकले । बलसागर ।। ४१ ________________

नव्हते, वाचले नव्हते; पण तेही येथे ऐकायला-वाचायला मिळाले. थोड्याच वेळात आसपासच्या काही मुसलमानी घरातूनही दगडफेक सुरू झाली. जालियनवाला बागेची आठवण व्हावी असे हे कोंडी करून निःशस्त्र जनतेवर हल्ला चढविण्याचे भ्याड कृत्य निदान काश्मिरातील पंडित समाज तरी कधीही विसरू शकणार नाही. कृती समितीच्या पत्रकात म्हटले आहे "Bleeding wounds of men, women, boys and girls at the Rattan Rani Hospital are eloquent evidence of Kashmir's 'Jallianwala Bagh' enacted in the Shitalnath lane by the Kashmir Armed Police on 25th August." ...It was a terrible, ghastly scene of premeditated massacre of peaceful unarmed people. About a thousand fell senseles or wounded, broken bones and widely bruised "... जखमेवर मीठ चोळावे तसा पुढचा प्रकार. जवळ जवळ हजारएक माणसे जखमी होऊन रस्त्यातच विव्हळते, कण्हत पडली; कुणाच्या बरगड्या मोडलेल्या, बहुतेकांची डोकी फुटलेली, कुणाचे हात, कुणाचे पाय - तरी एकालाही सरकारी इस्पितळात प्रवेश मिळाला नाही. प्रवेश नाकारण्यातच आला. वाहनांची सोय तर नाहीच. १५ ऑगस्टच्या रीगल चौकातील हल्ल्यानंतर जखमींच्या बाबतीत हाच हेतुपुरस्सर पक्षपात केला गेला होता. त्याची पुन्हा पुनरावृत्ती. रेडक्रॉस ही तर मानवतावादी, आंतरराष्ट्रीय संस्था ना ? पण तीही दडपणाखाली होता. १५ ऑगस्टला व २५ ऑगस्टलाही जखमींच्या शुश्रूषेला तिनेही नकार दर्शविला. एकीकडे वृत्तपत्रांची तोंडे बंद करण्यात आली होती, दुसरीकडे रेडक्रॉससारख्या स्वतंत्र सेवा संस्थाही वश करून घेण्यात आल्या होत्या. किती किती मार्गानी पंडितांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी काश्मिर पोलीस व त्यांचे मंत्रिमंडळातीत पाठीराखे गट प्रयत्न करीत होते आणि सादिकसाहेब किती असहाय्यपणे हे सारे पाहत राहिले होते, यावा यापेक्षा अधिक पुरावा काय हवा ? शेवटी रतनराणी या एका खाजगी दवाखान्यात जखमींना हलविण्यात आले - दवाखाना कसला? एका डॉक्टरचे दुमजली घरच ते. कसल्या खाटा आणि कसले वॉर्डस् ? जागा मिळेल तेथे, व्हरांड्यात, आवारात, कसल्यातरी चिरगुटावर असंख्य जखमी विव्हळत पडले होते आणि मिळेल तो उपचार करून घेत होते. | जखमींचा त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेला तपशील असा| पुरुष ११७७ स्रिया २९२ मुले ३५३ एकूण १८२२ बलसागर ।। ४२ ________________

इकडे गावात दुपारपासून अशाही अफवा फैलावू लागल्या होत्या की, काही मशिदींना आगी लावण्यात आल्या आणि काही मुसलमानांची घरेही लुटण्यात आली आहेत. एवढे निमित्त पुरे होते. आदल्या दिवशीची पुनरावृत्ती सुरू झाली. दंगली उसळत गेल्या, हिंदू वस्त्यांवर दगडफेक झाली. शिवीगाळ करीत आणि धमकावण्या देत गावभर मुसलमानांचे जमाव धुमाकूळ घालू लागले. रात्र पडली तरी हे अस ह्य प्रकार थांबले नाहीत. काश्मिर पोलिसांचे तर नावच नको. तिथे असलेले पंजाबचे आणि केन्द्राचे पोलीस दलही कुठेच या अर्वाच्य गुंडगिरीला आवर घालताना दिसत नव्हते. | एक दिवस कसाबसा उलटला आणि दि. २७ ला पुन्हा एकदा पंडित समाजावर गुंडांची आणि पोलिसांची मोठी संक्रांत कोसळली. आतापर्यंत झालेल्या मारहाणीमुळे बरेच लोक अत्यवस्थ होते. प्रथम एक दोघे मृत्यु पावले तेव्हा त्यांच्या प्रेतांची परस्परच विल्हेवाट लावण्यात आली होती. नंतर आणखी दोघे गेले. त्यांची प्रेते नातेवाईकांच्या ताब्यात दिली गेली, कारण बरीच वादावादी या प्रकरणी होऊन चकली होती. दि. २७ ला दुपारी या दोन जणांची मोठी अंत्ययात्रा निघाली व श्रीनरातील बहुसंख्य पंडित समाज यात्रेत मोठ्या दुःखित अंत:करणाने सहभागी झाला होता. “ ॐनमः शिवाय' हा मंत्र, काही भजने यापलीकड यो एवढ्या गंभीर मिरवणुकीतून शब्द उमटत नव्हता. घोषणा कटाक्षाने टाळल्या होत्या. पण नीलम टॉकीजजवळ साध्या कपड्यातील पोलिसांनी आणि गुडानी मिरवणुकीवर पुन्हा एकदम हल्ला चढविला- ' Rain of stone throWIng & lathi charging-' 'दगडांचा आणि लाठ्याकाठ्यांचा पाऊस पडला, अस या हल्ल्याचे वर्णन एका पत्रकात करण्यात आले आहे. शेवटी केन्द्रीय राखीव दलाचे पोलीस मदतीला आले व पांगापांग, पळापळ होऊन जागेवर राहिलेल्या निवडक लोकांनी झटपट अंत्यविधी कसाबसा उरकून घेतला. पाठोपाठ छोटा बाजार, नवाब बाजार, चनबल, बाटामूल या मुसलमान वस्तातून जमाव बाहेर पडला आणि त्याने आसपास हिंदू घरांची लुटालूट आणि जाळपोळ करण्यास सुरवात केली. डॉ. पेशिन यांचे औषधी दुकान प्रथम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, कारण आदल्या दिवशी सादिकसाहेबांनी बोलावलेल्या प्रमुख नागरिकांच्या सभेत डॉ. पेशिन यांनी पंडित समाजाची बाजू निर्भिडपणे मांडली ९'ता, हा त्यांचा गुन्हा. एका बेकरीवाल्याचे दुकान जाळण्यात आले-आगीने त्या आसपासच्या दुकानांनाही घेरले. शिवाला मंदिराची मोडतोड व लुटालूट झाली. ९स्पिटलमध्ये जखमींसाठी अन्न घेऊन चाललेली एक जीप अडवण्यात आली आणि अनाची नासाडी केली गेली. आसपासच्या वस्तीतले एखाददुसरे हिंदूघर दिसले ।। बलसागर ।। ४३ ________________

की त्यात जमाव घुसे. लुटालूट, दगडफेक, मोडतोड ओघानेच आली. काश्मिर पोलीस, गृहरक्षादल यांचा काही उपयोग नव्हता, कारण या कुंपणांनी शेत खाण्याचे हे दिवस होते. यानंतर कफ्र्यु आलाच. विनोद असा : सर्व हिंदू वस्त्यांचा भाग दिवसभराच्या संचारबंदीने आवळला गेला होता. पण जेथे दंगे उद्भवत होते, जाळपोळ होत होती ते हिंदूंची तुरळक वस्ती असलेले मुसलमान मोहल्ले मोकळेच होते. त्यामुळे लुटालूट, जाळपोळ चालूच राहिली. फक्त कृती समितीला काम करणे अवघड होऊन बसले. आंदोलन अधिकच विस्कळित होण्याची शक्यता वाढली. कारण हिंदु वस्त्यातून रात्रीअपरात्री होणा-या धरपकडीच्या वार्ता बाहेर पडेनाशा झाल्या, रुग्णालयात पडलेल्या हजारो जखमींची विचारपूस, औषधपाणी, जेवणखाण सगळे अनियमित झाले, कार्यकर्त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला. तरीही रोजच्या पाच जणांच्या तुकडीच्या सत्याग्रहाच्या कार्यक्रमात मात्र खंड पडत नव्हता. मंदिरामंदिरातून हजारो स्त्रिया प्रार्थनेसाठी संध्याकाळी वसत असत-तोही कार्यक्रम व्यवस्थित चालू राहिला. पंडित समाजाचे नैतिक धैर्य खचणे लांबच राहिलेजो तो Now or Never, Thus far & no further, Our struggle for democratic existance या भावनेने पेटून, कुठल्यातरी कामात स्वत:ला गुंतवून घेत होता. बरेचसे प्रमुख कार्यकर्ते तर भूमिगतच झाले होते, कृती समितीच्या अध्यक्षांचाच पत्ता पोलिसांना लागू शकत नव्हता. | धरपकड कशी चालू होती याचा हा एक नमुना. नॅशनल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.जे.एन. मिस्त्री.तीस तारीख. नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास मिस्त्री झोपी गेले. मध्यरात्री 'दीनानाथ', 'दीनानाथ' म्हणून हाका ऐकू आल्या. पाठोपाठ कुंपणाचे दार धक्के मारून उघडल्याचा आवाज आला.व्हरांड्यात बूट खाडखाडले, जिना वाजला. दारावर बुटांच्या लाथा ऐकू आल्या. सान्या घराला जाग आली, चोर-दरवडा असावा अशी प्रथम कल्पना झाली. पण लवकरच भ्रमनिरास झाला. मिस्त्री यांच्या खोलीत घुसलेल्यांपैकी एक सबइन्स्पेक्टर होता व बाकीचे साधे कॉन्स्टेबल्स. मिस्त्री यांचा एम. एस. सी. ला असलेला मुलगा शामसुंदर वडिलांजवळ जाऊन उभा राहिला. त्याची गचांडी धरून पोलिसांनी त्याला बाजूला खेचला. मिस्त्री यांनी आपल्या मुलाला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. मिस्त्री यांना त्यांच्या पत्नीने आधार दिला. पण काही परिणाम झाला नाही. उलट सब इन्स्पेक्टरने त्या बाईच्याच श्रीमुखात भडकावली व एका पोलिसाने मिस्त्री यांच्या दोन तोंडात ठेवून दिल्या. मागाहून दुस-याने मिस्त्री यांच्या पाठीवर व मांड्यावर लाठ्या घातल्या. धक्के मारीत बापाला व मुलाला खाली आणण्यात आले. तरी ।। बलसागर ।। ४४ ________________

मिस्त्री एकीकडे ओरडतच होते-माझ्या मुलाचे नाव ' दीनानाथ' नाही, श्यामसुंदर आहे, तुम्हाला हवा असलेला मुलगा हा नाही. याला नेऊ नका. कोणी त्यांचेकडे लक्ष दिले नाही. शेवटी धीटपणा करून मिस्त्री यांनी विचारले, ‘वॉरंट आहे का ? ' सब इन्स्पेक्टर जो खवळला आहे म्हणता ! मुलाबरोबर बापाचीही बकोटी धरून दोघांना ट्रकमध्ये कोंबण्यात आले. श्रीनगरातील राष्ट्रीय विचारसरणीविषयी प्रसिद्ध असणा-या एका नामवंत शाळेच्या संस्थापक-मुख्याध्यापकांची ही अवस्था ! या वेळी हे गृहस्थ रात्रीच्या अध्र्या चड्डीतच होते. त्यांचा चष्मा त्यांना घेऊ दिला नाही, दाताच्या कवळीची तर आठबणच राहिली नाही. बायकोने आणि मुलाबाळांनी ओरडा केला, पण काय उपयोग ? संगिनींची टोके दाखवून आणि धक्काबुक्की करून त्यांची तोंडे बंद करण्यात आली आणि पोलीस चौकीत पोचल्यावर पुढचे धिंडवडे काय कमी होते ! बापाच्या देखत मुलाचे हाल करून मग दोघांचे जाबजबाब घेतले गेले. दोनच्या सुमारास दोघांना एका कोठडीत ढकलण्यात आले–जेथे असेच दहा-बारा दुर्दैवी जीव पूर्वीच अडकवलेले होते. काश्मिरची कडक थंडी, गार फरशी, अंगावर अर्धी चड्डी, रात्रभर लघवीलाही पोलिसांनी बाहेर येऊ दिले नाही. तिथेच कोप-यात घाण, बसल्याबसल्या झोप, आणि बहुतेकजण मिस्त्री यांच्यासारखेच प्रतिष्ठित, सुशिक्षित. दुस-या दिवशी सकाळी त्यांना श्रीनगरच्या तुरुंगात हलविण्यात आले, तेव्हा हायसे वाटले, कारण तेथे बरेच समदु:खी भेटले. कोणी फळे दिली, कोणी कपडे दिले. दुःख सान्यांनी वाटून घेतले की हलके होते, निदान वाटते तरी, नाही का ? ‘माणूस प्रतिनिधी म्हणून मी श्रीनगरात दाखल झालो तेव्हा तेथील वातावरण हे असे जळके आणि जळजळीत होते. धरपकड आणि लपंडाव सुरू होता. चीड, संताप, अविश्वास, संशय, काळजी यांचे साम्राज्य सर्वत्र पसरले होते. साधा टांगेवालाही विचारल्या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा अधिक बोलेना-कारण ‘प्रतिनिधी ' ' भारतीय ' दिसत होता-म्हणजेच 'परका ' वाटत होता. टांगेवाले बहुतेक सर्व मसलसान पडले. टॅक्सीतही मोठ्याने बोलण्याची चोरी, कोण कुठे चहाडी करील आणि विनाकारण केव्हा कोठडीची हवा खावी लागेल याचा नेम नव्हता. मोगलाईच ती. काही पत्रकार भेटले. त्रयस्थांच्या भेटीगाठी झाल्या आणि ओळखीच्या एकदोघांना भेटावे म्हटले तर ते भूमिगत , बराच लपंडाव खेळून शेवटी भेट झाली ती एका अड्डयावर. इतरही बरेच कार्यकर्ते तिथे आस-याला वा लपायला आलेले होते. श्रीनगरच्या आसपासच्या भागातूनही वातावरण तापलेले होते. तिथे राहणे असुरक्षित वाटल्याने, किंवा चळवळीत आपणहून भाग घ्यावा म्हणून आलेले, असेही काहीजण त्या घोळक्यात होतेच । बलसागर ।। ४५ ________________

कुणी प्राध्यापक, कुणी सरकारी नोकर, कुणी विद्यार्थी... तहाब गावचा सरकारी डॉक्टर सांगत होता-गावात १८ हिंदू कुटुंबे. गावची वस्ती १८ हजार. सगळी मुसलमान. नुकतेच रात्री गुंड घराच्या आवारात शिरले. त्यांनी बागेची उखडाउखडी केली. का, तर म्हणे, डॉक्टरांनी शस्त्रास्त्रांचा साठा जमवलेला आहे, तो हुडकून काढण्यासाठी! धमक्या ही तर रोजचीच बाब आहे; - डोक्याला मार बसलेले हे संस्कृतचे प्राध्यापक: कॉलेजमध्ये हिंदू विद्याथ्यवर कसा जाणूनबुजून पक्षपात केला जातो त्याची आकडेवारी सांगताहेत . - हा एक सरकारी नोकर! आपल्यापेक्षा कमी शिकलेला, कमी अक्कल असलेला, मागाहून नोकरीला लागलेला कुणी एक, केवळ तो मुसलमान आहे एवढ्याच गुणावर कसा वर चढवला गेला, असे सगळयाच कचे-यात कसे चालू आहे, याचा तपशील हा देत आहे. - हा विद्यार्थी : ऑलिपिक सामन्यात हॉकीच्या खेळात पाकिस्तानचा विजय झाला तर कॉलेजच्या मुसलमान विद्याथ्र्यांनी 'पाकिस्तान झिदाबाद' च्या घोषणा देत कशा मिरवणुका काढल्या आणि भारताचा विजय झाल्यावर हिंदू विद्याथ्र्यांनी काढलेल्या मिरवणुकीवर कशी दगडफेक झाली, याच्या आठवणी सांगत आहे. - ' परमेश्वरी कशी आहे ? वागायला, चालचलणुकीला ?' मी * चांगली. चांगल्या घरातली मुलगी आहे ती.'

 • मी तर ऐकले तुमच्या समाजात मुलीच्या लग्नाला फार त्रास पडतो ! वीस वीस हजार रुपये हुंडा द्यावा लागतो ! त्यामुळे अशा पळवापळवीला अधिक वाव मिळतो, नाही का ?' मी
 • खरं आहे. आम्ही हाही प्रश्न चळवळ संपल्याबरोबर लगेच हाती घेणार आहोतच. आहेराची प्रथा बंद केली पाहिजे, महागड्या निमंत्रणपत्रिका काढून उगाच खर्च वाढवू नका हा प्रचार तर आम्ही आतापासूनच सुरू केला आहे - सर्वांचे एकमत .

| टॅक्सी आली. पहिली आली ती वाटेत सोडावी लागली, कारण ड्रायव्हरचा अंदाज लागेना. दुसरी खात्रीची मिळवायला ब-याच खाणाखुणा, इशारे करावे लागले. कफ्यूची वेळ होण्यापूर्वी जेवढे पाहणे शक्य होते तेवढे पाहून झाले- जळकी दुकाने, पडकी मंदिरे, दगडफेकीच्या खुणा असलेली घरे; त्या स्त्रियांच्या रोज होणा-या प्रार्थनासभा, ती दैनंदिन सत्याग्रहाची पूर्वतयारी, ते रुग्ण, तो दिवसाही । कफ्र्यु असलेल्या भागातील शुकशुकाट, कोप-याकोप-यावर कुजबुजत असलेली ती ।। बलसागर ।। ४६ ________________

टोळकी, पोलिसी वाहनांच्या सततच्या घिरट्या, शिरस्त्राणधारी सैन्यदलाचे पहारे- श्रीनगरात गुंड आणि पोलीस यांचेच राज्य असावे असे वाटत होते. अशीच बाहेरून खूप मोडतोड दिसत असलेली, एक तिमजली उंच हवेली. सर्व भाग मुसलमान वस्तीचा. " मुसलमान वस्ताव टॅक्सी थांबली. बाजूचा दरवाजा खूप वाजवला. हालचाल नाही. हाका मारल्या. वरची एक खिडकी उघडली गेली. बरोबर चा सोबती आणि खिडकीत उभी असलेली व्यक्ती. काही खाणाखुणा झाल्या, बोलणे झाले. वाजूचे लहानसे फाटक जरा वेळाने उघडले गेले. आवारात सामसूम होती. . आतून पाहिले तरी सगळी दारे, खिडक्या बंद होत्या. हवेलीचे मागील दार उघडल्याचा आवाज आला. कुणाची हवेली ही ! हिंदूची की मुसलमानाची ! आपण कोणाला भेटायला चाललो आहोत ? दरवाजा उघडला, ही उभी असलेली पुरंध्री कोण ? काश्मिरचा सुकीर्त गौरवर्ण तो हाच का ? तो सुविख्यात काश्मिरी लाल गुलाब हाच का ? झुळझुळीत निळया वस्त्रातील कोण ही ' सुकांत चंद्रानना ?' कुणी कुलवंताची कामिनी ?' बघ नकोस चंद्रा वळनी... तिचा नमस्कार घे. पुढे हो. डावीकडे, हा लाकडी जिना आहे. चल वर...... , |. ती नेहमी गजबजलेली असणारी कुणा रईसाची तिमजली उंच हवेली या वेळी खिन्नतेत बुडून गेली होती. पश्चिमेची सूर्यकिरणे कुठेकुठे रेंगाळत होती तेवढाच काय तो प्रकाश . बाकी अंधार आणि शुकशुकाट, दारातच दिसलेली ती गौरवर्णी बहुधा या हवेलीची मालकीण असावी. थोडेसे हसून तिने ॥ बलसागर ॥ ४७ ________________

आमचे स्वागत केले एवढेच, नंतर मात्र खोल्यामागून खोल्या ओलांडल्या, एक दोन जिने चढलो तरी कुठे आवाज नाही, हालचाल नाही. रहस्यकथेतल्या एखाद्या भुजंगनाथ देशमुखांच्या जुनाट पडक्या वाड्यात शिरावे तसे वाटत होते. याच भयमिश्रित कुतूहलाच्या मन:स्थितीत शेवटी तिस-या मजल्यावरील एका कोप-याच्या लहानशा खोलीच्या दाराशी आम्ही- मी (माणूस प्रतिनिधी) व एक दुभाषा काश्मिरी मित्र- येऊन उभे राहिलो. आमच्या येण्याची वर्दी दुस-या जिन्याने बहुधा आधीच वर पोचलेली असावी. कारण फार वेळ थांबावे लागले नाही. हिरव्या पडद्याआडून Come in, Come in असा आवाज आला व आम्ही लगेच खोलीत प्रवेश केला. पन्नाशीच्या घरातली, चौरस हाडापेराची एक भारदस्त व्यक्ती मोठ्या लाकडी पलंगावरून कष्टाने उठण्याचा प्रयत्न करीत होती व आम्हाला खुर्चीवर बसण्यास सांगत होती. डोक्याला पट्टी होती. चेहरा काळजीने काळवंडल्यासारखा दिसत होता. काही कुशल प्रश्न झाले, आमच्या समोरच्या खुर्चीवर ती व्यक्ती स्थानापन्न झाली आणि संभाषणाला हळूहळू वेग येऊ लागला. त्या व्यक्तीचे अंग अजूनही ठणकत असावे असे बोलताना सारखे जाणवत होते. अतिशय मवाळ शब्दात, एकही अपशब्द न उच्चारता, खिन्नता दाटलेल्या स्वरात ती व्यक्ती सांगत होती |' असे, इतक्या वर्षात कधीही घडले नव्हते. आमच्या वाडवडिलांच्या काळातही नाही. हा सर्व मुसलमान मोहल्ला. आमचे एकच काय ते हिंदू घर. पण कधीच कसला त्रास नाही, तेढ़-संशय नाही. वातावरण पूर्ण विश्वासाचे, एकमेकांना वेळी-अवेळी, उपयोगी पडण्याचे. घरातल्या मुलाबाळांचा, बायकामाणसांचाही सर्वत्र अगदी निःशंक वावर होता, येणे जाणे होते. त्या दिवशी पण, मी सकाळी नेहमीप्रमाणे आमच्या मळ्याकडे निघालो तेव्हा, गावात गेले ८-१५ दिवस गडबड, दंगल चालू होती तरी, मला आपल्या घरादारावर काही संकट येईल अशी मुळीसुद्धा शंका आली नाही. दिवसभर मी मळयातच होतो आणि काम संपल्यावर टांग्यातून मी दुपारी चार-साडेचारच्या सुमारास मोहल्यापर्यंत आलो, तरीही काही कल्पना आली नाही. आम्ही मुलासारखा सांभाळलेला एक मुलगा टांग्यात माझ्याबरोबर होता. घरापासून थोड्या अंतरावर टांगा आला आणि वातावरण बदलल्याचे प्रथमच एकदम जाणवले. कोणी सांगत होते घरावर दगडफेक झाली आहे, पुढे न जाणे चांगले. पण फार विचार करायलाही वेळ मिळाला नाही. टांगा थांबून आम्ही उतरतो आहोत, इतक्यात लहानशा जमावाने आम्हालाच गराडा घातला, डोक्यात काठीचे एकदम तडाखे बसले, कपड्यावरून, अंगावरून रक्त वाहू लागले. हातातले घड्याळ, बोटातली अंगठी, खिशातले पाकीट वगैरे केव्हा लुबाडले गेले ते कळलेच नाही. माझ्या बलसागर ।। ४८ ________________

बरोबरचा मुलगा रडत-ओरडत घरापर्यंत जाऊन काही गडीमाणसांना तेवढ्यात घेऊन आला नसता, तर माझे प्राण वाचणेच कठीण होते. सगळीकडून मार बसत होता आणि मी निपचीत रस्त्यावर पडून होतो. टांग्याचे घोडे कोणीतरी पळवून नेले आणि रॉकेल वगैरे ओतून टांग्यालाही आग लावण्यात आली. बराच आरडाओरडा झाला, घरातली एकदोन गडीमाणसे आली, थोड्या वेळाने पोलिसही पोचले. सगळ्यांच्या मदतीने मी घरापर्यंत कसब सा पोचलो, तो तिथेही सगळा शुकशुकाट. भांडी-कुंडी, कपबशा, लाकडी स्टैंड्स, आलमाया- जे जे हाताने उचलून नेण्यासारखे होते ते सगळे सामान नाहीसे झाले होते. मौल्यवान चीजवस्तू जी सापडली ती पळवण्यात आली होती. दगडफेक सुरू झाली तेव्हा मागील दाराने घरातील बायकामाणसे दुसरीकडे निसटली म्हणून त्यांना काही इजा पोचली नाही. पण घरही सोडवेना. त्यामुळे जी रेंगाळली त्यांना काही अनुचित प्रकार सहन करावे लागलेच. | ‘ केव्हा घडला हा प्रकार !' मी.

 • अठ्ठावीस तारखेला.
 • पोलीस तपास वगैरे सुरू आहे का ?' मी. | ‘ आले होते दोन-चार वेळा. नावे सांगा असे म्हणत होते. पण मी लुटालूट करताना कोणाला पाहिलेच नाही तर नावे कोणाची सांगू ! माझ्यावर हल्ला कोणी केला ते पण आठवत नाही. पण पोलिसांच्या खरोखरीच मनात असते तर त्यांना गुन्हेगार सापडणे बिलकुल अवघड नव्हते. घरातले इतके सामान पळवले गले आहे की, पाच-पन्नास घरांचा शोध घेतला तर काही ना काही वस्तू सापडल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी खात्री आहे. म्हणून पोलिसांचे शोधाशाधीचे नुसते नाटकच चालू आहे असे मला वाटते.'

‘शेजारीपाजारी नंतर आले होते का ? त्यांच्या काय प्रतिक्रिया ?' मी ‘येतात, खाली मान घालून बसतात. वाईट झाले असे म्हणतात. बाहेरचे लोक आले होते असे सांगतात. पण ते किती खरं बोलतात, मनापासून सांगतात हे काही समजत नाही. कदाचित ते काही करू शकले नसतील हेही खरं असेल-मला मात्र काहीच मत बनवता येत नाही . । ' पुढे काय ?' मी. | ‘प्रश्नच आहे. एवढा मोठा दवाखाना, प्रेक्टिस. शिवाय शेतीवाडी, मळा, १९. राहण्याला आता मन कचरतं, सोडावं तरी पंचाईत.

 • आपला दवाखाना कुठे आहे ?' मी.

।। बलसागर ।। ४९ ________________

युद्धात कशासाठी मेले ? आमचे जवान कशासाठी लढले ? कोटीकोटी लोकांना अर्धपोटी टेवून, दुष्काळात आणि उपासमारीत ढकलून आमचे अब्जावधी रुपये या काश्मिर खो-यात कशासाठी ओतले गेले आणि अजूनही जात आहेत, हे हडसून खडसून एकदा विचारले पाहिजे. | प्रश्न पंडितांच्या नोक-याचाक-यांचा नाही-ते तो सोडवायला समर्थ आहेत. प्रश्न जातीय दंगलींचा नाही. ज्यांनी रांची आणि श्रीनगर येथील दंगली एकाच मापाने मोजल्या त्यांच्या राजकीय अकलेची कीवच करावीशी वाटते. इतके सगळे होऊनही काश्मिरातील बहुसंख्य मुसलमान जातीय भावनेच्या आहारी सहसा गेलेला नाही हे आपण ओळखले पाहिजे. पंडित समाजानेही आपल्या परिपत्रकातून, लिखाणा-भाषणातून हिंदु-मुस्लिम ऐक्याचा सतत पहिल्यापासून पाठपुरावा केलेला आहे. एक उदाहरण देतो. अनंतनाग जिल्ह्यातील चुनीगुंद हे एक लहानसे गाव. गावात एक शिवमंदिर होते. या दंगलीत जमावाने त्याची पार मोडतोड केली. पण लगेच या मंदिराच्या उभारणीसाठी निधीही जमवण्याचे काम दुस-या काही लोकांनी हाती घेतले आणि मी चौकशी केली त्या दिवशी निधीचा आकडा पाच हजारांपर्यंत गेलेला होता; ही माहिती पंडित समाजाच्या एका कार्यकत्र्यानेच मला दिली आणि त्याची शहानिशा करून घेण्यासाठी मी अनंतनागला समक्ष जाऊनही आलो. हे निधी जमवण्याचे काम कोणी केले असेल ? शेख अब्दुल्लांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे मिझ अफझल बेग यांची ही कामगिरी. अनंतनाग येथे ते आपल्या राहत्या घरात सध्या नजरकैदेत आहेत. अनंतनाग येथे जाळपोळी करण्याकरता परवा जमाव जमला असता नजरकैदेचे नियम मोडून बेग मशिदीत गेले, त्यांनी भाषणे करून जमावाला शांत केले, ही वस्तुस्थिती नाकारून कसे चालेल ? | मी बेग यांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानले, दोनतीन तास त्यांच्याशी भरपूर चर्चा केली. बेगम अब्दुल्ला याही त्या वेळी तिथेच होत्या. मी आभार मानल्यावर बेग यांनी पहिलेच वाक्य उच्चारले ते असे : 'Don't think that it was a political stunt. It is our creed.' Gratu gaut हा काश्मिरचा ऐतिहासिक वारसा आहे हे ते पुनः पुनः सांगत होते आणि अगदी शेवटी रस्त्यावर फलंगभर म ला पोचवायला आले तेव्हाही बेग मला हेच सांगत होते- 'कुठल्याही स्त्रीची अब्रू माझ्या डोळ्यादेखत मी लुटली जाऊ देणार नाही. मग ती स्त्री हिंदू असो वा मुसलमान.' सात जूनच्या ख्रिश्चन विरोधी दंगलींनी बेग यांना असेच व्यथित केले होते आणि परवाच्या श्रीनगरच्या दंगली थांबविण्यासाठी ‘मला श्रीनगरात येऊ द्यात, माझ्या अनुयायांना, लोकांना भेटून शांततेसाठी प्रयत्न करू द्यात' अशी त्यांची मागणी असतानाही राजकीय विरोधक । बलसागर ।। ५२ ________________

म्हणून त्यांची ती मागणी नाकारली गेली. बेग यांच्या वोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा हे मी माझ्याबरोबर असलेल्या पंडित समाजाच्या एका स्थानिक जाणत्या कार्यकत्र्याला परतताना वाटेत मुद्दाम विचारलेही. त्यानेही बेग यांची भूमिका प्रामाणिक असल्याची ग्वाही दिली. म्हणजेच प्रश्न जातीय नाही. बेग व त्यांच्या सहका-यांना, म्हणजेच शेख अब्दुल्लांना काश्मिर स्वतंत्र राहावेसे वाटते- मग या स्वतंत्र काश्मिरात हिंदू गुण्यागोविंदाने नांदण्यास त्यांची हरकत नाही, आडकाठी नाही. काश्मिर पाकिस्तानात जावे असे वाटणारा दुसरा एक गट आहे व तो अधूनमधून जोरही करीत असतो. दंगली घडवून भारतीय शासन बदनाम करण्याची, काश्मिर शासनाला आतून सतत धक्के देण्याची एकही संधी हा गट वाया दवडीत नाही. पहिले पंधरा दिवस सादिक सरकारविरुद्ध शांततेने चाललेले पडितांचे सत्याग्रह आंदोलन या किंवा यांसारख्या भारतद्रोही गटानेच जातीय वळणावर नेले ही वस्तुस्थिती आहे. या भारतद्रोही कारवायांच्या बंदोबस्तासाठी समथ व कणखर शासन हा जसा एक उपाय आहे तसाच कडवी भारतनिष्ठ लोकसंख्या हाही दुसरा व अधिक खात्रीचा उपाय आहे. आज फक्त काश्मिरातील पाडतसमाजाची भारतनिष्ठा संशयातीत आहे. अशा परिस्थितीत ही संख्या कमी करणाच्या घटनांकडे डोळेझाक करायची, काहीतरी वरवरची मलमपट्टी करून वेळ मारून न्यायची की. कठोर उपाययोजना करून अशा घटनांना आळा घालायचा ? पंडित समाजालाच केवळ संरक्षण देऊन भागणार नाही. भारतनिष्ठ लोकसंख्या काश्मिरात भरपूर प्रमाणात स्थिर केल्याशिवाय काश्मिर केवळ सैन्यबलाच्या जोरावर भारतीय संघराज्यात राहू शकेल. या म्हणण्यात काही अर्थ नाही. भारत सरकार काश्मिरात पोत्याने पैसा ओतून, सादिक-शमसुद्दीन सारखी हुला गादीवर बसवून काश्मिरात भारतीय अस्तित्व टिकवू पाहत आहे. पण हा प्रयत्न अगदी फोल आहे. तुमच्या-आमच्या घामाचा आणि परदेशातून लाचारान भीक मागून आणलेला पैसा काश्मिरात आज अक्षरशः गटारात फेकल्यासारखा वाया जात आहे. सैन्याने आणि पैशाने काश्मिर आपल्याकडे ठेवण्याचा या वीस वर्षातील आपल्या सरकारचा प्रयत्न पूर्ण फसला आहे. या गोष्टीही गतात, पण किती ? तळच फुटका असल्यावर वरून त्यात कितीही पाणी ओतत हन काय मिळणार आहे ? सादिक सरकार खाली खेचून, राष्ट्रपती राजवट जागूनही फार काय होणार आहे ? तळापासून किडलेली, बरबटलेली तेथील करा यत्रणा तशीच कायम राहणार असेल तर राष्ट्रपती राजवटीनेही तेथे काहीच नवीन साध्य होणार नाही. | यासाठी सीमाप्रांत म्हणून काश्मिरची एक स्वतंत्र नीती यापुढे आखण्यात विला हवी. संशयातीत भारतनिष्ठ लोकसंख्येचे तेथील प्रमाण सतत वाढते ठेवा ।। बलसागर ॥ ५३ ________________

यला हवे, घटनेतील ३७० व्या कलमासारखे काश्मिरच्या भारतीयकरणास आडकाठी करणारे जे कायदे असतील ते ताबडतोब रद्द व्हायला हवेत, विशेष सवलती वगैरे देऊन भारतीयांना तेथे उद्योगधंदे काढण्यास, शेतीवाडी करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे. काश्मिरला अलग ठेवुन, तो भारताचा अविभाज्य भाग आहे म्हणून अधूनमधून गर्जना करण्याचा आजचा हास्यास्पद प्रकार ताबडतोब थांबायला हवा. करायचे असेल तर हे सगळे आणि असेच आणखी कितीतरी मुळापासून करा, तडकाफडकी लवकर करा. नाहीतर शेख अब्दुल्लांच्या हातात काश्मिरची किल्ली सोपवण्यावाचून तुम्हाला गत्यंतर उरणार नाही. कारण इतकी वर्षे तुरुगात खितपत पडूनही शेख अब्दुल्ला हेच आज काश्मिरी मुसलमानांचे नेते आहेत; जवळजवळ दैवताप्रमाणे त्यांच्यावर सर्वाची अपार श्रद्धा आहे. त्वरेने भारतीयकरण किंवा अब्दुल्लांसमोर लोटांगण हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत. तिसरा पर्याय म्हणजे आज आहे तो. सतत पेटलेले एक कुंड. कधी घुसखोर उठाव करतील, कधी पंडित मारले जातील, कधी फुटबॉल मॅचवरूनही दंगली उसळतील, जाळपोळी होतील. काही नेम नाही. भारताचा पैसा जात राहील, सैन्यबल खर्ची पडेल आणि काश्मिर कणाकणाने, क्षणाक्षणाने भारतापासून दूर दूरच जात राहील. काय ते लवकर ठरवा, त्याप्रमाणे कणखर कृती करा- वेळ आता फार थोडा उरला आहे. सप्टेंबरऑक्टोबर १९६७ ॥ वलसागर ।। ५४ ________________

एकविसाव्या शतकाचे महाद्वार ! एकविसाव्या ३॥ पाकिस्तान हटाव व गरिबी हटाव हे दोन्ही कार्यक्रम आपण परस्परांना ३. म्हणून युद्धपातळीवरून एकदमच हाताळले पाहिजेत. यापैकी एकावर भर जन दुसरा खुटीवर टांगून ठेवण्याची दुष्ट संधी कुणालाही साधू देता कामा " हा जर आग्रह वेळीच धरला गेला नाही, तर युद्धातून अराजक व हुकुमशाही जवटा जन्मास येतात असा अनुभव आहे. आपण तर लोकशाहीला वचनबद्ध 'हात. ही लोकशाही मूठभर धनिकांची बटिक म्हणून राबवली जात असेल तर ताल असंख्य गोरगरीब जनता या लोकशाही राजवटीच्या संरक्षणासाठी व या मुळावर आलेल्या पाकिस्तानसारख्या संकटांच्या प्रतिकारासाठी सुसज्ज "६ शकणार नाही. पाकिस्तान हा जगातील बड्या शक्तींचा आशियातील एक 'ई' आहे, तळ आहे. तेव्हा हा तळ एकदा कायमचा उखडून टाकल्याशिवाय भारताला कधीही शांतता लाभणार नाही, लोकशाही मार्गाने आपली उद्दिष्टे व्य करून घेता येणार नाहीत, जागतिक राष्ट्रमालिकेतील आपले योग्य ते स्थान गत करून घेता येणार नाही; हे सत्य आपण एकदा नीट ध्यानात घेऊन, त्या'माण आपल्या पुढील पाच-दहा वर्षांच्या ध्येयधोरणांची आखणी केली पाहिजे. * भारत-पाक युद्ध (१९७१) बांगला देशाच्या स्थापनेनंतर जरी संपुष्टात तर पाकिस्तानच्यामार्फत भारताच्या विकासाला पुन:पुन्हा खीळ ठोकप्या कारवाया सतत चालूच राहणार आहेत व भारत कधीही एक समर्थ व 'त राष्ट्र म्हणून उभे राहू शकणार नाही, अशीही दक्षता बड्या राष्ट्रांकडून ९सा बाळगली जाणार आहे. तेव्हा सध्याचा भारत-पाक संघर्ष हा व्यापक "काय मुक्तिपर्वातील एक टप्पा समजून पुढेही असे काही टप्पे घेतघेत अखे ।। बलसागर ।। ५५ ________________

रीस संपूर्ण पाकिस्तानच मोडून काढण्याची दीर्घदृष्टी व संघर्षाची ईर्षा आपण बाळगली पाहिजे व त्याप्रमाणे आपल्या सर्व सामाजिक-आर्थिक जीवनाची मजबूत पायावर पुनर्माडणी केली पाहिजे. युद्ध आज, पुनर्माडणी उद्या ही प्रवृत्ती घातक आहे. तिला वेळीच पायबंद घातला पाहिजे. अर्थव्यवस्था दुबळी ठेवून युद्ध आपल्याला कसे खेळता येणार आहे ? सामाजिक विषमतेने पोखरलेले राष्ट्र उद्या पाकिस्तानच्या बाजूने चीन युद्धात उतरले तर कसे टिकाव धरू शकणार आहे ? बेकारांचे तांडे आहेत तसे भरकटत ठेवले, लक्षावधी एकर जमीन पडीक ठेवली तर युद्धाच्या वल्गना कितीही केल्या तरी विजय दूरच राहील. मोठमोठ्या जमीनदाच्या या युद्धकाळातच ताबडतोब निकालात काढल्या गेल्या पाहिजेत. दडलेली काळी संपत्ती खेचून बाहेर काढली पाहिजे. मक्तेदारांना वठणीवर आणले पाहिजे. चोरटया व्यापा-यांना व त्यांना आश्रय देणा-या मंडळींना चौकात फटकारले पाहिजे. हे सर्व आमूलाग्र परिवर्तन आपण नाकारू व अशा आमूलाग्र परिवर्तनाचा आग्रह धरणा-यांना, युद्ध प्रयत्नात अडथळा आणणारे म्हणून खड्यासारखे वाजूस सारू, तर आपले अखेरचे उद्दिष्ट आणखीनच लांबणीवर पडेल. बांगला देशप्रमाणे सिंध, बलुचिस्तान या भागातही विघटनकारी शक्ती जोर धरीत आहेत. या शक्तींना प्रोत्साहन देऊन पाकिस्तान अखेरीस नष्ट करणे, आशियातील एका धर्माध व प्रतिगामी सत्तेचा बिमोड करणे व लोकशाही व समाजवाद मानणा-या आशियाई शक्तींचे नेतृत्व करणे हे आपले अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी गरिबी हटाव व पाकिस्तान हटाव या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला सतत झुंजावे लागणार आहे. आपल्याकडील हितसंबंधी गट एका वेळी एकाच आघाडीचा युक्तिवाद पुढे मांडत राहतील, हीही शक्यता आहे. अशावेळी या हितसंबंधी गटांना जनतेने निग्रहपूर्वक सांगितले पाहिजे की, महाशय, देशभक्तीचा मक्ता आपल्याला एकटयालाच काही बहाल केलेला नाही. प्रत्येक भारतवासीयाला आपली देशभक्तीची पवित्र भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे. आपण ही संधी मिळू देणार आहात की नाही ? की दहा टक्के पगार कपात वगैरे नेहमीच्या जुजबी घोषणा करून, मेळावे भरवून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणार आहात ? आपण आज पाकिस्तानशी लढण्याचा पवित्रा घेतला आहे, तो स्वागतार्हच आहे. आपला हा पवित्रा कायम राहणार असला तर या महान् लढ्यात आम्हालाही सहभागी करून घ्या. आमच्याही शक्तींचा उपयोग करून घ्या, आम्हालाही राष्ट्रसेवेची संधी मिळू द्या. यासाठी अशी धोरणे अंगिकारा, असा क्रांतिकारक कार्यक्रम हाती घ्या, की त्यामुळे येथल्या अखेरच्या, तळाशी दबलेल्या भारतीयालाही हे युद्ध आपले वाटेल, आघाडीवर लढणाच्या जवानांच्या पाठीशी तो आपली सारी ताकद उभी करू शकेल. हे क्रांतिकारक पुनर्रचनेचे कार्य गुंतागुंतीचे व आपल्या स्वार्थ बलसागर ।। ५६ ________________

संबंधांवर निखारा ठेवायला लावणारे असते म्हणून जर पुढे ढकलाल तर आत्ताच सांगून टाकलेले बरे की, हे युद्ध अखेरच्या विजयक्षणापर्यंत, महाशय, तुम्ही खेळूच शकणार नाही. तडजोडी अपरिहार्य ठरतील आणि आजचे संकट फारतर उद्यावर ढकलण्यात आपण यशस्वी ठरू. हे घडायला नको असेल तर आपण सर्वंकष पूनमांडणीचा आग्रह सुरुवातीपासूनच धरला पाहिजे, तशी खंबीर पावले त्वरेने उचलली पाहिजेत. | कसे घडते पाहा. वास्तविक पुणे हे आता काही केवळ एक शैक्षणिक केन्द्र उरलेले नाही. उद्योगधंद्यांचा पसारा येथे आता खूप वाढलेला आहे. तरीपण युद्धप्रयत्नात सहभागी होण्याची पुण्याच्या प्रतिष्ठित नेते मंडळींची पहिली उडी जवानांसाठी केवळ पाच लाख रुपयांचा एक रणगाडा घेऊन देण्यापलीकडे जाऊ शकला नाही. वास्तविक पाच लाखांची रक्कम तर लक्ष्मी रोडवरच्या एका बाजूकडून जमा व्हायला हवी. जाहिरातबाजी आणि रोषणाईला आळा बसवला तरा है जमणे कठीण नाही. ही रक्कमही पुन्हा बचतीत फक्त गुंतवायची आहे. हा-पाच वर्षांनी ती ज्याची त्याला परतच मिळायची आहे. तरीही उद्दिष्टांचा जाकडा ठरविताना पुण्यातील प्रतिष्ठित नेते मंडळींनी प्रारंभीच एवढा हात खून ठेवला आहे. हा हातराखूपणा कशाचे लक्षण आहे ? मूळ चौकटीत बदल करता वरचेवर काही हलवाहलवी करून प्रश्न सोडविण्याच्या संकुचित दृष्टीचे ९ लक्षण आहे. यामुळे डोक्यावरचे ओझे फार तर खांद्यावर घेतले जाईल. ते जगावरून फेकून देण्याचे सामर्थ्य प्राप्त होणार नाही. सुरुवातच करायची तर 3"यातील प्राप्तीकर कार्यालयातून प्राप्तीकर चुकविणा-यांची यादी घेऊन, या करचुकव्यांना आठवडा-पंधरवड्याच्या आत चुकवलेले कर भरण्यास भाग पाडले पाहिजे. सरकारच्या हाती यासाठी भरपूर अधिकार यापूर्वीच दिले गेलेले अहित. ते सर्व वापरून हे काम पुरे केले पाहिजे. मग मोर्चा वळवला पाहिजे 3प्यातल्या बड्या उद्योगपतींकडे-कारखानदारांकडे. एकटा किर्लोस्कर समूह जवानासाठी नॅट विमान देऊ शकतो. येत्या दोन-चार वर्षांची किर्लोस्कर रवीराची डिव्हिडंट्स वगैरे यासाठी राष्ट्रीय बचतीकडे गुंतवली गेली तरी हे काम " हाण्यासारखे आहे. पण असे काही घडणार नाही. किर्लोस्कर पाच-पंचवीस ९जार रुपये इकडे तिकडे नाचवतील. वर्तमानपत्रात याचाच अधिक गवगवा २ल आणि सामान्य माणसाला मात्र रॉकेलसाठी, पोस्टाच्या तिकिटापाकिटाTO, प्रवासासाठी, यद्धखर्च म्हणन जादा पैसे दर पावलागणिक मोजत बसावे तिलि. लक्षभोजनप्रिय मंडळींना तर आता केवढी तरी संधी आहे! लक्ष साठी लागणारा अन्नपुरवठा करण्याचे ते ठरवू शकतात. यासाठी ।। बलसागर ।। ५७ ________________

उसाचे क्षेत्र कमी करून अधिक जमीन व पाणी धान्योत्पादनाकडे वळविण्याचा निर्णय ते घेऊ शकतात. जादा जमिनी अपंग सैनिकांच्या पुनर्वसनासाठी राखून ठेवू शकतात. एकटा अकलुज तालुका एका पलटणीचा खर्च अशा त-हेने भागवू शकतो. फार कशाला ? या मंडळींनी आपल्या सरकारकडील थकवाक्या पुया केल्या, घेतलेली कर्जे ताबडतोब परत केली, तरी युद्ध प्रयत्नात त्यांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. पण असे काही घडणार नाही. घडेल असे की, लक्षभोजने विसरली जातील. ( समाजवादी ) फोरमवाले आणि लक्षभोजनवाले सगळेच एक होतील व एखादा जुजबी देखावा उभा करून वटहुकुम, सीलिंग वगैरे पंधरा कलमी कार्यक्रम युद्ध परिस्थिती म्हणून खुटीवर टांगून मोकळे होतील. वास्तविक युद्ध परिस्थिती म्हणून तर हा पंधरा कलमी कार्यक्रम ताबडतोब अंमलात आणायला हवा. याऐवजी तो बासनात गुंडाळून ठेवण्याची केवढी तत्परता या मंडळींनी दाखवली आहे. केवळ चर्चा करण्यासाठी बोलाविलेली मुंबईची बैठक एकदम रद्द ! आणीबाणीचे निमित्त ! | म्हणून अशी आघाडी आज हवी आहे, की ती या दोन्ही मोर्चावर काम करील. संघर्ष हवा पण तो रचनात्मकही हवा. अगोदर शत्रूशी मुकाबला, मागाहून रचना, ही विभागणी, ही फारकत चुकीची आहे. आपली ताकद या फारकतीमुळे खच्ची होणार आहे. अमेरिकेने मदत यांबवली, चीन युद्धात पडला तर आज नाही उद्या हे आपल्याला करावेच लागणार आहे. मग हे घडण्याची वाट पाहण्यात काय अर्थ आहे ? शुभं च शीघ्रम्. जवान तर आघाडीवर लढण्याचे आपले कर्तव्य चोखपणे बजावीत आहेत. लोकनेत्यांनी मात्र उगाच युद्धाची आणि देशभक्तीची पोकळ भाषणे ठोकीत गावोगाव हिंडण्यापेक्षा अशा त-हेने रचनात्मक संघर्षाचे तळ जागोजाग संघटित केले तर ती अधिक भरीव कामगिरी ठरणार आहे. जनशक्ती तर जागृत आहेच. तिला समाजवादी तत्त्वावर संघटित करण्याचे लांब पल्ल्याचे कार्य अधिक महत्त्वपूर्ण आहे., हैं। आपण करू लागलो की, एकीकडे पाकिस्तानची कबरही खणली जाईल, दुसरीकडे सामाजिक व आर्थिक समतेचे राज्य भारतात सुस्थिर होऊन, आशियातील लोकशाहीचा मजबूत बालेकिल्ला म्हणून, जागतिक पातळीवरही आपल्याला गौरवाचे स्थान प्राप्त होईल. पाकिस्तान नष्ट होणे याचा अर्थ जुन्या साम्राज्यवादी शक्तींनी ठेवलेला आपल्या विकास मार्गातील एक अडसर कायमचा दूर होणे. पाकिस्तान नष्ट होणे याचा अर्थ हिंदू-मुस्लिम वैरातील दाहकता, विषारीपणा नाहीसा होऊन, हे दोन समाज बंधुत्वाच्या समान पातळीवर एकत्रित येण्याच्या नव्या युगाचा प्रारंभ होणे. यासाठी ही पाकिस्तानची बेडी ।। बलसागर ।। ५८ ________________

कायमची तोडण्याचा निश्चयच या देशाने केला पाहिजे. निदान या युद्धात पूर्व बंगालप्रमाणे काश्मिरचा प्रश्न तरी निकालात निघावा. पुढचे आणखी पुढे पाहता येईल. मात्र यासाठी गरिबी हटाव आणि पाकिस्तान हटाव या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला झुंझावे लागणार आहे. हे जोडकाम करण्याचे आपण नाकारू तर विजय अर्धवट राहणार आहे. चीन अमेरिका यांच्या संयुक्त शक्तीला तोड देणे आपल्याला कठीण जाणार आहे. हे जोडकाम जो नेता, जो पक्ष साधेल तो हिंदुस्थानचा भाग्यविधाता ठरणार आहे. एकविसाव्या शतकाचे महाद्वार, हिंदुस्थानसाठी या जोडकामामुळेच उघडले जाणार आहे. चालू युद्ध हे फक्त या महाद्वाराच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आणखी पुढे जायला हवे. जायला हवे. जायला हवे. डिसेंबर १९७१ डिसेंबर १९७१ । बलसागर ।। ५९ ________________

विजय यशस्वी व्यक्ती तेजस्वी असतातच असे नाही. यशाला तेजाची झळाळी संघर्षामुळ प्राप्त होत असते. इंदिरा गांधींचे व्यक्तिमत्त्व असे संघर्षप्रिय आणि लढाऊ आहे, हे काँग्रेस महासमितीच्या बंगलोर अधिवेशनापासूनच स्पष्ट होऊ लागलेले हात. प्रथम त्यांनी काँग्रेसमधील विरोधकांवर चाल केली. मध्यावधी निवडणुकात त्यांनी काँग्रेसबाहेरील विरोधी पक्ष भुईसपाट केले आणि आता तिसरे भारत-पाक युद्ध जिकून, त्यांनी आपले आंतरराष्ट्रीय स्थानही निश्चित करून टाकले. यापुढे भारताला नगण्य समजून, निदान आशिया खंडातील राजकारण तरी कोणी खेळू शकणार नाही. बड्यातला बडाही. हे यश इंदिरा गांधींच्या लढाऊ मुत्सद्देगराचे आहे. सारा भारत या त्यांच्या पराक्रमावर आज लुब्ध आहे. एक वीरांगना म्हणून उद्याचा भारतही त्यांची स्मृती चिरकाल जतन करणार आहे. दोन वर्षापूर्वी, राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात दिल्लीतील सर्वसामान्य जनता म्हणत होती जब तक बहे जमनाका पानी तब तक रहे इंदिरा रानी - आणि आज सारा भारतवर्ष हे जयगान करीत आहे. - उद्याच्या भारतवर्षातही या जयगानाचे सूर निनादत राहतील. या बांगलादेश युद्धातील आपला सामरिक विजय मात्र अभिमानास्पद असला तरी राजनैतिक विजयासारखा दैदीप्यमान नाही. आंतरराष्ट्रीय विजय ।। बलसागर ।। ६० ________________

मालिकेत नोंदला जावा इतका मोठा नाही. मुळात हा सामना तुल्यबलांचा नव्हता. पाकिस्तान हा भारतापेक्षा फारच लहान देश. जन्मापासूनच दोन तुकड्यात फाटलेला. एक तुकडा लोकमताच्या दृष्टीने आपल्याला संपूर्ण अनुकूल असलेला. सैन्यबल आपल्या मानाने खूप कमी. आपले पायदळ दहा लाख तर पाकिस्तानचे तीन ते चार लाख. पाकिस्तानपेक्षा आपल्या विमानदलाची संख्या दुपटीहून थोडी अधिक. तोफखानादलाचे प्रमाण तर एकास तीन असे. रणगाडादल फक्त आपल्यापेक्षा निम्याहून थोडे अधिक. असा हा विषम सामना जिंकला नसता तरच आश्चर्य होते. आंतरराष्ट्रीय सामरिक विक्रमाची पातळी कोणती आहे ? भोवताली तेरा विरोधी अरब देशांचे कोंडाळे असताना, सहा दिवसात इस्रायलसारख्या टिचभर राष्ट्राने इजिप्तसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला धूळ चारली; ही आंतरराष्ट्रीय विक्रमाची पातळी आहे. किंवा व्हिएतनामचे युद्ध. एक गरीब आणि लहान राष्ट्र अमेरिकेसारख्या धनाढ्य आणि शस्त्रास्त्रसंपन्न बड्या राष्ट्राला दाती तृण धरायला लावते, हा जगाने चकित व्हावे असा सामरिक चमत्कार आहे. या मानाने आपला सध्याचा सामरिक विजय अल्प आहे व तो संयमानेच साजरा करणे आपल्याला अधिक शोभादायक ठरणार आहे. तरी हा विजय लक्षणीय आहे, अभिमानास्पद आहे, तो वेगळ्या दोन कारणांसाठी | १ : यापूर्वीच्या दोन्ही भारत-पाक संघर्षात जवान शौर्याने लढले तरी विजयाची कोणतीच निर्णायक जागा आपल्याला सर करता आलेली नव्हती. पासष्टच्या युद्धात लाहोर आपण घेतले नाही. पाकिस्तानने तिखट प्रतिकार केला की, आपल्यालाच लाहोरवरचा कबजा अभिप्रेत नव्हता, हे गुलदस्तात आहे. पण त्यामुळे सामना बरोबरीने सुटला असेच सवचे मत बनले. शिवाय मिळालेले अल्पस्वल्प विजयही आपण ताश्कंदला हरवून आलो. तसे यावेळी काही घडले नाही. डाक्का आपण जिंकले ! शत्रुसैन्य शरण आले ! विजयावर आता शिक्कामोर्तब झालेले आहे. विजय निःसंदिग्ध, निर्णायक व लहान असला तरी निरपवाद आहे. | २ : आपली सेना ही खरीखुरी मुक्ति सेना ठरली आहे. जितांनाही आपण सभ्यतेने वागवीत आहोत. आपली प्रेरणा मुलुखगिरीची, विस्तारवादाची, प्रदेश गिळंकृत करण्याची, कुणालाही गुलाम बनविण्याची नाही. शेजारी देशातील जनतेला उलट गुलामगिरीतून मुक्त करण्याची आहे; आणि हा मुक्तिसंग्राम संपल्यावर या दुर्दैवी जनतेवर कुठलेही वर्चस्व न गाजवता, सन्मानपूर्वक निरोप घेण्याची आहे. जसा रामाने बिभीषणाला राज्याभिषेक करवून लंकेचा निरोप घेतला होता ! इतकी विशुद्ध नैतिकता त्या इतिहासप्रसिद्ध लाल मुक्तिसेनांनीही । बलसागर ।। ६१ ६ ________________

प्रकट केल्याची नोंद सापडत नाही. नाझींचा नि:पात केल्यावर रशियाच्या लाल फौजा पूर्व युरोपात घुसल्या. त्यांनी अत्याचार तर केलेच, पण अनेक छोट्या देशांना गुलामही बनवले. अजून या देशांची गुलामगिरी संपलेली नाही. चीनच्या मुवितफौजांनी तिबेट गिळंकृत केला हा इतिहास तर ताजाच आहे. या पाश्र्वभूमीवर विजयी भारतीय सैन्याची वर्तणूक फारच उमटून दिसते. युद्धातही मानवतेची किमान पातळी आपण सोडली नाही हा निश्चितच एक जागतिक उच्चांक ठरावा. मात्र याही उच्चांकाच्या आपण फार आहारी जाता कामा नये. युद्धगुन्हेगारांची कठोर व तात्काळ चौकशी झाली पाहिजे आणि या गुन्हेगारांना डाक्क्याच्या चौकातच फासावर टांगले गेले पाहिजे... दया तिचे नाव भूतांचे पाळण। आणिक निदळण कंटकांचे ।। - ही मानवतेची व्याख्याही आपण विसरता कामा नये. डिसेंबर १९७१ ॥ बलसागर ।। ६२, ________________

स्वातंत्र्याची पंचवीस वर्षे म्हणजे नेहरूची, नेहरू कुटुंबाची पंचवीस वर्षे १९४७-४८ पासून हे नेहरूयुग सुरू झाले. सध्या या युगाचा माध्यान्ह आहे - जरा कललेला. या युगसूर्याचा प्रवास मात्र पश्चिमेकडून पूर्वेकडे असा झाला - चालू आहे. नेहरू गंगेचे सुपुत्र खरे. पण आपादमस्तक पाश्चिमात्य आचारविचारात रंगलेले, वाढलेले. त्यामुळे पश्चिमेचा, विशेषतः इंग्लंडचा थोर वारसा त्यांच्या रक्तात प्रारंभीच भिनला. या मुळावर त्यांनी थोडेबहुत पौर्वात्य - भारतीय संस्कार केलेही. पण अखेरपर्यंत प्रबळ राहिला, भारतीय भूमीत त्यांनी वाढवला - फुलवला तो एक पश्चिमेकडचा वृक्ष होता. या भूमीत, प्लासीच्या लढाईनंतर पेरल्या गेलेल्या बीजाचा हा एक गगनावर गेलेला विस्तार होता. संसदीय लोकशाही, संमिश्र अर्थव्यवस्था ही या वृक्षाला आलेली दोन मोठी फळे. इतर अनेक थोर व्यक्ती, पक्षोपपक्ष यांचा या फलनिष्पत्तीत महत्त्वाचा वाटा असला तरी हे फलित मुख्यतः नेहरूंच्या प्रयत्नांचे. नेहरूची देणगी, नेहरूयुगाचा वारसा म्हणून जो काय मानायचा तो हा आणि हा एवढाच . । | तसा भारताचा शोध नेहरूंनी फार उशीरा घेतला. पूर्वेकडेही ते फार शेवटी शेवटी वळले. त्यामुळे एकीकडे लोकशाही आणि संमिश्र अर्थव्यवस्था यांची पायाभरणी चालू असतानाच त्यांना दुसरीकडे असेही अंधुकसे जाणवू लागलेले होते की, हा पाया कुठेतरी कमी पडतो आहे, कच्चा राहतो आहे, वरचे बांधकाम बरेचसे अर्धवट व एकतर्फी होत आहे. ५९ साली केलेल्या एका महत्त्वाच्या । बलसागर ।। ६३ ________________

व्याख्यानात ते म्हणाले होते : उद्याच्या भारताची घडण आजच्या आमच्या परिश्रमांवर अवलंबून आहे. औद्योगिक आणि इतर क्षेत्रात भारताची उन्नती होईल, विज्ञानात आणि तंत्र शास्त्रात त्याची प्रगती होईल, आमच्या लोकांचे जीवनमान वाढेल, शिक्षणाचा प्रसार होईल, आरोग्य सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल आणि कला आणि संस्कृती लोकांचे जीवन समृद्ध करतील याविषयी मला मुळीच शंका नाही...परंतु मला जी चिंता आहे ती केवळ आमच्या भौतिक प्रगतीविषयीच नव्हे तर आमच्या लोकांचे शील आणि त्यांच्या मनाची सखोलता याविषयी आहे. औद्योगिक प्रगतीने सामर्थ्य प्राप्त झाल्यामुळे वैयक्तिक संपत्ती आणि सुखी जीवन साध्य करून घेण्याच्या प्रयत्नात आम्ही आमचे व्यक्तिमत्त्व तर गमावणार नाही ना ? तसे झाले तर ती एक शोकांतिका ठरेल ... (मौ. अबुल कलम आझाद स्मारक-व्याख्यानातून.) । नेहरूयुगाचा हा माध्यान्ह आहे. यशकीर्तीप्रतापाच्या नौबती दणाणत आहेत–तरी या शोकांतिकेचे सूरही दूरवरून ऐकू येण्याइतके स्पष्ट आहेत. भारत विजयी आहे. पण भारताचे मन खोलवर कुठेतरी आक्रंदतही आहे. ज्या गुणांसाठी भारत प्रसिद्ध होता ते गुण आज मातीमोल ठरलेले आहेत. नैतिकतेचे दिवसाढवळ्या वाभाडे निघत आहेत, सत्ता आणि संपत्तीने विद्येचा आणि विनयाचा बळी घेतला आहे. या प्रवृत्ती अशाच फोफावत राहिल्या तर जी लोकशाहीची, आर्थिक समृद्धीची वृक्षवाढ नेहरूंनी केली ती तरी टिकून राहणार आहे का ? कुठल्याही युगाचा अस्त हा नैतिकतेच्या अभावापासून सुरू होतो. नैतिकता याचा येथे अर्थ साधे मानवी सद्गुण. प्रामाणिकपणा, सत्याचरण, कष्टाची हौस, नाविन्याची ओढ, परस्पर सद्भाव, आणि विश्वास, दानत, स्वार्थापलिकडे थोडे तरी पाहण्याची वृत्ती–कशाकशाचा सध्या मागमूस आढळेनासा झाला आहे. सत्तेने आणि संपत्तीने काहीही दाबता येते, खरीदता येते, हे आजकालचे तत्त्वज्ञान बनू पाहत आहे. उद्याची जाणीव नाही. कालचा धरबंद नाही. आजचे आणि आत्ताचे तेवढेच पाहणे ज्याला त्याला अभिप्रेत दिसते. हीच ती युगांताची चाहूल नसेल का ? युगांतानंतर नवयुगाची सुरुवातही होतच असते. भारतात हे नवयुग केव्हा अवतरणार ? या युगाचा शिल्पकार कोण असेल ? सारे आज अनिश्चित, भविष्यात कोणीच डोकावू शकत नाही. एवढे मात्र खरे की, या युगाची लाट एखाद्या राजधानीतून, महानगरातून उसळलेली दिसणार नाही. सत्ता आणि संपत्ती ।। बलसागर ।। ६४ ________________

याभोवती आज घोटाळ गा-या कुणातही हो लाट उठवण्याचे सामर्थ्य असणार नाही. एखादा टिळक, एखादा गांधीच, अशी लाट उठवू शकतो-जो नव्या मातीत घुसतो, नवी माणसे घडवतो, नीतीचे, चारित्र्याचे, नवे मानदंड स्थापित करतो, थंड गोळयाचे मग अग्निगोलकात रूपांतर होत असते. युगारंभ दिसू लागतो. अशी माती जागवणारा, हलवणारा, आज कोण आहे ? अशांच्याही फौजा लागतील-ज्या खेडोपाडी पोचतील, जंगलात राहतील. मोजक्या ठिकाणी साचलेली संपत्ती आणि सत्ता मोकळी करून समतेचे वातावरण सर्व देशभर निर्माण करतील. कारण नेहरूंच्या लोकशाही युगानंतर अवतरणा-या युगाचे नाव आहे समतायुग . | हे समतायुग निर्माण झाले तरच लोकशाहीयुग टिकणार आहे. त्यामागच्या स्वातंत्र्ययुगाचाही अभिमान बाळगता येणार आहे. नाहीतर नुसतीच आपण गाणी म्हणत बसु - ‘आचंद्रसूर्य नांदो स्वातत्य भारताचे ! स्वातंत्र्य भारताचे !' ऑगस्ट १९७२ ।। बलसागर ।। ६५ ________________

आसाम । शिवाजी आसामच्या प्रश्नावर काही तोडगा निघेल अशी शक्यता फार कमी आहे. कारण आंदोलन करणारे आसामी विद्यार्थी, आंदोलनाला कमी जास्त पाठिंबा देणारे विविध राजकीय पक्ष, केन्द्र आणि आसाम राज्य सरकार, हे कुणीच प्रश्नाच्या मुळाशी जायला तयार नाहीत. विद्याथ्यांच्या मागणीप्रमाणे अगदी ५१ सालापासून आसाममध्ये घुसून स्थायिक झालेल्या बंगलादेशीय निर्वासिताना बाहेर काढण्याचे सरकारने मान्य केले तरी प्रत्यक्षात ही हकालपट्टी अंमलात येणार कशी ? तीस-तीस वर्षे हे निर्वासित मजूर म्हणून, व्यापारी म्हणून वावरत आलेले आहेत. काहींनी जमिनी घेऊन शेतीवाड्या केल्या. घरेदारे वसवली. अशांची एक संपूर्ण पिढी आसामात जन्मली, वाढली. आसामच्या लोकजीवनाशी, मातीशी हजारो निर्वासितांचे असे रागालोभाचे, स्वार्थाचे, देण्या-घेण्याचे नाते प्रस्थापित झाले. ही तीस-तीस वर्षाची नाती एकदम उपटून तोडून नष्ट करण्याचे ठरवले तरी प्रत्यक्षात हे घडण अवघड आहे. यासाठी नवे नियम-उपनियम केले, कायदे काढले तरी अनेक पळवाटा हुडकून जो तो आहे तेथेच चिकटून राहण्याचा प्रयत्न करील व आपली नोकरशाही फारच स्वच्छ व कार्यक्षम असल्याने बहुतेकांचे हे प्रयत्न शंभर टक्के यशस्वी ठरतील, अशीच शक्यता जास्त आहे. आपली नोकरशाही जर भ्रष्ट नसती, आपले राजकीय पक्ष जर व्यापक देशहित डोळ्यासमोर ठेवून या निर्वासितांच्या मतांचा मोह टाळू शकले असते तर आज आली आहे ती वेळच का उद्भवली असती ? निर्वासितांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे अस्तित्वात होतेच. पण त्यांची अंमलबजावणी न करण्यात येथील ।। बलसागर ।। ६६ ________________

नोकरशाही, राजकीय पक्ष या सगळ्यांचाच वाटा होता. नवीन कायदेकानू केले, ओळखपत्रे वगैरे दिली तरी हीच नोकरशाही, हेच राजकीय पक्ष उद्याही आसामात राहणार आहेत. तेव्हा नवीन लोंढे येणारच नाहीत, जुने व्यवस्थितपणे हुडकले जाऊन बाहेर कटाक्षाने हाकलले जातीलच याची शाश्वती काय ? जर आसामची नैसर्गिक साधनसामग्री विपुल असेल, तेथे कारखानदारी वगैरे वाढणार असेल आणि राजवट उदार व लोकशाहीवादी असेल तर आसपासच्या कमी विकसित व लष्करी अंमलाखाली दडपल्या गेलेल्या भागातून, म्हणजे मुख्यतः बांगला देशातून, आसामच्या भूमीवर लोकसंख्येचे आक्रमण होतच राहणार, हे उघड आहे. लोकसंख्याशास्त्राचा हा अगदी प्राथमिक धडा आहे. आपण बेफिकीर राहिलो तरी शास्त्र बदलत नाही. मद्रासी माणूस मुंबईत येऊन मराठी लोकांवर स्वार होतो. केरळीय माणूस मध्यपूर्वेत जाऊन पैसाअडका कमावतो. तसेच बांगला देशीय उद्या विकसित आसाममध्ये येणार नाहीत, त्यांचे आसामी जीवनावर वर्चस्व निर्माण होणार नाही, अशी शाश्वती कुणीच देऊ शकणार नाही. म्हणून या सर्व विभागाचा एकात्म व समतोल विकास हा या प्रश्नावरील खरा, टिकावू उपाय आहे व त्यासाठी ४७ साली या विभागाची, धर्माच्या तत्वावर झालेली कृत्रिम फाळणी : प्रथम रद्द होणे आवश्यक आहे. बांगलादेशीय रहिवासी घुसताहेत म्हणून त्यांना परत पाठविण्याचा किचकट व उफराटा उपद्वयाप करण्यापेक्षा किंवा आसामियांनी अंग चोरून आपल्याचे प्रांतात परकीयांच्या दबावाखाली संकोचून जीवन कंठण्यापेक्षा, जिथून वंगलादेशीय निर्वासित येताहेत तो तो भाग, तेवढ्या तेवढ्या प्रमाणात आसाम-बंगालशी जोडून घेण्याची मागणी केली पाहिजे व त्या दृष्टीने आंदोलनेही संघटित करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. गेलेला विकासाचा तोल याशिवाय पूर्णपणे सावरला जाणार नाही व निर्वासितांचा प्रश्नही । कायमचा सुटणार नाही. प्रत्याक्रमण हा आक्रमण थोपविण्याचा राजमार्ग असतो. हा पुढे जाणारा राजमार्ग चोखाळण्याऐवजी आसामची नाकेबंदी करण्याची उलट वाट धरली जात आहे. हे चूक आहे. आसामच्या आंदोलनाला संकुचित प्रतिवादी आंदोलन ठरविण्याचा डाव्या व विशेषतः बंगाली पत्रकारांचा दृष्टिकोनही चुकीचाच आहे. बंगलादेशीय नागरिक आसामात घूसतो आहे तर असामियांनी आणि बंगाल्यांनी बंगला देशात घुसण्यास काय हरकत आहे ? हा विचारसुद्धा आपल्याला सध्या सुचत नाही. याचे कारण गेल्या हजार वर्षांची आपली गुलामी. सततच्या पराभवामुळे काही मानसिक विकृती निर्माण होतात- चचलने यांना Diseases of Defeat असे म्हटले आहे. गेल्या हजार वर्षांत विजयांपेक्षा पराभवांचे अनुभव आपल्याला जास्त आले. त्यामुळे आक्रमक उपाय योजनेचा नुसता विचारही आपल्याला भयंकर वाटतो. ।। बलसागर ।। ६७ ________________

अशी उपाययोजना वेळीच सुचविणा-या एखाद्या सावरकरालाच आपण वाळीत ढकलून मोकळे होतो. आपण आपापसात दंगली काही कमी करीत नाही. आपण फार मोठे उदारमनस्क, शांतताप्रेमी किंवा अहिंसेचे पालन के रणारे आहोत, हेही खरे नाही. बरेचदा आपल्या मारखाऊ आणि पराभूत वृत्तीवर आपण ही नैतिकतेची झूल उगाचच चढवत असतो. ही झूल थोडीफार ओढून काढणारा सावरकरसुद्धा आपल्याला जिथे पचला नाही तेथे शिवाजीचे नावसुद्धा आपण का घ्यावे ? शिवाजीला आपण एक तर कुंपणावर तरी बसवून ठेवले आहे किंवा फोटोतून, पुतळ्यातून तो बाहेर पडणार नाही अशी दक्ष सावधानता बाळगली आहे. रायगडाला आपण जाग आणली. पण शिवाजीला झोपवले आहे. अलिकडच्या काळात आपले वेद जर्मनांनी नेले. त्यावर संशोधन वगैरे करून चांगल्या स्वरूपात ते आपल्याला व जगाला पुन्हा उपलब्ध करून दिले. आपली योगविद्या रशियात, अमेरिकेत व इतर विज्ञानात पुढे असणा-या देशात सध्या उचलली जात आहे व लवकरच ती Import ही होऊ लागेल. तसाच आपला शिवाजी देखील माओने, हो चि मिन्हने पळवला होता. तो अद्याप गायबच आहे. आपण फक्त त्याच्या पुण्यतिथ्या साजच्या करीत आहोत. वंगला देशातून निर्वासित येताहेत ? ठीक आहे. मी बंगला देशच भारताला जोडून घेतो, असे खरा शिवाजी म्हणाला असता. त्याने सुरतेची लूट का केली ? पैसा नव्हता हे एक कारण खरेच. पण औरंगजेबाच्या मामाने, शाहिस्तेखानाने पुण्यास तळ देऊन स्वराज्याची फार नुकसानी केली होती. ही नुकसानी वसूल करावी म्हणन, त्यावेळी औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या सुरतेवर शिवाजी चालून गेला. शत्रूच्या प्रदेशात घुसत नाही तो शिवाजी कसला ? इराणमध्ये अमेरिका घुसते आहे म्हणून अफगाणिस्तान आम्ही ताब्यात ठेवणार असे म्हणणा-या रशियाची आम्ही बाजू घेणार, त्याचे समर्थनही करणार आणि इकडे बंगलादेशीय म्हणजेच पूर्व पाकिस्तानी, आपल्या प्रत्यक्ष घरातच वर्षानुवर्षे घुसखोरी करीत आहेत तरी, त्यांना नुसते परत जायला सांगण्यातही खळखळ करणार, आपापसातच यासाठी कालमर्यादेवर भांडाभांड करणार ! विसंगतीचा, अभिजात घोळघाल वृत्तीचा हा कहर झाला. तुलनेने लहान असलेल्या बंगलादेशच्या बाबतीत आपला असा घोळ आणि पडखाऊपणा दिसतो आहे, तर जेथे चीन-अमेरिका या महासत्तांनो शिरकाव केलेला आहे त्या पूर्वाचलाच्या समस्येला आपण कसे व केव्हा भिडणार आहोत ? शिवाजीचे नाव घेणा-यांनी तरी या पडखाऊ वृत्तीवर प्रहार करायला हवेत. मतांवर, निवडणुकीतील यशावर डोळा ठेवून, गोडगोड आणि गुळगुळीत बोलण्याच्या वक्तृत्वस्पर्धेत त्यांनीही भाग घेण्याची काही आवश्यकता नाही. ज्यांचे सत्ता हेच सर्वस्व आहे त्यांना गोड बोलणे नि नुसते हसणे याशिवाय पर्यायच नसतो. पण शिवाजीचे ।। बलसागर ।। ६८ ________________

फोटो लावून ‘परं वैभवं नेतुमेतत्स्वराष्ट्र' म्हणणा-यांनी सेवेला पराक्रमाची पुरुषार्थाची जोड द्यायला हवी. शिवाजी तिकडे व्हिएटनामच्या जंगलात हरवला आहे, त्याला यासाठी हुडकून इकडे आणावे लागेल. रायगडाला प्रदक्षिणा कसल्या घालता आहात ? गडागडांवरचे पाणी बाटल्यांतून भरून आणून या ३०० व्या शिवाजी पुण्यतिथीनिमित्त शिवसमाधीवर अभिषेक काय चालवले आहेत ? साम्राज्यवाद्यांविरुद्ध लढून हो चि मिन्हने व्हिएतनाम अखंड केला. आणि आपल्याला आसामचा प्रश्न हीसुद्धा एक डोकेदुखी ठरावी ! धन्य आहे आपल्या शिवप्रेमाची ! मार्च १९८० ॥ वलसागर ।। ६९ ________________

खेचर इंदिरा गांधींनी अलीकडेच केलेल्या दोन घोषणा मोठ्या सूचक आहेत. वृत्तपत्रांनी व राजकीय निरीक्षकांनी–निदान मराठीतल्या तरी त्यांची दखल घेतलेली मात्र दिसली नाही. पहिली घोषणा अणुस्फोटासंबंधीची. गरज पडली तर भारत अणुस्फोट करण्यास, म्हणजेच अणुबाँब बनविण्यास मागेपुढे पाहणार नाही असे वाई म्हणाल्या. यापाठोपाठ बाईंनी पाकिस्तानला असेही सांगून टाकले की, काश्मिरचा प्रश्न उकरून काढणे म्हणजे सि मला काराराचा भंग होय. या दोन्ही घोषणा एकत्र केल्या तर असा समज होतो की, चालू दशकातले भारत-पाक युद्ध जवळ जवळ येत चालले आहे काय ? युद्धाची ठिणगी उडालीच तर आसामप्रश्नाचे लोढणे नको म्हणून अचानक दोन्ही बाजूंनी थोडीथोडी माघार घेऊन वाटाघाटींना सुरुवात तर केली नसावी ? ब. अंतुले यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली, यामागेही हा व्यापक संदर्भ असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानशी युद्ध म्हणजे मुस्लिमविरोध नव्हे, असेच जणू वाईंनी या निवडीतून सूचित करून ठेवलेले दिसते. अर्थात अंतुले यांची इंदिरा-संजयनिष्ठा, योग्यता व इतर पक्षांतर्गत कारणे या निवडीमागे होती, हे उघडच आहे. शिवाय देशांतर्गत परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चाललेली आहे. महागाई आणि बेकारी वाढते आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. जातीय दंगलींनी पुन्हा डोके वर काढले आहे. विभाजनवाद जोरात आहे. हा सारा बलसागर ।। ७० ________________

असंतोष, हे वाढते अराजक आणि ही फुटीरता कशी कमी होणार ? दडपादडपी हा एक मार्ग. आणीबाणीत या मार्गाचे पर्यवसान होते. दुसरा मार्ग युद्धाचा. युद्धामुळे महागाई वाढली तरी बेकारी कमी होते, पडून राहिलेले मालाचे साठे मोकळे होतात व आर्थिक अरिष्टातून तात्पुरती सुटका लाभते. तिसरा मार्ग विकासाचा; पण यासाठी समाजवादी धर्तीचा ठोस कार्यक्रम, राष्ट्रीय चारित्य आणि सामाजिक शिस्त हवी. या गोष्टींचा आज पूर्ण अभाव असल्याने पहिल्या दोन मार्गाचा अवलंब होण्याची शक्यताच आपल्या बाबतीत अधिक आहे. इंदिरा गांधींच्या समर्थकांनी या दिशेने आपल्या लेखण्या वेळवायला सुरू - वातही केली आहे. गिरिलाल जैन इंदिरा गांधींच्या राजकारणामागील तात्त्विक बाजू नेहमी आपल्या लिखाणातून पुढे ठेवीत असतात . ' Zia provokes Indira' अशा भडक मथळयाचा त्यांचा लेख टाइम्स रविवार पुरवणीत (दि. १० ऑगस्ट १९८०) प्रसिद्ध झालेला आहे, तो या दृष्टीने पुरेसा सूचक आहे. किंबहुना टाइम्स पुरवणीचे हे सगळे पान च सूचक व बोलके आहे. पानाच्या वरच्या भागात जैन यांचा वरील लेख आहे तर खालच्या भागात तारीक अली या प्रसिद्ध डाव्या नेत्याच्या ‘Will Pakistan survive' या लेखाची योजना करण्यात आलेली आहे. तारीक अली हे सध्या लंडनमध्ये असतात. पाकिस्तानातून त्यांना हद्दपार करण्यात आलेले आहे. त्यांनी खास टाइम्ससाठी हा लेख लिहावा व टाइम्सनेही या लेखाला गिरिलाल जैन यांच्या लेखासोबतच जागा द्यावी, हा केवळ योगायोग मानणे कठीण आहे. It is no longer premature to ask whether the policy of befriending Pakistan has run into trouble.' असे जैन यांच्या लेखावरची टीप सांगते, तर तारीक अलींचे म्हणणे असे की ' The question now is not whether but how long Pakistan can survive...' म्हणजे जैन यांनी सांगायच की, जनरल झिया आता कुरापती काढू लागलेला आहे, भारत-पाक मैत्रीपर्वाचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि तारीक अलींनी पुस्ती जोडायची की, नाही तरी पाकिस्तान आता किती दिवस टिकणार आहे ? जैन-तारीकअली ही जोडी प्रयत्नपूर्वक जमवण्यात आली असण्याचीच शक्यता अधिक आहे आणि वारे कुठल्या दिशेने वाहू लागले आहेत हे त्यावरून पुरेसे स्पष्टही होत आहे. तारीक अलींचे म्हणणे तर असे की, काबुलपर्यंत आलेल्या सोव्हिएट सैन्याने आणखी पुढे मुसंडी मारून, पाकिस्तानला झियांच्या लष्करी मगरमिठीतून सोडवले तर बरेच होईल, असे मानणारा वर्गही पाकिस्तानात संख्येने कमी नाही. सिंध-बलुचिस्थानमधील उठावांचीही त्यांनी भलावणच केलेली आहे. या सगळ्यांचा ।। बलसागर ।। ७१ ________________

परिपाक येत्या २४ महिन्यांत दिसेल, असा तारीक अलींचा अंदाज आहे. दोन ‘वर्षे' न म्हणता २४ ‘महिने' असा शब्दप्रयोगही मुद्दामच केलेला जाणवतो ! वर्षे म्हटल्यावर उगाचच काल लांबल्यासारखा वाटतो आणि तारीक अलींना तर ही पाकिस्तान-विलयाची घटना जेवढ्या लवकर घडून येईल तितकी हवी असावी. यासाठी रशियन फौजांची मदत घेण्यासही त्यांची हरकत दिसत नाही. तारीक अलींचे भाकित खरे ठरते की काय हे पाहायचे. ठरले तर उत्तमच. पण आजवरचा अनुभव निराळा आहे. पाकिस्तानच्या जन्मापासून डावी मंडळी आर्थिकदृष्ट्या हा देश स्वयंपूर्ण होऊ शकत नसल्याने टिकू शकणार नाही, असे म्हणत आलेली आहेत. पण बड्या देशांच्या मदतीने आणि चालू दशकात भुत्तोंच्या अमदानीपासून मध्यपूर्वेशी नाते जोडून, पाकिस्तान टिकूनच राहिलेले आहे. तेव्हा तारीक अलींचा आशावाद कागदावरच राहण्याची शक्यता अधिक. असे जरी असले तरी नवी दिल्लीची हवा बदलू लागलेली आहे, गरम वारे सुरू होण्याची शक्यता आहे, हा टाइम्समधील जोडलेखांचा गभितार्थ नोंद घेण्यासारखा आहे. | हे जोडलेख, विशेषतः तारीक ऊलींचा लेख, पु. भा. भाव्यांनी वाचला असता तर ? ते शक्य नव्हते. कारण १० ऑगस्टच्या आधीपासूनच ते मृत्यूच्या वाटेवर होते. काही वाचण्याच्या, व्यवत करण्याच्या अवस्थेत ते राहिले नव्हते. पण पाकिस्तान मोडले पाहिजे असे सातत्याने, कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता सांगणारा हा एकमेव साहित्यिक, तारीक अलीचे भाकित वाचून सुखाः वला असता. भावे तर पाकिस्तानला पाकिस्तान ही म्हणत नसत. त्यांच्या दृष्टीने ते पापस्तानच होते. हे पाकिस्तान जन्मले आणि भाव्यांमधला साहित्यिक तेव्हापासूनच आपल्याला दिसेनासा झाला. 'मुक्ती सतरावे वर्ष, ' ' फुलवा' यासारख्या कथा नंतर त्यांनी आपल्याला दिल्या नाहीत. नंतरच्या काळात त्यांनी जे लिहिले त्यावर पाकिस्तानच्या अस्तित्वाची दाट छाया उमटत राहिली. फाळणीचा घाव ते कधी ही विसरू शकले नाहीत. ही जखम त्यांच्या लिखाणातून, भाषणातून सतत वाहत होती. मग ते राजस्थानचे प्रवासवर्णन असो, निर्वासित हिंदू स्त्रीवर लिहि ले ली दिवाळी अंकातली एखादी कथा असो किंवा दंगलीनिमित्त लिहिलेला एखादा लेख असो. साहित्यिक हाही शेवटी एक माणूसच असतो. एखादा अनुभव त्याच्या अगदी जिव्हारी झोंबतो. त्याचे भावजीवनच यामुळे उन्मळून जाते. फाळणीच्या अनुभवाने भाव्यांवर असाच आघात केला. उत्कटता कमी झाली नाही; पण त्यांची नवनवोन्मेषशालिनी प्रतिभापद्मिनी मात्र फाळणीच्या आगडोंवात जळून गेली ! त्यांच्यातल्या कथाकामिनीने जणू जोहारच करून टाकला ! ।। वलसागर ।। ७२ ________________

काळ पुढे सरकतच होता. हिंदू स्त्रियांवरील अत्याचाराने बेभान होणारे भावे एखाद्या दलित स्त्रीवर झालेल्या अत्याचाराने बेभान होईनासे झाले. स्वातंत्र्यानंतर समतेचे युग हिदुस्थानात उगवू पाहत आहे याचा त्यांनी कधी वेध घेतलाच नाही. ते प्रामाणिक असल्याने इतर काही साहित्यिकांप्रमाणे या युगाच्या खोट्या प्रसववेदना त्यांनी कधी दाखवल्या नाहीत, हे त्यातल्या त्यात चांगलेच घडले; पण नव्या युगाची चाहूल त्यांनी घेतली असती तर निर्भयपणे फासावर चढणा-या नक्षलवाद्यात त्यांना एखाद्या नव्या 'मुक्ती' कथेचा नायक सहज दिसला असता. चितोडच्या जोहारांनी भारावून जाणा-या भाव्यांना तिनवेलीच्या किंवा वेलछीच्या ज्वाळा दिसल्या असत्या तर ? द्रौपदीची विटंबना करणारे हात जाळून टाकण्यासाठी भाव्यांनी सहदेवाला अग्नी आणायला सांगितले होते. बेलछी घडवणारे हात त्यांना दिसणे अशक्य नव्हते- ते साहित्यिक असले तरी त्यांचे रक्त उसळते होते ! उत्कटता हा तर त्यांच्या साहित्याचा प्रधान गुणधर्मच होता. शब्दसंपदा ही तर त्यांची दासी होती; पण ही सारी उत्कटता, हे सारे भाषाप्रभुत्व पुढे एकदेशी, एककेन्द्री झाले, थबकले; ४७ सालच्या पुढे सरकेनासे झाले. फाळणीने आमच्यातला एक साहित्यिक असा कायमचा घायाळ करून टाकला ! त्याच्या प्रतिभेचे गरुडपंख छाटून कापून टाकले. नाहीतर जे रक्त निर्वासितांच्या किंकाळ्यांनी तापले, जे अश्रु बलात्कारित हिंदू स्त्रीसाठी ओघळले, ते बेलछीसाठी अनावर झाल्याशिवाय राहिले नसते. भावे जटायू होते... सीतेला वाचवता वाचवता स्वत:च ते छिन्नविछिन्न होऊन जमिनीवर कोसळले. पुन्हा हा जटायू वर उठला नाही, उठू शकला नाही; हे खरे असले तरी अशा वेळी घरट्यात बसून राहिलेल्या अनेक पाखरांच्या अनेक कलापूर्ण कूजनांपेक्षा हे कोसळणे अधिक प्रामाणिक व मौलिक होते, यातही काही शंका नाही ! सीतेसाठी छिन्नविछिन्न होऊन मरण पत्करणा-या या एका जटायूला तारीकअलीचा लेख वाचून खरोखरच काय वाटले असते ? | जटायू भाव्यांना वाटले असते की, तारीक अली हा आपल्याकडील डाव्या मंडळींप्रमाणेच पाकिस्तान का निर्माण झाले. पाकिस्तानची ताकद कशात आहे, हे न समजलेला एकाक्ष विरोधक आहे. अंतर्गत बंडाळ्यांनी पाकिस्तान पोखरले जावो, की तेथे महागाई-बेकारी भयंकर वाढलेली असो, धर्माच्या आधारावर हे राष्ट्र अजूनही बराच काळ आपले अस्तित्व टिकवून धरल्याशिवाय राहणार नाही ! आपापसात इस्लामधर्मीयात कितीही मतभेद आणि वैर असो, हिंदुस्थानविरुद्ध नेहमीच सगळा इस्लाम एक होत राहील. आता तर मध्यपूर्वेची प्रचंड ।। बलसागर ॥ ७३ ________________

संपत्ती ‘मुस्लिम ब्रदरहुड'साठी उपलब्ध आहे. मुळातच आक्रमक आणि विजिगीषु असलेल्या इस्लामधर्माला आता एका नव्या जगज्जेतृत्वाच्या आकांक्षेने फुलवलेले आहे; हिरवा चाँद पुन्हा जगावर फडकवण्याची स्वप्ने इस्लामधर्मियांच्या डोळ्यांसमोर तरळू लागलेली आहेत. महंमद पैगंबरांनंतरचा इतिहास थोडा चाळून बघावा; शंभर-सव्वाशे वर्षांतच आफ्रिकेचा किनारा व्यापून, युरोपात स्पेनपर्यंत इस्लामने धडक मारली होती आणि इकडे, पूर्वेच्या बाजूला, महंमद विन कासमच्या अरबी घोड्यांनी सिंध प्रांत आपल्या टापांखाली आणायला सुरुवात केली होती. पुन्हा ते विजयपर्व लिहिण्याची, तसा पराक्रम गाजवण्याची महत्त्वाकांक्षा इस्लामी अंत:करणात जागृत झालेली आहे आणि पश्चिमेचे ज्ञानविज्ञान, तेलाचा अमाप पैसा आणि कधीही विचलित न होणारी धर्मश्रद्धा, यांच्या बळावर ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घेण्याची क्षमताही आता इस्लाम बाळगून आहे. असा एक आक्रमक पवित्रा जगभरच्या इस्लामने घेतलेला असताना पाकिस्तानसारखे भारताच्या उरावर बसवून ठेवलेले राष्ट्र कोलमडू दिले जाईल, इतर इस्लामधर्मी राष्ट्रे किंवा अमेरिकेसारखी महासत्ता ते घडू देतील, यावर तारीक अलीसारखा विश्वास ठेवणे कठीण आहे. पाकिस्तान कोलमडणे चांगलेच आहे; पण तेथे चीन-अमेरिका किंवा एखादा खोमेनी ठाण मांडायला येणार असतील तर त्या कोलमडण्याचा आपल्याला उपयोग काय, हाही प्रश्नच आहे. भारतानेच खैबरपर्यंत आपले प्रभावक्षेत्र विस्तारायला हवे. खैबर हाती नाही तोवर दिल्लीही सुरक्षित नाही, हे जुन्या काळापासून मान्य झालेले ऐतिहासिक भौगोलिक सत्य आहे व आज नाही उद्या या सत्याचा स्वीकार भारतीय राजनीतीला करावा लागणार आहे. उगाच नाही मोगल बादशाह, स्वत: मुसलमान असूनही, मध्यपूर्वेतील टोळधाडींना अफगाणिस्तानच्या सीमेवर अडवून ठेवण्यासाठी सतत तिकडे सैन्य पाठवित राहिले, आणि नंतर आलेल्या ब्रिटिशांनीही, रशियाला खैबरपलीकडे रोखून ठेवण्यासाठी, एक नाही, दोन नाही, तीन अफगाण युद्धे भारतावर लादली होती ! पाकिस्तानद्वारा संपूर्ण भारतीय उपखंडावर सतत दाब ठेवता येतो म्हणून जगातल्या महासत्ता आणि उदयास येत असलेला नवा मुस्लिम साम्राज्यवाद पाकिस्तानच्या रक्षणासाठी सदैव सिद्धच असेल ! एखादे भारत-पाक युद्ध होईल-जसे ते यापूर्वीच्या प्रत्येक दशकात झाले आहे. एखाद्या युद्धात आपल्याला जयही मिळेल-जसा तो बंगलादेश युद्धात मिळाला होता; पण पाकिस्तान नष्ट होण्याची शक्यता या दशकात तरी कमीच ! त्यासाठी भारत स्वावलंबी, समर्थ व एकात्म व्हायला हवा. मुस्लिम अनुनयाचा काँग्रेसी वारसा झिडकारून देणारी सत्ता दिल्लीत असायला हवी. इथल्या मुसलमानांना भारत हीच आपली पितृभू आणि पुण्यभूही वाटायला हवी. हिंदूनाही आपल्यातली सामाजिक विषमतेची दरी बुजवण्यात यश यायला हवे. हे ।। बलसागर ।। ७४ ।। ________________

सगळे झाले नाही तर पाकिस्तान मोड्नही आपल्याला फायदा शून्यच ! उलट बाहेरचे दुखणे घरात घुसण्याचा धोका अधिक. तो टाळायचा असेल आणि खैबरपर्यंतच्या क्षेत्रावर भारताचा प्रभाव प्रस्थापित करायचा असेल, तर प्रथम सामाजिक पातळीवर एकात्मता व अखंडता कशी निर्माण होईल, हे पाहिले पाहिजे. भारतातच आज छोटी-मोठी पाकिस्ताने, पिस्तीस्ताने निर्माण होऊ पाहत आहेत. त्यांचा बीमोड होऊन सारा भारतीय समाज एकसंध आणि अनुशासनशील झाला तर अखंड भारत व्हायला कितीसा वेळ लागणार आहे ? केवळ आणखी एखादे भारत-पाक युद्ध झाल्याने किंवा त्यातील जयपराजयाने हे साध्य होणार नाही. समाजाचे एकात्मीकरण प्रथम झाले पाहिजे. प्रदेशांचे नंतर आपोआप नाही तरी अल्पशा प्रयत्नांनी होऊ शकते. गोवा नाही का भारतात विलीन झाला ? पण तत्पूर्वी तेथील आणि येथील जनतेत तशी जागृती निर्माण करण्याच्या कार्यास अधिक जोमाने वाहून घेणे हीच भाव्यांसारख्या हिंदुत्ववादी साहित्यिकाला खरी श्रदांजली ठरेल ! भाव्यांनी सहदेवाला अग्नी आणण्यास सांगितले होते. उद्याचे नवे हिंदुत्ववादी त्या अग्नीची प्रार्थना करतील. म्हणतील । ' अग्ने नय राये सुपथान अस्मान्' ‘हे अग्ने, आम्हाला प्रगतीच्या, समृद्धीच्या मार्गाने घेऊन जा...' ऑगस्ट १९८० ।। बलसागर ।। ७५ ________________

मोरादाबाद आण मल्लापुरम् जातीय दंगलींना तोंड देण्यासाठी भारत सरकार आता एका खास निधर्मी संयुक्त शांतता दलाची स्थापना करणार आहे. या दलाच्या तीन बटालियन्स उभारण्यास सरकारने संमती दिली आहे व मख्यत्वेकरून या दलात अल्पसंख्यांक जमातीचे, तसेच वर्गीकृत जाती व जमातींचे लोक घेण्यात येतील असहा यासंबंधीच्या वार्तेत म्हटलेले आहे. (पहा-महाराष्ट्र टाइम्स, शनिवार १३ सप्टेंबर १९८० अंक, पृष्ठ १) जुल ३०. केरळातील मुस्लिम बहुसंख्या असलेला मल्लापुरम जिल्हा. इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या युवक शाखेने केरळभर जिल्हाधिका-याच्या कचेयांसमोर योजलेल्या निधनांच्या (Picketing) कार्यक्रमानुसार येथेही कार्यक्रम सुरू आहे. सुमारे सहा हजारांचा मुस्लिम जमाव. कार्यक्रम निरोधनाचा असला तरी जमावापैकी काहींजवळ शस्त्रे होती. निरोधनाचे निदर्शनात रूपांतर झाले व शेवटी पोलीस व जमाव यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन निदर्शक ठार झाले. एक पोलीसही मरण पावला. • According to the Kerala Home Minister, the demonstrators carried weapons, made an unprovoked attack on the police and killed one policeman on the spot...' असे मुकूदन सी. मेनन यांनी, 'इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली' या मुंबईहून निघणा-या, डाव्या साप्ताहिकातल्या ३० ऑगस्टच्या अंकात यासंबंधी जे वार्तापत्र लिहिले आहे त्यात म्हटले आहे. या चकमकीत किमान ४० जण जखमी झाले. त्यात १५ पोलीस आहेत. जमावा बलसागर ।। ७६ ________________

२ । कडुन ३ बसेस व १ जीप जाळण्यात आली. पोलीस चौकी, व्हिजिलन्स ऑफिस व पोलीस लाइन यावर हल्ला झाला. तेथील चीजवस्तू लुटली गेली. कागदपत्रे व इतर सरकारी सामानाची होळी करण्यात आली. | या प्रसंगी हजर असलेल्या केरळातील दोन मुस्लिम लीग आमदारांनी या चकमकीची सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकलेली आहे. । सरकारतर्फे या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार आहे. असा प्रकार केरळात पूर्वी कधीही झाला नाही असे केरळच्या गृहमंत्र्यांनी म्हटलेले आहे, तर केरळचे मुख्यमंत्री नयनार यांनी 'दैनिक चंद्रिका' या इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या स्थानिक वृत्तपत्राच्या त्याच दिवशीच्या, म्हणजे ३० जुलैच्या संपादकीयावर विशेष आक्षेप घेतला आहे. हे संपादकीय म्हणते- 'बद्र योद्धयांची स्मृती जागवणारा आजचा पवित्र दिवस आहे. आज मुस्लिम तरुणांची मने एका नव्या शक्तीने व स्फूर्तीने भारलेली असणे स्वाभाविक आहे. केरळ सरकारचे उर्दू-अरेबिक भाषेवर अन्याय करणारे धोरण हाणून पाडण्यासाठी हे तरुण आज पुढे सरसावत आहेत. लवकरच नयनार सरकारच्या मृत्युघंटेचे आवाज सर्वत्र निनादू लागतील ....' | गेली दहा वर्षे उद्-अरेबिक भाषेसंबंधी जे धोरण केरळात मुस्लिम लीगच्या संमतीनेच अवलंबिले गेलेले आहे त्यात नयनार सरकारने काहीही वदल केलेला नाही, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. फक्त उर्दू-अरेविक शिक्षकांच्या पात्रतेसंबंधीचे काही नियम व अटी अंमलात आणण्याचा निर्णय मात्र घेण्यात आला होता. यामुळे बरेच जुने उर्दू-अरेबिक शिक्षक अपात्र ठरून काही शाळा-वर्ग वगैरे बंद पडण्याचा धोका जाणवल्यामुळे मुस्लिमांचा याला विरोध होता. हा विरोध वाढल्यामुळे व ३० जुलैला वर दिलेल्या मल्लापुरम चकमकीमुळे केरळच्या नयनार सरकारने सध्या तरी माघार घेऊन. पूर्वीचेच धोरण चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. नयनार सरकार हे माक्र्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बहुमत असलेले संयुक्त सरकार आहे. | मोरादाबाद, अलिगढ किंवा उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच घडलेल्या मुस्लिम-पोलीस दंगलीवर मतप्रदर्शन करताना डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्रांनी व स्तंभलेखकांनी पोलिसांवर टीका केलेली आहे. अडीच वर्षांच्या जनता राजवटीत संघ-जनसंघाची बरीच माणसे पोलीसदलात घुसल्यामुळे किंवा घुसवण्यात आल्यामुळे संपूर्ण उत्तर भारतातील पोलीस दलांवरचाच मुस्लिमांचा विश्वास आता उडालेला आहे, असेही बरेच काही सांगितले गेले- लिहिले गेले. केरळात । बलसागर ।। ७७ ________________

तर संघाची किंवा जनता पक्षाची राजवट कधीच नव्हती. त्यामुळे तेथील पोलीसदल पूर्ण निधर्मी असण्यास काहीच हरकत नाही. शिवाय डाव्या कम्युनिस्टांचे व मुस्लिम लीगचे केरळातील परस्पर नातेसंबंध विख्यात आहेत. मोपल्यांच्या बंडाला स्वातंत्र्याचा उठाव समजून, त्यात भाग घेतलेल्यांना मानपत्रे वगैरे देण्यातही नंबुद्रि पादांना कधीच संकोच वाटलेला नव्हता ! केरळातली मुस्लिम लीग वेगळी आहे, असे प्रशस्तीपत्र इंदिरा गांधींनीही दिलेले आहेच. असे सगळे केरळातील वातावरण निधार्मिक व पुरोगामी असतानाही येथल्या पोलीसदलावर मुस्लिमांनी हल्ला का करावा ? मोरादाबादमध्ये डुकरामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, त्यामुळे मुस्लिम जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला. मल्लापुरममध्ये तर डुक्कर कुठे भावना दुखवायला आलेले नव्हते ! ज्यांच्या गळ्यात गळा घालून मुस्लिमांनी केरळात सत्तेचा खेळ केला त्या माक्र्सवादी नयनार सरकारचे पोलीसदल तर मुस्लिमविरोधी असण्याची शक्यता नव्हती ! बरं, प्रश्नही तसा मामुली. जुनाट धर्मशिक्षण देणाच्या काही शाळा किंवा वर्ग फार तर बंद पडले असते, जुन्या पद्धतीने शिकवणाया काही उर्दू-अरेबिक शिक्षकांवर काही काळ घरी बसण्याची पाळी आली असती. थंड डोक्याने विचार करून यावर तोडगा शोधून काढणे अशवय नव्हते; पण त्यासाठी एकदम पोलिसांवर हल्ला काय, सरकारी सामानाची लुटालूट, जाळपोळ काय, ३-४ जणांचा मृत्यू काय, नयनार सरकारची मृत्यूघंटा वाजवणे काय-सगळाच माथेफिरूपणा ! मोरादाबाद असो, मल्लापुरम असो, राजवट जनताची असो, कम्युनिस्टांची असो, काँग्रेसवाल्यांची असो. माथेफिरूपणात बदल नाही. भारतसरकारचे संकल्पित निधर्मी शांतता दल म्हणजे या माथेफिरूपणाला दिलेली एक मान्यताच आहे. आपल्या देशभरच्या सर्व पोलीसदलांवर, राखीव दलांवर, सैन्यदलांवर आपलाच विश्वास नाही, याची ही एक लाजिरवाणी कबुलीच आहे. दंगलींचा बंदोबस्त करताना या दलांपैकी जे कुणी पक्षपात किंवा धार्मिक भेदभाव करताना आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली, त्यांना धाक वाटेल अशा शिक्षा दिल्या गेल्या तर कुणीही हे आक्षेपार्ह मानणार नाही. अशी कडक उपाययोजना व्हायलाही हवी. सेक्युलॅरिझमचा आपल्या संदर्भात हा आणि एवढाच अर्थ आहे. वेगवेगळेपणाची भावना जोपासणे म्हणजे सेक्युलॅरिझम नव्हे. हा ब्रिटिश वारसा आहे व तो काँग्रेस सरकारने जसाच्या तसा उचलला आहे. ब्रिटिशांनी लावलेली, काँग्रेसने वाढवलेली ही अलगपणाची विषवल्ली आता इतर पक्षातही फोफावू पाहत आहे. सात-आठ कोटी मुस्लिमांचा, पाच-सहा ।। बलसागर ।। ७८ ________________

कोटी इतर अल्पसंख्याकांचा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा म्हटले तर हिंदुस्थानच काय आशिया खंडही अपुरा पडेल ! आज या सर्वांच्या हितरक्षणासाठी स्वतंत्र पोलीस दल मागितले गेले, दिलेही गेले. उद्या स्वतंत्र सैन्यदलाची मागणी होईल, परवा स्वतंत्र राजधानी आणि पंतप्रधानही का नको ? जोवर ' इंडिया दैट इज भारत' ही काँग्रेसी दृष्टी आहे तोवर ही अलगपणाची भावना वाढतच जाणार आहे. निदान “ भारत देंट इज इंडिया' एवढे तर म्हणायला लागा ! सप्टेंबर १९८० ।। बलसागर ।। ७९ ________________

मीनाक्षी पुरस् । १९५६ मध्ये नागपूरला डॉ. आंबेडकरांनी तीन लाख अनुयायासह बौद्धधर्म प्रवेश केला तेव्हा देशात फारशी खळबळ माजली नाही. ' प्रमुख नेते आणि विचारवंत यांनी आंबेडकरांच्या बौद्धधर्मस्वीकाराकडे दुर्लक्ष केले' असे धनंजय कीर यांनी आपल्या आंबेडकर चरित्रात या घटनेवर लिहिताना म्हटले आहे, ते खरेच आहे. (पृ. ५२३) याउलट जेमतेम हजार दोन हजार हरिजनांनी मीनाक्षीपुरम येथे व आसपास धमतर केल्यावर देशात' आज केवढी खळबळ माजली ? पंतप्रधान इंदिरा गांधींपासून शंकराचार्यांपर्यंत आणि डाव्या कम्युनिस्टांचे बौद्धिकप्रमुख वी, टी, रणदिवे यांच्यापासून रा. स्व. संघ - विश्व हिंदू परिषद या संघटनांपर्यंत सर्वांनी या हरिजनांच्या इस्लामधर्म प्रवेशाची तातडीने व गंभीरतेने दखल घेतली व त्यातून निरनिराळी विश्लेषणे व उपाययोजना पुढे आल्या. । (१) अरबांचा पैसा (२) उच्चवर्णीयांकडून हरिजनांना मिळणारी हीन वागणूक म्हणजेच सामाजिक विषमता (३) जमीन फेरवाटप कार्यक्रमाचे अपयश वे हरिजनांचा एकूण आर्थिक मागासलेपणा (४) हरिजनांचा, दलितांचा अधिक आक्रमक वनण्याचा प्रयत्न - अशी सर्वसाधारण चार कारणे या मीनाक्षीपुरम् धर्मातरामागे असल्याचे प्रतिपादन केले जात आहे. राजकीय सत्तास्पर्धेत हरिजनांचा बळी दिला जातो हेही एक पाचवे कारण येथे नोंदता येईल. । ही कारण मालिका आणखीही वाढवता येईल; परंतु एक गोष्ट या मीनाक्षी पूरम् घटनेमुळे अगदी स्पष्ट झाली. सगळे धर्म समान असले, सर्वधर्मसमभाव । बलसागर ।। ८० ________________

वगैरे जरी आपण बोलत किंवा मानत असलो तरी बौद्ध व इस्लाम या दोन धर्मात आपल्यापैकी बहुतेकजण मनोमन फरक करतात. तीन लाख हरिजन एकाच दिवशी, आपल्या नेत्यासह, बौद्धधर्मात गेले म्हणून आपण फारसे अस्वस्थ झालो नाही; पण हजार-दोन हजार हरिजन इस्लाममध्ये गेल्यावर मात्र सगळयांचे डोळे खाडकन उघडतात - ही तफावत, ही विसंगती कुठल्याही सर्व धर्मसमभावात न बसणारी आहे. जरी प्रमुख नेते आणि विचारवंत यांनी आंबेडकरांच्या बौद्धधर्म स्वीकाराकडे त्यावेळी दुर्लक्ष केले तरी सावरकर हे एक सन्माननीय अपवाद होते. सावरकरांनी आंबेडकरांच्या धर्मातराला ‘पथांतर' म्हटले व ‘बौद्ध आंबेडकर हे हिंदू आंबेडकरच आहेत,' असे निश्चयात्मक मत त्याच वेळी लेखाद्वारे व्यक्त केले. बौद्धधर्म हा व्यापक हिंदुत्वाच्या, हिंदू धर्माच्या व्याख्येत बसणारा एक पंथ आहे अशीच आपली सर्वसाधारण समजूत आहे. लोकमान्य टिळक, राधाकृष्णन इत्यादी अनेक हिंदू पंडितांची मते तर सोडाच; खुद्द डॉ. आंबेडकरांच्या धर्मातर प्रसंगी नागपूरला उपस्थित असणा-या बौद्धपंडितांनीही अशाच अर्थाचे मतप्रकटन केले आहे. * महास्थविर चंद्रमणी आणि इतर भिक्ष यांनी (आंबेडकरांच्या) धर्मांतराच्या दीक्षासमारंभाच्या वेळी जे पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात हिंदूधर्म आणि बौद्धधर्म ह्या एकाच वृक्षाच्या फांद्या आहेत असे म्हटले होते,' ही धनंजय कीरांनी आपल्या आंबेडकर चरित्रात केलेली नोंद (पृ. ५२३) काय सुचविते ? आंबेडकर व त्यांचे अनुयायी थोडे दूर गेले तरी आपल्याला कायमचे पारखे-परकीय झाले नाहीत, असेच त्यावेळी सर्वसाधारण हिंदू मत होते व पंडितांचा निर्वाळाही यापेक्षा वेगळा नव्हता. । | धर्म जर खरोखर बदलला असता तर हरिजनांना मिळणाच्या सवलती ताकिकदृष्ट्या रद्द व्हायला हव्या होत्या. कारण या सवलती हिंदुधर्मीय पूर्वास्पृश्यांसाठी होत्या; पण तसे घडले नाही. काँग्रेस व जनता सरकारनेही या सवलती वेळोवेळी मुदत वाढवून चालूच ठेवल्या व हे योग्यच झाले. सामाजिक विषमता हे सर्व हिंदूधर्मीयांचे सामुदायिक पाप आहे व त्यांनीच ते फेडले पाहिजे, अशी यामागील सर्वसाधारण भावना होती व अजूनही काही काळ अशा सवलती चालू राहिल्या तर हिंदुधर्मीयांनी कसलीही खळखळ करणे बरोबर नाही, सवलतीतले गैरप्रकार मात्र कमी व्हायला पाहिजेत, यापेक्षा अधिक चांगल्या मार्गाचा शोधही चालू राहायला हवा. मुद्दा हा की, हरिजनांचे बौद्ध होणे आपण धर्मातर मानले नाही, पथांतर मानले. पक्ष कोणताही असो. - पं. नेहरूंचा दृष्टिकोन काय होता ? धनंजय कीरांनी आपल्या आंबेडकर आहे. हे अवतरण नॉर्मन चरित्रात नेहरूंचे एक अवतरणच दिले ।। बलसागर ।। ८१ ________________

कझिन्सच्या “ Talks With Nehru' या पुस्तकातले आहे. नेहरू म्हणतातः * हिंदुधर्माच्या उदरात एक तेजस्वी विश्ववाद आहे. निरनिराळ्या आणि परस्परविरोधी विचारांचा समावेश करण्याएवढा हिंदुधर्म विशाल आहे... यापूर्वी हिंदुधर्माने मोठी स्थित्यंतरे पचविली आहेत. बौद्धधर्म जन्मास आल्यावर हिंदुधर्माने त्याच्याशी स्पर्धा केली नाही, त्याला शोषून घेतले." असा इतिहास असल्याने आपण आंबेडकरांच्या बौद्ध होण्यामुळे हादरून गेलो नाही. धक्का बसला ; पण तो सहन होईल इतपतच होता. मीनाक्षीपुरम्चा धक्का मात्र मोठा का वाटतो ? हरिजन बौद्ध होण्याऐवजी मुस्लिम झाल्याबरोबर किंवा त्यांनी ख्यिस्ती धर्माचा अंगिकार केल्याबरोबर चित्र एकदम का पालटते ? | कारण बौद्ध झाला तरी हरिजन समाज भारतीय परंपरेपासून तुटून अलग पडत नाही. मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाल्यावर मात्र तो भिन्न परंपरेचा अभिमानी होतो व त्याचे राष्ट्रियत्वच बदलते. याचा अर्थ स्वतःला प्रथम भारतीय मानणारे न्या. छगला, रफी अहमद किडवाई किंवा बॅ. अंतुले मुस्लिम समाजात निर्माण होत नाहीत असा नाही. बॅ. अंतुले निखालसपणे शिवाजीला आपला पूर्वज मानतात व मी नाक्षीपुरम्सारखे धर्मातर देशाला हानीकारक, धोकादायक आहे असे स्वच्छपणे सांगतात, तेव्हा त्यांच्या मुस्लिम असण्या-नसण्याचा काही प्रश्नच उत्पन्न होत नाही; पण असे अपवाद मुस्लिम समाजात फारच थोडे आढळतात. बहुसंख्य मुसलमान क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाल्यावर फटाके वाजवणारेच असतात. पूर्वीपासून ही वस्तुस्थिती हिंदुत्ववादी सांगत आलेले आहेत व अलीकडे, हमीद दलवाई प्रभृतींनी ती सांगायला सुरुवात केल्यानंतर समाजवादी-काँग्रेसवादी जनांना ती मान्य करण्यावाचून गत्यंतरच उरले नाही. राष्ट्र सेवा दल पत्रिकेच्या १९६७ च्या दिवाळी अंकात हमीद दलवाई यांचा ‘भारतीय मुसलमानांचे अंतरंग' या नावाचा एक लेख आहे. या लेखात व त्यानंतर अनेक व्याख्यानांतून हमीद दलवाईनी मुसलमानांच्या पाकिस्तानधाजणे पणाची स्पष्ट जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. वरील लेखात त्यांनी म्हटले आहे.-'अलीगड विश्ववि द्यालयाच्या एका प्राध्यापकाने माझ्याशी बोलताना, क्युबेक मधील वाढलेल्या फ्रेंच लोकसंख्येचे उदाहरण देऊन, भारतातील ‘मुसलमानांनाही व्यवेकमधील फ्रेंचांप्रमाणे आपल्याला भारतात आणखी एक स्वतंत्र भूमी निर्माण करता येईल !' हे काढलेले उद्गार मुस्लिम मनोवृत्तीचे यथार्थ दर्शन घडवतात. इंग्रजी (क्यबेकमधील फ्रेंच कॅथॉलिक आहेत.) कैनेडियन प्रॉटेस्टंट असल्यामळे ते कुटुंबनियोजन करतात .कॅथॉलिकांनी कुटुंनियोजन न केल्यामुळे गेल्या ७५ वर्षात त्यांनी आपली । बलसागर ।। ८२ ________________

लोकसंख्या वाढविली असे या प्राध्यापक महाशयांना सांगायचे होते.)' दहापैकी नऊ मुसलमानांच्या मनात अशा प्रकारची आणखी पाकिस्ताने निर्माण करण्याची भावना असते, असेही या लेखात हमीद दलवाईंनी म्हटलेले आहे. ही वस्तुस्थिती असल्याने मीनाक्षीपुरम्चे धर्मातर हे राष्ट्रांतर ठरते व पुण्यात, स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास लाजणान्या समाजवाद्यांनाही, या घटनेवर चर्चा घडवण्यासाठी, एखादा परिसंवाद आयोजित करावासा वाटतो. हे जर पन्नास वर्षांपूर्वी,समाजवादी-काँग्रेसवादी जनांना जाणवले असते तर पाकिस्तान झालेच नसते; पाकिस्तान होऊनही मुस्लिमांच्या राष्ट्रीयत्वाचा प्रश्न सुटलेला नाहीच. तो होता तिथेच आहे. फक्त हिंदू समाजात अधिक जागृती झालेली आहे व सावरकर- गोळवलकर पूर्वीइतके आज अस्पृश्य राहिलेले नाहीत. शब्द हिंदू' ठेवा किंवा 'भारतीय' असू द्या. उद्या भारतीयत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘समान भारतीय परंपरेचा वारसदार तो भारतीय' असेच ठरवावे लागेल. शेवटी राष्ट्रीयत्व म्हणजे तरी काय ? एकत्वाची अखंड जाणीव. अशी जाणीव समान परंपरेच्या मान्यतेवाचून सहसा निर्माण होत नाही. ज्यावेळी व्यास -वाल्मिकी, रामकृष्ण-शिवाजी यांना येथील मुसलमान आपलेसे मानतील, हा ऐतिहासिक वारसा स्वीकारायला तयार होतील, जीनांपेक्षा नेहरू त्यांना जवळचे वाटतील, तेव्हा मीनाक्षीपुरमूसारखी एखादी घटना इतकी खळबळ माजवू शकणार नाही. तेही एक पथांतर ठरेल, जसे आंबेडकरांचे बाद्ध होणे ठरले, ठरत आहे तसे. फक्त तो दिवस अद्याप खूप लांब आहे। हेही विसरून चालणार नाही. | इस्लामधर्मातही भरपूर विषमता आहे. समतेच्या अपेक्षेने जे हरिजनदलित या धर्मात जातील त्यांचा भ्रमनिरासच होण्याची शक्यता अधिक आहे. मीनाक्षीपुरमला धर्मातरित झालेल्या स्त्रियांना लगेच बुरखे पुरविण्यात झाले. नमाज पढण्याच्या वेळी सगळे समान असतील, पण व्यवहारात उच्चनाचभाव, विषमता इस्लाम धर्मातही यथेच्छ पाळली जाते. आर्थिक व सामान जक समता हे नवेच मूल्य आहे व समाजवादी तत्वज्ञानामुळे ते विसाव्या जकात मान्यता पावत आहे. सगळ्याच जुन्या धर्मात कमीजास्त प्रमाणात, नरनिराळ्या स्वरूपात विषमता असणार हे गृहीत धरायला हवे. केवळ हिंदूधर्माला वाळ काढून झोडपण्याचे आपल्याकडच्या डाव्यांचे प्रयत्न अज्ञानमूलक आहेत. मीळनाडूत गेली पन्नास-पाऊणशे वर्षे रामस्वामी नायकर व त्यांची द्रविड नत्र चळवळ हिंदू धर्मावरच फक्त आघात करीत राहिली. मुसलमानअख्रश्चनांनी केली नसेल एवढी हिंदूधर्मीय देवदेवतांची विटंबना या नायकर iळवळीने खुद्द मद्रास शहरात केली. डी. एम्. के. उदयानंतर तर सर्व ।। बलसागर ।। ८३ ________________

सत्तास्थानावरून तथाकथित उच्चवर्णीय हिंदू पार हुसकले-हाकलले गेलेले आहेत. याच तामीळनाडूत-एका हिंदू निर्मूलक द्रविड राज्यात हरिजनांचे हाल चालु राहावेत, त्यांना इस्लामधर्म स्वीकारावासा वाटावा, हा केवळ हिंदूविरोधी चळवळीचा वास्तविक केवढा पराभव आहे ! तेव्हा हिंदुत्वाला झोडपून प्रश्न सुटणार नाही. सगळ्यांनीच विषमतेचे आविष्कार पुसून टाकण्यासाठी प्रामाणिक धडपड केली पाहिजे. या धडपडीवर समजा हरिजनांचा, दलितांचा विश्वासच बसत नसेल तर बळजबरीने, आर्थिक लालूच दाखवून वगैरे त्यांना हिंदुधर्मात ठेवण्याचा अत्याग्रह मात्र अजिबात दाखवू नये. दलितांनी इस्लामधर्म स्वीकारल्यावर ते अधिक आक्रमक होतील याचीही भीती वाळगण्याचे काही कारण नाही. एक काळ असा होता की, निम्मा-पाऊण हिंदुस्थान मुसलमानांच्या ताब्यात होता. तोही हिंदूंनी मुक्त केलाच. मुस्लिम प्रश्नावर शिवाजी हाच तोडगा आहे. गांधीजी नव्हेत. शिवाय आता तर परधर्मात गेलेल्या अनेकांना हिंदुधर्मात परत घेणारी शुद्धी चळवळही अस्तित्वात आहे. पन्नास वर्षांपूर्वी लाखोंनी हरिजन इस्लाम धर्मात गेले. या सगळ्यांना परत हिंदुधर्मात आणणारा श्रद्धानंद उद्या पुन्हा निर्माण होणार नाही कशावरून ? म्हणून कायद्याने धमतराला बंदी घालण्याची सध्यातरी आवश्यकता नाही. प्रचलित कायद्यांची अंमलबजावणी नीट झाली तरी सक्तीने, धाकधपटशाने होणारे धर्मांतर थांबवता येईल. पैशाच्या लोभाने किंवा इतर काही फायदे मिळतात म्हणून जे मुस्लिम धर्मात जाऊ इच्छितात त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही एकदा मान्य केल्यावर कोण कसे अडवू शकणार ? पैशाच्या, जहागिरीच्या लोभाने राज्येही आपण पूर्वी घालवली आहेत. मोंगल सम्राटांना आपल्या मुली देणारे दलित थोडेच होते ? तेव्हा कायद्याने धमतर थांबविणे शक्य व योग्यही ठरणार नाही . शुद्धीकरणाची चळवळ चालू राहिली तर मुसलमानातील निदान जाणकारांना तरी हा सगळाच खटाटोप निरर्थक वाटू लागण्याचीही शक्यता आहे. सध्याच, औरंगाबादेतील काही सूज्ञ मुस्लिम व्यक्तींनी, आथिक-राजकीय लाभांसाठी मुस्लिम धर्मात येणारे, उद्या अधिक लाभ मिळाले तर परत हिंदू किंवा इतर धर्मात कशावरून जाणार नाहीत, अशी रास्त शंका उपस्थित करून, या पद्धतीच्या धर्मातराविषयी प्रतिकूल मत नोंदवले आहे. नव्याने जे हरिजन–दलित मुस्लिम होत आहेत, त्यांच्यापैकी बरेचजण सुंता करून घ्यायला तयार नसतात. अशा सुंता न करता आलेल्यांना, कर्मठ, जुने मुसलमान बरोबरीच्या नात्याने कसे वागवतील ? मदुराईजवळच्या मेलाकोट्टाई येथे जुन्यांना, नव्या धर्मांतरितांनी आपल्याबरोबर मशिदीमध्ये नमाज पढणेही पसंत नव्हते. चक्क बाचाबाची झाली व जुन्यांना ब नव्यांना नमाजाच्या वेगवेगळ्या वेळा ठरवून द्याव्या लागल्या. तेव्हा इस्लामची दारेही हरिजन - दलितांसाठी सताड उघडी आहेत व आत । बलसागर ।। ८४ ________________

गेल्यावरसुद्धा, समतेचे नंदनवन अगदी वाट पहात आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमधर्मातही अनेक सुज्ञ व्यक्ती अशा असतील की, ज्यांना अशा त-हेने होणारे धर्मातर पसंत नसेल . अशांची मदत घेऊन ही मीनाक्षीपुरम्ची लाट थोपवता आली तर नेहमीचा हिंदू-मुस्लिम कटतेचा प्रश्नही उद्भवणार नाही. हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती या सर्व धर्मातील सूज्ञ व विवेकी मंडळींनी, राष्ट्रवादी दृष्टिकोनातून संयुक्तपणे असा प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्करच ठरणार आहे ! हिंदुधर्म हा विश्वधर्म आहे असे हिंदुधर्माचे थोर प्रवक्ते नेहमी सांगत असतात आणि ते बरोवरही आहे. हिंदुधर्म हा समुद्रासारखा आहे व इतर धर्म हे नद्यांसारखे आहेत असे विनोबांनी म्हटले आहे. हिंदुत्वातला हा वैश्विक गाभा विचारातून, आचारातून प्रकट होत राहील हे पाहण्याची जबाबदारीही ओघाने हिंदुत्वाभिमान्यांकडे येते. तात्कालिक आक्रमणे परतवून लावत असताना या मूळ गाभ्याला धक्का लाग देता उपयोगी नाही. मुस्लिम मनोवृत्तीचे हिंदू तयार होणे हा काही हिंदुत्ववादाचा अंतिम विजय नव्हे. सगळ्या पंथोपपंथांना सामावून घेण्याइतका हा हिंदुत्वाचा समुद्र विशाल व व्यापक असायला हवा. एका उदार जीवनदृष्टीचा परिपोष या धर्मामुळे होत रहावा. केवळ सहिष्णुता, केवळ सर्वधर्मसमभाव, एवढेच पुरेसे नाही. सर्वधर्मसत्यभाव हे हिंदुधर्माचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग असू शकतात. प्रत्येक मार्गात सत्याचा थोडा-अधिक अंश असू शकतो. अंतिम सत्य एकच असले तरी त्याचा साक्षात्कार विविध पद्धतीने होऊ शकतो, हे ज्ञानाचे उच्च शिखर आजवर फक्त हिंदुधर्म - तत्वज्ञानांनीच गाठले आहे. एक पुस्तक - एक प्रेषित - एक मार्ग याचा अट्टाहास हिंदुधर्माला मंजूरच नाही. ही वैश्विक व सर्मसमावेशक दष्टी तात्कालिक चळवळींच्या गदारोळात लुप्त झाली तर जतन करण्यासारखे हिंदुधर्मात काही उरणार नाही. हिंदू शरीरे फक्त विस्तारून काय उपयोग ! शरीरे हवीत ती आत्मा प्रकट व्हावा म्हणून. धर्मातराच्या प्रश्नाकडेही तात्त्विकदृष्ट्या हिंदू माणूस कसा पाहात असतो ? श्री. गोळवलकरगुरुजींनी आपल्या विचारधन' पुस्तकात शंकराचार्याचेच उदाहरण आदर्श म्हणून दिले आहे. गोळवलकरगुरुजी म्हणतात : “ आमच्या धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या शिकवणुकीनुसार हिंदू व मुसलमान दोघे सारखेच आहेत. अतिम ईश्वरी सत्याचा साक्षात्कार हिंदूलाच होऊ शकतो असे नाही. आपापल्या मतानुसार परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग अनुसरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी शृंगेरी मठाचे माजी शंकराचार्य श्रीमद् चंद्रशेखर भारतीस्वामी यांचे एक उदाहरण सांगतो. एकदा एक अमेरिकन मनुष्य त्यांच्याकडे आला व ' मला हिंदू करून घ्या ! ' अशी त्याने विनंती केली. शंकराचार्यांनी ।। बलसागर ।। ८५ ________________

त्याला विचारले, 'तुम्हाला हिंदू व्हावे असे का वाटते ? ' तो म्हणाला, ‘खिस्ती धर्माने माझे समाधान झाले नाही, माझी अध्यात्मिक भूक शमली नाही.' यावर शंकराचार्य म्हणाले, ' आपण ख्रिस्ती धर्माचे खरोखरच प्रामाणिकपणे पालन केले आहे काय ? प्रथम तसा प्रयत्न करून पहा. इतके करूनही तुमचे समाधान झाले नाही, तर मग माझ्याकडे अवश्य या ! ' आमचा दृष्टिकोन हा असा आहे. इतरांना आपल्या धर्मात ओढण्याचा प्रकार हिंदुधर्माला मान्य नाही. धर्मातर हे प्राय: राजकीय वा तत्सम अन्य लाभाच्या हेतूने करण्यात येते. आम्ही ते निषिद्ध मानतो. आम्ही म्हणतो, सत्य हे असे आहे. पटत असेल तर त्या मार्गाने चला ! ( विचारधन, दुसरी आवृत्ती, पृष्ठ ४४१ ) ही अशी हिंदुधर्माच्या गाभ्याची धारणा असल्याने एखाद्या संप्रदायात तो बद्ध करून त्याला संकुचित करणे किंवा केवळ तात्कालिक, किंवा- प्रतिक्रियात्मक पातळीवर त्याचा विचार करणे उचित नाही. पूर्वीसारखी उदासीनता, न्यूनगंडही नको. खोटा, पोकळ अहंभाव आणि दुराभिमानही नको. समुद्राने महासमुद्र व्हावे नद्या पुष्कळ आहेत . ! सप्टेंबर १९८१ । बलसागर ।। ८६ । ________________

- - हिदुत्व । भारतीयत्व हिंदत्व । भारतीयत्व | | १८६७ मध्ये, म्हणजे सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये ‘हिंदू मेळा' नावाची संस्था स्थापन झाली. या मेळ्याच्या चौथ्या अधिवेशनानंतर म्हणजे १८७१ मध्ये नॅशनल सोसायटी' नावाची संस्था स्थापन करण्यात आली. हिंदू समाजात ऐक्य नि राष्ट्रीय वृत्ती यांचा परिपोष व्हावा हे या संस्थेचे ध्येय होते. तिच्यातर्फे दर महिन्यास एक व्याख्यान आयोजित केले जात असे. या व्याख्यानाच्या सत्रात एकदा राजनारायण बोस यांचे व्याख्यान झाले. त्यात हिंदू धर्माच्या श्रेष्ठतेवर त्यांनी भर दिला होता. या व्याख्यानानंतर एक वाद सुरू झाला आणि ख्रिश्चन लोक आणि ब्राह्मोसमाजी लोक यांनी सभा घेऊन श्री. बोस यांच्या मताला विरोध केला. मेळाव्याचा आवाका हिंदू समाजापुरता मर्यादित असल्याने 'राष्ट्रीय' शब्दाच्या वापराला या लोकांकडून आक्षेप घेण्यात आला. तेव्हा हिंदू मेळ्याचे मुखपत्र 'नॅशनल पेपर' याने त्या आक्षेपाला पुढील उत्तर दिले-- । 'आमच्या पत्रलेखकाने हिंदूविरुद्ध का आक्षेप घ्यावा हे आम्हाला समजत नाही. कारण हिंदू हे स्वतः राष्ट्र आहेत. तेव्हा या राष्ट्रीय समाजाने स्थापन केलेल्या संस्थेला राष्ट्रीय म्हणणे योग्यच आहे.' | हिंदुत्व विचाराचे सुप्रसिद्ध अभ्यासक श्री. ज. द. जोगळेकर यांनी नोंदवलेल्या वरील माहितीवरून असे दिसते की, हिंदुराष्ट्रवाद हा जुनाच आहे आणि त्यावरील आक्षेपही जुनेच आहेत. आक्षेप घेणा-या मंडळींचे गट व काळ बदलला असला तरी आक्षेपकांची प्रवृत्तीही तीच आहे. वरील वाद झाला तेव्हा सावर । बलसागर ।। ८७ ________________

करांचा, संघाचा किंवा हेडगेवारांचा जन्मही झालेला नव्हता ! पाकिस्तानची कल्पनाही तेव्हा अस्तित्वात नव्हती. अलीगड विद्यापीठ नव्हते. उलट या देशात जो पिढ्यानुपिढ्या राहतो, इथल्या संस्कृतीचा जो स्वत:ला घटक मानतो तो सारा समाज म्हणजे हिंदू समाज, अशीच इथली सर्वसाधारण लोकभावना होती. शेवटचा मोगल बादशहा बहादुरशहा जफर जेव्हा इंग्रजांना उद्देशून आपला सुप्रसिद्ध शेर लिहितो. तेव्हा तो तेग हिंदोस्ताँनकी' अशीच शब्दरचना करतो, हिदीस्तान म्हणत नाही. शिवाजीचे * हिंदवी स्वराज्य' आणि बहादुरशहा जफरचे * हिंदोस्ताँ ' या दोन्हीतून व्यक्त होणारी भावना एकच होती. ती म्हणजे या भूमीविषयी, इथल्या परंपरेविषयी, संस्कृतीविषयी ममत्वाची भावना ! 'हिंदू' हा शब्द काँग्रेसच्या जन्मापूर्वी या व्यापक व सर्वसमावेशक अर्थानेच वापरला जात होता, हे जोगळेकरांसारख्या हिंदुत्वाभ्यासकांनी आता पुरेसे सिद्ध केलेले आहे. अलीगडचे संस्थापक सय्यद अहमद खान यांचे एक उदाहरण तर फारच बोलके आहे. 'हिस्टरी ऑफ दि फ्रीडम मुव्हमेंट इन इंडिया' या आपल्या ग्रंथमालेच्या दुस-या खंडात (पृ. ३५८) हे उदाहरण डॉ. ताराचंद यांनीच नोंदवलेले आहे. डॉ. ताराचंद लिहितात, : * सय्यद अहमद खान यांनी आपल्याला हिंदू का समजण्यात येऊ नये याबद्दल पंजाबमधल्या एका हिंदूंच्या सभेत तक्रार केली. ते म्हणाले की, तुम्ही स्वत:पुरता हिंदू शब्दाचा उपयोग केला आहे हे बरोबर नाही. कारण माझ्या मते (म्हणजे सय्यद अहमद खान यांच्या मते) हिंदू शब्दाने विशिष्ट असा संप्रदाय दर्शविला जात नाही. उलट हिंदुस्थानात राहणा-या प्रत्येकाला स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. मला वाईट वाटते की, मी हिंदुस्थानात राहत असूनही तुम्ही मला हिंदू समजत नाही. हिंदू म्हणजे एतद्देशीय परंपरेविषयी ममत्व असणारा माणूस. इथल्या संस्कृतीचा आपल्याला घटक समजणारा समाज, तो हिंदू समाज. अशी जर ममत्वाची, घटकत्वाची भावना नसेल तर समाजाचे राष्ट्रात रूपांतर होणे कठीण असते. जगात बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादाची निर्मिती अशी परंपरेतील एकत्वाच्या, ममत्वाच्या सातत्याच्या घटकांवर आधारित असलेली आपल्याला दिसते. । विस्कळित हिंदू समाजाचे एकात्म हिंदुराष्ट्रात रूपांतर होणे परकीय सत्ताधा-यांना अर्थातच धोकादायक वाटू लागले. म्हणून एकात्मतेचे खच्चीकरण सुरू झाले. मुसलमानांना हिंदूपासून प्रथम अलग पाडले गेले. जे सय्यद अहमद खान * मला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार आहे' असे म्हणत होते, तेच अलिगढ विद्यापीठाच्या स्थापनेकडे वळले, वेगळेपणा जोपासू लागले. दुसरा प्रवाह होता तो समाजसुधारकांचा. हिंदु समाजातील काही दुष्ट चालीरीतींविरुद्ध या सुधारकांनी एकीकडे चळवळी जरूर केल्या; पण या चळवळी करताना दुष्ट । बलसागर ।। ८८ ________________

चालीरीती म्हणजेच हिंदू समाज, असे समीकरण मनात धरून हिंदू या शब्दाचा, हिंदुत्वाचा द्वेषही त्यांनी फैलावला. काँग्रेस सुरुवातीला या प्रवृत्तीच्या लोकांच्या ताब्यात होती. त्यामुळे राष्ट्रवाद म्हणजे हिंदुद्वेष, हे समीकरण घट्ट होत गेले. मुसलमानांनी तर हा शब्द टाकलाच; पण मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात, काँग्रेसच्या चळवळीत सामील व्हावे म्हणून काँग्रेसनेही हा शब्द टाकण्याची तयारी दाखवली. टिळक-काळात निदान हिंदू आणि हिंदी हे दोन्ही शब्द वापरात तरी होते. हिदी ऐक्यासाठी हिंदुत्वावर पाणी सोडायची टिळकांची भूमिका नव्हती; पण त्या दिशेने वाटचाल सुरू मात्र झालेली होती. गांधी-नेहरू काळात तर या वाटचालीला भलताच वेग आला, हिंदू शब्दाला सोडचिठ्ठीच दिली गेली ! काँग्रेसी राष्ट्रवाद आणि ब्रिटिशधार्जिणा समाजसुधारणावाद यांनी ‘हिदू' शब्द उच्चारणे पापच ठरवून टाकले. हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात हिदूचाच तेजोभंग होऊ लागला. आजही तो सुरूच आहे ! | येत्या २० मार्चला (१९८२) पुण्याला भरणारी राष्ट्रीय एकात्मता परिषद म्हणजे याच पूर्वापार हिंदुविरोधाचा नवा अविष्कार आहे. गेल्याच महिन्यात विश्वहिंदू परिषदेतर्फे एक जनजागरणाचा कार्यक्रम झाला. त्याला उत्तर देण्यासाठी ही राष्ट्रीय एकात्मता परिषद योजली गेली, हे उघड आहे. विनोद म्हणजे, एके काळी संयुक्त महाराष्ट्रासाठी झटलेली, मुंबईवर मराठी जनतेचा हक्क सांगणारी मंडळीच या परिषदेच्या मुळाशी आहेत. मुंबईत अठरापगड जातींचे लोक राहतात. अनेक प्रांतांचे, धर्माचे लोक मुंबईत आहेत. अ-मराठी कामगार आहेत, तसे अ-मराठी भांडवलदारही मुंबईत आहेत. असे आहे तर मग मुंबई केवळ मराठी माणसाची कशी ठरते ? जे मुंबईत राहतात त्या सर्वांची मुंबई आहे, असे समजायला हवे; पण तसे समजले गेले नाही. मुंबईवर मराठी जनतेचा हक्क सांगितला गेला. तिच्यासाठी एकशे पाच हुतात्म्यांचे रक्तही सांडले गेले ! मुंबई महाराष्ट्राची, मराठी जनतेची आहे, असे म्हटल्यावर मुंबईतल्या पजाब्यांना, दाक्षिणात्यांना काय वाटेल, याची चौकशी त्या वेळी या मंडळींनी केली होती का ? गुजराथी तर मुंबईशी एकरूप झालेले. त्यांचा हक्क जराही मान्य करण्यात आला नाही. का ? दशकानुदशके मुंबईत राहणा-यांच्या भावनाचा विचार न करता त्या वेळी मुंबईवर मराठी जनतेने हक्क सांगितला, प्रस्थापित केला, तो कशाच्या आधारावर ? ' बहुसंख्या' हाच प्रमुख निकष त्या वेळी आधार म्हणून मानला गेला. मुंबईत बहुसंख्य लोक मराठी आहेत यावरून मुंबई जर मराठी जनतेची ठरते, ठरली, तर त्याच न्यायाने, या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणून हा देश हिंदूचा आहे, हे हिंदूराष्ट्र आहे, असे । बलसागर ।। ८९ ________________

म्हणण्यात काय गैर आहे ? मुंबई महाराष्ट्राची म्हणजेच मराठी जनतेची आहे, असे म्हटल्यावर गुजराथ्यांनी किंवा इतरांनी मुंबईत राहू नये, मुंबई सोडून निघून जावे, असा अर्थ निघत नाही. तसेच हा देश बहुसंख्यांक या न्यायाने हिंदूंचा आहे, असे म्हटल्यावर, मुसलमानांनी, खिश्चनांनी किंवा इतरांनी हद्दपार व्हावे, असा अर्थ त्यातून निघत नाही, निघू नये. तसा तो मुद्दाम काढला जात आहे. यामागे • हिंदू' या शब्दाविषयीचा द्वेष याशिवाय दुसरे-तिसरे कुठलेही कारण नाही. तो जुना असल्याने जायला थोडा वेळ लागेल. तोवर मुंबईवर मराठी जनतेचा हक्क सांगून, हिंदुस्थानवर हिदंचा हक्क नाकारण्यातला विनोद आणि विसंगती आपल्याला सहन करीत राहिलेच पाहिजे ! | २० मार्चच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेतर्फे प्रचारासाठी बिल्ले काढण्यात आलेले आहेत. 'आम्ही भारतीय आहोत, भारतीयत्वाचा आम्हाला अभिमान आहे,' असे त्यावर लिहिलेले आहे. कुणीही असा प्रश्न विचारेल की, “ बाबांनो ! या भारतीयत्वाची तरी व्याख्या काय ?' जी व्याख्या हिंदूची, हिंदुत्वानी, तीच व्याख्या शेवटी भारतीयत्वाची करावी लागते. भारतात केवळ एकत्र राहिलेल कुणी भारतीय ठरत नाही. दीडशे वर्षे इंग्रज येथे राहिले. काहींचा जन्मही भारतात झाला असेल ! मग ब्रिटिशांना आपण भारतीय म्हणणार का ? आसामात चार-चार पिढ्या स्थायिक झालेले पाकिस्तानी-बांगलादेशीय आहेत. का त्यांना परकीय ठरवून हाकलून लावायचे ? कारण एकच. ते जरी भारतात राहत असले तरी भारतीय परंपरा ही आपली परंपरा आहे. असे ते मानत नाहीत भारतीय कोण ? जो आसेतुहिमालय पसरलेल्या भूमीला आपली भूमी मानता । व्यास–वाल्मिकींपासून टिळक-गांधींपर्यंत चालत आलेल्या परंपरेचा जो स्वत:ला वारस समजतो, या परंपरेबद्दल योग्य तो डोळस अभिमान बाळगतो, तो भारतीय हाच राष्ट्रवादाचा आशय सावरकरांनी 'पितृभू' आणि ' पुण्यभू' हे दोन शबवापरून सुटसुटीतपणे व्यक्त केलेला आहे. परंपरेचा काही भाग चांगला अस काही वाईट व टाकाऊ असेल; पण राष्ट्रवाद एकदा मान्य केला की, परपर घटकत्व मान्य करावेच लागते आणि आजतागायतची भारतीय परंपरा ही मूल आणि मुख्यतः हिंदू परंपरा आहे, हेही नाकारून चालत नाही ! म्हणून हिट्स भारतीय हे दोन्ही शब्द समानार्थाने वापरण्याचा रा. स्व. संघाचा पर्यायच सय " स्थितीत योग्य आहे. जोवर हिंदू या शब्दाबद्दल आकस आहे, जाणूनबुजून शब्दाचा द्वेष केला जात आहे, तोवर केवळ ' भारतीय ' या शब्दाचा स्वाक करणे धोकादायक आहे. हिंदी राष्ट्रवाद पूर्वी जसा रुजला नाही, तसेच हिंदुत्वा द्वेषावर उभा राहू पाहणारा हा आत्मविद्रोही भारतीय राष्ट्रवादही येथे रुजण ॥ बलसागर ।। ९० ________________

नाही. कारण त्याचा पाय च ठिसूळ राहील. केवळ प्रादेशिक तत्त्वावर कुठलाच राष्ट्रवाद कुठेच आजवर तरी उभा राहिलेला नाही ! डावी मंडळी राष्ट्रवादाकडे वळत असतील तर हे एक बरे लक्षणच आहे; पण माक्र्सवादी-समाजवादी तत्त्वज्ञानात राष्ट्रवादाला स्थान नाही, हेही ध्यानात ठेवायला हवे. राष्ट्रवादाचा खाजगी मालकीशी जवळचा संबंध आहे. मध्यमवर्गीयांचे हे तत्त्वज्ञान ! कामगारवर्ग हा आंतरराष्ट्रवादीय असायला हवा ! माक्सवादी-समाजवादी मंडळींनी स्वत:ला भारतीय म्हणवून घेणे, भारतीयत्वाबद्दल अभिमान वगैरे बाळगणे, हाही एक संकुचितपणाच आहे. हिंदू हे विश्ववादाकडे चालले असता, मावर्स-लेनिनला भारतीयत्वात कोंडणे, हे पाऊल पुढचे ' की मागचे ? || वलसागर ॥ ९१ ________________

जन्मशताब्दी : एका आधुनिक चार्वाकाची पुण्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात संरक्षणतज्ज्ञांचे एक चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात आसाममधील अस्थिरतेकडे लोकांचे लक्ष वेधण्यात आले. पाकिस्तान आणि चीन या बाह्य शत्रूपासून जेवढा धोका आपल्याला आहे, त्यापेक्षाही आसाम आणि लगतच्या राज्यांतील अस्थिरतेमुळे निर्माण होणारा धोका जास्त गंभीर आहे, असा इशाराही या चर्चासत्रात संरक्षणतज्ज्ञांनी दिलेला आहे. | याच संदर्भात, चर्चासत्रात अशी माहिती देण्यात आली की, इंडोनेशियाच्या शालेय पाठ्यपुस्तकात अंदमान-निकोबार ही बेटे इंडोनेशियाची आहेत असे दाखवले जाते. भारत सरकारने याबद्दल आक्षेप घेतला आहे, अशी काही माहिती मात्र चर्चासत्रात पुढे आली नाही. उद्या फॉकलंडप्रमाणे काही वाद निर्माण झाला आणि युद्ध भडकले तर आपली बाजू आपण कशी सिद्ध करणार आहोत ? | मूर बेटाबाबतचा वाद गेल्याच वर्षी बांगलादेशाने माजवला होता ! इंडोनेशिया असे काही करणारच नाही याची शाश्वती काय ? सबंध बंगालचा उपसागर आपलाच आहे, असा दावा मलेशियाचे पंतप्रधान टुकु अब्दुल रेहमान यांनी पूर्वीच करून ठेवलेला आहे. । तेव्हा अंदमान-निकोबार व इतर बेटे यांचे भारताशी असलेले नाते यापुढे केवळ राजकीय-संरक्षणात्मक पातळीवर किंवा आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित न ठेवता, सांस्कृतिकदृष्ट्या हा भाग आपण भारताच्या, भारतीय जन ।। बलसागर ॥ ९२ ________________

तेच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न करायला हवा. | आसाम हा तर अंदमानप्रमाणे मूळ भूमीपासून अलग नसलेला, भारताचा अविभाज्य भाग आहे. तरीपण सांस्कृतिक-धार्मिकदृष्ट्या तो भारताशी समरस न झाल्याने, राजकीय, आर्थिकदृष्ट्याही तो तुटलेला व दुर्लक्षित राहिला. काश्मिर वाचवण्यासाठी पं. नेहरूंनी किती आटापिटा केला ? आजही काश्मिरशी आपली अस्मिता जोडली गेलेली आहे. पण काश्मिरपेक्षा दसपट मोठा व महत्त्वाचा असलेला आसाम मात्र शत्रूच्या घशात चाललेला असताना, आपण, आपले सरकार निद्रिस्त राहिलो. कारण आसामचे उर्वरित भारताशी सांस्कृतिक-धार्मिक पातळीवर असे संबंधच आजवर कमी आले. | आपली यात्रेची ठिकाणे सगळी उत्तरप्रदेशातली, हिमालयातली. दक्षिणेकेडचे रामेश्वर-कन्याकुमारीही आपल्याला जवळचे वाटते. पण शतकानुशतके जेथे भारतीय यात्रेकरू जाताहेत, असे एकही यात्रास्थान आसामात नाही. म्हणून आसाम भारतात राहिला काय, शतूने बळकावला काय किंवा फुटून तो अलग झाला काय, भारतीयांना याचे सुखदुःख आज तरी सारखेच आहे. चीनी आक्रमणाच्या वेळी आसामवर पाणी सोडायची नेहरूंनी तयारी ठेवली नव्हती का ? अशीच स्थिती उद्या अंदमान-निकोबार बेटांची होणार नाही कशावरून ? म्हणून सर्व भारतीयांचे अंदमान हे एक नवे यात्रास्थान व्हायला हवे. सर्वप्रथम जेथे स्वातंत्र्य अवतरले, १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीच जो भारतीय भूभाग सर्वप्रथम स्वतंत्र झाला, ती ही समुद्रवलयांकित भूमी. १८५७ पासूनच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे, भारत स्वतंत्र व्हावा म्हणून सशस्त्र मार्गाचा अवलंब करणाच्या सहस्रावधी क्रांतिकारकांचे हे तपस्थान. पं. नेहरूंनी स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हटले होते की, भाक्रानानगल हीच आपली नवी तीर्थक्षेत्रे व्हायला हवीत. पण अजून तरी तसे काही झालेले दिसत नाही. दिसणारही नाही. साबरमतीचा आश्रम तीर्थाचे ठिकाण म्हणून लोक मानतील. जेथे पं. नेहरुंना व इतर काँग्रेसनत्याना डांबून ठेवले होते, तो अहमदनगरचा किल्लाही यात्रास्थान ठरू शकेल. कारण देशासाठी केलेल्या त्यागाची ही प्रतीके आहेत. अंदमान हे सर्वोच्च प्रतीक, काग्रेसवाल्यांनी खोटा इतिहास जनतेच्या गळी उतरवण्याचा गेल्या ५०-६० वर्षे कतीही प्रयत्न केला असला, तरी आपले स्वातंत्र्य केवळ अहिंसेने मिळालेले नाही हे सत्य आता लोकांना हळहळू पटत चालले आहे. क्रांतिकारकांच्या त्यागकथा, याचे शौर्य आणि हौतात्म्य यांच्या गाथा घरोघर पोचत आहेत, जनतेच्या अंत:करणात त्यांच्याविषयी आदर आणि भक्तिभाव फुलत आहे. राजकत्र्यांनी कितीही !। बलसागर ।। ९३ ________________

दडपले तरी सत्य, आज नाही उद्या, मान्यता पावल्याशिवाय कसे राहील ? पाटब्लअर दि. २८ मे १९८२ अंदमान-निकोबार द्वीपसमूहाची राजधानी पोर्टब्लेअर येथे सावरकर जन्मशताब्दी समारोह समितीच्या वतीने सेल्युलर जेलच्या १२३ क्र. कोठडीतील सावरकरांच्या प्रतिमेला अध्यक्ष श्री. लक्ष्मण सिंह (भू. पू. संसदसदस्य), उपाध्यक्ष श्रीमती जयदेवी व सचिव श्री. गोविंदराव हर्षे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून वर्षभराच्या होणा-या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हा कार्यक्रम पोर्टब्लेअर स्थित सेल्युलर जेलमध्ये सकाळी ९ वा. संपन्न झाला. श्री. पंडित (मानव विज्ञान विभागाचे डायरेक्टर), पी. टी. आयः चे श्री. मुजुमदार, लाईट ऑफ अंदमान या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक श्री. परशुराम, श्री. शरदचंद्र गुप्ते, विवेकानंद केंद्राचे जीवनव्रती श्री. नागभूषण, शासनाच्या वतीने श्री. आर. एस. बाली (सचिव, समाजकल्याण विभाग) इत्यादी मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती... त्याच दिवशी सायंकाळो, शिक्षक प्रशिक्षण संस्थानच्या सभागृहात समितीच्या वतीने एक सभा आयोजित करण्यात आली. सभेची सुरुवात सावरकररचित ' जयोस्तुते श्री महन्मंगले' व 'सागरा प्राण तळमळला' या कवितांच्या हिंदी अनुवादाच्या सुस्वर पाठाने सौ. फाले यांनी केली. | अध्यक्षांच्या स्वागतानंतर स्थानीय कवी व कवयित्रीद्वारा सावरकरांच्या जीवनावर स्वरचित कविता-वाचन झाले. त्यानंतर समितीचे सचिव श्री. हर्षे वर्षभराच्या कार्यक्रमाची रुपरेखा सांगताना म्हणाले, “ जन्मशताब्दी समारोहाच्या अनुषंगाने वर्षभरात वक्तृत्वस्पर्धा, निबंधलेखनस्पर्धा, कवितावाचन (स्वरचित), चित्रकलास्पर्धा इत्यादी उपक्रम बाल, कुमार व कॉलेज विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात येतील.' तदनंतर स्वातंत्र्यसैनिक श्री. बॅनर्जीनी सावरकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. श्री. पंडित आपल्या भाषणात म्हणाले, “आपल्या जीवनसर्वस्वाचा होम करणा-या सावरकरांनी ज्या चेतनेने प्रेरित होऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संपूर्ण कुटुंबाची आहुती दिली, ती प्रेरणा, ती चेतना आज लुप्त झाली आहे. त्या चेतनेचे पुननिर्माण हेच खरे कार्य ठरेल.' * श्री. शरदचंद्र गुप्ते आपल्या भाषणात म्हणाले, “ सावरकर केवळ स्वातंत्र्यसैनिकच नव्हते, तर एक समाजसुधारक होते. रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना ॥ बलसागर ।। ९४ ________________

त्यांनी केलेल्या समाज सुधारणेच्या कार्याचा आढावा घेताना ते म्हणाले, * अस्पृश्यता निवारणाचे फार मोठे कार्य सावरकरांनी पतितपावन मंदिराची स्थापना करून केले. दलित व हरिजनांना मंदिरात प्रवेश मिळावा, समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त व्हावे, म्हणून त्यांनी हिरीरीने प्रयत्न केले. जे ते बोलत, ते ते आचरणात आणीत. सावरकर हिंदुत्वनिष्ठ होते; पण त्यांचा कर्मकांडावर विश्वास नव्हता. धर्मांतराला ते विरोध करीत. धर्मातरित बंधुंना परत आपल्यात आणण्यावर त्यांचा कटाक्ष असे. कारण सावरकरांचे स्पष्ट मत होते की, भारतात धर्मातराचा अर्थ राष्ट्रांतर आहे.' लाईट ऑफ अंदमानचे संपादक परशुराम आपल्या भाषणात म्हणाले की, सावरकरांच्या प्रयत्नामुळे आज अंदमान-निकोबार भारताचा भूभाग आहे. अंदमानमध्ये आर्यसमाजाच्या कार्याचा पाया अप्रत्यक्षपणे सावरकरांनी घातला. सेल्युलर जेल मधील वास्तव्यात कैद्यांना हिंदी त्यांनी शिकविले व जेलमध्ये त्या काळी असणा-या कैद्यांना धर्मातरित होण्यापासून वाचविले. त्यांचे ऋण आम्ही कसे विसरणार ? सावरकरांचे विचार स्थानीय लोकांपर्यंत पोहचवून त्यांचा या समितीच्या कामात सहयोग असावा अशी त्यांनी विनंती केली. -- अध्यक्ष श्री. लक्ष्मणसिंह यांनी समितीतर्फे लवकरच एक पोहण्याची शर्यत आयोजित केली जाईल व विजेत्याला फिरती ढाल देण्यात येईल अशी घोषणा करून उपस्थितांना, वक्त्यांना व शासनाच्या सहयोगाबद्दल शासनाला धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे संचालन श्री. सेवाराम सेतिया, प्राध्यापक, गव्हर्नमेंट कॉलेज; पोर्टब्लेअर, यांनी केले. असे हे सत्य हळूहळू मान्यता पावत आहे. आजवर दडपला गेलेला सशस्त्र कतिप्रयत्नांचा इतिहास हळहळ प्रकाशात येत आहे. या ज्वलंत इतिहासापासून १ता घ्यावी असे भारतीय जनतेला वाटू लागलेले आहे. अदमानला स्थापन झालेल्या सावरकर जन्मशताब्दी समारोह समितीच्या "हल्या बैठकीला पुण्याच्या 'एकता' मासिकाचे संपादक श्री. रामदास कळस" हे उपस्थित होते. पूर्वी ते संघाचे प्रचारक होते व सध्याही मासिकाच्या "दनाबरोबरच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांचे संघकार्यही चालू आहे आणि एका 3 रागाशी सामनाही ! या सामन्याची वाच्यता नाही. जाहिरातबाजी नाही. यकती माणसे जर अंदमानातील सावरकर जन्मशताब्दी समारोह समिताउभा असतील तर शासनाचे पाठबळ लाभो न लाभो, सावरकरांचे, भारतीय अशी बलसागर ।। ९५ ________________

स्वातंत्र्यसमराचे एक भव्य स्मारक तेथे उभे राहणे अवघड नाही. हे स्मारक उभारण्यासाठी, उभारले गेल्यानंतर ते पाहण्यासाठी भारतीय मंडळी मग तेथे जाऊ लागतील; आज वेगळे वाटणारे, दूरचे वाटणारे हे बेट मग भारताचाच एक खराखुरा भाग होऊन जाईल. खरे तर सावरकरांची तीन ठिकाणी स्मारके या जन्मशताब्दीनिमित्त व्हायला हवीत. एक पूर्व किना-यावर, अंदमानला'स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. दुसरे, पश्चिम किना-यावर, रत्नागिरीला-जात्युच्छेदक-विज्ञानवादी- ‘हिंदू संघटक' सावरकरांचे आणि तिसरे मुंबईचे-'अखंड भारतवादी' सावरकरांचे. सावरकरांच्या जीवनाची ही तीन पर्वे आहेत आणि या तीनही पर्वात सावरकर हा एकाकी झुंज देणारा एक योद्धाच होता. आज त्यांचे ' जयोस्तुते' रेडिओ-टिव्हीवर प्रसंगोपात्त लागत असले तरी, हे स्वातंत्र्यगीत जेव्हा त्यांना स्फुरले तेव्हा, एक माथेफिरू क्रांतिकारक, एक दहशतवादी, म्हणूनच त्यांची संभावना, त्या काळातल्या थोरामोठ्यांकडून होत होती. ज्यावेळी त्यांनी रत्नागिरीत समाजसुधारणेची चळवळ केली त्याही वेळी त्यांना अनुसरणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकेच होते आणि शेवटच्या पति तर काय ? सैनिकीकरणाचा, अखंड भारताप्रित्यर्थचा सगळा लढा म्हणजे प्रवाहाविरुद्धचे पोहणे. कुठली श्रद्धा त्यांना हे अखंड संघर्षशील जीवन जगण्याचे बळ देत होती ? बरेचसे सावरकर बुद्धिनिष्ठ, तर्कवादी आहेत- एक आधुनिक चार्वाकच हाआगरकरांनंतरचा; पण हिंदू समाजात पुनरुत्थानाची एक सुप्त शक्ती आहे, आजवर अनेकदा पराभूत होऊनही हा समाज पुन्हा पुन्हा वर उठलेला समाज आहे, अशी त्यांची एक मनोमन श्रद्धा होती. हिंदू अश्वत्थाचे मी एक सळसळते पान आहे,' अशी त्यांची स्वतःविषयीची भावना होती. ही भावना, ही श्रद्धा त्यांना बळ पुरवीत होती, एकाकी अवस्थेतही झुंजत राहण्याची. सावरकरांची ही श्रद्धा अगदीच अंधश्रद्धा नसावी. या अश्वत्थ-भावनेलाही १ लब्धप्रकाश इतिहास निसर्ग मानाचा' काही आधार लाभलेला असावा. कारण तशा घटना अवती-भवती खूप घडत आहेत. अंदमानात स्थापन झालेली सावरकर जन्मशताब्दी समारोह समिती ही अशा अनेक घटनांपैकी एक. जून १९८२ बलसागर ।। ९६ ________________

। स्वतन्त्र आणि सतत्व | महाराष्ट्र साहित्य-पत्रिकेच्या चालू एप्रिल-मे-जून अंकात 'विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यासंबंधी श्री. द. न. गोखले याचा एक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासाबरोबरच लेखकाचा समन्वयवादी व तौलनिक दृष्टिकोनही लेखात जागोजाग प्रगट झाला आहे व समारोपात तर लेखकाने स्वच्छच लिहिले आहे की, 'वर्तमान काळाची नि येत्या शतकाची अशी मागणी आहे की, आम्हाला विष्णुशास्त्री चिपळूणकर हवे आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुलेही हवे आहेत. आम्हाला सामाजिक समता मागणारे चिपळूणकरही पाहिजे आहेत आणि ज्वलंत राष्ट्रवाद पुकारणारे फुलेही पाहिजे आहेत. छे! छे ! प्राप्त काळ वाट बघत आहे विष्णुशास्त्री फुल्यांची !! जोतिबा चिपळूणकरांची !!' ही समन्वयी भूमिका स्वागतार्हच आहे; पण फुले सांप्रदायिकांकडून प्रतिसाद कितपत मिळेल हे सांगवत नाही. जनता राजवटीत जयप्रकाशांच्या मध्यस्थीमुळ राष्ट्रवादी आणि समतावादी प्रवाह काही काळ एकत्र आले होते. दुहेरी दस्यत्वासारख्या एका फालतू प्रश्नावर शाब्दिक रणे माजवली गेली आणि हे वाह अलग झाले. हा अलगपणा सध्या इतका टोकाला गेलेला आहे की, पुण्यात चालली विश्व हिंदू परिषदेची प्रचंड मिरवणूकही समतावाद्यांना पाहवली नाही पण त्यांनी या मिरवणकीचा जनमानसावरील प्रभाव पुसून टाकण्यासाठी, डावास डाव म्हणून, राष्ट्रीय एकात्मता परिषदांचा धडाका उडवून दिला. वास्तविक श्यतेची मृत्यूघंटा वाजवीत निघालेली हिंदू धर्मानुयायांची मिरवणूक पाहून ।। बलसागर ॥ ९७ ________________

कुणालाही समाधान व आनंद व्हायला हवा होता. ज्यासाठी सगळे समाजसुधारक आपली लेखणी आणि वाणी गेली शंभरएक वर्षे झिजवत आले, ती गोष्ट हिंदू समाजाने मान्य केली, हा समाज आपल्यावरील अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्यासाठी कटिबद्ध होतो आहे, त्यासाठी नित्याचे विधायक कार्य आणि नैमित्तिक मिरवणूका, मेळावे वगैरे भरवून जनजागरणाचा वेग वाढवू पाहत आहे, हे दृश्य चांगले की वाईट ? भले ही वेग मीनाक्षीपुरमुच्या धक्क्यामुळे वाढला असेल ! मूळ हेतू यामुळे साध्य होत असेल तर अशा दृश्यांचे वास्तविक स्वागतच व्हायला हवे - त्यातील अतिरेक टाळण्याचा इशाराही हवाच; पण स्वागत आणि हक्काचा इशारा राहिला बाजूला; ओरड उठली, अशी मिरवणूक काढणा-या संघटनांवर बंदी घालण्याची ! असा सगळा सध्या पूर्वग्रहदूषित मामला आहे. त्यामुळे अजून काही काळ तरी महाराष्ट्राच्या राजकीय - सामाजिक जीवनातले हे दोन प्रवाह वेगवेगळे राहणे अटळ दिसते. विचार बदलले तरी संस्कार तेच राहतात. संस्कारांच्या पातळीवरचा समन्वयच टिकाऊ ठरतो. असे जरी असले तरी वैचारिक व बौद्धिक पातळीवरून समन्वयाची भूमिका मांडत राहण्याला महत्त्व आहेच. हे कार्य द. न. गोखले यांच्या लेखाने उत्तम साधले गेले आहे. श्री. गोखले यांचे याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. 'तु को लागी HTET | ए । पत्रिकेच्या संपादकांनी या विषयावर अधिक चर्चा व्हावी म्हणून श्री. गोखले यांचा लेख काहीजणांकडे पाठवला. यापैकी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ग. वा. बेहरे व श्री. ना. ग. गोरे यांनी लेखावरील प्रतिक्रिया पत्रिकेला कळवल्या; त्याही वरील अंकात संपादकांनी छापल्या आहेत. तर्कतीर्थाची प्रतिक्रिया नोंद घेण्यासारखी आहे. तर्कतीर्थांनी म्हटले आहे : देशातील सर्व जातीजमातींचे म्हणजे नागरिकांचे हितसबंध परस्पर-पोषक व परस्परांच्या अत्मोन्नतीस संपूर्ण पणे उपकारक असावे लागतात. असे हितसंबंध समाजरचनेत ‘दृढमूल झालेले असले म्हणजे तेथे राष्ट्र म्हणून एक सामाजिक, राजकीय संघटना अस्तित्वात येते. छ । । । । तर्कतीर्थाचे हे मत मान्य केल्यास जगात आज एकही देश ‘राष्ट्र' ठरू शकणार नाही. राष्ट्राभिमानासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लंडमध्ये आजही हुजूर आणि मजूर आहेत. त्यांचे संबंध परस्परांच्या आत्मोन्नतीस संपूर्णपणे उपकारक समजायचे का? ते नसल्यास आणि नाहीतच-इंग्लंडचे राष्ट्रीयत्व तोवर 'वेटिंग लिस्ट' वर ठेवायचे का ? अमेरिकेतले निग्रो आणि गोरे यांच्यात उघडउघडच वैरभाव आहे. मग अमेरिकेला राष्ट्र' ही पदवी तर्कतीर्थाकडून मिळवायल आणखी किती शतके वाट पाहावी लागेल ? आदिवासी समाजात हितसंबंध ।। बलसागर ।। ९८ ________________

परस्परानुकूल, परस्पर पोषक व समानतेवर आधारित असतात; पण या समाजात राष्ट्रभावनेचा अभावही दिसतो. असे का ? विष्णुशास्त्र्यांचा राष्ट्राभिमान एकारलेला होता, राजा राममोहन रायांसारख्यांच्या, लोकहितवादींच्या, दयानंदांच्या, म. फुल्यांच्या सुधारणावादाला त्यांनी आंधळा व अहंकारी विरोध केला, हा विरोध चूकच होता, असे म्हणता येईल; पण राजा राममोहन रायादिकांना राष्ट्राभिमानाचे आदिरहस्य चिपळूणकरांपेक्षा अधिक जाणवलेले होते हे तर्कतीर्थाचे मत फार विचित्रच आहे. १८५७ च्या बंडात म्हणा, की स्वातंत्र्य युद्धात म्हणा, ब्रिटिशांचा विजय झाला म्हणून चर्चमध्ये जाऊन आकाशातल्या प्रभूचे आभार मानणारे राजा राममोहन रॉय जर राष्ट्रवादाच्या आदिरहस्याचे ‘ साक्षात्कारी' जाणकार मानायचे, तर झाशीच्या राणीचे पुतळे देशभर उभे करणान्या सगळ्यांना त्याआधी मूर्ख ठरवायला हवे. देशाभिमानाचे आदिरहस्य आदिकवींनीच सांगून ठेवले आहेजननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।। -स्वत्वाची प्रखर जाणीव. हे स्वत्व जितके व्यापक व विशाल, सर्वस्पर्शी व सर्वसाक्षी असेल तितके चांगले; पण स्वतत्त्वाची जागा, एखादे ‘सु'तत्त्व जरी असले, तरी ते घेऊ शकत नाही. सुराज्यापेक्षा स्वराज्य हवे असे टिळक नाही तर का म्हणाले असते ? चिपळूणकर इंग्रजशाही विरुद्ध उभे ठाकले. फुले ब्राह्मणशाहीविरुद्ध लढले. आज या दोन्ही शाह्या संपल्या आहेत. घाशीराम कोतवाल नाटकात सुरुवातीस समोर येणारी ब्राह्मणशाहीची भिंत आज बहुतांशी ढासळलेली ढेपाळलेली आहे। आणि इंग्रज तर गेलाच; पण तो गेला असला तरी आर्थिक पारतंत्र्य संपलेले नाही. सांकृतिक गुलामगिरी वाढतच आहे सगळ्याच नवस्वतंत्र देशासमोरील हे नवे संकट आहे. इंग्लंडची जागा अमेरिकेने किंवा रशियाने घेतलेली आहे व ५वीच्या ब्राह्मणांच्या ऐवजी आता नवे तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ आले आहेत. पूर्वी 'मंत्र' हस्तगत करून तो नसणा-या इतरांवर गुलामगिरी लादली जायची. मंत्राऐवजी आता ‘तत्र' हे काम करीत आहे. त्या वेळी इंग्रजांचे अंधानुकरण व्हायचे. आता आपली नवी पिढी अमेरिकेकडे डोळे लावून बसलेली आहे. राजकीय स्वातंत्य आले; पण आर्थिक व सांकृतिक दास्य वाढले. या नव्या दास्याविरुद्ध, गुलाम - गरीविरुद्ध कसे उभे ठाकायचे ? भारतीय राष्ट्रवादासमोरील हे आजचे मुख्य जव्हान आहे. चिपळूणकर - फुले यांच्या प्रवृत्तींचा काहीएक सन्मवय साधूनच ९ आव्हान पेलता येईल. स्वभाषा, स्वदेश याविषयीचा प्रखर अभिमान नसला * राष्ट्रवाद उभाच राहू शकत नाही ; पण विषमतेने, जातिभेदाने पोखर. या समाजाचे ‘स्वत्त्व' ही बरेचदा पोकळ व नि:सत्व ठरते. समता व स्वातत्य ।। बलसागर ।। ९९ ________________

यांचा समन्वय हवा; पण सध्या तरी असा समन्वय, तो घडवणारी व्यक्ती किंवा शक्ती दृष्टिपथात नाही. कुठे दात आहेत तर कुठे चणे ! हे अंतर कमी व्हावे म्हणून प्रयत्न करणा-यांना श्री. गोखले यांच्या लेखाने थोडा तरी दिलासा नक्कीच मिळेल " । जून १९८२ ।। बलसागर ।। १०० ________________

। दंगली केव्हा थांबतील ? शनिवारी, तीन जुलैला (कराडजवळील) ओगलेवाडी येथे झालेल्या गलत हिंदू एकता आंदोलन' कार्यकत्र्याचा हात होता असा आरोप सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बी. एस. मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना केलेला आहे. (प्रेस ट्रस्ट वार्ता) | श्री. मोहिते यांनी असेही सांगितले की, दोन वर्षांपूर्वी हिंदू एकता आंदोलन कार्यकत्र्यांनी ओगलेवाडी येथील एका प्रार्थनास्थळाच्या बांधकामास विरोध केला होता. ३ जुलैला घडलेल्या घटनांमागे हे कारण होते. नुकतीच बिहारमध्ये एक हिंदू-मुस्लिम दंगल उसळली. पाटण्याजवळील लवारी शरीफ येथे. अशोक सिंग नामक एका पत्रकाराचा या दंगलीसंबंधी एक अघि लेख संडे ऑब्झव्र्हर या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला आहे. (दि. ४ जुलै) ' लखावरून तरी सिंग हे ऑब्झव्र्हरमधील लेखकांप्रमाणेच रा. स्व. संघ/हिंदुत्व'चि दिसतात. तरी या सिंगांनी या लेखात एके ठिकाणी म्हटले आहे lisi The most important factor to have triggered off commun2011, a factor most hotly debated, concerns an acre of land in and heart of the township and its allotment to the Imarat - e sharia.” ‘इमारत-ए-शरियाला शहराच्या मध्यवस्तीतील सुमारे एकरभर जागा बलसागर ।। १०१ ________________

दिली गेली. दंगल उसळण्यामागील हे मुख्य कारण आहे. यावर जोरदार चर्चाही झाली.” (शरिया हे बिहारमधील एक प्रमुख मुस्लिम धर्मस्थान आहे.) एक वर्षापूर्वी बिहारशरीफ येथे हिंदू-मुस्लिम दंगल उसळली होती. त्याही वेळी जागेबाबतचा बादच मुळाशी होता. पुण्यात चालू वर्षी दंगल झाली. मशिदीला हात न लावता रस्तारुंदी होऊ घातली होती. पतितपावन या हिंदुत्ववादी संघटनेने याला आक्षेप घेतला. वाटेत येणारे देऊळ काढले तशीच मशिदही काढा, नाहीतर देवळाला हात लावू नका, अशी मागणी होती. यातून तणाव वाढत गेला व पर्यवसान शेवटी एका कार्यकत्र्याच्या मृत्यूत व दंगलीत झाले. आता ओगलेवाडीला हेच घडले-घडत वाहे. अचानक, बेकायदा देवस्थाने उभी राहतात. यांना हरकत घेतली तर तणाव वाढतो, दंगली उसळतात. अशी बेकायदा बांधकामे वेळीच हटवून दंगलीचे मूळ कारण दूर करायचे की, हरकत घेणा-यांनाच दोषी ठरवून पकडायचे ? तुरुंगात डांबायचे ? आपण जर खरे सेक्युलरवादी, धर्मनिरपेक्षवादी असू तर बेकायदा बांधकाम मशिदीचे आहे की मंदिराचे आहे इकडे लक्ष न देता, ते बेकायदा आहे, रहदारीला, शांततेला त्रासदायक आहे, या एकाच कारणास्तव ते प्रथम वेळीच हटवा असे म्हणू; पण आपण काँग्रेसछाप सेक्युलरवादाचे पाईक असू तर मंदिरे पाडु, पण मशिदींना हात लावणार नाही. अशा पक्षपाती सेक्युलॅरिझमचा निषेध म्हणून हिंदू एकता आंदोलन किंवा पतितपावन या किंवा अशा चळवळी नेहमीच उभ्या राहणार, यापुढे वहुजनसमाजाचा त्यांना वाढता पाठिंबा लाभणार. यशवंतराव चव्हाणांनी किंवा बाबासाहेब भोसल्यांनी कराड-ओगलेवाडीमधून कितोही पद. यात्रा काढाव्यात; तरुण माणसे यापुढे त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, हेच कराड -ओगलेवाडी दंगलींनी दाखवून दिले आहे. फुलवारीशरीफ येथील जो जमिनीचा तुकडा दगलीला कारणीभूत ठरला तो इमारत-ए-शरियाला देऊ नये, असा बिहारचे माजी मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांचा पूर्वीचा स्पष्ट आदेश होता; पण सध्याचे मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रांनी सौदा केला. मुस्लिम मते गेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला मिळाली व जमिनीचा तुकडा शरियाच्या पदरात पडला. कुणीतरी कोर्टात गेले. या जमिनीवर बांधकाम करू नये हा कोर्टाचा मनाईहुकूम. तरी सरहद्दगांधी खान अब्दुल गफारखान पाटण्याला आले असताना त्यांच्या हस्ते इंदिरा काँग्रेसचे मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रांच्या उपस्थितीत, शरियाच्या नव्या बांधकामाचा कोनशिलासमारंभ साजरा बलसागर ॥ १०२ ________________

झाला-कोर्टाचा मनाई हुकूम धाब्यावर बसवून ! आस पासचे हिंदू मग का नाहीं खवळणार ? . . . 5 | जे पुण्याला घडले, ओगलेवाडीला घडले तेच फुलवारी-शरीफला घडले. कोकणपट्टीत हे ठिकठिकाणी सध्या घडते आहे. अरबी पैशातून मोक्याच्या जमिनी गावोगाव मस्लिम मंडळी खरेदी करीत आहेत. काही कायदेशीर मार्गाने तर काही बेकायदेशीररीत्याही. खुद्द रत्नागिरी शहरात शिवाजी पुतळ्याजवळच असा एक जमिनीचा व्यवहार होतो आहे आणि एक तणावक्षे त्र तेथे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ओगलेवाडीला ज्या बांधकामाबद्दल हिंदू एकतावाल्यांनी आक्षेप घेतला, त्याचा विचार तेव्हाच का झाला नाही ? सर्व धर्मातील समंजस मंडळींना एकत्र करून हा वादग्रस्त बांधकामाचा प्रश्न तेव्हाच सामोपचाराने निकाली काढला गेला असता, तर आज दंगली उसळण्याची वेळच आली नसती; पण असे होणे नाही ! कारण आपला सेक्युलॅरिझम काँग्रेसछापाचा आहे, पक्षपाती आहे, फक्त हिदूंना ठोकत राहणारा आहे. मिरजेला येऊन श्रीमंत म्हातारे अरव पैशाच्या जोरावर गरीब मुस्लिम मुलींची खरेदी करतात. या विकृत चाळ्यांबद्दल तेथील हिंदू एकता आंदोलनवाल्यांनी आवाज उठवला. प्रश्न मुस्लिमांचा आहे, मला काय त्याचे, अशी संकुचित भूमिका घेतली नाही. एकाही काँग्रेसछापी सेक्युलरवाद्याने या विशुद्ध राष्ट्रीय भूमिकेबद्दल हिंदू एकतावाल्यांचे अभिनंदन केले नाही. असे जोवर घडते आहे तोवर दंगलीही अटळ आहेत. ओगलेवाडी, कराड, पुणे, फुलवारीशरीफ, बिहारशरीफ, जमशेटपूर...नावे तरी किती घ्यायची ? ही संख्या कमी करायची असेल तर हिंदू समाजाच्या खच्चीकरणावर, तेजोभंगावर आधारित काँग्रेसी सेक्युलरवादाचा वैचारिक आणि राजकीय पराभवच करायला हवा. ही प्रक्रिया सुरू झालेलीच आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात, यशवंतरावांच्या क-हाडात आणि वसंतदादांच्या सांगली-मिरजेत हिंदू एकता आंदोलन उभे राहावे, याचा दुसरा अर्थ कोणता ? गांधीजी थोर महात्मे होते, नेहरू उदारमतवादी होते; पण मुस्लिम अनुनयावर आधारित असलेला त्यांचा प्रादेशिक हिंदी राष्ट्रवाद भावी पिढ्यांनी स्वीकारलाच पाहिजे असे नाही. गांधीजींचा अन्त्योदय हवा. नेहरूंचा लोकशाही समाजवाद महत्वाचा; पण दोघांचाही राष्ट्रवाद सदोष व अपूर्ण. हे राष्ट्र प्रथमत: हिंदूराष्ट्रच आहे. हे पुढे जायचे किंवा मागे पडायचे, ते हिंदू समाजाच्या पुढे जाण्यावर किंवा मागे राहण्यावरच अवलंबून आहे. या देशाचे जे काही बरेवाईट होणार, ते हिंदू समाजाच्या बरेवाईटपणावरच अवलंबून आहे. या बहुसंख्य समाजालाच या देशात चोरट्यासारखे राहायला लावणारा सेक्युलरवाद किती दिवस टिकाव धरणार ? खरा सेक्युलरवाद शिवाजीने आचरला, टिळकांनी सांगितला. गांधी-नेहरूंच्या उदयानंतर ही खरी वाट लुप्त झाली. ती पुन्हा शोधून काढून, बलसागर ॥ १०३ ________________

आचरणात आणल्याशिवाय कराड-ओगलेवाडीची पुनरावृत्ती टळणार नाही; हे प्रथमतः मुस्लिमांनी, ख्रिश्चनांनी ध्यानात घ्यायला हवे. कारण दंगली जरी त्यांच्या आडमुठेपणामुळे सुरू झाल्या, तरी ते संख्येने अल्प असल्याने, शेवटी नुकसान अधिक त्यांनाच सहन करावे लागणार आहे. त्यातल्या त्यात गरीब लोकांचे हाल तर अधिकचत्यांचा काहीही दोष-अपराध नसताना. बिहारशरीफच्या दंगलीनंतर अनेक गोरगरीब मुस्लिमांना हिंदूंनी आश्रय दिला, घरी ठेवून घेतले; पण या हिंदूंबद्दल चार बरे शब्द उच्चारायला, बिहारशरीफला जाऊन आलेल्या पुण्यातील काँग्रेसछापी सेक्युलरवादी, समाजवादी मंडळींची जीभ अडखळत होती. इतका जोवर हिंदुद्वेष आहे तोवर हिंदू एकता आंदोलनवादाला तरी पर्याय कसा निर्माण होणार ? आणि का व्हावा ? जुलै १९८२ ।। बलसागर ।। १०४ ________________

| राष्ट्रीय एकात्मता की राष्ट्रीय पुरुषार्थ ! | भारतात पूर्वीपासून भौगोलिक-सांस्कृतिक एकात्मता ब-याच प्रमाणात अस्तित्वात होती. पण राजकीय एकात्मता नव्हती. ती इंग्रजी राज्यानंतर आली . पूर्वापार चालत आलेली भौगोलिक - सांस्कृतिक एकात्मता आणि नवी राजकीय एकात्मता यांचा संयोग म्हणजे राष्ट्रीय एकात्मता असे म्हणता येईल. | हा संयोग दृढ होत गेला याचे कारण स्वातंत्र्यप्राप्तीचे आपले समान उद्दिष्ट. इंग्लंडमध्ये राष्ट्रवादाचा विकास लोकशाहीबरोबरच होत राहिला. राजाविरुद्ध प्रजा असा तेथे सतत संघर्ष होता व राजाविरुद्ध सर्व प्रजेला एकत्र ठेवण्यास राष्ट्रवाद उपयोगी पडला. तसेच साम्राज्यविस्ताराचे एक सर्वव्यापी उद्दिष्टही समाजातील विविध गटांना, परस्परविरोधी हितसंबंधांना एकत्रित बांधून ठेवू शकले. भारतातील राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडली गेली. जातीभेद, प्रांतभेद असले तरी ब्रिटिशांविरूद्ध सर्व देश एक झाला. निदान तीन चतुर्थांश तरी. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर असे सर्वकष उद्दिष्टच जनतेसमोर नसल्याने आता हा तीन चतुर्थांश देश तरी एकत्र राहतो आहे, की त्याचे आणखी विघटन होणार आहे, अशी काळजी उत्पन्न झाली आहे. एक-चतुर्थांश देश त्यावेळी फुटून का निघाला, भारताची फाळणी का झाली या प्रश्नाचा अभ्यास म्हणूनच आजही आवश्यक आहे. कोणी कितीही निधर्मवाद सांगितला किंवा सर्वधर्मसमभाव बाळगला तरी एक वस्तुस्थिती स्वच्छपणे मान्य केली पाहिजे. जेथे जेथे मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोकसंख्या वाढली, नेमक्या त्याच भूभागातून वेगळ्या राज्यांची, भारतापासून फुटून निघण्याची चळवळ स्वातंत्र्यानंतर उभी राहिली. । बलसागर ।। १०५ ________________

आसामचा प्रश्न हा तेथील मुस्लिम लोकसंख्या वाढल्यामुळे निर्माण झालेला प्रश्न आहे. हा प्रश्न सुटायचा असेल तर तेथील परकीय, म्हणजेच चालू संदर्भात मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण कमी केले पाहिजे किंवा निदान या परकीय शक्तींचा राजकीय दबाव कमी होईल अशी उपाययोजना अंमलात आणली पाहिजे. हीच गोष्ट आसाममधील टेकडी राज्यांची. ही सर्व राज्ये ख्रिश्चन बहुसंख्य असल्याने भारतापासून फुटून अलग निघण्यासाठी उत्सुक आहेत. सैन्यबळाचा वापर करूनच आपण हा सर्व भूभाग भारतात डांबून ठेवत आहोत. काश्मिरबाबतही वस्तुस्थिती वेगळी नाही. तेथले सैन्य काढून घेतले तर राजकीयदृष्ट्या काश्मिर स्वतंत्र राज्य म्हणून लगेच घोषित होईल. शेख अब्दुल्लांचे उद्दिष्ट हे होते व त्यांच्या पक्षाचे ध्येय आजही हेच आहे. कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत आपण काश्मिरात ओतली आहे. पण तरीही मुस्लिम बहुसंख्य असल्याने काश्मिरची भारतासंबंधीची बांधिलकी नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे- राहणारही आहे. तेव्हा, आहे त्या तीन चतुर्थांश भारताची एकात्मता टिकवून धरायची असली, तर या देशातले हिंदूचे प्रमाण कमी होणार नाही हे पाहिले पाहिजे. एतिहासिक परिस्थितीमुळे आपल्याकडे आज धर्मातर हे राष्ट्रांतर ठरत आहे. म्हणून कुठल्याही राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारमंथनातून हिंदू ची या देशातील संख्या कमी करू पाहणा-या धमांतर प्रयत्नांचा स्पष्ट निषेध व्हायला हवा. धर्माऐवजी विज्ञानाची कास धरावी हे तत्वतः खरे असले तरी भारताच्या सध्याच्या स्थितीत व मागील अनुभव पाहता, हिंदूधर्मीयांच्या बहुसंख्येचाही आग्रह अटळ आहे, व हा हिंदुत्ववाद नाकारणे म्हणजे शुद्ध आत्मघात आहे. हिंदूची बहुसंख्या हीच येथील राष्ट्रीय एकात्मतेची पहिली व मूलभूत हमी आहे. A bird in hand is worth two in the bushes हे हिंदुत्वविरोधकांनी कधीही विसरू नये. अर्थात संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची असते हेही खरेच. भूतकाळातील थोर परंपरेचा अभिमान आवश्यक असला तरी भविष्यकालीन समान उद्दिष्टे, या उद्दिष्टांच्या दिशेने केलेली वाटचाल राष्ट्राला अधिक बळकटी आणत असते. असे एखादे समान, सर्वव्यापी उद्दिष्ट स्वातंत्र्यानंतर येथील जनतेसमोर ठेवले गेले नाही. नेहरुंचा लोकशाही समाजवाद सर्वांनी पत्करला. पण प्रत्यक्षात लोकशाही म्हणजे निवडणुका व समाजवाद म्हणजे नोकरशाहीची वाढ, असेच दृश्य निर्माण झाले. वास्तविक स्वातंत्र्यानंतर स्वावलंबन हेच देशासमोरील प्रधान उद्दिष्ट ठरायला हवे होते. त्याऐवजी रशियन पद्धतीचे नियोजन आले, प्रगत पाश्चात्य देशांचे भांडवल-तंत्रज्ञान आले. त्यामुळे स्वावलंबनाऐवजी परकीय कर्जाच्या, मदतीच्या चिखलात आज आपण रुतलो आहोत. येथील अफाट श्रमशक्ती, निसर्गसंपत्ती ।। बलसागर ।। १०६ । ________________

गुंजत पडली व देश आज एका नव्या आर्थिक गुलामगिरीच्या पाशात अडकत चाललेला आहे. इंग्रजांना आपण घालविले पण मागील दाराने, रशिया, अमेरिका घरात घुसले आहेत, इकडे आपले पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या बड्या परकीय शक्ती आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला असलेला सर्वात मोठा धोका आहे व या शक्तींविरुद्ध जनमत संघटित करणे, बड्या शक्तींची मदत घ्यावी न लागता स्वावलंबनाची कास धरून येथे पर्यायी नियोजनपद्धती यशस्वी करणे, हे राष्ट्रीय एकात्मतावाद्यांसमोरील सर्वात महत्त्वाचे कार्य असायला हवे. आपली श्रमशक्ती आणि निसर्गशक्ती यांची सांगड घालून आपण स्वावलंबी भारत निर्माण करणार नसू, तर आर्थिक व त्याबरोबरच येणारी सांस्कृतिक गुलामगिरी अटळ आहेआंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या कर्जाने व त्यावरील अटींनी ही गुलामगिरी स्पष्टही झालेली आहे. म्हणून पुन्हा स्वदेशी व स्वावलंबनाच्या टिळक-गांधी मंत्राचा उच्चार व आचार आता, कालमानाप्रमाणे त्यात आवश्यक ते बदल करून, सुरू व्हायला हवा. असा लोकपुरुषार्थ ही खरी आजची निकड आहे. अशा पुरुषार्थाशिवाय नुसती एकात्मता टिकली काय, गेली काय, सारखेच ! सगळा एकात्म भारत हा रशियाचा किंवा अमेरिकेचा मनाने व शरीराने गुलाम झालेला आपल्याला चालणार आहे का ? पुरुषार्थ विचाराशिवाय, आचारणाशिवाय केवळ राष्ट्रीय एकात्मतेची चर्चा ही केवळ एक पुस्तकी, अनुत्पादक व वांझोटी चर्चाच ठरण्याचा संभव अधिक. म्हणून जे कोणी हा देश आपला मानून त्यासाठी त्याग करण्यास पुढे येतील, त्या सर्वांना बरोबर घेऊन, जे कोणी येणार नाहीत त्यांना आमंत्रणांवर आमंत्रणे धाडण्यात वेळ खर्ची न घालता, आणि जे कोणी विरोध करतील त्यांचा विरोध मोडून काढून, स्वावलंबी व समर्थ भारताच्या उभारणीचे नवे महानिर्माण पर्व येथे सुरू व्हायला हवे. अशा नव्या पुरुषार्थवादाची पेरणी हीच आपल्या राष्ट्रीय एकात्मतेची गुरुकिल्ली आहे. असा पुरुषार्थ चीनमध्ये माओने निर्माण केला म्हणून चीन आज आपल्यापेक्षा मूलभूत क्षेत्रात व शस्त्रातस्पर्धेतही पुढे गेलेला आहे. माओ साम्यवादी होता म्हणून हे घडले नाही. अनेक पूर्व युरोपीय देशही रूढार्थाने साम्यवादी होते व आहेतही. या सगळ्यांना रशियाच्या गुलामगिरीत अडकावे लागले. चीनचा राष्ट्रपुरुषार्थ माओने जागा केला म्हणून चीन पुढे गेला. चीनमध्ये हुकुमशाही आहे, आपण लोकशाहीचा प्रयोग करीत आहोत, हेही चीन व भारत तफावतीमागचे कारण नाही. अनेक डाव्या आणि उजव्या हुकुमशाही राजवटी एकात्म असल्या तरी परावलंबी असतात. क्युबाला कुठे चीन होता आले ? तेव्हा हुकुमशाही, साम्यवाद वगैरे कारणे दाखवून चीनचे यश आपल्याला कमी करता येणार नाही. चीनमध्ये क्रांती झाल्यावर माओने स्वावलंबी चीनच्या उभारणीचा ध्येयवाद डोळ्यांसमोर ठेवला, नियोजनाची वेगळी व स्वायत्त पद्धती स्वीकारली, रशिया किंवा ।। बलसागर । १०७ ________________

अमेरिका यापैकी कुणाचेच अंधानुकरण केले नाही, म्हणून धडपडत, ठेचकाळत का होईना, चीन पुढे गेला. आपल्यापेक्षा आज तो अधिक स्वाधीन व स्वतंत्र आहे. आपल्यालाही असाच एखादा भारतीय पुरुषार्थाचा मार्ग हुडकावा लागेल. नाही तर आज आहे ती तीन चतुर्थांश भारताची एकात्मताही टिकून रहाणार नाही, तिचा विकास होणे तर लांबच. | राष्ट्रवाद हे प्रामुख्याने मध्यमवर्गाचे तत्वज्ञान आहे. ज्या समाजात टोकाची विषमता व भेदाभेद असतात, मधली फळी अस्तित्वात नसते, तेथे राष्ट्रवादही कमजोरच असतो. त्यामुळे मागासलेल्या व उपेक्षित समाजघटकांचे लवकरात लवकर मध्यमवर्गीकरण कसे होईल, अगदी वरचा आणि अगदी खालचा तळ यातील अंतर कमी कमी कसे होईल, या दृष्टीने येथील स्वावलंबी नियोजनाची, विकास योजनांची आखणी व्हायला हवी. मागासलेले घटक पुढे आले, त्यांनी शिक्षण घेतले किंवा त्यांना नोक-या वगैरे मिळाल्या की, ते मध्यमवर्गीय होतात म्हणून नाके मुरडण्याची टुम आहे. वास्तविक या प्रक्रियेचे, या वर्गातराचे किंवा वर्णातराचे आपण स्वागत करायला हवे. दलितांमध्ये किंवा कामगार शेतमजुरां मध्ये नवा मध्यम वर्ग निर्माण होणे यात वाईट व अस्वाभाविक असे काय आहे ? उलट या प्रक्रियेमुळेच या समाजघटकांचे येथील मातीशी, येथील परंपरेशी खरे जैविक हितसंबंध निर्माण होतील व या हितसंबंधांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी हे घटकही पुढारलेल्या, पूर्वीच मध्यमवर्गात दाखल झालेल्या घटकांबरोबर उभे राहतील. त्यांना हा देश, हे राष्ट्र आपले वाटेल. 'दलितांना कुठे आहे मातृभूमी ? असा प्रश्न डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्यसंपादनाच्या वेळी विचारला होता. याचा शब्दशः अर्थ घेण्याचे कारण नाही. त्यामागील आशय असा की, ज्यांचे याण करावे, संवर्धन करावे असे येथल्या मातीशी, परंपरेशी जुळलेले हितसंबंध दलितांमध्ये पुरेशा प्रमाणात निर्माण झालेले नाहीत. स्वातंत्र्यानंतर ते होत आहेत, पण वेग फार कमी आहे. तो वाढवला पाहिजे. मुस्लिम समाजातही मध्यमवर्ग निमीण न झाल्याने हा समाज आधुनिक राष्ट्रवादापासून दूर राहिला, मुल्लामौलवींचे या समाजावरील वर्चस्व कायम राहिले, त्यांनी अनेक देशांतून राजसत्तेवरही कबजा मिळविला. धर्मभावना आणि मुल्ला-मौलवींचे वर्चस्व या दोन अलग गोष्टी आहेत. टिळक-गांधी धार्मिक होते; पण जन्या हिंदू धर्ममार्तडांचा त्यांच्यावर प्रभाव नव्हता. अशी फारकत मुस्लिमांमध्ये झाली नाही, म्हणून मुस्लिमांना शेजारच्या हिंदूंपेक्षा दूर वाळवंटातला धर्मबांधव अधिक जवळचा वाटत राहिला, येथील राष्ट्रीय प्रवाहापासून हा समाज अलग राहिला. केवळ अलगच नाही, तर जुने वर्चस्वाचे दिवस पुन्हा येतील, पुन्हा आपण हिरवा ।। बलसागर ।। १०८ ________________

चाँद या भूमीवर फडकवू शकू, अशी स्वप्नेही अनेक मुस्लिम नेत्यांनी पाहिली, अजून ती कायमची दृष्टिआड झालेली आहेत अशी शाश्वती देता येत नाही. पुरेशा प्रमाणात मुस्लिम समाजात नवा मध्यमवर्ग निर्माण झाला, त्याने धर्मसुधारणा घडवून आणली, खोमेनी किंवा पाकिस्तानपेक्षा त्यांना येथील राम-कृष्णांची. बुद्ध-महावीरांची आणि शिवाजी-टिळक-गांधींची परंपरा जवळची व आपलीही वाटू लागली, तर अशी शाश्वती आपोआपच निर्माण होईल. पण तोवर मात्र ही परंपरा आपली परंपरा आहे असे मानणा-या हिंदू समाजालाच येथली राष्टवादाची धुरा सांभाळावी लागणार आहे. मग या राष्ट्रवादाला कुणी हिंदू राष्टवाद म्हणेल, कुणी हिंदी म्हणेल वा भारतीय म्हणेल. आशय महत्त्वाचा आहे. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्या नि:स्पृह विचारवंताने हा आशय पूर्वीच सांगून ठेवलेला आहे. धनंजयरावांनी लिहिले आहे- 'आसामी नि गुजराथी, पंजाबी नि तामीळ अशा संघराज्यातील विभिन्न व दूरस्थ लोकसमूहास एकत्र आणण्यास हिंदू परंपरेचा वारसा हेच एकमेव साधन आहे. मोठमोठ्या लोकसंघास सतत संबंध अथवा केवळ शेजार असली कारणे पुरत नाहीत. आपल्या विस्तीर्ण देशातील हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदुत्वनिष्ठा ती काहीकाळी नि स्थळी जरी लुप्तप्राय झालेली दिसली तरी, एकंदरीत ती फार प्रभावी ठरली असून तिची धारणाशक्ती निर्विवाद आहे. नवीन (भारतीय) संघराज्याने हिंदुत्व नाकारणे म्हणजे गतेतिहासाचा दाखला धिक्कारणे, एवढेच नव्हे तर, भविष्यासही धोक्यात घालण्यासारखे आहे.' (केसरी, २४ ऑक्टोबर १९४७) । सुज्ञास अधिक लिहिणे न लगे...... पुण्याच्या सव्र्हट्स ऑफ इंडिया सोसायटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता चर्चा सत्रात ( २५, २६ सप्टेंबर १९८२ ) वाचलेला निबंध. ।। बलसागर ।। १०९ ________________

। । । । _- काश्मिर । अधिक हिरवे ! | बिहार वृत्तपत्र नियंत्रण विधेयकाविरुद्ध देशभर रान उसळले. सुरुवातीला या विधेयकाच्या बाजूने असणा-या इंदिरा गांधींनाही थोडे नमावे लागावे, विधेयकात काही त्रुटी आहेत हे मान्य करावे लागावे, हा विरोधी रान उसळल्याचा परिणाम म्हणावा लागेल . शक्यता अशी दिसते की, या विधेयकावर राष्ट्रपतींची सही होण्यापूर्वी त्यात बदल केले जातील. त्यातील वृत्तपत्र स्वातंत्र्यावर उघडउघड हल्ला करणाच्या तरतुदी मागे घेतल्या जातील व हा वणवा शांत करण्यात येईल; (हे। विधेयक आता पूर्ण मागेच घेतले गेले आहे! ) पण याच सुमारास काश्मिरचे पुनर्वसन विधेयक संमत होणाच्या मार्गावर असेल. या विधेयकाविरुद्ध वास्तविक बिहार विधेयकापेक्षा अधिक उग्र स्वरूपात लोकमत प्रकट व्हायला हवे आहे; पण हा मामला अद्याप तरी थंडच आहे. लेख येताहेत; पण बिहार विधेयकासारखी निकडीची जाणीव व तीव्र विरोधी भावना त्यात दिसत नाही. राजकीय पक्षांचीही विशेष हालचाल नाही. अशी हालचाल करू शकणारा विरोधी व अखिल भारतीय म्हणता येईल असा पक्ष सध्या एकच दिसतो - भाजप. कारण बाकीचे सगळेच विरोधी पक्ष आता प्रादेशिक बनले आहेत. पण भाजपही काश्मिर पुनर्वसन विधेयकाबाबत विशेष हालचाल करताना दिसत नाही. वास्तविक हा प्रश्न भाजपने जिव्हाळ्याचा मानायला हवा. कारण भाजप - जनसंघ अधिकच संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे, काश्मिर भारतात राहावा यासाठी बलिदान झालेले आहे ! इतर राज्यांप्रमाणेच काश्मिरही एक राज्य मानले जावे, यासाठी काश्मिरला स्वतंत्र व खास दर्जा देणारे घटनेतील ३७० हे कलम रद्द व्हावे ।। बलसागर ।। ११० ________________

म्हणन श्यामाप्रसादकालीन जनसंघाने चळवळ उभारली होती व शेवटी या चळवळीमुळेच श्यामाप्रसादांना आपले प्राण गमवावे लागले ! हे कलम अद्याप घटनेत आहे तेथेच आहे. हे कलम आहे तोवर भारत - काश्मिर सामिलीकरण पूर्णत्वास पोचले असे म्हणता येणार नाही. भारतीयांना काश्मिरात मालमत्ता खरेदी करून स्थायिक का होता येऊ नये ? संकल्पित काश्मिर पुनर्वसन विधेयकामुळे हा अधिकार, पाकिस्तानात पूर्वी निघून गेलेल्या काश्मिरच्या एके काळच्या रहिवाशांना मात्र दिला जाणार आहे. पूर्व पाकिस्तानातून किवा बांगला देशातून आसाममध्ये जसे पाकिस्तानी निर्वासित शिरले किंवा घुसवले गेले व आज ही संख्या डोईजड होण्याएवढी मोठी झाली, तसेच दहावीस वर्षानंतर काश्मिरबाबतही होण्याची दाट शक्यता आहे. प्रथम आझाद काश्मिरातून, नंतर पाकिस्तानच्या इतर प्रांतातूनही काश्मिरात हे तथाकथित निर्वासित येत राहतील, स्थायिक होतील व काश्मिर आज आहे त्यापेक्षाही भारतापासून अधिक दूर जाईल ! मुळातच शेख अब्दुल्लांची महत्त्वाकांक्षा नेपाळप्रमाणे काश्मिरचे स्वतंत्र राज्य व्हावे ही होती; पण टोळीवाल्यांनी आक्रमण केले. टोळीवाल्यांमागोमाग पाकिस्तानी सैन्यच काश्मिरवर चालून येण्याचा धोका निर्माण झाला म्हणून, अगदी नाईलाजाने शेख अब्दुल्लांना भारताकडे मदत मागावी लागली व तत्पूर्वी भारत-काश्मिर-सामिलीकरण-करारावर सही करावी लागली. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळेच तेव्हा काश्मिर वाचू शकले. शेखसाहेबांचे स्वतंत्र काश्मिरचे स्वप्न धुळीला मिळाले. या स्वप्नाचा अवशेष म्हणजे आपल्या घटनेतील ३७० कलम ! हा अवशेषही गेल्या तीस वर्षांत वास्तविक पूर्ण पुसला जायला, नाहीसा व्हायला हवा होता. त्याऐवजी संकल्पित पुनर्वसन विधेयकामुळे तो विस्तारित होण्याचाच धोका निर्माण झालेला आहे. हे विधेयक संमत झाले तर हेरगिरीसाठी याचा पाकिस्तानकडून दुरुपयोग केला जाईल हे तर खरेच; पण काश्मिर सोडून जे लोक पाकिस्तानात ३०।३५ वर्षांपूर्वी स्थलांतरित झाले, त्यांना एकाएकी पुन्हा काश्मिरात यायची ओढ लागण्याचे कारणच काय ? आणि ही ओढ मान्य करून त्यांना पुन्हा काश्मिरात परत आणायचे, तर मग हीच सवलत पाकिस्तानातून भारतात ढकलल्या गेलेल्या हिंदू - शीख निर्वासितांना का लाभू नये ? अनेक सिंधी भारतात स्थायिक झालेले आहेत, स्थिरावले आहेत; पण त्यांनाही आपल्या मूळ ठिकाणची आठवण होते, तेथे जावेसे वाटते, जमल्यास मालमत्ताही खरेदी करावीशी वाटते. जो न्याय काश्मिरला, जी सवलत काश्मिरातून पाकिस्तानात गेलेल्या निर्वासितांना, तीच सवलत, तोच न्याय पाकिस्तानातून भारतात ढकलल्या गेलेल्या हिंदू - शीख निर्वासितांनाही लागू केला जात असेल, तर उत्तमच बलसागर ।। १११ ________________

आहे. अशा निर्वासितांच्या जाण्यायेण्यामुळे भारत - पाकिस्तान जनतेतील दरावा कमी होईल व भारताची फाळणी ही किती कृत्रिम व अनैसर्गिक घटना होती हे उभय देशातील जनतेच्या लक्षात येऊन, ही ऐतिहासिक चूक सुधारण्याचा एखादा मार्ग भविष्यात केव्हा तरी खुला होईल; पण पाकिस्तानकडून असा प्रतिसाद सद्यःस्थितीत तरी अशक्य दिसतो. उलट अण्वस्त्रांचा वापर करून का होईना, काश्मिर पाकिस्तानला जोडण्याचे स्वप्नच पाकिस्तानी राज्यकर्ते अजूनही उराशी बाळगून बसलेले दिसतात. म्हणून पाकिस्तानी नागरिकांना काश्मिरात, म्हणजेच भारतीय भूभागात परत येऊ देणे, त्यांना स्थायिक होऊ देणे, त्यांना मतदानाचे वगैरे राजकीय हक्क देणे, म्हणजे काश्मिरचा आसाम करणे होय. सध्याच काश्मिरात बहुसंख्या मुस्लिमांची आहे. काश्मिर हे सरहद्दीवरचे राज्य असल्याने या बहुसंख्येचे प्रमाण मुळात कमी व्हायला हवे. तेथील हिंदू - शीख - बौद्ध - ख्यिश्चन वगैरे लोकवस्तीचे प्रमाण वाढायला हवे. आज बहुसंख्य काश्मिरी मुसलमानांना भारत हा आपला देश वाटत नाही. ते इंडियाला परका देश समजतात ही वस्तुस्थिती आहे ! केवळ आपले सैन्य तेथे तळ ठोकून आहे म्हणूनच काश्मिर भारतात आहे ! अशी आधीच नाजूक स्थिती असताना आणखी काही पाकिस्तानी नागरिकांची भर त्यात कशासाठी टाकायची ? म्हणून संकल्पित काश्मिर पुनर्वसन - विधेयकाविरुद्ध जोरदार चळवळ व्हायला हवी. इतकेच नाही तर घटनेतील ३७० हे कलम रद्द करण्यासाठी मागे झालेल्या चळवळीचे जोरदार पुनरुज्जीवनही व्हायला हवे. प्रादेशिक पक्ष हा उठाव करू शकणार नाहीत . सबंध दक्षिण भारत या प्रश्नाविषयी सध्या तरी उदासीन आहे. राज्यांना अधिक स्वायत्तता हवी अशी कम्युनिस्ट पक्षाची मागणी असल्याने व एकूणच भारत हे राष्ट्र नसून हा एक खंड आहे अशी या पक्षाची भूमिका असल्याने, या पक्षाकडूनही हा प्रश्न उचलला जाण्याची शक्यता कमीच. सत्तारूढ इंदिरा काँग्रेस पक्ष किंवा भाजप यापैकी कुणी तरी एकाने किंवा उभयतांनी सहकार्य करून, काश्मिर आहे त्यापेक्षा अधिक हिरवे करू पाहणारी ही वाटचाल रोखून धरायला हवी. इतर राज्यांना मुख्यमंत्री असतात. काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांना मात्र पंतप्रधान म्हणावयाचे ! काश्मिरी माणूस भारतात कुठेही स्थायिक होऊ शकतो, मालमत्ता खरेदी करू शकतो; पण एखाद्या तामिळी किंवा बंगाली माणसाला मात्र काश्मिरात हे हक्क नाहीत. हा भेदभाव संपला पाहिजे. त्यासाठी केवळ सध्या पुढे आलेले व संमत होऊ घातलेले पुनर्वसन - विधेयक रद्द होऊन भागणार ॥ बलसागर ।। ११२ ________________

नाही. घटनेतील ३७० हे कलमच काढून टाकायला हवे. राज्यांना अधिक स्वायत्तता हवी ही मागणी विचारार्ह आहे ; पण स्वायत्तता म्हणजे अलगपणाची वाटचाल नसावी. काश्मिरची वाटचाल अशी अलगपणाकडची आहे. म्हणून ती रोखून धरली पाहिजे. अगोदरच खूप उशीर झालेला आहे ! ऑक्टोबर १९८२ ।। बलसागर ।। ११३ ________________

खड्गहस्त.... 11 दक्षिणेकडे तेलगृदेशम् या पक्षाने मिळविलेल्या नेत्रदीपक व स्पृहणीय यशामुळे महाराष्ट्रातही प्रादेशिक पक्ष काढून सत्ता हस्तगत करावी, असे अनेकांना वाटू लागलेले आहे. समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. शरद पवार यादृष्टीने हालचाल करीत असावेत. त्यांना काही पत्र पंडितांचा, मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळत असावा; पण कावेरीचे पाणी वेगळे, मुळा मुठेचे, भीमा-इंद्रायणीचे पाणी वेगळे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्राने आजवर प्रादेशिक राजकारण केलेले नाही. अगदी इतिहास काळापासून महाराष्ट्राची राजकीय प्रवृत्ती अखिल भारतीय राजकारण करण्याची आहे. शिवाजी किंवा पहिला बाजीराव, त्यानंतर रानडे - गोखले - टिळक, नंतरचे सावरकर - आंबेडकर किंवा आजचे डांगे - एस. एम. जोशी – यशवंतराव चव्हाण वगैरे सर्व नेते देशाचे राजकारण करणारे होते -- आहेत. दिल्लीवर, अखिल भारतावर या नेत्यांचा प्रभाव पडला की नाही, ते किती प्रमाणात यशस्वी -अयशस्वी ठरले, हा प्रश्न वेगळा. पण या सगळ्यांची प्रवृत्ती, राजकीय बैठक अखिल भारतीय होती. दक्षिणेकडे, तामिळनाडू किंवा आंध्रप्रदेशातून अशी अखिल भारतीय राजकारणाची परंपरागत प्रवत्ती दिसून येत नाही. नादिरशहा किंवा अहमदशहा अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा महाराष्ट्रातून फौजा घेऊन जायची तशी काय आवश्यकता होती ? शिवाजीमहाराजांना सर्व दक्षिणेकडची सुभेदारी औरंजेबाकडून सहज मिळवता आली असती; पण त्यांना हवे होते हिंदवी स्वराज्य - दक्षिणोत्तर ।। बलसागर ।। ११४ ________________

सर्व हिंदचे राज्य ! हिंदूपदपातशाहीसाठी ते लढले, त्यांनी स्वत:ला राज्याभिषक करवून घेतला व त्यांचीच परंपरा पुढे पहिल्या बाजीरावाने, सदाशिवरावभाऊने चालवली. पानपतला दोन लाख मराठी बांगडी फुटली हे दुर्दैव; पण यश किंवा अपयशापेक्षा या युद्धामागची मराठी प्रेरणा महत्त्वाची ! संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला प्रथम गेल्यावर, म्हणूनच, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्यांना आजही, पानपतची धूळ मस्तकी लावावीशी वाटते. अशी ऐतिहासिक प्रेरणा ही अखिल भारतीय राजकारण करण्याची प्रवृत्ती दक्षिणेकडे मुळातच कमी आढळते. म्हणूनच आंध्रमध्ये रामाराव चटकन पुढे येतात, विजयीही होतात ! प्रांतिक भावनांना अनुकूल असे वातावरण तेथे तयारच असते. महाराष्ट्रात ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद असला, दलित - अदलित भेद असले तरी द्रविड मुन्नेत्रसारखी चळवळ येथे कधीच उभी राहिलेली नाही. या अर्थाने सावरकरांनी महाराष्ट्राला भारताचा खड्गहस्त म्हटलेले आहे. आपापल्या प्रांतापुरते राजकारणच देशात यापुढे वाढणार असेल तर भारतीय राजकारणाचा विचार कोण करणार ? देशासमोरील राजकीय - आर्थिक संकटांच्या सोडवणुकीसाठी कोण पुढे सरसा वणार ? आसामचा प्रश्न आंध्र - तामिळनाडूला आज स्पर्श तरी करताना दिसतो का ? तसाच काश्मिरचा प्रश्न. या प्रश्नाची त्वरित सोडवणूक झाली नाही, तर तेथे दुसरा आसाम तयार होईल ! चीन - पाकिस्तानच्या सीमा काश्मिरला भिडलेल्या आहेत. अमेरिकेला तळ हवेच असतात. एकदा येथले उरलेसुरले हिंदू भारतात हाकलले की, काश्मिरचे आसामच काय, पॅलेस्टाइन करायलाही सगळे मोकळे ! प्रादेशिक पक्षांचा आवाकाच मर्यादित असतो. काश्मिर - आसामसारखे किवा नाणेनिधी कर्जासारखे भारतव्यापी प्रश्न या आवाक्यात बसूच शकत नाहीत आणि हे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे असतात, जितके बेळगाव - कारवारसारखे किंवा पाणी - वाटपासारखे प्रश्न असतात. म्हणून इतरत्र जरी प्रादेशिक पक्ष, आपापल्या राज्यापुरते असलेले राजकारण डोके वर काढत असले तरी महाराष्ट्राने या लाटेत बुडून जाणे, हे आजवरच्या इतिहास परंपरेशी विसंगत। ठरणार आहे. महाराष्ट्राचे खास प्रश्न आहेत, त्यांच्याकडे लक्ष पुरविले गेले पाहिजे यात वाद नाही; पण हे प्रश्न अखिल भारतीय चौकटीतच सोडवण्याची आजवरची महाराष्ट्रीय नेतृत्वाची शिकवण आहे. मग तो काळ शिवाजीचा असो की नेहरूंचा. हा वारसा महाराष्ट्राने सोडू नये. महाराष्ट्राला राष्ट्रीय प्रवाहाची मुळातच ओढ आहे. या व्यापक प्रवाहाचे विस्मरण झाले तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र तरी राहील का ? असा काही काळ जातो की ।। बलसागर ।। ११५ ________________

खड्गहस्त हा नावापुरताच खड्गहस्त राहतो. तरीपण कुणी हस्तच छाटून टाकीत नाही. प्रादेशिकतेच्या प्रवाहात वाहून जाणे हे असे हात छाटून टाकण्यासारखे आहे. महाराष्ट्रात तरी अशा अविचाराला वाव मिळू नये. राष्ट्रीय प्रवाहाचे विस्मरण निदान महाराष्ट्राला तरी न व्हावे. जानेवारी १९८३ ।। बलसागर ।। ११६ ________________

| रा. स्व. संघाचे महाशिबिर विधायक कार्य आणि मूलभूत कार्य या दोन वेगळ्या संकल्पना आहेत . विधायक कार्याचा भर मुख्यत: आर्थिक - सामाजिक विकासावर आहेशाळा काढणे, रस्ते - विहिरी खोदणे, शेती - ग्रामोद्योगांची प्रगती साधणे, याला सर्वसामान्यपणे विधायक कार्य असे म्हटले जाते. याउलट मूलभूत कार्य म्हणजे व्यक्तीचा विकास घडवणे. माणूस हा मुख्यतः स्व-केन्द्रित प्राणी आहे. या मनुष्यप्राण्याच्या 'स्व'चा परिघ वाढवणे, माणसाला आपल्या स्वार्थाच्या, अप्पलपोटेपणाच्या, वैयक्तिक संकुचित जीवनाच्या कोशातून बाहेर काढून, त्याला व्यापक सामाजिक-राष्ट्रीय व अंतिमतः मानवीय हिताच्या प्रवाहात आणणे, हे मूलभूत कार्याचे वैशिष्ट्य असते. | रा. स्व. संघ असे जाणीव-विकसनाचे मूलभूत कार्य करतो असे संघ संस्थापनेपासून सतत सांगितले जात आहे. | पुण्याला पुढच्या आठवड्यात भरणा-या रा. स्व. संघाच्या महाशिबिराचा उद्देशही काही वेगळा नाही, असे संघ–प्रमुखांनी नुकतेच एका पत्रकार - परिपदेत सुस्पष्टपणे सांगितले आहे. रा. स्व. संघाचे प्रांत-संघचालक मा. बाबाराव भिडे यांच्या शब्दात सांगायचे तर “माणूस चांगला करणे हेच रचनात्मक काम आहे असे संघ मानतो. ते काम वाढवायचे असेल तर संघाचे काम वाढले पाहिजे. याच उद्देशाने १४-१५-१६ जानेवारीला पुण्यात पर्वतीपाठीमागच्या पठारावर, महाराष्ट्र प्रांताचे हे भव्य शिबिर आयोजित केले आहे. (तरुण भारत, २९ डिसेंबर १९८२ ) । बलसागर ।। ११७ ________________

जाणीव विकासाचा मूलभूत पाया जर व्यवस्थित घातला गेला असेल तर विधायक कार्याची उभारणी किती निर्दोष व अल्प कालावधीत होऊ शकते याचे उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा विकास प्रकल्प हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. | या गोंडा विकास प्रकल्पाची माहिती देणारी एक लेखमालाही पुण्याच्या तरुण भारतने याच सुमारास प्रसिद्ध केली आहे. लेखक कृष्णा जोशी. | गोंडा हा नेपाळ-सीमेलगतचा अगदी मागासलेला व डोंगराळ मुलुख. नाजी देशमुखांनी आपल्या दीनदयाळ शोध संस्थानच्या वतीने या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला व जनता पक्षाच्या राजकारणातून निवृत्त झाल्यावर त्यांनी आपली सर्व शक्ती या विकास प्रकल्पावर केन्द्रित केली. शेकडो कार्यकर्ते ग्रामोदयाचे स्वप्न साकार करण्यासाठी येथे आज झपाटून काम करत आहेत. उत्तर प्रदेश किंवा केन्द्र सरकारलाही गेल्या ३५ वर्षात जे करून दाखवता आले नाही ते, या कार्यकत्यांच्या प्रयत्नामुळे, अवघ्या पाच वर्षांत तेथे उभे राहू शकले आहे. अनेक जाणकारांनी हा नवनिर्माणाचा, विधायक कार्याचा प्रयोग आजवर पाहिलेला आहे व आपले अनुकूल अभिप्राय नोंदवलेले आहेत. भारत सरकारच्या कृषिमंत्रालयद्वारा संचालित राष्ट्रीय विकास संस्थेने, डिसेंबर १९८० मध्ये एक समिती गोंडा प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी नेमली होती. समाजकार्यासाठी असलेले १९८२ सालचे नेहरू पारितोषिक ज्यांना देण्यात आले ते श्री. प्रेमजीभाई या समितीचे निमंत्रक होते. श्री. प्रेमजीभाई यांनी जानेवारी ८१ मध्ये राष्ट्रीय विकास संस्थेच्या चिटणिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, “गरिबी हटवण्यासाठी मागास प्रदेशात जलसिंचन योजना राबवून कृषिउत्पादन अगदी अल्पकाळात कशा प्रकारे वाढविता येईल याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शासन व स्वयंसेवी संघटनांच्या सहकार्यावर साकार झालेले गोंडा जिल्ह्यातील प्रकल्प. राष्ट्रीय विकास संस्थेने दिलेले आर्थिक साहाय्य मामुलीच होते; पण अर्थवितरण संस्थांनी सुमारे १२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले व त्यामुळे २७ हजारांहून जास्त कूपनलिकांद्वारा अडीच लाख एकर जमीन लागवडीखाली आली व दोन हजार आठ गावातील पंचाण्णव हजार किसानांना त्यांचे आर्थिक दारिद्रय दोन-अडीच वर्षात दूर करता आले." बी. जी. व्हर्गिज हे या विषयातले एक तज्ज्ञ पत्रकार मानले जातात. इंडियन एक्स्प्रेसच्या (दिल्ली) २५ व २६ नोव्हेंबर ८१ या अंकात त्यांनी दोन लेख या गोंडा प्रकल्पावर लिहिले आहेत. ते म्हणतात, दीनदयाळ शोध संस्थानने कूपनलिका खोदल्या नाहीत. त्यांनी जनतेला प्रवृत्त केले, प्रेरणा दिली व किसानांना शासन व वित्तीय संस्थांद्वारा मिळणाच्या सवलती व कर्ज यांचा फायदा घेऊन कुपनलिका बसवून घेण्यास मदत केली. अशा प्रकारच्या प्रेरक संघटनांची आवश्य । बलसागर ।। ११८ ________________

कता आता अधिकच भासते. कारण या अगोदर अशा प्रकारची प्रगती जवळपासच्या कोणत्याही प्रदेशात घडल्याचे उदाहरण उपलब्ध नाही. लोखंडाऐवजी बांबू वापरून, कुपनलिकांचा खर्च परवडू शकला. त्यामुळे धान्योत्पादन वाढले. दोन-दोन पिकेही शेतकरी घेऊ लागले आणि त्यामुळे गरिबी हटवण्याचा किसानांचा मार्ग मोकळा झाला.' ‘ब्लिट्झ'चे आणि नानाजी देशमुखांचे सख्य विचारायलाच नको ! तरी पण या साप्ताहिकाच्या १५ ऑगस्ट १९८१ या अंकात असा उल्लेख आढळतो-“गोंडा प्रकल्प हाती घेतल्यापासून नानाजी देशमुखांनी मागे कधी वळून पाहिलेच नाही. केन्द्रीय मंत्रिमंडळात उद्योगमंत्र्यांची जागा देऊ केली असता त्यांनी अव्हेरली त्यांचे ध्येय, गोंधळून गेलेल्या व फसगत झालेल्या समाजाला विश्वास प्राप्त करून देणे व पटविणे की, राजकीय पक्ष वा नोकरशाही आपल्या उन्नतीसाठी काही करतील असे समजणे चुकीचे असून भारताचे उज्ज्वल भवितव्य स्वतः प्रत्येक नागरिकांच्या हाती आहे. | पण गोंडा जिल्हा प्रकल्पासारखी कामे रा. स्व. संघ पुरेसा वाढला नसताना, समजा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच हाती घेता आली असती का ? त्यावेळी संघाला अनेकांनी तसे सुचविले होते. कोणी संघाने राजकारणात भाग घ्यावा असाही आग्रह चालवला होता. संघ-स्वयंसेवकातही खूप चलबिचल होती. बंदीकाळातून संघ नुकताच बाहेर पडला होता. अनेक क्षेत्रे खुणावीत होती, पण सरसंघचालक गोळवलकरगुरुजी अगदी निश्चयात्मक बुद्धीने सांगत होते | | चार वर्षांपूर्वी प्रवास करीत असता मी बिहारमध्ये गेलो होतो. तेथे स्वयंसेवक नसलेल्या काही सज्जनांशी बोलण्याचा योग आला. त्यात काँग्रेसचे एम. एल. ए. देखील होते. त्यांनी व त्यांच्या मित्रांनी असा प्रश्न विचारला की, तुम्ही अनेक तरुण एकत्रित करता तर त्यांच्याकरवी काही विधायक कार्य का करीत नाही ?' मी त्यांना सांगितले की, “ आपल्या समाजात, संस्कारपूर्वक समष्टीपरायणता उत्पन्न करून, तरुणांच्या अंत:करणात एकात्मभाव निर्माण करून, एक सुव्यवस्थित, व्यक्तिव्यक्तीच्या हृदयातील समष्टिपरायणतेच्या आधारावर स्थित अशी संघटनात्मक रचना उभी करणे हे विधायक कार्य नाही काय' ?" संघ स्वयं सेवकांसमोर २०।१०।४९ या दिवशी केलेल्या भाषणातील हा उतारा आहे. या भाषणात गुरुजींनी पुढे म्हटले आहे : | " गेली ५० वर्षे आपल्या देशात ‘कन्स्ट्रक्टिव्ह वर्क'चा घोष होत आहे. पण विचार केला तर असे दिसून येते की, कन्स्ट्रक्शनपेक्षा डिस्ट्रक्शनच जास्त झालेले ।। बलसागर ।। ११९ । ________________

आहे. कारण, पहिली रचना माणसाची करावयास पाहिजे. तिकडे दुलक्ष करण्यात आले. जवळ पैसा मुळीच नाही तरीही घर बांधण्याचा विचार करण्यासारखेच हे अव्यवहार्य आहे. जर व्यवस्थित, सुसंघटित अनुशासनबद्ध शक्ती असेल, संघटनेचे घटक केवळ दक्ष-आरामाशिवाय इतरही अनेक गोष्टी आपल्या बोलण्यातून आणि आचरणातून समाजाला शिकविण्याकरिता समर्थ असतील, म्हणजेच हे पहिले कन्स्ट्रक्शन नीट झाले असेल तरच तथाकथित इतर कार्ये होऊ शकतील." - हे ‘पहिले कन्स्ट्रक्शन नीट झाले' असे केव्हा समजायचे? संघाजवळ भरपूर मनुष्यबळ आहे वगैरे, इतरांच्या काहीही कल्पना असल्या तरी श्री गुरुजी या तथाकथित संख्येविषयी फारसे समाधानी नसावेत. ते अध्यात्मवादी असले तरी संघटनेच्या व्यावहारिक स्थितीसंबंधीची त्यांची कल्पना पूर्ण वास्तववादी होती. म्हणून या भाषणाच्या शेवटी त्यांनी स्वयंसेवकांना निर्वाणीच्या शब्दात सांगितले: | " आज संघाची आपणाला जी प्रतिष्ठा दिसते ती बरीचशी काल्पनिक आहे. वृत्तपत्रांनी निर्माण केलेली आहे.लोक समजतात की, संघाजवळ अपरंपार मनुष्यबळ व सामर्थ्य आहे. जनतेची संघाविषयीची अपेक्षाही स्वभाविकत:च फार मोठी आहे. पण एकीकडे ही अपेक्षा एवढी मोठी झाली आहे, तर दुसरीकडे कार्याचे स्वरूप प्रत्यक्ष घटले आहे. दोन वर्षांपूर्वीची संख्या, कार्याचा जोम, वातावरण, प्रचारक वगैरे गोष्टींशी तुलना केली असता कार्याचा प्रत्यक्ष प्रभाव कमी झालेला आहे असेच म्हणावे लागेल. मध्यंतरीची स्थिती लक्षात घेता (बंदोकाल) यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही; परंतु दोन वर्षांपूर्वी थांबलेला प्रवाह पुन्हा परिपूर्ण गतीने वाढू लागण्याची आज किती पराकाष्ठेची आवश्यकता आहे याचा विचार करा. एक विशिष्ट प्रकारची संघटनेची व्यवस्था उत्पन्न होईपर्यंत समाजसेवेची अन्यान्य कार्य होऊ शकत नाहीत हे जाणून, त्या मर्यादेपर्यंत पोचण्याचा कसोशीचा प्रयत्न आज आवश्यक आहे. त्या मर्यादेकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या बोलण्याने, कृतीने, व्यवहाराने व चारित्याने सर्वत्र हा भाव निर्माण केला पाहिजे की, समाजसेवा करण्याची पात्रता कोणात असेल तर ती यांच्यात आहे. हे कार्य जर नसेल तर अखंड राष्ट्ररूपाने समाज उभा कसा राहू शकेल? अशी व्यापक भावना आपल्या संपर्काने समाजात उत्पन्न केली, कार्याला प्रतिष्ठा मिळविली तरच अन्यान्य समाजसेवेच्या कार्याचा विचार करणे योग्य होईल. आज आपली जी स्थिती आहे तिचा विचार करता, कार्याची योग्यता विशिष्ट मर्यादे. पर्यंत नेण्याऐवजी, भिन्न भिन्न समाजकार्याचाच अंगिकार करीत बसणे मला तरी सर्वस्वी अयोग्य वाटते. जनतेची अपेक्षा, आपल्या योग्यतेविषयीची कल्पना, शतगुणित झालेली आहे, तर इकडे कार्याची अवस्था घटलेली आहे. अशा ।। बलसागर ।। १२० ________________

स्थितीत आपण कार्ये घेऊन समाजरचना करू शकू, या गोष्टी व्यर्थ होत. जर आपण सारी शक्ती लावून अगर सा-या लहानसहान गोष्टी बाजूला सारून, आपल्या पद्धतीने तेजस्वी, प्रतिष्ठासंपन्न, प्रभावी व व्यापक कार्याची उभारणी शीघ्रातिशीघ्र केली नाही तर मी निश्चयपूर्वक आपल्याला सांगतो की, वुई हँव नो फ्यूचर, अॅब्सोल्युटली नो फ्यूचर... अर्थात् आपणास भविष्यकाळ नाही...मुळीच नाहो ! इतर प्रांतातूनही मी हेच सांगत आलो आहे व आपणालाही हेच सांगू इच्छितो.” (श्रीगुरुजी समग्र दर्शन, खंड - दोन) आता ४९-५० सालासारखी स्थिती राहिलेली नाही. संघकार्य वाढतच गेले व जसजसे ते वाढले तसतसा संघाने समाजसेवेच्या ‘अन्यान्य' क्षेत्रातही प्रवेश केला व त्यावर आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उठवला. कुठे गोंडा जिल्हा प्रकल्प आहे, कुठे कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र आहे. आदिवासी क्षेत्रात कल्याण आश्रमासारखी संस्था कार्य करीत आहे. रायपूरजवळ चांपा येथे एक महारोग निवारण केंद्रही चालू आहे. गोंडा जिल्हा प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रात काम उभे करावे असा काही मंडळींचा विचार आहे व मागासलेला बीड जिल्हा त्यांना खुणावत आहे. असे चहूदिशांनी, चहुबाजूंनी संघकार्य फोफावते आहे, वाढते आहे. वटवृक्ष विस्तारतो आहे. हा विस्तार मुळ संघकार्यावर, म्हणजे दैनंदिन शाखांवर, तेथे घडणा-या राष्ट्रभक्तीच्या संस्कारांवर अवलंबून आहे, हे उघड आहे. हे मूळ हरवले, तर रा स्व. संघाची, काँग्रेस किंवा सर्वोदयवाद्यांचा सर्व सेवा संघ होण्यास कितीसा वेळ लागणार? 'अन्यान्य क्षेत्रातील कार्य उभे राहिले तरी ते वाढविण्यासाठी, नवनवीन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी, चारित्र्यसंपन्न कार्यकर्त्यांचा पुरवठा सतत व्हावा लागणारच. हे कार्यकर्ते घडविण्याचे, व्यक्तिगत व सार्वजनिक चारित्यनिर्मितीचे कार्य संघशाखा देशभर करीत आहेत. हे मूलभूत कार्य आहे. हे भक्कम असेल तर गोंडा जिल्हा प्रकल्पासारखी विकासकार्ये हा हा म्हणता उभी राहू शकतात. हे मूलभूत कार्य महाराष्ट्रात किती प्रमाणात पूर्ण झाले आहे? पुण्याला उपरोक्त काळात होणा-या संघशिबिरावरून त्याची थोडीफार कल्पना सर्वांना येऊ शकेल. पूर्वी खेडेगावात शेकडा एक व शहरभागात शेकडा तीन टक्के कार्यकर्ते हवेत असे गणित संघात मांडले जाई. मर्यादा गाठायची तर अजूनही संघाला खूपच वाटचाल केली पाहिजे. ही वाटचाल लवकर पूर्ण होवो व ‘बलसागर भारत' उभा करण्याचे संधस्वप्न लवकर साकार होवो ! जानेवारी १९८३ ।। बलसागर ।। १२१ ________________

श्रीगुरुजी | सत्तेपासून अलिप्त असणारा पण सत्तेवर अंकुश ठेवू शकणारा यतीवर्ग ही भारतीयांची राजकारणातली, समाजरचनेतली एक प्राचीन काळापासून चालत आलेली आवडती कल्पना आहे. या कल्पनेचा पुरस्कार अलिकडच्या काळात गांधीजींनी केलेला असला तरी ही कल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्यासाठी कुणी पराकाष्ठेचे प्रयत्न केले असतील तर ते श्री. गोळवलकर गुरुजी यांनी. काँग्रेसचे लोकसेवक संघात रूपांतर व्हावे अशी गांधीजींची अखेरची इच्छा होती. हे लोकसेवक म्हणजे सूत कातत बसणारे कुणी निरुपद्रवी प्राणी राहावेत असे गांधीजींना खासच वाटत नव्हते. खेडोपाडी, जेथे कुठे अन्याय आणि अनाचार, हिंसा आणि अत्याचार यांची परिसीमा झाली असेल तेथे या लोकसेवकांनी धावून जावे, लोकांना प्रतिकाराचे शिक्षण द्यावे, उद्योगाला लावावे, * शहाणे करून सोडावे ! सकळ जन' अशीच त्यांची या लोकसेवकांकडून अपेक्षा होती. म्हणन सत्ता पायाशी लोळण घेत असतानाही शेवटी त्यांनी नौआखलीचा मार्ग पत्करला. दुरून सत्तेवर अंकुश चालवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसची वाढ प्रथमपासून अशी होत आलेली होती की, सत्तास्थानापासून दूर राहणे बहुसंख्य काँग्रेसजनांच्या प्रवृत्तीत बसणारे नव्हते. त्यामुळे गांधीजींचा लोकसेवक संघाचा आदर्श कागदावरच राहिला, कुणाही प्रथम श्रेणीच्या काँग्रेसजनाने सत्ता सोडून लोकसेवकाचा कंटकाकीर्ण मार्ग स्वीकारला नाही. सतेच्या केन्द्राकडे बहुसंख्य लहानथोर गांधीवादी इतक्या वेगाने धावत सुटले, की 'सेवा' हा शब्द लवकरच या वर्तुळात एक टवाळीचा विषय ठरला. विधायक कार्यकर्त्यांना उद्देशून वल्लभभाईंनीच म्हटले ।। बलसागर ।। १२२ ________________

होते की, या सर्व गांधीजींच्या विधवा आहेत. नेहरूंना तर या गांधी कल्पनेचे वल्लभभाईइतकेही आकर्षण नव्हते. त्यामुळे सर्व सेवा संघ किंवा इतर सर्वोदयी संस्था यांच्या रूपाने गांधीप्रणित लोकसेवक संघाचे काही पुसटते दर्शन घडत असले तरी प्रत्यक्षात गांधीजींबरोबरच गांधीजींच्या लोकसेवक संघाचे अस्तित्वही संपले असे मानावयास हरकत नाही. श्री. गोळवलकर गुरुजींशिवाय अखिल भारतात अन्य कुणीही या आदर्शाच्या जवळपास पोचणारी व्यापक आणि मजबूत सेवा संघटना आजवर उभी करू शकलेला नाही. या दृष्टीने वरवर पाहता वेगवेगळ्या वाटणा-या या दोन प्रवाहांचा संगम घडून येण्यासारखा आहे. गुरुजींनी गांधीजींच्या कल्पनेचे उघडउघडच स्वागत केलेले होते. हळूहळू श्रेष्ठ कर्तृत्वाची माणसे संघकार्यातून मोकळी करून समाजजीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात स्वतंत्र कार्य करण्यासाठी सोडून दिलेली होती. या व्यक्तींवर व त्यांनी उभारलेल्या कार्यावर गरुजींची संघविचारांची छाप अवश्य होती. पण यापलिकडे वर्चस्व गाजविण्याची, सत्ता लादण्याची धडपड संघाकडून होत होती हा आरोप, ज्यांना संघविद्येतला ओनामाही कळला नाही असेच महाभाग करू शकतात. श्यामाप्रसादांना त्यांनी जनसंघ स्थापनेसाठी प्रवृत्त केले. काही कार्यकर्ते त्यांना दिले. यापलिकडे सत्तेच्या उलाढालीत त्यांना फारसा रस नव्हता. उलट पंजाबमधील भाषिक प्रश्न, चातुर्वण्य, भाषावर प्रांतरचना इत्यादी विषयांवर त्यांनी अशा भूमिका प्रकटपणे घेतल्या की, जनसंघ अडचणीतच यावा. पण गुरुजींना याची पर्वा नव्हती. कारण कुठलीही राष्ट्रवादी सत्ता त्यांना मान्य होती. राष्ट्रजीवनाचा एकूण स्तर आपल्या शाखोपशाखांद्वारे उंचावणे हे त्यांनी आपले जीवनकार्य मानले होते व यातूनच एक समर्थ, शक्तिसंपन्न भारत उभा राहील, प्राचीन वैभव या भूमीला लाभेल अशी त्यांची श्रद्धा होती. सत्ता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हाती घेऊन हे साधण्यापेक्षा सत्तेवर संस्कारसंपन्न व्यक्ती व गट आणून आपण आर्य चाणक्याप्रमाणे किंवा विद्यारण्यांप्रमाणे निवृत्त व्हावे, एकेका जबाबदारीतून मुक्त व्हावे असा त्यांचा स्वाभाविक कल होता. संघस्वयंसेवकांमध्येही अशाच स्वरूपाचे संस्कार दैनंदिन शाखांतून होत होते. 'पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते–' सत्ताभाव जागृत करणारी ही संघप्रार्थना नाही. गांधीजींप्रमाणेच 'नाहं कामये राज्यम्' या प्रवृत्तीचे गुरुजी । एक यती होते. यतीवर्गाने निष्काम कर्माचरणाने समाजधारणा करावी, हा प्राचीन भारतीय आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. हा आदर्श गुरुजींच्या उत्तराधिका-यांनी जोपासला, वाढवला तर गांधीजींना जे जमले नाही, परिस्थितीमुळे त्यांना जे अपयश आले, ते धुवून काढण्याची एक ऐतिहासिक संधी संघाला लाभेल, जगासमोर दंडहीन समाजक्रांतीचा एक नवाच प्रयोग उभा राहील. ।। बलसागर ।। १२३ ________________

हा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध आहे. राजसत्तेच्या विस्ताराची हद्द झाली आहे. सामाजिक आणि सांस्कृतिकच केवळ नव्हे, वैयक्तिक जीवनाचे नियंत्रणही राजसत्तेकडे गेलेले आहे, आपणहून लोक ही पुरोगामी गुलामगिरी स्वीकारीत आहेत. जयप्रकाश या प्रवृत्तीला समाजवाद न म्हणता राज्यवाद म्हणतात. विनोबांनी हा रावण वाढतो आहे अशी भीती व्यक्त केली आहे. हा एक गांधीजी आणि गुरुजी यांच्या परंपरेतील समान धागा आहे. हा जोडला गेला तर आज बोकाळलेले नैराश्य आणि वैफल्य काही प्रमाणात नक्कीच दूर होऊ शकेल. श्रीगुरुजींना यापेक्षा अधिक अर्थपूर्ण श्रद्धांजली कोणती असू शकते ? जून १९७३ एक चर्चा गुरुजींनंतरचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुधीर बेडेकर , संपादक तात्पर्य मासिक, पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक गोळवलकर गुरुजी या दोन गोष्टी गेली कित्येक वर्षे एकमेकांपासून वेगळ्या काढताच येत नसत. डॉ. हेडगेवार याच्यानंतर गुरुजींनीच आपले परिश्रम, संघटनाकौशल्य आणि एकाग्र निष्ठा ओतून संघ जोपासला आणि वाढवला. त्यांच्या निधनानंतर संघाचा, त्याच्या कार्याचा आणि भविष्याचा वेगळा विचार होऊ लागल्याचे दिसते आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणहन मांडले गेलेले विचार पहाण्यासारखे आहेत. ‘माणूस' चे संपादक श्री. श्री. ग. माजगावकर यांनी 'माणूस' १६ जून १९७३ या अंकात संघाच्या पुढील ध्येयधोरणाला दिशा दाखवणारा (वरील) लेख लिहिला आहे. श्री. श्री. ग. एकेकाळी संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना संघाची विचारप्रणाली, रचना आणि कार्य यांची चांगली माहिती आहे. संघाची शक्ती कशात आहे आणि दुबळेपण कशात आहे हेही ते जाणतात. अत्यंत सुसंघटित, शिस्तबद्ध ।। बलसागर ॥ १२४ ________________

असा निष्ठेच्या कार्यकर्त्यांचा एक संच ही संघाची ताकद आहे-सर्वोदय वगैरे संघटना किंवा बहुतेक राजकीय पक्ष यांच्यामध्ये नेमके हेच दिसत नाही. अशावेळी मजबूत संघटना ही एक शक्ती आहे हे खरेच, पण नुसती संघटना असून पुढे काय ? आज देशापुढे जे प्रश्न आहेत, समाजाचे मुळापासून परिवर्तन घड. वण्याचे काम आहे त्याचे काय ? त्याकरता परिवर्तनाला सुसंगत असे विचार, निश्चित कार्यक्रम व त्यानुसार कृती ह्या गोष्टी संघाकडे आहेत काय ? तसे नाही असे श्री. गं. ना जाणवते आहे. कारण ते जगात आज काय चालले आहे हे उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. कृषिप्रधान चीनने स्वत:च्या देशाच्या उन्नतीकरता चालवलेल्या भव्य प्रयोगाचे महत्त्व त्यांना कळले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे प्रत्यक्ष जनसमूह जागे होऊन सामूहिकपणे समाज बदलत असतात हा धडा त्यांनी घेतला आहे. जनसमूह उठवण्याकरता व प्रगतीचा शास्त्रशुद्ध कार्यक्रम राबवण्याकरता जे लागते ते संघामध्ये नाही हा दुबळेपणा त्यांना स्पष्ट दिसतो आहे. आणि म्हणून त्यांनी खालीलप्रमाणे उपाय सांगितलेला आहे. सत्तेपासून पूर्ण अलिप्त राहून, निष्काम वृत्तीने समाजपरिवर्तन करणारा एक यतीवर्ग ही संघाची बैठक आहे. गांधीजींनी जेव्हा काँग्रेसचे लोकसेवादलात रूपांतर करावे अशी कल्पना मांडली ती हीच होती. पण गांधीवादी सत्तेच्या मागे लागले व है। स्वप्न साकार झाले नाही. हे अपयश धुवून काढून, जगासमोर ‘दंडहीन समाजक्रांतीचा एक नवाच प्रयोग उभा करण्याची ऐतिहासिक संधी संघाला आहे असे ते म्हणतात. संघटना, समाजपरिवर्तनाच्या दिशेने कृती आणि राजसत्तेपासून अलिप्तता ही त्रिसूत्री संघाने मानावी हा याचा अर्थ आहे. त्याला ते संघ व गांधीवाद यांचा मेळ घालणे म्हणतात. नव्या सरसंघचालकांचे भाषण । | १३ जुलैच्या प्रज्वलंत साप्ताहिकात नवे सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरस यांच्या, १५०० संघ कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणाचा वृत्तांत आहे. ते म्हणतात की, (१) लोकांच्या टीकेमुळे संघकार्यकत्र्यांनी वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करायला लागले पाहिजे. (२) संघाने सामाजिक समस्या सोडवण्याबाबत भरीव कार्य करून जनतेच्या संघाकडून असलेल्या अपेक्षा पुन्या केल्या पाहिजेत. (३) राजसत्तेशी संघर्ष घेणे संधाला मान्य नाही. कारण कोणत्याही पक्षाचे शासन असले तरी शेवटी ते राज्य आपलेच आहे अशी आमची धारणा आहे. आम्ही फक्त वाईटाविरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती समाजात आणू बघतो. यावरून हे स्पष्ट आहे की, श्री. गं. नी सांगितलेला मार्ग संघाच्या नव्या ।। बलसागर ।। १२५ ________________

नेतृत्वाला पूर्णपणे मान्य आहे ! फरक फक्त तपशिलाचा पडला तर पडेल. मग खरोखरच संघ ‘दंडहीन समाजक्रांती'चा भव्य प्रयोग करू शकेल काय ? | या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी गोष्ट : संघचालकांनी केलेला दावा व श्री. गं. नी संघाला सत्तेपासून अलिप्ततेचे जे प्रशस्तीपत्रक दिले आहे ते योग्य आहे। काय ? जनसंघाची श्यामाप्रसादांकरवी स्थापना, त्यांना पुरवले जाणारे कार्यकर्ते, संघाचे स्वयंसेवक निवडणुका व इतर राजकीय कृतींमध्ये घेत असलेला भाग हे। मग कशाकरता ? श्री. गं. नीच याचे उत्तर दिले आहे ! ‘सत्ता प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हाती घेण्यापेक्षा सत्तेवर संस्कारसंपन्न व्यक्ती व गट आणून ' आपण आर्य चाणक्याप्रमाणे निवृत्त व्हावे असा गुरुजींचा कल होता व स्वयंसेवकांना तसेच शिकविले जाते असे त्यांनी लिहिले आहे. याचा अर्थ संघाला सत्तेत रस नाही असा होतो का ? आपल्या मतांची व धोरणांची माणसे व गट सत्तेवर यावीत असेच हे धोरण नाही का ? | तेव्हा संघ सत्तेपासून अलिप्त नाही. फक्त त्यांनी निवडणुकांमधून मते मिळवण्याचे काम जनसंघावर सोपविले आहे आणि 'दंड' ते स्वतः शाखाशाखांवर तयार करत आहेत. मते आणि दंड मिळूनच सत्ता होत असते. | पण समजा सत्तेपासून संघाला अलिप्त रहायचे आहे असे गहित धरू. संघ श्री. ग. म्हणतात तशी समाजक्रांती कधीतरी करू शकेल का ? आमच्या मते हे अशक्य आहे. याला दोन कारणे आहेत ती खाली सविस्तर मांडली आहेत. राजसत्तेच्या प्रश्नाचे महत्व एक तर मुळातच दंडहीन, सत्तानिरपेक्ष समाजक्रांती असे काही अशक्यच आहे. ती शक्य आहे असे मानणारी गांधीजी वा श्री. गं. सारखी मंडळी एक चूक करत असतात. शासनसत्ता ही समाजाच्या वर, पलीकडे अशी काही आहे ही त्यांची समजूत असते. त्यामुळे तिला टाळून, तिची पाठ फिरलेली असताना वा तिच्या नजरेसमोर, “समाजातल्या समाजात बदल घडवून आणता येईल असे त्यांना वाटते. पण हे बरोबर नाही. आज आपल्या देशात कोणते क्षेत्र असे आहे की जेथे शासनाचा संबंध येत नाही ? शेती तुम्ही शासनाला टाळून सुधारू शकता का ? एक-दोन गावात वा तालुक्यात शकालही. पण देशभरची शेती सुधारण्याकरता ट्रॅक्टर, खते, कर्ज, पाणी ह्या गोष्टी पुरवायच्या तर त्याचा संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंध नाही का ? आणि अर्थव्यवस्थेमध्ये बदल करायचा तर तिची सुत्रे तुमच्याकडे नकोत का ? देशात पोलाद किती व्हावे हे शासन ठरवणार नाही तर कोण ठरवणार ? परिवर्तनाच्या कार्यक्रमात प्रस्थापित हितसंबंध असलेले सधन ।। बलसागर ।। १२६ ________________

वर्ग मोडता घालतात तेव्हा त्यांच्या डोक्यात घालायला ‘ दंड' तुमच्याकडे नको काय ? शासन हे समाजांतर्गत चालणा-या प्रक्रियांमध्येच गुंफलेले असते. चाल व्यवस्था तगवण्याचे ते एक हत्यार असते; ती तुम्हाला बदलायची असेल तर या हत्याराविषयी उदासीन राहून चालणार नाही. वरिष्ठ वर्गाचे हे हत्यार मोडून टाकून, नव्या व्यवस्थेला साजेसे असे हत्यार पाहिजे. कामगार-शेतक-यांचे शासन आले पाहिजे. गांधीजींची लोकसेवादलाची कल्पना फसली ती यामुळे. केवळ काँग्रेसवाले स्वार्थी व सत्तालोभी होते म्हणून नव्हे, तर वर्गहीन समाजच फक्त शासनरहित असू शकतो यामुळे. स्वातंत्र्याच्या वेळी भारतात वर्ग होते, आणि भांडवलदार व जमीनदार वर्ग सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ होते. म्हणून त्यांचे शासन काँग्रेसद्वारा आले. हे अटळ होते. ज्या आर्थिक सामाजिक परिस्थितीत शासनाची गरज उरत नाही, लोकसेवादल खरोखरी व्यवहारात येऊ शकते ती परिस्थिती आजही आलेली नाही. ती फक्त पिळवणूकरहित, पिळवणूक करणारे व पिळले जाणारे वेगवेगळे वर्ग नसलेल्या समाजवादी समाजातच येऊ शकेल. | दंडहीन समाजक्रांती हे स्वप्न आहे. गांधीजींचे होते, त्याच्या ठिकन्या झाल्या; श्री. ग. असेच अव्यावहारिक व अशक्य काहीतरी सांगत आहेत . डाव्या चळवळींपासून ते इतर गोष्टी शिकले, पण राज्यसत्तेच्या प्रश्नाबाबत ते काहीच शिकले नाहीत . | दुसरा मुद्दा हा की, सरसंघचालक प. पू. बाळासाहेब देवरसांनी कितीही म्हटले तरी सामाजिक समस्या सोडवण्याची क्षमता संघात आहे का व येऊ शकेल का ? तीन गोष्टी येथे विचारात घ्यायला पाहिजेत. - संघाची विचारसरणी आजच्या सामाजिक समस्या सोडवायला पुरेशी आहे का? राष्ट्रवाद, सैनिकी शिस्तबद्ध संघटनेचे सामर्थ्य, हिंदू धर्माशी व मुसलमानद्वेषाशी निष्ठा, समाजवादी वा साम्यवादी चळवळींना विरोध ही संघाच्या विचारातली मुख्य सूत्रे आहेत. आजच्या सामाजिक समस्या सोडवणे दूरच राहो, त्या समजावून घेण्यासाठी अतिशय प्रगल्भ अशा शास्त्रशुद्ध विचारांची गरज आहे. तो संघाकडे नाही. देशातले दलित न्यायासाठी उठत आहेत - त्यांची समस्या म्हणजे जातीव्यवस्थेची, हिंदू धर्माच्या मूळ स्वरूपाची समस्या आहे. ती संघवाले समजावून घेतात की चातुर्वण्याचा आंधळा पुरस्कार करतात ? दारिद्रय नष्ट करण्याचा मार्ग, आजची भांडवली अर्थरचना मोडून विज्ञानसिद्ध ढाच्यात आर्थिक जीवन नव्याने रचणे हा आहे. भ्रष्टाचार थांबवणे व नेकीने आपापले काम करणे । बलसागर ।। १२७ ________________

यापलिकडे संघाच्या आर्थिक विचारांची धाव जात नाही. ते कसे गरिबांचे प्रश्न सोडवणार ? मुसलमान द्वेषाने भरलेल्या व हिंदू सारा एक ' या पोकळ घोषणेने भारून गेलेल्या एकारल्या बुद्धीला विविध भाषा, धर्म, जाती, प्रांत असलेल्या या खंडप्राय देशाचे प्रश्न सोडवता येणे अशक्य आहे. संघाच्या विचार प्रणालीचा आवाका फार तोटका आहे; आधुनिक विज्ञान व तंत्रशास्त्र, राष्ट्रप्रेम व नेकी आणि सैनिकी संघटना यांनी केवळ विसाव्या शतकाचे प्रश्न सुटत नसतात. ते सोडवण्याकरिता समाजाचे विज्ञान व मानवीपणाचा नवा, खराखुरा अर्थ वाहणारी मूल्ये व ध्येये आवश्यक असतात, ही गोष्ट संघाच्या मंडळींना कधीच लक्षात आली नाही व येईल असे दिसत नाही. दुसरी गोष्ट, संघटना ही एखाद्या यंत्रासारखी असते. हे यंत्र कसे आहे व कशाकरता आहे या दोन गोष्टी वेगळ्या काढता येत नाहीत. त्याचा हेतू त्याच्या रचनेशी अविभाज्यपणे बांधलेला असतो. संघाची विचारप्रणालीच नव्हे; सबंध संघटनाच मुळात समाजक्रांतीसाठी बांधली गेली नव्हती व ती तशी बदलणारही नाही. आडमुठ्या बंदिस्त मनाच्या हिंदु-राष्ट्राच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांना एकत्र आणून, ठाकून ठोकून कडवेपणा आणून, बांधलेली संघटना म्हणजे संघ. समाजापासून अलग पाडून, जनतेच्या विविध व बदलत्या जीवनाचे रंग त्यांना अजिबात लागू न देता संघस्थानावर आणल्या गेलेल्या तरुणांची संघटना संकुचित होऊन साचून गेली नाही तरच आश्चर्य. कामगार लढे लढवणे, दलितांच्या चळवळी उभारणे, खेड्यापाड्यातल्या शेतक-यांना संघटित करून सामूहिक कृतीत आणणे ह्या गोष्टीशिवाय समाज परिवर्तन आज अशक्य आहे. मूठभर निष्ठावंत युवकांनी क्रांती होत नसते हे आता स्पष्ट आहे. संघाची संघटना या गोष्टी करायला असमर्थ आहे. या गोष्टी संघ करू बघेल तर त्यांच्या संघटनेला चिरा जातील, ढिलाई येईल व संघ आजचा संघ उरणार नाही. ‘संघशक्तीचा विनियोग सामाजिक समस्या सोडवण्याकरता केला तर संघशक्तीचा व्यय दुर्बल होईल, मूळ संघटना दुर्बल होईल ही काही स्वयंसेवकांची भीती व्यर्थ आहे,' असे प. पू. देवरस म्हणाले. पण त्यांच्या दुर्दैवाने हेच खरे आहे ! जितका जनतेशी, तिच्या जीवनाशी व झगड्यांशी स्वयंसेवकांचा संबंध येईल तितका त्यांचा कडवेपणा, आडमुठेपणा व अंधश्रद्धा नष्ट होईलच ! | तिसरी गोष्ट, समाजशास्त्राच्या दृष्टीने जर आपण आजच्या भारतीय समाजाचे विश्लेषण केले तर कोणते वर्ग वा गट समाजक्रांती करू शकतील असे दिसते ? संघाचा पाया समाजाच्या कुठल्या थरात रुजलेला आहे ? महाराष्ट्रापुरते बोलायचे तर संघ हा नागपूर-पुण्याच्या, व इतर काही ठिकाणच्या ब्राह्मण, मध्यम व कनिष्ठ मध्यमवर्गातल्या लोकांचा आहे. संघाला पैसे व पाठिंबा पुर । बलसागर ।। १२८ ________________

वणारे लोक व्यापारी, जमीनदार व भांडवलदार आहेत. सर्व देशातले चित्रही हेच साधारणपणे आहे. | मध्यमवर्गीय, ब्राह्मण, शिक्षित तरुणांच्या थरापुढे आज भवितव्य काय आहे? एकांडेपणे तो काहीच करू शकत नाही. कारण तो अल्पसंख्य आहे; तसेच मुख्यत: पांढरपेशा नोकरदार असल्याने आर्थिक-सामाजिकदृष्ट्याही समाजजीवनाच्या नाडयांवर त्याची फारशी पकड नाही. जातीयवादी, बुरसटलेल्या सरंजामी विचारांनिशी तो इतर जाती व कामगार-शेतक-यांशी नाते जोडून वाढूही शकत नाही. हा वर्ग एकतर सधनांबरोवर, जुनाट सरंजामी व भांडवलदार वर्गाबरोबर जाऊन स्वत:चा नाश करून घेऊ शकतो, किंवा कामगार-शेतक-यांबरोबर (म्हणजे ९०टक्के भारतीय राष्ट्राबरोबर! } जाऊन डाव्या चळवळीद्वारा क्रांतीच्या तेजाकडे जाऊ शकतो. पहिला पर्याय स्वीकारणारे तरुणच संघात गेलेले आहेत, भविष्याकडे पाठ फिरवून भूतकाळाकडे वळले आहेत.। जर समाजाच्या विकासाचे काही शास्त्र असेल तर ते संघाच्या विरुद्ध आहे ! थोडक्यात, जर संघाने आपली विचारप्रणाली विज्ञानावर व नव्या मूल्यांवर आधारली, समाजाच्या परिवर्तनाचा शास्त्रशुद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार संघटना वदलली व कामगार-शेतक-यांशी जुळते घेणारी केली, जर संघाचे वर्गीय स्वरूप बदलून ती एक कष्टक-यांची संघटना झाली तर व तरच संघ सामाजिक समस्या सोडवू शकेल. पण मग तो संघ उरणार नाही! तो एक क्रांतिकारक पक्ष होईल व कदाचित आम्हीही संघात जाऊ ! पण हे होणार नाही आणि म्हणजेच आजच्याप्रमाणे उद्याही संघ ही एक वरवर सांस्कृतिक पण छुपेपणाने विशिष्ट गट सत्तेवर बसवणारी राजकीय शक्ती असणार आहे. लोकशाही न मानणारी, हिंसा व कटबाजीवर विश्वास ठेवणारी हुकुमशाही त-हेची संघटना असेल. सामाजिक व सांस्कृतिक सुधारणेला ती विरोध करेल, चातुर्वण्र्याचा पुरस्कार करेल व मुस्लिमद्वेषाने लोकांचा असंतोष भलतीकडे वळवून कष्टक-यांच्या एकीमध्ये बिब्बा घालत राहील. राष्ट्राच्या नावाने वरिष्ठ वर्गाचे व मूठभरांचे हित साधेल व नव्वद टक्के राष्ट्राच्या क्रांतिकारक चळवळींना राष्ट्रद्रोही म्हणून विरोध करेल. प. पू. देवरसांनी स्वयंसेवकांना किती प्रामाणिकपणे आत्मटीका करायला सांगितली ते त्यांचे तेच जाणोत. पण श्री. गं. ना अजूनही संघ सुधारेल अशी आशा वाटत असली तर त्यांनी, व संघाच्या सर्व प्रामाणिक व ख-या देशप्रेमी स्वयंसेवकांनी आणि हितचिंतकांनी ती सोडून द्यावी हे बरे. इतिहासाच्या रणांगणावर ज्यांचा पराभव अटळ आहे त्यांच्या रथाचे चिखलात रुतलेले चाक वर काढण्याच्या शक्तीचा व्यय कशाकरता ? ।। वलसागर ।। १२९ ________________

में केन्द्रीकरण हा सत्तेचा स्वभाव . मी लिहिलेल्या 'श्रीगुरुजी' या लेखावर मतप्रदर्शन व टीका करणारा सुधीर बेडेकर यांचा ‘गुरुजींनंतरचा रा. स्व. संघ' हा (वरील) लेख माणूस २१ जुलै १९७३ या अंकात प्रसिद्ध झाला आहे. मुख्यत: बेडेकरांचे दोन आक्षेप आहेत. (१) राजसत्तेचे गुंतागुंतीचे, गुंतलेले व वर्गीय स्वरूप मी किंवा लोकसेवक संघाची कल्पना मांडणा-यांनी ध्यानात घेतलेले नाही. त्यामुळे दंडहीन समाजक्रांती हा आमचा विचार अव्यवहार्य, अशक्य कोटीतला आहे. (२) रा. स्व. संघाचे स्वरूप क्रांतिकारक परिवर्तनाला विरोधी आहे. शिवाय या बेडेकरांच्या लेखात काही चुकीची, पूर्वग्रहदूषित विधाने अधूनमधून पेरलेली आहेत, माक्र्सवाद व डावी विचारसरणी यांच्या अंतिम विजयाचा एक ठराविक, काहीसा भाबडा आशावादी सूरही व्यक्त झालेला आहे. | मुख्य दोन आक्षेपांपैकी पहिल्याचा विचार जरा विस्ताराने करू, बेडेकर म्हणतात : शासन हे समाजांतर्गत चालणा-या प्रक्रियांमध्येच गुंतलेले असते. चालू व्यवस्था तगवण्याचे ते एक हत्यार असते; ती तुम्हाला बदलायची असेल तर या हत्याराविषयी उदासीन राहून चालणार नाही. वरिष्ठ वर्गाचे हे हत्यार मोडून टाकून, नव्या व्यवस्थेला साजेसे असे हत्यार पाहिजे. गांधीजींची लोकसेवादलाची कल्पना फसली ती यामुळे. केवळ काँग्रेसवाले स्वार्थी व सत्तालोभी होते म्हणून नव्हे, तर वर्गहीन समाजच फक्त शासनरहित असू शकतो यामुळे." | यातील ‘उदासीन' व ' शासनरहित' हे शब्द महत्त्वाचे आहेत. मी ज्याला “ अलिप्त' लोकसेवा म्हटले, त्याला बेडेकर उदासीनपणा, शासनरहितपणा समजल्यामुळे त्यांचा घोटाळा झालेला आहे. लोकसेवकांनी ‘उदासीन' असावे अशी गांधीजींची कल्पना तर निश्चितच नव्हती, गुरुजींचीही नसावी. परंतु राजसत्तेच्या आधीन न होता, त्या यंत्रणेत स्वतःला अडकवून न घेता मुक्तपणे, स्वतंत्रपणे लोकसेवकांनी परिवर्तनाचे, समाजधारणेचे कार्य करावे, एखाद्या खुर्चीत बसून राहण्यापेक्षा लोकात फिरावे, मिसळावे, त्यांना शिक्षण द्यावे, अन्याय असेल तेथे प्रतिकारासाठी सज्ज करावे अशी ही कल्पना आहे. लेखात मी मुद्दामच आर्य चाणक्याची, विद्यारण्यांची उदाहरणे दिली. एकाने नंदांची भ्रष्ट राजवट धुळीला मिळवली होती; दुस-याने दक्षिणेत, मध्ययुगीन भारतात एका स्वतंत्र हिंदु राज्याच्या स्थापनेला चालना दिली. शेवटी या दोन्ही व्यक्ती निवृत्त झाल्या तरी राजसत्तेची एवढी उलथापालथ घडवून आणणा-यांना आपण ।। बलसागर ।। १३० ________________

उदासीन', शासनसत्तेचे महत्व व मर्म न ओळखणारे म्हणू शकतो का ? गांधीजी आणि उदासीनता ही तर दोन टोके आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत राजसत्तेवर अंकुश चालविण्याची, जनतेची आत्मशती जागृत करण्याची, यासाठी अहिंसक पर्यायांचा शोध घेण्याची या महात्म्याची धडपड थक्क करून सोडणारी आहे. या ‘अलिप्त' लोकसेवकांनी राजसत्तेचे महत्त्व, तिचे गुंतागुंतीचे, प्रस्थापितात गंतलेले स्वरूप पूर्णपणे ध्यानात घेतले इतकेच नव्हे, तर राजसतेच्या मर्यादाही त्यांनी ओळखलेल्या होत्या. ' शासनसत्ता ही समाजाच्या वर, पलिकडे अशी काही असते' असे त्यांनी मानलेले दिसत नाही. असे असते तर गोळवलकरगुरुजी रामकृष्ण आश्रमात होते तेथेच राहिले असते; गांधीजींनी विधायक कार्याचा पसारा आणखीही वाढविला असता. पण दोघेही शेवटपर्यंत राजसत्तेशी कधी विरोधी, कधी सहकारी संबंध ठेवून होते आणि तरीही 'अलिप्त होते. राजसत्तेचे वर्गीय स्वरूप मान्य करण्याची बेडेकर संप्रदायाची अट मात्र त्यांनी पुर्ण केलेली दिसत नाही. तरीपण अन्याय करणा-या वर्गाविरूद्ध, हितसंबंधाविरूद्ध उभे राहण्याची ताकद त्यांच्याजवळ होती, तशी दृष्टी होती, असे मानायला भरपूर जागा आहे. राजसत्तेचे हत्यार वेळप्रसंगी, कालमान पाहून वापरायचे, पण या हत्याराचे आपणच बळी व्हायचे नाही, हा साम्यवादी तत्त्वज्ञानाच्याही पलिकडे जाणारा एक विचार याच्या मुळाशी आहे व महाभारतकाळापासून भारतीय राजनीतीज्ञ तो मांडत आलेले आहेत. ' राजा कालस्य कारणम्' हा सिद्धांत मांडणाच्या व्यासांना राजसत्तेचे महत्त्व व स्थान कळले नव्हते असे समजणे जरा धाडसाचेच ठरेल. पण राजसत्ता म्हणजे सर्वकाही नाही, व्यापक समाज जीवनाचा तो एक भाग आहे, या भागावरही योग्य ते नियंत्रण हवे, हे नियंत्रण अखेरीस लोकांच्या हाती पण लोकहिताचा प्रवक्ता म्हणून दंडहीन लोकसेवक याकामी कमी धोक्याचा, असा यतीवर्ग कल्पनेमागील विचार आहे. या यतीवर्गाने अगदी आपत्प्रसंगीच हत्याराला (सत्तेला) स्पर्श केला पाहिजे. नाहीतर हे हत्यारच ते घडविणा-या यतीवर उलटते, त्याचा बळी घेते. आपणच घडविलेल्या हत्याराचे बळी होण्याचा दुर्दैवी प्रसंग यतीवर्गावर किंवा आधुनिक परिभाषा वापरायची तर क्रांतिकारक गटावर येतो असा अगदी अलिकडच्या इतिहासाचाही दाखला नाही काय ? केन्द्रीभूत होणे हा कुठल्याही सत्तेचा स्वभाव असतो. मग ती धार्मिक क्षेत्रातील असो वा राजकारणातील असो. अगदी कामगार-किसानांची सत्ताही याला अपवाद ठरू शकत नाही. सत्ता हळूहळू केन्द्रीभूत होते आणि या अतिरिक्त केन्द्रीकरणामुळे ती भ्रष्ट होत जाते, तिचे वर्तुळ लहानलहान होते, ती साचून, साकळून मुठभरांच्या हातचा खळ बनते. हा दोष एखाद्या व्यक्तीचा नसतो. सत्तेच्या या स्वाभाविक प्रवृत्ती - ।। बलसागर ।। १३१ ________________

मुळे भ्रष्ट व्यक्तीच स्पर्धेत हळूहळू पुढे येत राहतात, अधःपात वाढत जातो. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय अगदी क्रांतिकारक सत्ताधा-यांनाही वेळोवेळी योजावे लागतात. स्टेलिनला शुद्धीकरणाच्या मोहिमा काढाव्या लागल्या. माओला सांस्कृतिक क्रांतीचा धक्का द्यावा लागला. पण सत्ताधा-यांनीच या मोहिमा, हे धक्कातंत्र वापरण्यातही धोका असतो. सत्तेचे केन्द्रीकरण अधिकच वाढते. म्हणून हे कार्य विकेन्द्रित पद्धतीने व्हावे असा लोकसेवक पर्यायामागील विचार आहे. लोकसेवकाने दंडहीन असावे, पण दंडहीनता म्हणजे शक्तिहीनता नाही. निदान गांधीजींच्या कल्पनेतला लोकसेवक तरी शक्तिहीन नव्हता. तो फक्त दिल्ली-मुंबईत राहण्यापेक्षा खेडोपाडी, विखुरलेल्या पण असंघटित नव्हे, अशा अवस्थेत राहावा अशी त्यांची कल्पना होती. त्याने किंवा अशा संघटनेने ग्रामस्वराज्याचे काम करावे अशी त्यांची अपेक्षा होती. सत्तेच्या अटळ केंद्रीकरणाला पायबंद घालण्याचा हा एक त्यांचा प्रयत्न होता. वर्ग आणि विषमता असल्याने हा प्रयत्न फसला, केवळ वर्गविहीन समाजातच हा आदर्श अस्तित्वात येऊ शकेल हे बेडेकरांचे म्हणणे बरोबर नाही. वर्गविहीन समाज रशियात आहे हे खरे असेल, तर तेथे का सत्तेचे अधिकाधिक केन्द्रीकरण सुरू आहे ? का तेथे धंदेवाईक राजकारणी, नोकरशहा सत्तेच्या यंत्रावर आपला ताबा अधिकाधिक जमवीत आहेत ? तेथे लोकसेवकत्वाची गांधीजींनी मांडलेली कल्पना मुळापासूनच अस्तित्वात नव्हती, त्या देशातील सत्तांतरे, चळवळी यांचा ढाचाच वेगळा आहे, हे यामागील कारण आहे. आणि विषमता, वर्गविग्रह आहेत म्हणून तर लोकसेवकांची खरी समाजालाही गरज आहे. ही सामाजिक दु:खे संपली तर हवा कशाला तो लोकसेवक ? जो तो आपले दु:खनिवारण करून घ्यायला समर्थच होईल. आज ही दु:खे आहेत म्हणून लोकसेवकाची गरज आहे. फक्त एक दु:ख नाहीसे करताना दुसरे, पहिल्यापेक्षाही भयानक दु:ख मानगुटीवर बसू नये, म्हणून हा विकेंद्रित पर्याय पुढे मांडलेला आहे. सत्तेच्या अटळ तर्कशास्त्राला दिलेला हा एक छेद आहे. हा परंपरेने हिंदुस्थानात चालतही आलेला आहे. गुरुजींच्या निधनानिमित्त लिहिलेल्या लेखात मी तो पुन्हा मांडला एवढेच. आचार्य जावडेकरांनीही यासंबंधी पूर्वी लिहिलेले आहे. | ( २ ) या अपेक्षा संघाकडून पूर्ण होऊ शकतील की नाही हा प्रश्न अगदी वेगळा आहे व त्याचे खरे, निर्णायक उत्तर संघाला प्रत्यक्ष कृतीनेच, आज नाही उद्या द्यावे लागणार आहे. मी याबाबत काही लिहिणे, विधाने करणे तितकेसे बरोबर ठरणार नाही. बेडेकर जो माक्र्सवादी वर्गसिद्धांत मानतात त्यानरोधाने त्यांनी केलेले संघाच्या असमर्थतेबद्दलचे विवेचन ठीकच आहे. ते नवीनही नाही पण अगदी टाकावूही नाही. काही भाग त्यातला । बलसागर ।। १३२ ________________

संघस्वयंसेवकांनी अवश्य विचारात घेण्याजोगा आहे. विशेषतः नव्या मूल्यांची जाण हवी, हा बेडेकरांचा आग्रह योग्यच आहे. केवळ राष्ट्रवाद, केवळ प्रामा णिक व नेकीचे आचरण पुरेसे नाही हे कोणीही मान्य करील. पण प्रश्न असा येथेही उपस्थित होऊ शकतो की, वेडेकरांनी तरी ही जाण काही चिकटवलेल्या वाक्यांपलिकडे कुठे व्यक्त केली आहे? त्यांचेही एकूण प्रतिपादन जुन्या । माक्र्सवादी चौकटीत अगदी घट्ट ठाकूनठोकून बसविलेले आहे, अडकून वसलेले आहे. हे प्रतिपादन आजवर, निदान हिंदुस्थानात तरी फारसे बरोबर ठरत आलेले नाही. बेडेकर इतिहासाच्या रणांगणाचा उल्लेख करतात . ही रणांगणे बहुधा दूरची, वाहेरची असावीत. कारण आपल्याकडील रणांगणांवर तरी वर्गीय संघटनांचा, विचारसरणीचा आजवर पराभवच होत आलेला आहे. विशेषतः येथील मध्यमवर्गीय समाजजीवनाची ( शहरातल्या व खेड्यातल्याही ) या वर्गीय विचारकांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी जी उपेक्षा केली, जो तिरस्कार केला, तो या पराभवाला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलेला आहे, हे बेडेकरांसारख्या तरुण माक्र्सवाद्यांनी तरी ध्यानात घ्यायला हवे. मध्यमवर्गाचे म्हणून जे दोष नेहमी दाखविले जातात ते समाजाच्या इतर घटकातही असतात, आहेत. आणि असले-नसले तरी या वर्गाची परंपरागत व नवी ताकद विचारात घ्यायला हवी. अगदी अर्थव्यवस्थेतील या वर्गाच्या स्थानाचा, मोक्याच्या जागेचा तात्पुरता, व्यूहात्मक विचार करायचा ठरवले, तरी ही ताकद, प्रस्थापिताला अडवण्याची ही कुवत या वर्गाजवळ आहे, ती वाढते आहे, हे मान्य करावे लागेल. बँका बंद पडल्या तर प्रस्थापित हादरेल की, दहा-पाच गिरण्यामधील संपामुळे ? आणि बँक कर्मचा-यांना कामगार म्हणणे, गरीब किसान, शेतमजुरांच्या वर्गात त्यांना बसविणे ही या शब्दाची अगदी थट्टा आहे. मध्यम वर्ग हे काही साचलेले एखादे तळे किंवा डबके नाही. विज्ञानाच्या प्रगतीमुळे नव्या नव्या उद्योग तंत्रामुळे त्याची अंतर्गत रचना, घटना यात सारखे बदल घडत आहेत. तंत्रज्ञ, सेवाक्षेत्रातील व प्रशासनातील घटकांचे प्रमाण व ताकद समाजजीवनात यापुढे वाढत जाणार आहे. तेव्हा संघस्वयंसेवक ' मध्यमवर्गीय आहेत म्हणून त्यांचा अटळ पराभव निदान मी काही गृहीत धरू शकत नाही. तसेच कोणत्याही एका वर्गाकडे क्रांतीचा, समाजपरिवर्तनाचा मक्ता सोपविणेही मला योग्य वाटत नाही. येथील नव्वद टक्के जनतेला सरसकट एका वर्गात, एका गाठोड्यात कोंबून डाव्या क्रांतीचा उठाव, हेही एक स्वप्नरंजनच आहे. नव्वद टक्के जनतेच्या हिताशी नाते जोडणे मात्र महत्वाचे, मूलभूत. एवढाच बेडेकरांचा आग्रह असेल तर त्याविषयी दुमत नाही. हे जोडण्यासाठी राष्ट्रवादाच्या तरफेचा उपयोग होईल असा आमच्यासारख्यांचा ।। वलसागर ।। १३३ ________________

विषयावर अनेकांनी ' झोत टाकले असते. मुस्लिमविरोध हा संघाचा स्थायीभाव मानला गेलेला आहे. मुस्लिमांना प्रवेश नाही म्हणून संघाला जातीय - संकुचित ठरवण्याचा या देशात गेली पन्नास वर्षे अव्याहत प्रयत्न सुरू आहे. हा अडथळा - अडचण आता दूर झाली. मनमोकळेपणे या कृतीचे स्वागत व्हायला मग काय हरकत होती ? पण नाही. एकही पत्रक नाही. सभा नाही. उठसूट पत्रके आणि मोर्चे काढणा-या तथाकथित डाव्यांच्या मनोवृत्तीवर ‘झोत टाकणारी ही घटना आहे आणि म्हणूनच अशांच्या टीकेला, जळफळाटाला संघाने आजवर केराची टोपली दाखवली तर त्यात संघाची तरी काय चूक आहे ? अहमदाबाद येथे संबकायालयात झालेली एक अनौपचारिक चर्चा आठवते. अहमदाबाद येथील हेडगेवार भवनात जमाते इस्लामच्या काही कार्यकत्र्यांनी नमाज पढला, अशी बातमी वृत्तपत्रात आली होती. या घटनेबाबत अधिक माहिती मिळवावी म्हणून मी अहमदाबादला, इतर कामासाठी गेलो असता, मुद्दाम तेथील संघ प्रमुखांची भेट घेतली. नानाजी देशमुख यांचे सख्खे भाऊच गुजरातचे संघप्रमुख आहेत. नमाज-घटना ही साखळीतील एक लहानसा दुवा आहे, असे यासंबंधी त्यांच्याशी बोलताना माझ्या ध्यानात आले. त्यांना स्वत:ला तर ही घटना अगदीच सहज घडून आलेली व मामुली वाटत होती. वृत्तपत्रांनी ती उगाच फुलवली - फुगवली. अशा फुलवण्या - फुगवण्याने अशा नाजूक कामात अडथळाच उत्पन्न होतो, असा त्यांनी वर अभिप्रायही व्यक्त केला. संघ - कार्यकर्ते व जमाते इस्लामीचे लोक आणीबाणी - काळात तुरुंगात एकत्र होते. जेलमधून सुटल्यावरही संबंध कायम राहिले, अधिक जोपासण्याचे उभयपक्षी प्रयत्न झाले. आणीबाणीनंतरच्या दौ-यात देवरस अहमदाबाद येथे गेले असता जमाते इस्लामीच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. तेथील कार्यकत्र्याशी थोडा वेळ चर्चाही केली. या प्रसंगी गुजराथ जमाते इस्लामीचे प्रमुख श्री. हबीबुर रहेमान यांनी कुराणाची प्रतही त्यांना नजर केली. यानंतर जमाते इस्लामीचे अ. भा. प्रमुख अहमदाबादला आले तेव्हा त्यांचाही संघकार्यालय -भेटीचा कार्यक्रम योजण्यात आला. ही भेट चर्चास्वरूपाची होती व चांगली तीन - चार तास चर्चा रंगली. (१२ जून १९७७) चर्चेच्या दरम्यान जमाते मंडळींची नमाज पढण्याची वेळ झाली. नमाजाला जागा कुठची ? मशिदीत जाऊन पुन्हा परत यायचे म्हणजे वेळ लागणार. म्हणून या मंडळींनी इच्छा प्रदशित केल्यावरून त्यांची नमाज पढण्याची तिथेच एका वेगळ्या दालनात व्यवस्था करण्यात आली. या मध्यंतरानंतर चर्चा पुन्हा सुरू झाली. पद्य वगैरे संघपद्धतीने चर्चेची सुरुवात व शेवटही झाला. कार्यक्रम अटोपल्यावर या ।। बलसागर ॥ १३६ ________________

नमाज - प्रकरणावर संघापुरता पडदा पडला होता; पण तिकडील वृत्तपत्रात व परस्पर बोलण्यात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत राहिल्या. काहींच्या मते जमातेवाल्यांनी संघाची परीक्षा पाहण्यासाठी मुद्दामच हे नमाजाचे नाटक केले. नाहीतर कोण लेकाचा दिवसातून पाच वेळा, अगदी ठरलेल्या वेळी, अलीकडच्या काळात नमाज पढत असतो ? काहींच्या मते जमाते ही सनातनी मुस्लिमांची संघटना असल्याने त्यांनी नमाजाची वेळ पाळणे स्वभाविकच होते. महत्त्वाचा मुद्दा जमातेवाल्यांचा हेतू काय होता हा नसून संघवाल्यांनी या घटनेचा स्वीकार कसा सहजतेने केला हा आहे. पन्नास वर्षे जी संघटना मुस्लिमविरोधासाठी बदनाम केली जात होती तिच्यात हा बदल पचवण्याची, सहजपणे आत्मसात करण्याची एकाएकी ताकद आली कुठून ? देवरसांचा आदेश आला आणि खालपासून मंडळी एका रात्रीत बदलली असे झाले नाही. होणे शक्यही नव्हते. वर्षभर देवरस कार्यकत्यशी, सहका-यांशी यासंबंधी बोलले - चालले असले पाहिजेत. कुणाची समजूत घातली गेली असेल तर कुणाचा विरोध कठोरपणे मोडून काढला गेला असणेही शक्य आहे. दिल्लीतीत काही कार्यकर्ते सांगत होते, एका बैठकीत फार खडाजंगी झाली. संघ सत्तेच्या मागे लागू पाहतो आहे व त्यासाठी मुस्लिम - प्रवेशाचे हे खूळ संघाला आवश्यक वाटते, अशी टीका काही जुन्या मंडळींनी केली. मुस्लिम राजकारणाचे बदलते संदर्भ सांगून त्यांची समजूत संघ - श्रेष्ठींना घालावी लागली. एवढ्या प्रचंड व देशव्यापी संघटनेचा कारभार राजा बोले आणि दळ हाले या ठोकबाज पद्धतीने चालतो अशी समजूत करून घेणे भाबडेपणाचे किंवा मूर्खपणाचे लक्षण आहे. अंतर्गत लोकशाही ही संघाची कार्यपद्धती आहे व निदान हेडगेवार व देवरस यांच्या कारकीर्दीत तर या पद्धतीचा अवलंब सहजपणे झालेला आहे. गोळवलकरगुरुजी यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे गूढ व आध्यात्मिक असल्याने कदाचित् अंतर्गत लोकशाहीचा दैनंदिन प्रत्यय येत असेल - नसेल. जवळचे लोकच याबाबत खरी वस्तुस्थिती सांगू शकतील; पण हेडगेवार - देवरस ही समान धाटणीची व्यक्तिमत्त्वे आहेत व या व्यक्तिमत्त्वांशी लोकशाही वृत्तीप्रवृत्ती मुळीच विसंगत नसतात. उलट सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा एक विलक्षण हातोटी अशा आत्मविलोपी व्यक्तिमत्त्वांजवळ असते. अशा आत्मविलोपाशिवाय का एवढ्या प्रचंड संघटना उभ्या राहतात ? । | अहमदाबादच्या याच भेटीत श्री. देशमुखांनी मला संघाच्या ‘अराजनैतिक मंच' या एका नव्या उपक्रमाची थोडी माहिती दिली. अ. भा. स्तरावर या मंचाचे काम सुरू आहे. प्रत्येक प्रांतात यासाठी एका स्वतंत्र कार्यकत्र्याची योजना संघाने केलेली आहे. राजकीय क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील, सर्व धर्मातील, सर्व जातींतील विधायक कार्य करणा-या संस्था, व्यक्ती यांना एकत्र आणणे हे । बलसागर ।। १३७ ________________

या मंचाचे उद्दिष्ट आहे. हरिजनांविषयी अर्थातच श्री. देशमुख यांना मी विशेष खोदून विचारले. तेव्हा त्यांनी समग्र गोळवलकर वाङमयातील-बहुधा तो सातवा खंड असावा-या प्रश्नासंबंधी गांधीजी व गुरुजी यांच्यात झालेली एक महत्त्वपूर्ण चर्चा मला काढून दाखवली. मी ती तिथेच वाचली. या चर्चेत, गांधीजींच्या 'हरिजन' शब्दयोजनेबद्दलच गुरुजींनी सूक्ष्म मतभिन्नता नोंदविली असून, अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे एकात्मता निर्माण न होता, हरिजनांचा एक छोटा व वेगळा गटच समाजात तयार होईल व परस्परातील अंतर वाढत राहील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. संघाचा दृष्टिकोन गांधीजींनीही नीट समजावून घेतलेला दिसतो; पण कोणीही कुणाला चूक किंवा संकुचित ठरवलेले नाही. गांधीजींच्या सत्यशोधनप्रवृत्तीबद्दल तर गुरुजींनी अतीव आदरभाव व्यक्त केला आहे आणि हे स्वाभाविकच होते; कारण दोघेही हिंदुधर्माभिमानी होते व ‘सत्याचा शोध हे तर या धर्माचे प्राणतत्त्व. 'जीवनम् सत्यशोधनम्' या श्लोकाधत हे विनोबांनीही नेमके व्यक्त केले आहे. ही असली अवतीभवतीची वैचारिक चर्चा मी देशमुखांशी करीत होतो व हरिजनांसाठी, ते कुणी खास वेगळे आहेत असे समजून काम करणे हे संघपद्धतीत कसे बसत नाही, हे देशमुख मला सांगत होते. अराजनैतिक मंचाचे विशेष लक्ष मागासलेल्या विभागांकडे-प्रदेशांकडे राहील हेही त्यांनी स्पष्ट केले; पण मंचाचा मुख्य उद्देश देशातील सर्व विगरराजकीय विधायक शक्ती जागृत करणे, संघटित करणे असा सध्या तरी असल्याचे मला त्यांच्या सांगण्यावरून जाणवले. उद्या ही शक्ती खरोखरच जागृत व संघटित झाली, संघाने ती करून दाखवली तर जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीचेच नव्हे तर भारतीय समाजवादाचे एक नवीनच पर्व या देशात सुरू होणे अशक्य नाही. समाजवाद या नावात बिचकण्यासारखे, विरोध करण्यासारखे काही नाही, त्यातील अन्त्योदयाचा आशय संघाला मान्य आहे हे देवरसांनी ‘इलस्ट्रेटेड विकली' ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलेलेच आहे. (मार्च १२-१८, १९७८ अंक) परंतु समाजवाद या नावाने आज जी रचना प्रचलित आहे ती राज्यवादी आहे, हा राज्यवाद संघाला अमान्य आहे. याच वस्तुस्थितीचा बोध झाल्याने जयप्रकाशांनीही पूर्वी समाजवादी पक्ष सोडला व एकूण पक्षीय राजनीतीलाही रामराम ठोकला ! सोव्हिएट रशिया किंवा चीन हे साम्यवादी देश असोत की भांडवलशाही युरोप-अमेरिका असो; दोन्हीकडे राज्यसंस्थेने संपूर्ण समाज व व्यक्तिजीवनाचा कोंडमारा चालवलेला आहे. मध्ययुगात जसे धर्माचे व पुरोहित-पोपवर्गाचे समाजजीवनावर सर्वंकष वर्चस्व होते, तसे वर्चस्व सध्याच्या काळात राजकीय पक्ष व नोकरशाही . ।। बलसागर ।। १३८ ________________

यंत्रणा यांचे स्थापन झालेले आहे व व्यक्तीची उपक्रमशीलता, समाजाचे स्वयंप्रेरित चलनवलन या वर्चस्वामुळे, या निर्णायक प्रभुत्वामुळे गोठून गेलेले आहे. मध्ययुगात धर्मसंस्थांनी व्यक्ति जीवन गुलाम केले. आज तोच वारसा राज्यसंस्था चालवीत आहे. सर्व समाज शासनावलंबी म्हणजेच पुन्हा परावलंबीच आहे. शासनयंत्रणा हीच आज मध्ययुगातील धर्मसंस्थेप्रमाणे एक प्रचंड शोषणयंत्रणा होऊन बसलेली आहे व या शोषणयंत्रणेबद्दलचा असंतोष जगभर वाढीस लागत आहे. १९६७ मधले फ्रान्सचे विद्यार्थी उठाव हा या असंतोषाचाच एक उद्रेक होता. भांडवलशहांप्रमाणेच नोकरशहांचीही आतडी खाबाखांबांवर लोंबलेली आम्हाला पाहायची आहेत', अशी विद्यार्थीनेत्यांची घोषणा या उठावात होती, यावरून या नव्या शोषणयंत्रणेबद्दलचा राग किती खोलवर साठत–साचत येतो आहे हे सहज ध्यानात येऊ शकते. फ्रान्सचे अनुकरण नंतर पूर्व व पश्चिम युरोपात, अमेरिकेत, जपान - आशियामध्येही मोठ्या प्रमाणात झाले. किंबहुना ६७ हे वर्ष जगभर विद्यार्थीआंदोलनांनी गाजवून सोडलेले होते व आपल्याकडेही या लाटा धडकू लागलेल्या होत्या. जयप्रकाशांना या लाटांचे आवाज ऐकू येणे हेही स्वाभाविक होते. कारण ते त्याच मार्गाने प्रवास करीत होते. राजकारण सोडल्यावर ते भूदानाकडे वळले ते केवळ दहा-पाच हजार एकर जमीन वाटण्यासाठी नव्हे. तिसरी नैतिक शक्ती समाजात जागृत करणे हा त्यांचा उद्देश होता. विद्याथ्र्यांची उद्रकशक्ती व जयप्रकाशांची नैतिक शक्ती यांचा योग्य वेळी संगम होऊन नवनिर्माण आंदोलन आपल्याकडे गुजराथ–बिहारमध्ये उभे राहिले व क्रमाक्रमाने ते विकसितही होत गेले. बिहारमध्ये प्रतिसरकारे स्थापन होऊ लागली तेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारली व जनशक्ती व राजशक्ती या दोन शक्तींची टक्कर होऊन राजशक्ती पराभूत झाली. जयप्रकाशांच्या या ऐतिहासिक कार्यात संघानेही त्यांना मनःपूर्वक साथ दिली. कारण जयप्रकाश ज्या मार्गाच्या शोधात आहेत व होते तो मार्ग संघाला अपरिचित नव्हता. नवीनही नव्हता. समाजाची स्वयंशक्ती जागृत व संघटित करणे, या शक्तीच्या बळावर समाजातील भिन्न-भिन्न शक्तिकेंद्रांवर वचक ठेवणे, त्यांचे विरोध अधिकारातिक्रमणे मोडून काढणे, याद्वारे विकेंद्रित समाजजीवनाचा भारतीय आदर्श साकार करणे, असा संघाचा प्रवास आहे व यासाठी किमान संघटन हवे म्हणून दैनंदिन संघशाखांचा उपक्रम आहे. आचार्य जावडेकरांना अभिप्रेत असलेला आधुनिक यतीवर्ग हे संघाचे, विशेषत: गोळवलकर गुरुजींचे भारतीय समाजकारणाला फार मौलिक योगदान आहे व या एका भूमिकेबाबत तर गांधीजी आणि गुरुजी फारच जवळ असल्याचे आपल्याला दिसेल. काँग्रेसचे विसर्जन करून लोकसेवासंघात तिचे रूपांतर करावे असा गांधींचा निर्णय प्रकट झाल्यावर अगदी उत्स्फूर्त असे या निर्णयाचे स्वागत व त्याचा उचित शब्दात गौरवहीं । बलसागर ।। १३९ ________________

गुरुजींनीच केलेला आहे. श्रीकृष्णाने हे वेळच्या वेळी केले नाही म्हणून यादवांच्या लीला त्याला पाहाव्या लागल्या असा मार्मिक अभिप्रायही गुरुजींनी या संदर्भात व्यक्त केला आहे. समाजधारणेचा हा खास भारतीय आदर्श आहे, गांधीजींचा लोकसेवकसंघाचा विचार हा भारतीय प्रतिभेचाच एक श्रेष्ठ आविष्कार आहे असे म्हणणारे गुरुजी आज कुणी विचारात घेवोत न घेवोत ; इतिहासात त्यांचे योगदान निश्चित नोंदले जाईल, कारण गांधीजींनाही मनात असून जे जमले नाही, करता आले नाही, ते या संन्यस्त सरसंघचालकाने करून, जमवून दाखवले आहे. संघ आज प्रचंड सामथ्र्यानिशी उभा आहे तो या आधुनिक यतींच्या खांद्यावर. दिल्लीत किंवा मुंबईत कुणी दोन-चार संघवाले मंत्री आहेत, सत्ताधारी आहेत म्हणून नव्हे. याच संघ-सामथ्र्यावर मोहित होऊन जयप्रकाशांनी त्याला मनःपूर्वक सुशय चितिले आहे, आशीर्वादही दिला. जयप्रकाश म्हणाले| "बांगला देशापासून पाकिस्तानपर्यंत आपण एक राष्ट्र आहोत असे मी मानतो. आमची राज्ये भिन्नभिन्न असू शकतात. हजारो वर्षांपासून भारतात अनेक राज्ये होती. तरीही आमचे राष्ट्र मात्र भारतीय होते. काही गोष्टी नाहीशा होत नाहीत अशा असतात. उर्दू व फारसीचे सुप्रसिद्ध कवी इक्बाल यांनी स्वत:च असे म्हटले आहे की, ‘कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी.' (काही गोष्टी अशा आहेत की आमचे अस्तित्व नष्ट होत नाही) तर मित्रांनो, ही गोष्ट त्यांपैकीच आहे आणि तीच गोष्ट आपल्याला धरून ठेवायची आहे. कारण तीच आमच्या दृष्टीने सर्वात मौल्यवान आहे. आज तीन राज्यांत (भारत, पाकिस्तान बांगलादेश) विभाजन झाल्यावरही या तीन राज्यांत सर्वात मोठे राज्य कोणते असेल तर ते भारतच ! आमचा व्यवहार, आमचे आचरण असे असले पाहिजे की, आपले पूर्व आणि पश्चिम असे जे दोन तुकडे झाले आहेत त्यांची हृदये आपल्याला जिंकता आली पाहिजेत. ती राज्ये वेगळी राहावीत. भारतातही अनेक राज्ये आहेत. तरी आपली भारतीयता कायम राहिली पाहिजे. ज्याप्रमाणे हिंदू भारतास आपला मानतात, तसेच त्यांनीही भारताला आपले मानावे या दृष्टिकोनातून आपणास काम करावयाचे आहे. “आपण संयमी आहात, आपण गुणसंपन्न आहात आणि माझी अशी अपेक्षा आहे की, आपण भारताला नवे रूप द्या. मनुष्य आणि मनुष्यबंधू असावेत, उच्चनीच भेद असू नयेत असा भारत बनवा, असा एक वृद्ध या नात्याने माझा आपणास आशीर्वाद आहे. गरीब व श्रीमंत असा भेद नाही ही गोष्टही शक्य आहे व तीही झाली पाहिजे. गरिबी नाहीशी करणे कठीण आहे ते काही एक-दोन दिवसांत शक्य नाही, हे ओळखूनही काम केले पाहिजे. ज्या घरात लहान मुले अर्धपोटी राहून दुःखित अंत:करणाने रात्री झोपी जातात, अशी किती तरी बलसागर ।। १४० ________________

घरे असतील ! पोटभर अन्नही मिळत नाही. अन्न मिळाले तर ते निकृष्ट असते ही किती दु:खाची गोष्ट आहे ! हे आपण कसे बदलणार ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही आर्थिक क्रांती कशी होईल? अमची खेडी कशी बदलतील ?...संस्कृतीच्या बाबतीत आपण अधिकारी आहात. धर्म व परंपरेच्या बाबतीत आपण विचार करता व त्यामळे सांगण्याचा अधिकार आहे म्हणून आपण हे काम करू शकता. माझी तुम्हाला तशी विनंती आहे. आपल्यासाठी प्रत्येक क्षण मोलाचा आहे. जेथे ब्राह्मण व हरिजन भाऊभाऊ आहेत, एकमेकांना जेथे आम्ही आलिंगन देऊ शकू, जेथे गरीब व श्रीमंत हा भेद मिटवता येईल, जेथे शासन प्रत्यक्ष जनतेच्या हाती जाऊ शकेल असा देश आम्ही पाहू इच्छितो. हे शक्य आहे. हे काही स्वप्न नव्हे...हे आपल्याच हातून घडेल. मी आपली स्तुती करीत नाही. वस्तुस्थितीच अशी आहे म्हणून हे सांगतो तुमचा विचार फार दूरपर्यंत जाईल. तुमच्या मागे ब्राह्मणत्वाची शक्ती आहे. आज वर्तमानकाळात जे परिवर्तन घडत आहे त्या परिवर्तनकार्यातही आपणच अग्रणी आहात. ती शक्ती आपल्याबरोबर आहे.... (पाटण, ३ नोव्हेबर ७७ संघ-शिबिरातील भाषण) । दीनदयाळ उपाध्याय म्हणजे तर चालता बोलता, मूर्तिमंत संघ! संघाला अभिप्रेत असणा-या मानवतेची सगुण-साकार प्रतिमा अखंड भारत' या संघाच्या मूळ उद्दिष्टावरील दृष्टी जराही ढळू न देता त्यांनी ते गाठण्याचा मार्ग मात्र पुढील शब्दात विशद केलेला आहे. भाषा वेगळी, विचार एक असे दीनदयाळ आणि जयप्रकाश यांची अवतरणे शेजारीशेजारी ठेवल्यावर कोणालाही वाटल्या. वाचून राहणार नाही. दीनदयाळजी म्हणतात हे दीन, दरिद्री अडाणी आमच्याकरिता नारायणस्वरूप आहेत. आम्हाला त्यांची पूजा करावयाची आहे. हा आमचा सामाजिक आणि मानवधर्म आहे. ज्या दिवशी यांना पक्की, सुंदर व स्वस्त घरे आपण देऊ, ज्या दिवशी यांच्यमुलांना आणि स्त्रियांना शिक्षण आणि जीवनदर्शन देऊ, ज्या दिवशी त्यांना उद्योग आणि धंद्याचे शिक्षण देऊन आपण त्यांचे उत्पन्न वाढवू, त्या दिवशी आमचे बंधुप्रेम प्रकट होईल. खेड्यांमध्ये आज काळ अचल उभा आहे. तेथे आईबाप आपल्या मुलांचे भविष्य बनविण्यास असमर्थ आहेत. त्या ठिकाणी जोपर्यंत आपण आशेचा आणि पुरुषार्थाचा संदेश पोहचवू शकणार नाही तोपर्यंत आपण राष्ट्राचे चैतन्य जागृत करू शकणार नाही. आमच्या श्रद्धेचे केंद्र, आमचे आराध्य आणि उपास्य, आमच्या पराक्रमाचे आणि प्रयत्नांचे उपकरण आणि आमच्या संपन्नतेचा मानदंड तो मानव आहे, जो आज अक्षरशः अनिकेत आणि अपरिग्रही आहे. जेव्हा त्या मानवाला पुरुषार्थचतुष्टयशील बनवून उत्कर्षाचा ।। बलसागर ।। १४१ ________________

स्वामी आणि विद्याविनयसंपन्न करून आध्यात्मिकतेच्या साक्षात्काराने राष्ट्र आणि विश्व यांच्या सेवेत तत्पर, अनिकेत आणि अपरिग्रही बनवू शकू, तेव्हा आम्हाला अभिप्रेत असलेला एकात्म मानव साकार होईल. | जावडेकरांचा यती, गांधी-विनोबांचा लोकसेवक, संघाचा अपरिग्रही, अनिकेत स्वयंसेवक-प्रचारक... भारतीय समाजवादप्रस्थापनेची अखंड भारत संस्थापनेची ही वाट आहे-हा मार्ग आहे. कळेल त्याला कळेल. नाही त्यांनी खुशाल म्हणतलिहीत राहावे,...‘झोत टाकावेत...“संघ म्हणजे एक जुनाट व बुरसटलेली शक्ती आहे' वगैरे वगैरे... | अखंड भारत ही कल्पना म्हणजे जमिनीचा- प्रदेशाचा गेलेला एखादा तुकडा एखाददुसरा प्रांत परत मिळविणे, एवढी संकुचित असती तर बेळगाव-कारवारच्या प्रश्नाइतकीच, गेल्या तीस वषति, एखाद्या मागणीची अवकळा तिला आली असती. ही कल्पना म्हणजे कुणी तरी कुणाकडे केलेली मागणी नाही किंवा कुणावरचे आक्रमणही नाही. हे एक समाजदर्शन आहे, एका राष्ट्रीय साक्षात्कारातून (Vision) समूर्त झालेले. हिंदू समाजाच्या स्वरूपावद्दलची ही एक आत्मश्रद्धा, आत्मजाणीव आहे. किमान गेली पाच हजार वर्षे येथे एक संस्कृतिप्रवाह अखंडपणे वाहात आलेला आहे. या प्रवाहात विक्षेप आले, तो काही काळ विकृत किवा लुप्त झाला, त्यावर आक्रमणे झाली, तरी तो मूळ स्वरूपात वाहत ठेवण्याचे प्रयत्नही अव्याहत होत राहिले, पुढेही होत राहतील. या प्रवाहाशी ज्यांनी ज्यांनी शत्रुत्व केले ते ते अखेरीस या प्रवाहात समाविष्ट होऊन नाममात्रच अस्तित्वात राहिले, प्रवाह पुढे वाहत-गातच राहिला, अशी या ‘अखंड' शब्दामागील एक विशाल व ऐतिहासिक आत्मजाणीव आहे. ही जाणीव हा हिंदुराष्ट्रवादाचा मूलाधार आहे आणि म्हणूनच इतकी उपेक्षा, इतका तिरस्कार, टीका आणि विरोध होऊनही हा वाद, हा विचार दबला नाही, मेला नाही, यापुढे तर मरण्याची सुतराम शक्यता नाही. संघस्थापनेमागेही ही जाणीव कशी होती हे स्वा. सावरकरांनी एका प्रसंगी फार मोजक्या शब्दात सांगितलेले आहे. १९३९ मध्ये संघाच्या पुणे शाखेच्या गुरुपौणिमा उत्सवात सावरकरांचे मुख्य भाषण झाले. या भाषणात ते म्हणाले, हिंदुत्वाच्या अथांग सागरावर संकल्पविकल्प, पक्षोपपक्ष, जयापजय यांच्या कितीही लाटा आदळून गेल्या तरी, हा सागर, आहे तसाच, कायम आहे. ही गोष्ट या संघाचे आद्यप्रणेते डॉ. हेडगेवार यांच्या लक्षात येऊन त्यांनी या संघाची प्राणप्रतिष्ठा केली'...हेडगेवारांचीच ही हिंदुत्वाच्या विशाल सागराची कल्पना गंगौघ स्वरूपात गोळवलकरगुरुजी आपल्या बौद्धिकातून स्वयंसेवकांच्या काना-मनावर ठसवत-बिबवत असत, यालाच ते राष्ट्रजीवनाचा संस्कार ।। बलसागर ।। १४२ ________________

म्हणत. व्यक्तिव्यक्तीला आपापल्या संकुचित कुंडातून, वैयक्तिक-कौटुंबिकव्यावसायिक-राजकीय कोषातून बाहेर खेचून, निदान काही काळापुरते तरी या राष्ट्रजीवनप्रवाहाचे तिला दर्शन घडवणे,तिचा 'स्व' व्यापक 'स्व'शी जोडणे, व्यष्टीला समष्टीशी जुळविणे, यासाठी दैनंदिन शाखा असत व आहेत. त्यांच्याबद्दलचा संघाचा पराकाष्ठेचा आग्रह पहिल्यापासून आजतागायत यासाठीच कायमही राहिला आहे. हा आग्रह ढिला झाला तर राष्ट्रजीवनाची जाणीव बौद्धिक किंवा वैचारिक पातळीवरच राहण्याचा धोका होता, जशी आज समाजवादी जाणिवांची स्थिती झाली आहे तशी राष्ट्र जाणीवेचीही झाली असती. विचारांनी सगळेच समाजवादी; पण आचरणाच्या नावाने महापूज्य ! जेवढा अधिक समाजवादी तेवढा अधिक स्वत:पुरते पाहणारा, सत्ता-संपत्तीकेंद्राच्या अवतीभवती अधिक घुटमळणारा अशी सद्य:स्थिती आहे आणि याचे एक कारण विचारांना, बौद्धिक मतांना दैनंदिन संस्कारांची बैठकच आग्रहपूर्वक दिली गेली नाही. ही बैठक हिंदुराष्ट्रविचारांना संघामुळे लाभली म्हणून तो केवळ टिकून आहे इतकेच नव्हे, तर वर्धमानही आहे, नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची धमक व ईर्षाही अंत:करणात बाळगून आहे. जमिनीचा गेलेला तुकडा, दोन-अडीच प्रांत-विभाग परत मिळणे, न मिळणे, ही या विचारआचारांची फक्त एक मधली, तात्कालिक स्थिती आहे. अखंडत्वाची सांस्कृतिक जाणीव महत्त्वाची आहे व ‘संघटनेसाठी संघटना या संघसूत्राचा नेमका अर्थ, पिढ्यानपिढ्या ही जाणीव व्यक्ती-व्यक्तीच्या अंतःकरणात सतत तेवत ठेवण्याची व्यवस्था, हा आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत संघ सामील झाला नाही. हेडगेवार असते तर कदाचित हे घडून आलेही असते. गुरुजींचे निवृत्ति-प्रधान विचारविश्व आड आले असण्याचीही शक्यता आहे. दुस-या स्वातंत्र्याच्या चळवळीत, जयप्रकाश आंदोलनात मात्र संघाने उडी घेतली. पण ही उडी घेतली याचा अर्थ मूळ समाजजाणिवेचा प्रवाह वाढता-विस्तारता ठेवएण्याचे आपले जन्मदत्त कार्य सोडून संघ सत्तेच्या दैनंदिन उलाढालीत गुरफटायला तयार झाला असा नाही. जाणिवेचे विशालीकरण करण्याचे मूळ कार्य चालू ठेवून परिस्थितीप्रमाणे, कालमानाचा अंदाज घेऊन व स्वसामथ्र्याला पेलवतील एवढी तात्कालिक, निकडीची कामे करीत राहणे संघ वर्ण्य मानीत नाही, गुरुजींच्या काळातही मानत नव्हता. अगदी कुष्ठरोग निवारणाचे बाबा आमटे यांच्यासारखे कार्यही रायपूर भागात गुरुजींनी सुरू करून दिल्याचे आपल्याला आज दिसते याचा अर्थ काय होतो ? तेथील कुष्ठरोगी, आश्रमाची जमीन पिकवण्यासाठी व वसाहतीला उपयोगी पडावा म्हणून एक ‘माधव सागर' तेथे स्वश्रमावर तयार करीत आहेत. एव्हाना हा तलाव तयार झालाही असावा. ही केवढी पुरुषार्थ जागवणारी घटना आहे ? अशी विकासकार्ये, चळवळी ।। बलसागर ।। १४३ ________________

संघाला वज्र्य नाहीत; पण आग्रह आहे, अट्टाहास आहे तो गेली पाच हजार वर्षे अखंडपणे वाहत आलेला राष्ट्रजीवनाचा प्रवाह असाच पुढे वाहत-वाढवत नेण्याचा, अधिक खोल व रुंद करण्याचा. या प्रवाहात आता मुसलमान सामील होऊ इच्छित आहेत...आनंद आहे. त्यांनी सामील व्हावे असा आवर्जुन प्रयत्न करण्याचीही निकड आहे. याल तर तुमच्यासह' हा सावरकरी बाणा सारखा उपयोगी नाही. चाळीस वर्षापुर्वी तो आवश्यक होता. आता परिस्थिती बदलली आहे, संदर्भ नवीन आहेत, म्हणून अखंड भारताचे आपले ध्येय न सोडता संघाने मुस्लिमांना आपली द्वारे खुली केली. कारण गेलेले प्रदेशही पुन्हा जोडले जायचे, एकत्र यायचे, तर तत्पूर्वी मने जुळली पाहिजेत; मते, उपासनापद्धती वेगळ्या राहिल्या तरी 'संस्कार' एक हवा-अखंड राष्ट्रजीवनाचा. केमाल पाशा जसे, ‘प्रथम मी तुर्की, मग मुसलमान' असे म्हणत असे तसे येथील मुसलमानांनीही म्हणायला शिकले पाहिजे; म्हणजे अखंड भारत अस्तित्वात आल्यासारखाच आहे. त्यासाठी वेगळी चाल करून जायची वगैरे काही आवश्यकताच उरणार नाही. अलिगढ प्रवृत्तीच्या नेमक्या विरुद्ध दिशेचा हा प्रवास आहे. पण मुस्लिम समाजाला तो केल्याशिवाय गत्यंतर नाही. संघाच्या मदतीने तो सुकर होईल एवढेच. हा प्रवास सुकर व्हावा म्हणून देवरसांचा संघ प्रयत्नपूर्वक काही नवे पूल बांधत आहे, परस्पर सामंजस्याचे वातावरण त्यामुळे निर्माण होऊ शकते. संघाने एक पुढचे पाऊल टाकले आहे. मुसलमानांनाही आपली पाऊले आता नीट जुळवून घ्यावी लागतील. अशी मने आणि पावले नीट जुळत गेली तर शक्यता आहे, अलग झालेले प्रदेशही पुन्हा एकत्र येतील, सिंधू आणि गंगा यांचे मीलन होईल, सावरकरांचे-गाधींचे भंगलेले स्वप्न पुन्हा साकार होईल. मार्ग अर्थातच वेगळे असतील. त्या वेळी मुसलमानांना वगळूनच विचार करणे भाग होते. आता त्यांना बरोबर घेऊन जावे लागणार आहे. त्यांनाच का? दूरदूर चाललेल्या आमच्या दलितबांधवांनासुद्धा ! त्यावेळी हे दोन्ही गट बरोबर नव्हते म्हणून फाळणी नामुष्कीने, नाइलाजाने पत्करावी लागली. हे इतिहासाचे काळ पान पुन्हा सोनेरी करावयाचे असेल तर डाव्या-उजव्या बाजूला हे दोन्ही गट हवेतच. किंबहुना त्याशिवाय अखंड भारताच्या स्वप्नाला अर्थच उरणार नाही. या दोन्ही गटांच्या सुरक्षिततेचाही हाच एकमेव व उत्तम उपाय आहे. मूळ प्रवाहापासून दूर फटकून राहणे हे असुरक्षिततेचे-मागासलेपणाचे मुख्य कारण आहे. या प्रवाहाचे आजवरचे नाव 'हिंदू' आहे म्हणून बिचकून जाण्याचेही कारण नाही. उद्याचे नाव प्रवाहातूनच वर येईल. त्याची चिता आज कशाला? आसिंधू सिंधू भारताला जे आपली केवळ पितृभ आणि पुण्यभूच मानतात असे नाही, तर मातभू आणि भ्रातृभूही मानतात ते सगळेच हिंदू आहेत, भारतीय आहेत, आणि बंधुभावाने राहू इच्छिणा-या सर्वांचे ‘अखंड भारत | ।। बलसागर ।। १४४ ________________

हे राष्ट्रीय स्वप्न आहे. आज ते धूसर आहे, अंधुक आहे. ते तसेच काही काळ असणे स्वाभाविकही आहे. कारण निर्मितीकाल हा नेहमीच धूसर आणि अंधुक असतो. खलिल जिब्रानचा 'प्रॉफेट' म्हणतो तसा "वस्तुमात्राचा आरंभ अस्पष्ट आणि आकारहीन असतो; पण त्याचा अंत तसा असत नाही... “जीवनाची आणि चैतन्यमय अशा सर्व वस्तूंची गर्भधारणा दंवबिंदूत होत असते, स्फटिकात ती होत नाही. ‘आणि स्फटिक म्हणजे क्षय पावणारा दंवबिंदूच नसेल हे कोण सांगू शकेल ?... ऑक्टोबर १९७८ ।। बलसागर ।। १४५ ________________

मणिकांचन दिवाळी हा हिंदूचा सण; पण या 'हिंदू' शब्दावरूनच वादळ माजले, वातावरण ढवळून निघाले, देश अस्थिरतेच्या अंध:कारात बुडाला, बुडवला गेला. मुळात हा शब्द भौगोलिक' आहे, असे भारतीय संस्कृती कोशाचे विद्वान संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांनी या गदारोळात एका प्रसंगी सांगितले; पण तिकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. पूर्वीही ही व्युत्पत्ती अनेकदा, अनेकांनी सांगितलेली आहे; पण त्याही वेळी कुणी याकडे लक्ष देण्याची तसदी घेतलेली नव्हती. पन्नास वर्षांपूर्वी सावरकरांनी यासाठी ‘हिंदुत्व' हा ग्रंथच लिहिला; पण तोही विचारात न घेता या विषयावर वादळे अद्याप निर्माण केली जातच आहेत. हे का घडते हेही म्हणूनच पाहावे लागते. झाड जमिनीवर उगवते हे खरे; पण जेवढ्या जमीन भागावर झाड उभे आहे तेवढी जमीन किंवा वरचे खोड म्हणजेच झाड असे कुणी म्हणू शकत नाही. तसेच या 'हिंदू' शब्दाचे आहे. भौगोलिकदृष्ट्या काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि काटेवाडपासून कामरूप-आसामपर्यंत पसरलेल्या भूभागात राहणा-या लोकांना ‘ हिंदू' ही संज्ञा लाभली व या अर्थाने ही संज्ञा * भौगोलिक' आहे, ‘प्रादेशिक' आहे हे खरे; पण लोक राहू लागल्यावर ते प्राण्यांसारखे नुसतेच जन्मले आणि मेले असे तर घडत नाही. ते राहतात, पोटापाण्याचा उद्योग करतात, कलाकौशल्यांची निर्मिती करतात, ज्ञानाची देवाणघेवाण करतात, परस्परांवर प्रेम करतात, द्वेषाने वेडे होतात, युद्धे खेळतात, राज्ये स्थापन करतात आणि यापलीकडे जाऊन ईश्वराच्या शोधासाठी हे सर्व सोडून अरण्यात, डोंगरावर निघूनही जातात. थोडक्यात जमिनीवरून वर आलेले झाडाचे खोड जसे ।। बलसागर ।। १४६ ________________

केवळ खोड राहत नाही, त्याला पानाफुलांचा बहर येतो, फळे येऊन ते वाकते किंवा वादळवा-याने झोडपले जाऊन ते कोसळते, तसेच लोकांचे, समाजाचेही होत असते. असे हे होत राहणे म्हणजेच भूगोलाचे-प्रदेशाचे संस्कृतीकरण होणे, जनावरांची माणसे होणे. यादृष्टीने पाहता 'हिंदू' ही संज्ञा मूळ भौगोलिक-प्रादेशिक खरी; पण हजारपाचशे वर्षानंतर आपोआपच ही संज्ञा केवळ भूभागापुरती लागू न राहता व्यापक होत गेली, या भूभागातील लोकांच्या धर्म संस्कृतीला, कलाकौशल्याला, इतिहासपुराणांना उद्देशूनही हा शब्द, 'हिंदू' ही संज्ञा वापरली जाऊ लागली. हा सर्व अर्थाचा-आशयाचा व्यापक विस्तार ध्यानात घेऊनच सावरकरांनी आपल्या 'हिंदू' या शब्दाच्या व्याख्येत 'पितृभू' आणि 'पुण्यभू' अशी जोडशब्दांची योजना केली. हिंदू' कुणाला म्हणावे ? जो पिढ्यानपिढ्या या भूभागात नांदत आला, म्हणजे ज्याची ' पितृभू' हा विशिष्ट भूभाग आहे तो माणूस, तो समाज हे तर उघडच आहे; पण हा झाला केवळ भूगोल. पिढ्यान पिढ्या एकत्र नांदल्यामुळे या माणसाने, या समाजाने एक संस्कृतीविशेषही निर्माण केला, तोही ध्यानात घ्यायला हवा. म्हणून 'पितृभू'ला ' पुण्यभू'ची जोड सावर. करांनी दिलेली आहे. 'हिंदू' हा शब्द अशा त-हेने केवळ भूभागापुरताच मर्यादित न राहता, धर्मसंस्कृती, कलाकौशल्यकलापालाही उद्देशून वापरला जाऊ लागला. जमिनीप्रमाणेच तो आकाशालाही भिडला, शरीराप्रमाणेच मनोबुद्धींनाही व्यापून तो उरू लागला. असे प्रत्येक समाजाचे होत असते, यात अस्वाभाविक, अनैसर्गिक असे काहीही नाही. सवयोने, परंपरेने एखादा शब्द रूढ होतो, त्याभोवती लोकजीवन संघटिन-विघटित होत राहते, संस्कृतींचे उत्कर्षापकर्षही अशा शब्दांशी जोडले जातात. असे जर आहे-असते तर 'हिंदू' शब्दावरूनच एवढे वादळ का ? ‘हिंदी हा शब्द चालू शकतो. 'जयहिंद' ही घोषणा लोकप्रिय ठरू शकते. यावरून निघालेला 'इंडियन' हा शब्द तर फॅशनेबलसुद्धा आहे. मग 'हिंदू' हा शब्द उच्चारल्यावरच एकदम दचकायला का व्हावे ? ब्रिटन आणि इंग्लंड हे दोन शब्द सर्रास वापरले जाऊ शकतात. यातील एका शब्दाचा त्याग करा असे कुणी म्हणत नाही. मग 'हिंदू' हा शब्द सोडा आणि भारतीय' हा शब्द वापरा असा अट्टाहास कशासाठी ? दोन्हींचा सहज स्वीकार आणि वापर आपल्याकडे का होऊ शकत नाही ?

 • हिंदू' म्हणजे एक भोंगळ आणि भित्रा प्राणी अशी जोवर स्थिती होती तोवर या शब्दाला फारसे कुणी बिचकत नव्हते. सरसहा तो प्रचारात होता, आधुनिक भारताची पायाभरणी करणारे थोरथोर नेतेही आपल्या लिखाणात, बोलण्यात या देशाला हिंदुराष्ट्र' असे म्हणत होते. टिळकांच्या, विवेकानंदांच्या,

वलसागर ।। १४७ ________________

अरविंदांच्या लिखाणात हा शब्द सहजगत्या आलेला आहे; पण हळूहळू हिंदू संघटित व समर्थ होऊ लागला, जशास तसे वागू लागला, सतत मार खात राहण्याचे तो नाकारू लागला, तेव्हापासून एक प्रकारची संकुचिततेची भावना या शब्दाला चिकटली व नवराष्ट्रनिर्मितीला ही भावना अडचणीची ठरते असे वातावरण तयार होऊ लागले. बहुसंख्याकांचे राष्ट्र म्हणजे हिंदुराष्ट्र हा सरळसाधा अर्थ मागे पडून ‘अल्प संख्यांकांची हद्दपारी' या अर्थाने या शब्दाकडे पाहिले जाऊ लागले व हिंदुस्थान हिंदूओंका, नही किसी के बापका' या हिंदू संघटनावाद्यांच्या घोषणेमुळे हा अर्थ अधिकच पक्का होऊन बसला. वास्तविक 'हसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्थान' या द्विराष्ट्रवादी घोषणेची ‘हिंदुस्थान हिंदुओका' हो घोषणा स्वाभाविक प्रतिक्रिया होती. ती तेवढ्यापुरती, चळवळीतील भावनोद्रेक म्हणूनच खरी होती. आक्रमक अल्पसंख्याकांना दिलेले ते उत्तर होते. मूळ हिंदुराष्ट्रवादी मांडणीमध्ये अल्पसंख्याकांचे सर्व लोकशाही हक्क सुरक्षित आहेत अशीच भूमिका घेतली गेलेली होती. संयुक्त, समान हिंदी राज्य हेच हिंदुराष्ट्राचे ध्येय आहे अशी स्पष्ट घोषणा सावरकरांच्या गाजलेल्या अहमदाबादच्या अध्यक्षीय भाषणात करण्यात आलेली होती. पण चळवळीच्या काळात मूळ भूमिका सहसा पाहिल्या जात नाहीत तसेच याही बाबतीत घडले व हिंदुराष्ट्रवाद म्हणजे मुसलमानांना, इतर अल्पसंख्याकांना हद्दपार करू म्हणणा-यांचा राष्ट्रवाद असा समज रूढ झाला व अल्पसंख्याकांच्या मतांवर सत्तेचे नवे राजकारण उभे करणा-या सर्वांच्या तो पथ्यावर पडणारा असल्याने, तो दूर करण्याची कुणी तसदी घेईनासा झाला. स्वातंत्र्यानंतर समतेचे वारे देशात वाहू लागले. हिंदू म्हणजे चातुर्वण्य मानणारा समाज असा एक नवा अर्थ पूर्वीच्या मुस्लिम विरोधी अर्थाला चिकटला व आज मुस्लिमविरोध व दलितविरोध असे दोन अर्थ 'हिंदू' या संज्ञेला चिकटलेले असल्याने हा शब्द उच्चारायला जो तो बिचकत आहे. आपण संकुचित ठरू या भयाने बहुतेक लोक या शब्दाचा वापर करण्याचे टाळत आहेत. वास्तविक हिंदुत्व वादी चळवळीत चातुर्वण्य मानणारे गोळवलकर गुरुजी होते तसेच चातुर्वण्यावर हल्ला करणारे सावरकरही होते. असे भेद हिंदी राष्ट्रवादी चळवळीतही होतेच. गांधीजी चातुर्वण्य मानत होते तर नेहरू, सुभाष आधुनिक समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारे; पण आशय दोन्हीकडचा सारखा असूनही हिंदीभारतीय राष्ट्रवाद संकुचित ठरला नाही; हिंदुराष्ट्रवादाभोवती मात्र वर्णवर्चस्वाच्या, मुस्लिमविरोधाच्या भिती रचल्या गेल्या, संकुचिततेची एक तप्तमुद्रा या शब्दावर कायमची ठोकली गेली. इतकी की, अटलबिहारी वाजपेयींसारखे पूर्वाश्रमीचे जनसंघवादी नेतेही 'हिंदू' शब्दाऐवजी ' भारतीय' शब्द वापरावा असे सुचवू लागले. प्रश्न असा आहे की, हिंदू आणि भारतीय हे दोन्ही शब्द ।। बलसागर ।। १४८ ________________

समानार्थक असतील तर एक सोडावा आणि दुसरा पत्करावा असा तरी आग्रह का असावा ? दोन्हींचा वापर चालू रहावा हेच अधिक उचित व आजवरच्या परंपरेला, प्रथेला धरून होणार नाही का ? रा. स्व. संघाने ही भूमिका घेतलेली आहे व सद्यःस्थितीत ती चुकीची आहे असे म्हणता येणार नाही. पुढे जाऊन सरसघचालक बाळासाहेब देवरस आपल्या अलीकडेच झालेल्या नागपूरच्या विजयादशमी उत्सवातील भाषणात असेही म्हणाले आहेत की, बहुसंख्यांक असलेल्या हिंदूना या देशात जातीय व संकुचित ठरवणे हा या समाजाचा घोर अपमानच आहे. यावरून 'हिंदू' शब्द राजकारण्यांना अडचणीचा वाटतो आहे म्हणून टाकून देण्याचा संघाचा मुळीच विचार नाही हे स्पष्ट होते. ज्यावेळी राजकारणात वावरणारे लोकही हिंदू, हिंदी, भारतीय हे शब्द पूर्वीप्रमाणे समानार्थक म्हणून सरसहा वापरू लागतील, या शब्दावरचा बहिष्कार मागे घेतील तेव्हाच हा प्रश्न कायमचा सुटणार आहे. बदल उभयपक्षी हवा. संघाने बदलावे असे ज्यांना मनापासून वाटते त्यांनीही आपले जुने समज-गैरसमज तपासून घ्यायला नकोत का ? कशासाठी गेली साठ वर्षे हा संघ यज्ञ' चालू आहे हे विरोधकांनी, टीकाकारांनीही आता नीट जाणून घ्यायला हवे. हिंदू, भारतीय हे शब्द संघ समानार्थक मानतो अशी सरसंघचालकांनी निःसंदिग्ध घोषणा केलेली आहे. तसे प्रत्यक्ष आचरणही संघाकडून घडत आहे. मोर्वांतील पूरग्रस्तांना साहाय्य असो की, केरळातील संघ शाखांची बांधणी असो; जो राष्ट्रनिष्ठ, देशाविषयी आत्मीयता असणारा, तो आपला अशी संघाची वागणूक लख्ख आहे. मग संघाने या देशाला ' हिंदुराष्ट्र' म्हटले म्हणून बिघडले कोठे ? H अर्थात हिंदुराष्ट्र म्हणा, भारत म्हणा किंवा उद्या आणखी काही एखादे नामांतर होऊ द्या; वस्तुस्थिती बदलत नाही; प्रश्न कायमच राहतात. हे राष्ट्र ज्यांना मोठे व्हावे असे वाटते त्यांना केवळ शब्दांचे वाद खेळून समाधान पावता येणार नाही. राष्ट्र मोठे कसे करायचे हा मुख्य सवाल आहे व याचे उत्तर पूर्वीच्या चुका उगाळत बसून किंवा केवळ आपल्या जुन्या परंपरेत वरचेवर बुड्या मारून सापडणे शवय नाही. आज हे राष्ट्र गरीब आहे. येथे संपन्नतेचे युग कसे येईल ? आज हे राष्ट्र विषमतेने ग्रासलेले आहे. येथे समता कशी स्थापन करता येईल ? आज येथे राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव आहे. हा कसा दूर करता येईल ? परकीय बड्या राष्ट्रांची दडपण वाढत आहेत, अमेरिकन संस्कृतीचे न कळत, कळत अनुकरण होत आहे. भारतीय आदर्शाचा लोप सुरू आहे. हे सांस्कृतिक, आर्थिक आक्रमण कसे थोपवून धरायचे ? देशात विघटनवादी प्रवृत्तींनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यांना ।। बलसागर ।। १४९ ________________

पायबंद कसा घालायचा ? येथील लोकशाहीचा प्रयोग फसण्याचा धोका आहे. हा कसा टाळायचा ? हे खरे या दशकातले आपले मूलभूत प्रश्न आहेत व शब्दांचे घोळ घालत बसून ते सुटणार नाहीत हे उघड आहे. या मूलभूत प्रश्नांना जनता पक्ष हे बरेचसे समाधानकारक उत्तर सापडले होते; पण दुर्दैवाने या पक्षाची नौका शाब्दिक मतभेदांच्या खडकावरच आपटुन फुटली. उद्दिष्टांबाबत कुठलेही वाद निर्माण झालेले नव्हते; पण शब्दांचे बागुलबुवे उभे केले गेले आणि अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दात सांगायचे म्हणजे 'एक स्वप्न अध्यवरच तुटून गेले. मृच्छकटिकातल्या चारुदत्तासारखी जनता पक्षनेत्यांची अवस्था झाली. 'न भीतो मरणादस्मि'-चारुदत्त आपल्या मित्राला म्हणतो* केवलं दूषितं यशः' ।' मित्रा, भय मरणाचे नाही. यशाला काळीमा लागला हे दुःख आहे- ' जनता पक्षाचे निदान काही नेते तरी मनातल्या मनात असेच म्हणत असतील. यांचे दु:खे केवळ सत्ता गेल्याचे नाही; ७७ चे उज्ज्वल यश, त्यावेळी डोळ्यांसमोर तरळलेली संपूर्ण क्रांतीची स्वप्ने धुळीला मिळाली ही खरी यांची व्यथा आहे. क्रांतीच्या मार्गाबाबत मतभेद झाले असते, तत्त्वासाठी फाटाफूट झाली असती तर फिकीर नव्हती. पण काहींची व्यवितगत सत्ताकांक्षा आणि नैतिक-बौद्धिक अहंमन्यता यामुळे पक्ष फुटावा, सत्ता जावी, क्रांतीचा प्रवास अर्धवटच रहावा, हे खरे या नेतेमंडळींचे दु:ख आहे. आणि हे सर्व या क्रांतीच्या जन्मदात्याच्या डोळ्यांसमोरच घडावे ! तो मृत्युशय्येवर असताना त्याला आपली बाग उजाड झाल्याचे पाहावे लागावे, हा तर केवढा दैवदुविलास आहे ? खरं तर त्याला जनता पक्ष बांधणीच्या कितीतरी पुढे जायचे होते. हे केवळ सुरुवातीचे हत्यार होते. पण तेही आज मोडून पडले आहे. ते पुन्हा जोडले गेले, जन्मदात्याची स्वप्ने आणि जनता पक्षाची संघटना यांचा मेळ पुन्हा जमून आला तर कुठल्याही शब्दात मावणार नाही, एव्हडी सुखसमृद्धी येथे नांदू शकणार आहे. इतकी साधनसामग्री, मनुष्यबळ, बुद्धिबळ येथे आजही उपलब्ध आहे की, कोणतीही असामान्य व्यक्ती-शक्ती न अवतरताही येथे आवश्यक ते परिवर्तन घडू शकते, संपूर्ण क्रांतीचे स्वप्न साकार होऊ शकते. गरीब भारत बलसागर भारत म्हणून विश्वात शोभून दिसू शकतो. जे. पी. गेले असतील. पण त्यांचा वारसा टिकवून धरला जाऊ शकतो. असामान्य नेतृत्वाची उणीव गणनेतृत्वाने भरून काढता येण्यासारखी आहे. संभाजीचा वध झाल्यावर मराठेशाही कशी तरली ? तसे हे जनता पक्षातले संताजी-धनाजी आपापले मतभेद-स्वार्थ विसरून काही काळ तरी वावरू शकतात की नाही ? यासाठी थोडा विवेक हवा. दूरदृष्टी हवी. पूर्वग्रह बाजूला ठेवण्यासाठी आवश्यक तो विचारांचा, वृत्तीचा मोकळेपणाही हवा. एवढ्याने सर्व कार्यभाग आटोपतो असे नव्हे. पण जयप्रकाशांचे कुंकू लावायचे तर किमान एवढे तरी ।। बलसागर ।। १५० ________________

जमायलाच हवे. त्यांचा क्रांतीचा वारसा पुढे न्यायचा तर न भांडणारा, एकदिलाने चालणारा, कार्यक्रमाची नेटाने अंमलबजावणी करणारा, गणनेतृत्वांधिष्ठित जनता पक्ष ही किमान गरज आहे. मुख्य भार अर्थातच ग्रामीण भागात राहून, सत्तासंपत्ती याकडे पाठ फिरवून, दारिद्रयरेषेखाली जीवन कंठणा-या जनसमुदायांचे संघटन आणि संवर्धन करणा-या तरुणांनी वाहायचा आहे. संपूर्ण क्रांतीचा रथ अशी तरुण मंडळीच पुढे नेला तर नेऊ शकणार आहेत. जयप्रकाशांची सारी आशा या तरुणवर्गावरच केन्द्रित झालेली होती. केवळ सत्ताबदल, पक्षबदल किंवा वर्गबदल म्हणजे क्रांती असे त्यांनी मानले नव्हते. या प्रचलित माक्र्सवादी-समाजवादी भ्रमातून ते फार पूर्वीच मुक्त झालेले होते. त्यांची संपूर्ण क्रांतीची कल्पना माक्र्सवाद आणि सर्वोदय या दोन्हीचा समन्वय साधण्याचा एक प्रयत्न होता. हा प्रयत्न यशस्वी ठरायचा तर सत्तेपेक्षा सेवा, राजकारणापेक्षा समाजकारण अधिक महत्त्वाची मानणारी तरुण मंडळी मोठ्या संख्येने पुढे यायला हवीत. रा. स्व. संघ आणि जयप्रकाश यांच्यातील समान दुवा हाच होता. सत्ताधारी परिवर्तनावर शिक्कामोर्तब करू शकतात, परिवर्तनाचे प्रवाह सुरू करू शकत नाहीत. त्यासाठी लोकांबरोबर, लोकांसाठी झिजणारे सेवाव्रतधारी तरुण–प्रौढच अधिक उपयुक्त आहेत, असा गांधीजींचाविनोबांचा विचार जयप्रकाश पुढे नेत होते व आज नाही उद्या या विचाराला संघासारख्या संस्थांकडून मान्यता लाभण्याची, त्यानुसार व्यापक प्रमाणावर कृती घडण्याची खूपच शक्यता निर्माण झालेली होती. ही परिवर्तनाची खास भारतीय शैली आहे व कालानुरूप जे. पी. तिला नवे रूप देत होते, संघाचीही याला साथ मिळणे अवघड नव्हते. शेवटी हिंदुत्व काय किंवा भारतीयत्व काय, शब्दांच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. असे पाहिले गेले असते तर जनता पक्ष फुटला नसता आणि जे. पीं.नाही आपले विचार अंमलात आणणारी तरुण मंडळी जागोजाग पाहण्याचे भाग्य लाभले असते. उद्या असा भाग्योदय होणार नाही असे नाही. पण एक संधी हुकली एवढे खरे. पुन्हा केव्हा असा मणिकांचन योग जमून येतो ते पाहायचे. तो लवकर येवो. ऑक्टोबर १९७९ बलसागर ।। १५१ ________________

हा प्रवाह आला कोठून ? आणला कोणी ? जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर यांची कन्याकुमारी ते दिल्ली ही भारत यात्रा महाराष्ट्रात पोचली आहे. येत्या आठवड्यात ती पुण्यास येत आहे. यात्रेकरूंचे स्वागत मोठ्या प्रमाणावर करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. निवडणुका जवळ येत असल्याने जो तो पक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर राहण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. जनता पक्षाजवळ संघटना नसल्याने या पक्षाने या चंद्रशेखर-यात्रेचा असा उपयोग करून घेतला तर त्यात वावगे काहीच नाही. यात्रेतून पक्ष जरी बलवान झाला नाही तरी चंद्रशेखरांचे व्यक्तिमत्त्व एका अखिल भारतीय पातळीवर यामुळे पोचू शकते. जयप्रकाशांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हे व्यक्तिमत्त्व आजवर वाटचाल करीत आलेले आहे. ७७ मध्ये पक्ष नसला, संघटना नसली तरी जयप्रकाशांच्या व्यक्तिमत्त्वामुळे व आणीबाणीविरोधी वातावरणामुळे जनता पक्ष विजयी झाला, इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकला. असे व्यक्तिमत्त्व आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी उपलब्ध नाही. ही उणीव भरून काढण्याचा चंदशेखरांचा व त्यांच्या अनुयायांचा-सहका-यांचा प्रयत्न आहे. केवळ इंदिरा गांधीच व्यक्तिनिष्ठ राजकारण करतात असे नाही. एकूण भारतीय राजकारणाची प्रकृतीच व्यक्तिनिष्ठ आहे. पूर्वीही काँग्रेसमध्ये टिळकयुग, गांधीयुग, नेहरूयुग अशी व्यक्तिनामांकित युगेच होती. हिंदूसभा म्हणजे सावरकर हे समीकरण होते. भाजपजवळ अटलबिहारींसारखा अखिल भारतीय मान्यता व लोकप्रियता असलेला नेता आहे. शिवाय संघटना बांधणीसाठीही हा पक्ष प्रयत्नशील असतो. असे काही ठोस भांडवल जनता पक्षाजवळ म्हणजेच पूर्वाश्रमीच्या समाजवादी पक्षा । बलसागर ।। १५२ ________________

जवळ नाही. ही उणीव लाटांनी भरून निघते असा आजवरचा अनुभव आहे. अशी एखादी लोकोत्साहाची लाट निर्माण करण्याचाही हा प्रयत्न असण्याची शक्यता आहे. या यात्रेसोबत असलेले पुण्याचे भाई वैद्य यांची या यात्रेसंबंधीची वार्तापत्रे साधना-मराठवाडा या वृत्तपत्रातून आलेली आहेत. तामिळनाडूतील एका घोषणेचा उल्लेख एका वार्तापत्रात करण्यास ते विसरलेले नाहीत. वैद्यांनी लिहिले आहे, ' भारत यात्रेत घोषणा देताना तमिळ तरुण एम्. जी. आर.ला (तामिळनाडूचे चित्रपट अभिनेते,-मुख्यमंत्री) कोपरखळी मारत असत. ट्विकल, ट्विकल लिटर स्टार.... चंद्रशेखर सुपर स्टार ! अशा उल्लेखांवरून तरी वाटते, की 'भारताचा शोध' एवढाच काही या यात्रेचा आंतर हेतु नसावा ! वाट दिल्लीला जाणारी आहे. वाटसरू पुण्यास येत आहेत, त्यांचे स्वागत असो ! | प्रांतभेद, भाषाभेद, उत्तर-दक्षिण वाद, पक्षभेद वगैरे असले तरी भारतीय एकात्मतेचा अनुभवही यात्रिकांना ठिकठिकाणी येतो आहे. भाई वैद्यांनी आपल्या वार्तापत्रात लिहिले आहे; तरीही भारत यात्रेच्या काळात या गोष्टीची पक्की खात्री झाली की, प्रादेशिक अभिमानाच्या आड राष्ट्रीय अभि. मानाचा निर्मळ प्रवाह झुळझळ वाहात आहे. त्याची कित्येक प्रत्यंतरे मिळाली." ही प्रत्यंतरे पाहता यातील एकही न-हिंदू नाही, हे वातपित्रांवरूनच दिसते आहे. हा राष्ट्रीय अभिमानाचा वारसा मग आला कुठून ? भारतीय एकात्मता जर आज अस्तित्वात असेल तर नक्कीच ती गेल्या शे-दोनशे वर्षांपूर्वीही होती. तत्पूर्वीपासूनही चालत आलेली असणार; पण हे मान्य केले तर राष्ट्रवादाचा काँग्रेसी व डावा साम्यवादी सिद्धान्त सोडून द्यावा लागतो, त्याचं काय ? काँग्रेसच्या प्रारंभीच्या काळात तिच्यावर मवाळांचे, नेमस्तांचे वर्चस्व होते. रेल्वेमुळे, पोस्टामुळे, इंग्रजी शिक्षणामुळे आणि एकछत्री अंमलामुळे येथे राष्ट्रभावना निर्माण झाली, इंग्रजी राज्यामुळे भारतात राष्ट्रवाद आला, हा देश इंग्रजांमुळे एक झाला असे या मवाळाग्रणींचे मत होते व हेच मत पुढे गांधीनेहरूच्या काळापर्यंत व आजहो, न तपासता सर्वत्र रूढ झाले. उलट, येथील डावे व विशेषतः साम्यवादी, भारत हा एक उपखंड आहे, हा एक देश - हे। एक राष्ट्र नाहीच, येथे अनेक भाषिक राष्ट्रे आहेत असे प्रतिपादन करीत असतात. ही दोन्ही टोके अनैतिहासिक ठरवून येथील हिंदुत्ववाद्यांनी प्रथमच असे ठामपणे सांगितले की, इंग्रज येथे येण्यापूर्वीही, गेली सुमारे पाच हजार वर्षे तरी या देशात एक राष्ट्रीय समाज अस्तित्वात आहे, एक राष्ट्रजीवन येथे विकसित होत आहे, येथे एकात्मतेचा अंत:प्रवाह कधी प्रकटपणे, कधी सुप्तपणे वाहात आलेला ।। बलसागर ।। १५३ ________________

आहे. हा अंतःप्रवाह कधी खंडित झाला असेल, पराभूतही ठरला असेल; पण इजिप्त किवा ग्रीसप्रमाणे पूर्ण नामशेष असा कधीही झालेला नाही. हा प्रवाह मुख्यतः आणि मूलत: हिंदू प्रवाह आहे आणि हाच येथील एकात्मतेचा, राष्ट्रीयत्वाचा मूलाधार आहे. इंग्रजांनी प्रादेशिक-भौगोलिक ऐक्य आणले हे हिंदुत्ववादी नाकारीत नाहीत. या मुख्य प्रवाहाला अनेक उपप्रवाह येऊन मिळाले आहेत, हीही वस्तुस्थिती आहे; पण गंगा-यमुनांचा संगम झाला तर पुढे वाहात जाणा-या प्रवाहाला गंगानदीच म्हणतात. तसे इतर भिन्नभिन्न प्रवाह मुख्य प्रवाहाला मिळाले तरी प्रवाहाचे मूळ हिंदूस्वरूप बदलत नाही. चंद्रशेखरांना व इतर भारतयात्रिकांना आढळून आलेला राष्ट्रीय एकात्मतेचा प्रवाह ही काही अचानक उद्भवलेली राजापूरची गगा नाही. तो असलाच तर भगीरथाच्या काळापासून वाहात आलेला आहे, हिंदू म्हणवणा-यांनी तो वाहात राहावा, नामशेष होऊ नये म्हणून आपली जीवने यासाठी सांडलेली आहेत, वेचलेली आहेत. म्हणून मवाळीग्रणींचा केवळ प्रादेशिकतेवर आधारित हिंदी राष्ट्रवाद व डाव्यांचा-साम्यवाद्यांचा उपखंडवाद हे दोन्हीही अनैतिहासिक राष्ट्रवाद आहेत. हिंदुत्व हेच येथील राष्ट्रजीवनाचे पर्याप्त वर्णन आहे. ख्रिस्ती धर्ममार्तडांनी गॅलिलियोचा खूप छळ केला. छळाला कंटाळून त्याने पृथ्वी ही बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे स्थिर आहे अशी कबुलीही दिली; पण शेवटी हळू आवाजात तो म्हणालाच, " मी काय करू ? ती फिरतेच आहे.' तसे निवडणूक-मार्तडांनी आपल्याकडे चालवले आहे. ख्रिश्चनांची आणि मुस्लिमांची मते मिळावीत म्हणून 'लब्धप्रकाश-इतिहास-निसर्गमाना ' वर आधारलेला राष्ट्रवादाचा मळ सिद्धांतच ते नाकारीत आहेत. तिकडे धर्ममार्तडांचे जे झाले तेच इकडे या निवडणूकमार्तडांचे होणार आहे. काळच त्यांना खोटे ठरवणार आहे. भारत-यात्रिकांना एकात्मतेचा अनुभव जर खरोखरच येत असेल तर या अनुभवाच्या मुळाशी, तळाशी जाण्याचा त्यांनी शक्यतो लवकर व प्रामाणिकपणे अवश्य प्रयत्न करावा. भारत म्हणा, राष्ट्रीय एकात्मता म्हणा, हिंदुत्व म्हणा - मूळ एकच आहे- इंग्रज आणि मुसलमान या देशात येण्यापूर्वीही जे होते ते. देवाण-घेवाण, सरमिसळ झाली हे नक्कीच; पण गाभा, बीजस्वरूप टिकले; ते टिकवून ठेवण्यासाठी पिढ्यानुपिढ्यांनी आपले रक्त सांडले म्हणून ! असे रक्त वाहिले नसते तर चंद्रशेखरादी यात्रिकांना जो भारतीय एकात्मतेचा अनुभव आला तो आलाच नसता ! चंद्रशेखर ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालले आहेत त्या जयप्रकाशांनाही शेवटी शेवटी हे सत्य जाणवले. ' कुछ बात है ऐसी'जी आम्हाला एकत्र बांधून ठेवते आहे, असे त्यांनी बिहारमधील, अगदी एका बलसागर ।। १५४ ________________

रा. स्व. संघ कार्यक्रमात उघडपणे सांगितलेले आहे. ही बात ' कोणती ? अवश्य सर्वांनी शोध घ्यावा. सत्ता मिळाली न मिळाली, सुपरस्टारकी लाभली न लाभली तरी भांडणे तरी कमी होतील, प्रसिद्धीला सिद्धीची जोड देता येईल. नाही तर आहेच आले वारे, गेले वारे लाटांकडून लाटांकडे एप्रिल १९८३ | ।। बलसागर ।। १५५ ________________

सामथ्र्य आहे चळवळीचे | १८ जुलै १९८३. म. फुले यांनी लिहिलेल्या ' शेतक-याचा आसूड' या ग्रंथाला या दिवशी शंभर वर्षे पूर्ण झाली. पुण्याच्या साहित्य परिषदेत या निमित्ताने सभेचा एक कार्यक्रम योजला गेला होता. वक्ते होते प्रा. गं. बा. सरदार आणि प्रा. वि. म. दांडेकर. दांडेकरांनी फुल्यांच्या ग्रंथाची थोडक्यात ओळख करून दिली तर गं. बा. सरदार यांनी ग्रंथातील सर्व विचार सध्या लागू पडत असलेनसले तरी फुले यांच्यापासून प्रेरणा घेणे महत्त्वाचे आहे, विभूतिपूजा टाळली पाहिजे असे सांगितले. शेतक-यांच्या दैन्यावस्थेला ब्राह्मणांची पुरोहितशाही व सरकारी नोकरांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे, असे फुले यांचे त्या काळचे प्रतिपादन आहे. सावकारशाहीचा उल्लेख फुले यांनी केलेला आहे; पण या शाहीवर म. फुले यांच्या आसुडाचे वळ उठलेले नाहीत. याचे एक कारण, बहुसंख्य सावकार गुजर, मारवाडी-जैन वगैरे ब्राह्मण नसलेल्या समाजातील होते, हे असावे, असेही ग. बा. सरदारांनी आपल्या भाषणाच्या ओघात सूचित केले. कार्यक्रम आटोपल्यावर पूर्वाश्रमीचे एक कम्युनिस्टविचारी, सध्या इंदिरानुकूल असलेले एक ज्येष्ठ व निवृत्त पत्रकार म्हणाले, “ शरद जोशी सध्या यापेक्षा वेगळे काय सांगत आहेत ?' शरद जोशींच्या विचारांची-चळवळीची महाराष्ट्राला सर्वप्रथम ओळख करून देणा-या ' योद्धा शेतकरी' या विजय परुळकर लिखित पुस्तकाच्या शेवटी, ।। बलसागर ।। १५६ ________________

मलपृष्ठावर ठळकपणे शरद जोशींचे पुढील विधान छापण्यात आलेले आहे. शरद जोशी म्हणतात - । * शेतक-यांचे शोषण न होता जलद आर्थिक विकास होऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी हा लढा आहे. महात्मा फुले यांनी शेतक-यांच्या आसुडाविषयी जे सांगितले त्यामध्ये व आज मी जे काही सांगतोय त्यामध्ये काहीही फरक नाही फक्त फुल्यांच्यानंतर हा विचार प्रथमच पुढे येत आहे आणि मी तो अर्थशास्त्रीय परिभाषेत मांडतो आहे. | एक ऐतिहासिक महत्त्वाचा लढा आपण लढतो आहोत. यामधून जगाच्या आर्थिक जडण-घडणीला नवी दिशा मिळणार आहे." | म. फुले यांची शिकवण राज्यकर्त्यांनी नेहमी डोळ्यांसमोर ठेवावी, त्यांच्यापासून स्फूर्ती व प्रेरणा घ्यावी म्हणून मुंबईच्या नव्या विधानभवनासमोर म. फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यानंतरचे, आपले महाराष्ट्रातील राज्यकर्ते तरी बहुसंख्येने शेतकरीसमाजातून पुढे आलेले आहेत. तरी शेतकरी समाज मात्र फुल्यांच्या काळात होता त्यापेक्षा अधिक उध्वस्त व कर्जबाजारी झालेला आहे. शरद जोशींची शेतकरी-चळवळही सध्या पूर्ण थंडावलेली आहे. शेतक-यांच्या एकाही चळवळीला, बंडाला आजवर आपल्याकडे पूर्णपणे यश का आले नाही ? तिकडे चीनमध्ये शेतक-यांचे नेतृत्व करणारा माओ यशस्वी ठरतो. शेतक-यांची दैन्यावस्थेतून, कर्जबाजारीपणातून मुक्तता करतो. इकडे विनोबांची भूदान चळवळ अल्पयशी, नक्षलवादी पराभूत, शरद जोशी–रुद्राप्पा-चरणसिंग या शेतकरी नेत्यांची पिछेहाट, असे का ? एक काळ माओच्या अतिगौरवाचा होता. सध्या माओचे अवमूलन सुरू आहे. ही दोन्ही टोके सोडली तरी माओने ग्रामीण चीनचा कायापालट घडवून आणला, शेतक-यांचे दैन्य घालविले, चीनला कर्जबाजारीपणातून मुक्त केले, याबाबत शंका घ्यायला जागा नाही. मराठीत पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले आर. के. पाटील यांचे चीनवरचे पुस्तक पहा किंवा अगदी अलीकडचे नारगोळकरांचे. या दोन्ही व्यक्ती चीनमध्ये प्रत्यक्ष जाऊन आलेल्या. सर्वोदयी विचाराच्या. यांनी माओ-क्रांतीचे यश आणि अपयश दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. शेतक-यांची परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच सुधारली आहे असे ।। बलसागर ।। १५७ ________________

त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केलेले आहे. कुसुम नारगोळकरांच्या पुस्तकाला सर्वोदये विचारवंत श्री. दादा धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. दादांनी लिहिले आहे, * चीनच्या शेतक-यांचे आणि शेतमजुरांचे क्रांति पूर्व काळातील अत्यंत खडतर आणि हलाखीचे जीवन आणि क्रांतीनंतरचे त्यांचे त्यामानाने किती तरी सुखाचे जीवन यांच्यातील तफावत अंत:करणाला स्पर्श करते. चीनमध्येही क्वचित आळशी व कामचुकार लोक असतील; पण बेकारी, उपासमार व भीक यांचा मागमूसही नाही ही गोष्ट साम्यवादी क्रांतीची जमेची बाजू आहे. तिची वास्तविकता व महत्त्व ही कुठल्याही सहृदय माणसाला मुग्ध करण्यासारखी आहे." (‘आम्ही पाहिलेला चीन,' कुसुम नारगोळकर, पृष्ठ ६ ) | अशी माहिती अलीकडे येत आहे की, माओनंतरचे राज्यकर्ते माओने स्थापन केलेल्या कम्युनपद्धतीत हळूहळू बदल करीत आहेत. खासगी शेतीला मर्यादित प्रमाणात प्रोत्साहन देण्याची त्यांची दृष्टी आहे. जेथे खाजगी मालकी व्यवस्था पूर्वीपासूनच आहे त्या तैवानमध्ये किंवा युद्धोत्तर दक्षिण कोरियामध्ये शेतीशेतक-यांची प्रगती खूपच आहे. त्यामानाने माओचा किंवा माओ-नंतरचा चीन मागेच आहे, हे खरे आहे. पण भारतापेक्षा चीन पुढे आहे, तेथील ग्रामीण-शहरी जीवनाचा आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक स्तर आपल्यापेक्षा उंचावलेला आहे, यात शंका नाही. अजून भारत खतांची आयात करतो आहे, परक्या देशांवर अगदी प्राथमिक गरजांसाठीही आपण अद्याप अवलंबून आहोत. चीनमध्येही ग्रामीण भाग सोडून शहरात गर्दी करण्याची प्रवृत्ती आहे; पण आपल्यासारख्या झोपडपट्टया, भिका-यांच्या रांगा तेथे नाहीत. नुकतेच आपल्याकडील प्रकाशकांचे एक शिष्टमंडळ चीनला भेट देऊन आले. या शिष्टमंडळाचे एक सदस्य कृष्णा कृपलानी ( दिल्ली यांनी चीनमध्ये त्यांना सहज जे दृष्टोत्पत्तीस आले ते एका पत्रद्वारे प्रसिद्ध केलेले आहे. मुळ पत्र ' टाइम्स ऑफ इंडिया' ( १२ जुलै १९८३ ) या अंकात आलेले आहे. त्याचे हे पुण्याच्या * श्रमिक विचार' या दैनिकाचा २० जुलै अंकातील भाषांतर | कृपलानींची साक्ष | : नुकतीच मो चीनला भेट देऊन आलो. भारतातील प्रकाशकांचे एक शिष्टमंडळ भारत सरकारतर्फे चीनला पाठविण्यात आले होते, त्यात माझाही समावेश होता. चिनी सरकारतर्फे अशा शिष्टमंडळाला निमंत्रण दिले गेले होते. पंधरा दिवसांच्या आमच्या दौ-यात आम्ही बीजिंग, चेंग डू, शांघाय आणि कॅन्टन या शहरांना भेटी दिल्या. चिन्यांचे आदरातिथ्य भरपूर होते; परंतु कुठेही भपको नव्हता. चिनी लोक मला अत्यंत मैत्रीपूर्ण वाटले, तसेच ।। बलसागर ।। १५८ ________________

मनमोकळे आणि चांगल्या रहाणीमानात रस असलेले वाटले. जपान्यांसारखच चिन्यांनाही निसर्गाचे वेड आहे . त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची आवड आहे. आम्ही ज्या ठिकाणी रहात होतो तेथे किंवा अन्य ठिकाणीही दूरान्वयाने देखील माओच्या तत्त्वज्ञानाने आमचे 'ब्रेन-वॉशिंग' करण्याचा प्रयत्न केला गेला नाही किंवा चीनच्या पुरातन संस्कृतीच्या बढायाही कुणी मारल्या नाहीत. माझे सहकारी जे व्यवसायाने प्रकाशक होते ते चीनमधील प्रकाशकांशी संपर्क साधण्यात गुंतले होते. मी मात्र चीनमधील रस्त्यांवरील देखावे पाहण्यात गर्क होतो. भारतासारखेच चीनमधील रस्तेही माणसांनी भरून वाहात असतात. उलट भारतापेक्षा चीनमधील रस्त्यांवर माणसांची गर्दी जास्तच वाटली. आम्ही ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या त्या ठिकाणी माणसांच्या समुद्रातून वाट काढावी लागत होती. लहान-थोर, तरुण-वृद्ध हातात हात घालून, हसत-खिदळत, कधी आइस्क्रीम खात किंवा रस्त्यातून सरबत किंवा कोला पिताना दृष्टीस पडत असत. सर्वांचे वेष जवळजवळ सारखेच होते. पॅन्ट आणि कोट, बहुधा निळया, हिरव्या गडद रंगाचा. बायका आणि पुरुषांचे वेष सारखेच असल्याने ओळखता येणे कठीण जात होते. चेहरेपट्टीवरून किंवा केसांच्या ठेवणीवरून ओळखणे भाग पडायचे. मला सर्वात प्रकर्षाने काय जाणवले असेल तर श्रीमंती आणि गरिबी असे परस्पर विरोधी दृश्य मला कुठेही दिसले नाही. मी खूप प्रयत्न करूनही पंधरा दिवसात मला एकही भिकारी कुठे दिसला नाही ! भुकेले चेहरे आणि कृश शरीरे जशी कुठे आढळली नाहीत तसेच श्रीमंती आणि भपकेबाज कपडे केलेली माणसेही कुठे दिसली नाहीत. आपल्या देशात मात्र हे दश्य सर्रास दिसते, ही जाणीव झाली. अर्थात मी जे पाहिले ते सर्व वरवरचे होते. त्यांची आंतरिक दुःखे काय आहेत हे कळण्यास काही मार्ग नव्हता ; पण एक गोष्ट स्पष्ट दिसली की, अशी जरी काही वैयक्तिक दुःखे असली तरी ती घरी ठेवून ते बाहेर पडले असावेत. कुणा परदेशीय माणसाला दाखविण्यासाठी मुद्दाम आयोजित केलेली ही दृश्ये नव्हती, तर ती नेहमीचीच होती.

सिनेमाची पोस्टर्स, नाटकाच्या जाहिराती किंवा नृत्याच्या जाहिरातीत कुठेही अश्लीलता किंवा उघड्या अंगाचे प्रदर्शन दिसले नाही. तरुण मुले-मुली जरी खेळकर आनंदी दिसली तरी सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे, मिठ्या मारून प्रेम व्यक्त करणे असे जे प्रकार पाश्चिमात्य देशात नेहमी पाहायला मिळतात ते चीनमध्ये कुठेही दिसले नाहीत. मी जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत; परंतु चिनी स्त्रियांइतक्या आकर्षक स्त्रिया मला कुठेही

आढळल्या नाहीत आणि ते सुद्धा फेशनेबल कपडे, दागिने किंवा स्नोपावडरी किंवा इतर सौंदर्य प्रसाधने न वापरता ! चिनी स्त्रिया नुसत्याच आकर्षक नाहीत ।। बलसागर ।। १५९ ________________

तर त्या कार्यक्षम आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, दुकाने, लिफ्टमधील कामे स्त्रिया करतातच; परंतु टॅक्सी चालवणे, बसड्रायव्हर म्हणूनही अनेक स्त्रिया कामे करीत आहेत. हे सगळे करून कुटुंबातही बडदास्त ठेवणेही चालूच असते. चिनी स्त्रिया अत्यंत नम्र आणि आकर्षक असल्या तरी भडक अजिबात नाहीत. इंग्लंड-अमेरिकेतील स्त्रिया जी कामे करतात ती सर्व चिनी स्त्रिया करतात, त्यांच्यासारख्या रस्त्यातून भटकत मात्र नाहीत.

मी जे काही पाहिले ते गांधीजींनी पाहिले असते तर त्यांना ते खचितच आवडले असते. खरोखर ज्या देशात एकही मनुष्य उपाशी नाही, एकही चिंध्या ल्यालेला नाही आणि ज्या देशात प्रत्येक मनुष्य सर्वजण सारखे असल्याने ताठ मानेने वावरतो आहे, असा देश म्हणजे गांधीजींच्या कल्पनेतील रामराज्यच. चिनी लोक त्याला फार तर माओ राज्य म्हणतील. कारण ते देवावर विश्वास न ठेवणारे आहेत. मात्र आम्ही एका बुद्ध मंदिरात गेलो असताना बुद्धाच्या प्रचंड मूर्तीपुढे शेकडो लोक गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना दिसले.
चीनमध्ये मी जे पाहिले त्यामुळे मी फार प्रभावित झालो आणि मला रविंद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीमधील ओळी आठवल्या.

‘मी येथून जाताना शेवटला निरोप म्हणून शब्द उच्चारावे ते हेच की, जे मी पाहिले आहे ते अगदी निरुपम-अगदी अप्रतिम आहे!' माक्र्स-लहान शेतकरी | लहान शेतकरी क्रांती करू शकत नाही असे माक्र्सचे मत होते. अशा शेतकव्यांचे जीवन फार अलग असते, परस्परसंबंध त्यांच्यात कमी असतात, गरजा स्वयंपूर्ण उत्पादनपद्धतीने भागवल्या जात असल्याने समान हितसंबंधाचे एकीकरण होऊन विशाल व व्यापक वर्गीय ऐक्याची भावना त्यांच्यात निर्माण होत नाही. जमिनीच्या लहान लहान तुकड्यांवरचे त्यांचे प्रेम फार तर ‘पितभू' (माक्सचा शब्द ) या देशभक्ति पर जाणिवेपर्यंतच उत्क्रांत होऊ शकते असे माक्र्स म्हणतो. या संदर्भात माक्सने शेतकरी समाजस्थितीला बटाट्याच्या पोत्यांची उपमा दिली. या लहान जमीनधारक शेतक-यांमधले परस्परसंबंध फक्त स्थानिक स्वरूपाचे असतात, त्यांच्या हितसंबंधांच्या एकजिनसीपणातून समाजघटक, समान राष्ट्रीयत्वाचा बंध किंवा राजकीय संघटना अस्तित्वात येत नाही म्हणून त्यांचा एक व बनलेला नसतो. म्हणून अशा विखुरलेल्या शेतकरी समाजाचा, जरी हा समाज बहुसंख्य असला तरी, प्रभाव पडत नाही, असे माक्र्सने आपल्या ‘लुई बोनापार्तची १८ वी ब्रूमेअर' या पुस्तकात लिहिले आहे; पण माओने मार्क्सचे । बलसागर ।। १६० ________________

है मत चुकीचे ठरवून दाखविले. विखुरलेल्या शेतकरी समाजालाच त्याने मोठ्या प्रमाणात संघटित करून चीनमध्ये क्रांती घडवून आणली. शेतक-यांच्या ठिकाणी स्वाभाविक असलेल्या दो बिघा जमिनीच्या प्रेमाचे त्याने पितृभूप्रेमात विकसन केले आणि वर्गविग्रहाचाही कौशल्याने उपयोग करून घेतला. स्वदेशप्रीती आणि समता या दोन्ही भावनांचा मेळ घातल्यामुळे माओला यश मिळाले. एडगर स्नो हा माओ-चीनवर लिहिणारा अलीकडचा पहिला महत्त्वाचा लेखक. माओचे हे वैशिष्ट्य त्यानेही हेरले होते.त्या अगोदर चीनमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी तिस-या इंटरनॅशनलतर्फे गेलेले मानवेंद्रनाथ रॉय यांनाही माओ हा राष्ट. वादी नेता आहे, असेच प्रकर्षाने जाणवलेले होते. आणखी एक चीन अभ्यासक, लिओनेल मॅक्स चॅसिन, आपल्या 'द कम्युनिस्ट काँक्वेस्ट ऑफ चायना' या ग्रंथात लिहितो-Mao cleverly appealed to the insticts of social justice and propritorship which are so strong in the human heart. Mao knew how to make his soldiers dedicated workers for a powerful China, a respected China where justice, truth and peace would reign.' (China Readings, II p.297) म्हणजे समर्थ चीनचे, जगात मान असलेल्या देशाचे, शांतता आणि न्याय यांची शाश्वती असलेल्या नवसमाजाचे स्वप्न माओने चीनी शेतक-यांसमोर ठेवले, त्याच्या स्वार्थालाही खतपाणी घातले आणि त्याला नवचीन उभारणीचा ध्येयवादही शिकवला. जगातील कामगारांनो–एक व्हा' या माक्र्सवादी स्वप्नापेक्षा हा स्वप्नवाद वेगळा आहे. राष्ट्रवाद येथे नाकारला गेलेला नाही उलट राष्ट्रीय प्रेरणेचा आधार घेतला गेलेला आहे. असा आधार नसता तर शेतकरी आणि कामगारच नाही तर लहान कारखानदार, मध्यमवर्ग या सर्व घटकांना एकत्र करण्यात माओला जे यश लाभले ते लाभलेच नसते. बँक-के-शेखची भ्रष्टाचारी राजवट हे जसे माओविजयाचे एक कारण होते, तसेच हे व्यापक राष्ट्रीय ऐक्यही, ही सर्व वर्गाची एकजूटही महत्त्वाची ठरली. हे ऐक्य, ही एकजूट आपल्याकडे पहिल्यापासूनच नाही. फुले आणि टिळक एकत्र आले नाहीत. सावरकर आणि आंबेडकर यांचे जमले नाही. कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय प्रवाहापासून दूर राहिला आणि राष्ट्रीय प्रवाहाला सामाजिकआर्थिक समतेचे महत्त्व जाणवले नाही. विनोबांनी एकदम 'जय जगत' म्हटले व नक्षलवाद्यांनी ‘माओ आमचा चेअरमन' अशी चक्क राष्ट्रद्रोही घोषणा केली. साम्राज्यवादविरोधी लढा आणि समानताशील विकासतंत्र यांची माओने योग्य ती सांगड घातली, म्हणून आपल्यापेक्षा माओला अधिक भरीव यश प्राप्त करून घेता आले. आपण लोकशाही स्वातंत्र्याची बूज अधिक राखली हे खरे आहे; पण ११ ॥ बलसागर ।। १६१ ________________

स्वातंत्र्याला सामर्थ्याची जोडही द्यावी लागते. तिस-या जगतात भारतापेक्षा चीनचा आवाज आज अधिक ताकतवान आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. क्रीडाक्षेत्रापासून अणुविज्ञानापर्यंत चीन आज आपल्या पुढे आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री शुल्टझ भारतात येऊन दादागिरी करून जाऊ शकतात. आंतर. राष्ट्रीय कर्ज काढल्याशिवाय आपल्याला मागील कर्जावरचे व्याजही भागवता येत नाही. चीन असा परावलंबी व कर्जबाजारी नाही. दुष्काळ, महापूर चीनमध्ये आजही आहेत. भ्रष्टाचार, कामचुकारपणा कम्युनिस्ट राजवट आली की संपतो असेही नाही ; पण चीनचे अग्रक्रम आपल्यापेक्षा अधिक पायाशुद्ध होते. चीनने प्रथम खेडीपाडी सुधार ली, लोकांना काम दिले, संरक्षण स्थिती मजबूत केली आणि मागा हून जागतिक शांततेची कबुतरे उडवली. सावरकरांचे, गांधीजींचे थोडे तरी, वेळच्या वेळी ऐकले असते, त्याप्रमाणे धोरणे आखून ती अंमलात आणली असती तर १९६२ मधली चीनकडून झालेली फजिती टाळता आली असती. पराभव समजू शकतो. माघार-चढाई हेही प्रकार युद्धात चालतात. पण रस्ते नाहीत, सैन्याला गरजेच्या वस्तुचा पुरवठा नाही, गाफीलपणा, हा चुकीच्या तत्त्वज्ञानाचा, दुबळया राजनीतीचाच परिणाम होता. नेहरूंनी गांधींचेही ऐकले नाही आणि सावरकरांना तर ते मानतच नव्हते ! संरक्षणाकडे दुर्लक्ष आणि स्वावलंबी, स्वयंपूर्णतेकडे नेणा-या नियोजनाचाही अभाव. असा नेहरूवाद चीनने दिलेल्या एकाच धक्क्याने कोसळला ! या धक्क्यातून नेहरू शेवटपर्यंत वर आले नाहीत. पंचशील आणि जागतिक शांतता हवी; पण पराभूतांच्या तोंडी हे शांतिमंत्र शोभून दिसत नाहीत. नेहरूंमुळे लोकशाही जिवंत राहिली ; पण पराभववादालाच एक विकृत प्रतिष्ठाही मिळत राहिली. या पराभववादातून आपले हे राष्ट्र प्रथम वर यायला हवे. ही मानसिक किंवा सांस्कृतिक क्रांती येथे प्रथम घडून यायला हवी. याशिवाय शेतक-यांचे दारिद्रय असो, राष्ट्रीय एकात्मता असो किंवा नियोजन असो, आपले कुठलेच प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. हा देश आपला आहे, तो वैभवाकडे नेण्याची जबाबदारी आपली आहे असे मानणाच्या सर्वांची भक्कम एकजूट आणि लोकांना काम मिळेल असे पायाशुद्ध नियोजन, ही आजची गरज आहे. द्वेषभावना ने वाढवता ही गरज पुरी करता येणे शक्य आहे. खोटा-भाबडा आशावाद आणि फाजील निराशावाद दोन्ही टोके यासाठी सोडली पाहिजेत. 'सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे ।।' हा रामदासी पुरुषार्थमंत्र अशा काळासाठीच आहे. अवतारांची वाट पाहत बसण्यात काय अर्थ आहे ? ऑगस्ट १९८३ ।। बलसागर ।। १६२ ________________

एकात्म मानव | पंडित नेहरूंनी भारताचा शोध घेतला पण ' भारतीयत्व' कशात आहे हे त्यांनी आपल्या ग्रंथात नि:संदिग्धरीत्या कुठेही सांगितलेले नाही. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी हा भारतीयत्वाचा शोध घेण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. इतकेच नाही तर या भारतीयत्वाच्या आदेशाप्रमाणे ते प्रत्यक्षात जगले-वाग लेही. त्यांच्या दृष्टीने कशात आहे हे भारतीयत्व ? अनेकत्वात एकत्व पाहण्याची, अनुभवण्याची जीवनदृष्टी म्हणजे भारतीय जीवनदष्टी असे त्यांचे गृहीत होते व या गृहीतावरच त्यांचा एकात्म मानववाद हा उभा आहे. परंतु येथे हेही लक्षात घेतले पाहिजे की, एकात्म मानववादाची उभारणी भौतिक किंवा जडवादी दृष्टिकोनातूनही होऊ शकते. मार्सचे मानवदर्शन अशा जडवादावर आधारित आहे. उलट दीनदयाळ उपाध्याय हे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे वारसदार असल्याने चैतन्यवाद ही त्यांच्या एकात्मतेची मूळ धारणा आहे. हा जड-चैतन्यवाद तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात हजारो वर्षे चालत आलेला आहे व तो यापुढेही चालत राहणार आहे. सृष्टीच्या मुळाशी जडतत्त्व आहे की, चैतन्याच्या स्फुरणातून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, हे तत्त्वज्ञांना आजवर कधीही न सुटलेले कोडे आहे व शेवटी यापैकी कुठला तरी एक पक्ष श्रद्धेने किंवा संस्काराने स्वीकारून मानवी जीवनाविषयी, समाजधारणेविषयी विचार मांडावा लागतो. इतिहासात जडवादाचे प्राबल्य असणारे कालखंड आहेत तशीच चैतन्यवादाने भारलेली शतकेच्या शतकेही आहेत. घड्या ।। बलसागर ।। १६३ ________________

ळ्याच्या लंबकाप्रमाणे मानवी समाज या दोन टोकांमध्ये हेलकावत असतो असेही दाखवून देता येईल. भारतापुरते बोलायचे तर जडवादाचे प्राबल्य असणारा कालखंड तुलनेने थोडा आहे व चैतन्यवादाने जडवादावर येथे नेहमीच विजय मिळविलेला आहे. या इतिहासक्रमाशी दीनदयाळांचा एकात्म मानवविचार जुळलेला आहे. अधिक काळपर्यंत एखादी विचारपद्धती, एखादे तत्त्वज्ञान, त्यातून निर्माण होणारी जीवनशैली एखाद्या देशावर प्रभाव गाजवीत राहिली तर ती त्या देशाचे वैशिष्ट्य, वेगळेपणाची खूण मानायला हरकत नाही. तसे चैतन्यवादाबाबत म्हणता येईल. जगातल्या सर्व देशात, सर्व काळात हा वाद जरी अस्तित्वात असला, त्याचे पुरस्कर्ते निर्माण झालेले असले तरी भारतातच या वादाची पाळेमुळे खूप खोलवर गेलेली आहेत, येथील जीवनावर या वादाची दाट छाया पसरून राहिलेली आहे व वेदकाळापासून विवेकानंदांपर्यंत आणि गीतेपासून गांधीजींपर्यंत हा चैतन्यस्रोत अखंडपणे वाहात आलेला आहे. या प्रवाहाचेच एकात्म मानववाद' हे दीनदयाळकृत एक नवे संस्करण आहे, नवे नामकरण आहे. प्रवाह प्राचीन आहे, सनातन आहे. त्यातला आशय या दोन शब्दात दीनदयाळांनी नेमका अंकित केला आहे. आपले * भारतीयत्व' कशात आहे ? ‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति' या जीवनदृष्टीत ते सामावलेले आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या मूळ अस्तित्वाचा, भारतीयत्वाचा शोध घेतला त्यांनी त्यांनी हे सत्य सांगितले. दोनदयाळ हेच सत्य चालू संदर्भात, विशेषतः सामाजिक आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून पुन्हा नव्याने सांगत आहेत. परिस्थितीचे पुनः पुन्हा विश्लेषण करून, नवीन संदर्भात कुठलेही तत्त्वज्ञान असे मांडले गेले नाही तर ते जीर्ण होते, नष्टही होते. आपल्याकडे विश्लेषणाचे, कालानुरूप तत्त्वज्ञानाची नव्याने मांडणी करण्याचे प्रयत्न अव्याहत होत राहिलेले आहेत. विवेकानंद ज्या काळात वावरले तेव्हा मिल्ल-स्पेन्सर यांच्या विचारांचा भारतावर पगडा होता, ख्रिश्चन धर्म प्रचार जोरात सुरू होता. हे वैचारिक व आध्यात्मिक आक्रमण परतवून लावता येईल अशीच आपल्या विचारांची, तत्त्वज्ञानाची मांडणी विवेकानंदांनी केलेली आपल्याला दिसेल. त्यांनी मिल्ल-स्पेन्सरवाद्यांचे ताकिक हल्ले आध्यात्मिक प्रभावाने निष्प्रभ केले व ख्रिस्ताचे सेवातत्त्व हिंदुधर्मात अंतर्भूत करून घेतले. दीनदयाळांचा कालखंड हा भांडवलशाही-समाजवाद या विचारांचा कालखंड. त्यामुळे या विचारांच्या संदर्भात त्यांनी एकात्म हिंदू परंपरेचे विश्लेषण व नवे संस्करण करायला प्रवृत्त होणे साहजिकच होते. त्यांच्या एकात्म मानववादाची उभारणी या दोन विचारसरणींनी उभी केलेली आव्हाने डोळ्यांसमोर ठेवून झालेली ।। बलसागर ।। १६४ ________________

आपल्याला दिसेल. भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही विचारसरणीत एक समान दोष त्यांना आढळला. या विचारसरणीत माणसाच्या फक्त एकाच अंगावर फाजील भर दिला गेलेला आहे. भांडवलशाहीत माणूस फक्त आर्थिक प्राणी मानला गेला तर समाजवादात त्याला राजकीय प्राणी ठरविण्यात आले. तसाच दुसराही एक अतिरेक या दोन्ही विचारसरणीत आहे. भांडवलशाहीत व्यक्ती या घटकाला अवास्तव महत्त्व देण्यात आलेले आहे तर समाजवादात व्यक्तिजीवन सामाजिकतेत-राजकारणात पूर्णपणे विलीन होण्याचा धोका दडलेला आहे. आर्थिक-राजकीय अंगांना अवास्तव महत्त्व व व्यक्ती किंवा समाज यापैकी एका घटकाचे प्रभुत्व ही मनुष्याच्या विकासाला मारक ठरणारी दोन टोके आहेत. दीनदयाळांच्या एकात्म मानववादात या दोन टोकांचे भान विशेष बाळगले गेलेले आहे. मनुष्यपणाची अशी तोडमोड, ओढाताण, फाळणी न व्हावी यासाठी त्यांनी हिंदुधर्मातील चतुर्विध पुरुषार्थाची कल्पना पुन्हा उचलून धरली, नव्या संदर्भात तिची वेगळी मांडणी केली. माणूस म्हणजे केवळ आथिक-राजकीय प्राणी नाही, तो समाजाचा गुलाम नाही, तसेच समाजाला आपल्या स्वार्थासाठी केव्हाही, कसाही वेठीस धरणारा शोषक नाही. व्यवितविकास आणि समाजस्वास्थ्य यांचा एक विशिष्ट मेळ घालणे हे नियोजनाचे, समाजरचनेचे मुख्य प्रतिपादन आहे व भांडवलशाहीचा अस्त व समाजवादाविषयीचा सार्वत्रिक भ्रमनिरास या सद्य:स्थितीच्या संदर्भात हे प्रतिपादन विचारात घेण्याची फार गरजही आहे. | भांडवलशाही-समाजवाद या पश्चिमेकडून आलेल्या विचारसरणीतली आणखीही एक उणीव दीनदयाळांनी दाखवून दिलेली आहे. भाकरीचा प्रश्न, राजकीय जीवन प्रधान मानता मानता या विचारसरणी अखेर माणसाचे उच्च असे आध्यात्मिक जीवनच नाकारतात, ते संपुष्टातही आणतात. भाकरीइतकीच माणसाला आध्यात्मिक सुखाचीही गोडी आहे, हे सत्य, ही तत्त्वज्ञाने या विचारसणी ध्यानातच घेत नाहीत. धर्म किवा अध्यात्म म्हणजे पिळवणूक करणा-या वर्गाने आपले वर्चस्व टिकवून धरण्यासाठी उभी केलेली थोतांडे आहेत असा दृष्टिकोन बाळगल्यानंतर माणसाच्या उच्च आध्यात्मिक सुखाची अशी वाताहत उडण्यावाचून दुसरे काही घडूच शकत नाही. दीनदयाळ ज्या हिंदुपरंपरेत वाढले, त्या परंपरेला मनुष्यजीवनाची अशी वाताहत मंजूर नाही. भाकरी आणि अध्यात्म या परंपरेने अभिन्न मानले व ऐहिक आणि पारलौकिकाचा मेळ साधणारी व्यक्तिजीवनाची व समाजव्यवस्थेची मांडणी आदर्श ठरवली. माणसाच्या सर्व गरजा, वासना, प्रेरणा, नैसर्गिक प्रवृत्ती विचारात घ्यायच्या, ।। बलसागर ।। १६५ ________________

त्यांचा परस्परांशी मेळ घालत घालत शेवटी मोक्ष-मुक्तीच्या आद्य जीवनप्रेरणेशी त्या जोडून द्यायच्या, त्यांचे हळूहळू उदात्तीकरण साधणारी जीवनाची क्रमबद्ध मांडणी करायची, हे हिंदुजीवनपद्धतीचे वैशिष्ट्य आहे व एकात्म मानववाद म्हणजे वेगळे काही विचारधन नसून या प्राचीन पद्धतीचे व परंपरेचे युगानुकूल असे नवे संस्करण मात्र आहे. श्री. गोळवलकरगुरुजी यांनी वेगळ्या शब्दात हे वैशिष्ट्य असे सांगितलेले आहे. गुरुजी म्हणतात " आमची प्रकृती कोणती ? भौतिकतेचा परमोच्च विचार ठेवूनही त्याहन भिन्न असे जे आहे त्याचा साक्षात्कार आम्हाला झालेला आहे. आम्ही समाजालाही त्याच दृष्टीतून पाहिले आहे. त्यातूनच सुखलाभ होणार आहे. विकासासाठी प्रत्येक व्यक्तीतील गुणावगुण पाहून त्याच्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

 • प्रत्येक व्यक्तीला स्वत:च्या पावलाने जाता येईल अशी पात्रता उत्पन्न करणे आणि त्या मार्गाने चालताना ती स्वास्थ्यलाभ घेऊ शकेल, हा विचार करून आमच्या समाजाची रचना झाली आहे. त्याला स्थायी स्वरूप प्राप्त व्हावे, याचसाठी शासनसत्तेची निर्मिती केली गेली...."

| यात माणूस व समाज आपल्याला हवे तसे आपले जीवन घडवू शकतो, आपला विकासक्रम ठरवू शकतो, समाज विकास प्रक्रियेची दिशा, गती यावर योग्य ते नियंत्रण ठेवू शकतो, असे एक अध्याहृत गृहीतकृत्य आहे. उलट माक्र्सवाद किंवा एकूण भांडवलशाही-समाजवादी तत्त्वज्ञाने ऐतिहासिक अपरिहार्यता अटळ मानतात . समाजव्यवस्था बदलण्याची, नवी घडवण्याची विशिष्ट वाटच माणसाला उपलब्ध आहे, ती वाट निवडण्याचे, वेगळ्या वाटा चोखाळण्याचे स्वातंत्र्य माणसाला नाही असे मानतात व एकात्म मानववादासारखे विचार आदर्शवादी-स्वप्नाळू म्हणून निकाली काढतात. म्हणजे हा प्रश्न पुन्हा नियती विरुद्ध माणूस या सनातन प्रश्नाशी भिडतो. माणूस नियती बदलू शकतो, तो स्वतंत्र आहे, आपले जीवनाकार घडवण्याचे विशिष्ट मर्यादेत त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, नव्हे तसे त्याने ते सतत घडवत राहिले पाहिजेत; जुने टाकून देत, नवे आकृतिबंध रचत अखेर पूर्ण स्वातंत्र्याचा, मुक्तीचा अनुभव घेणे हेच मानवी जीवनाचे साफल्य आहे, अशी एकात्म मानववादाची धारणा आहे. ही धारणा खरी की, ऐतिहासिक अपरिहार्यता खरी याचा निकाल अर्थातच केवळ पुस्तकात लागणार नाही. आपण रशिया-चीनपेक्षा येथील मानवी विकासाचा काही वेगळा घाट निर्माण करू शकलो तर एकात्म मानववाद हे केवळ स्वप्नरंजन नसून एक जितेजागते तत्वज्ञान आहे हे आपोआपच सिद्ध होणार आहे. ।। बलसागर ।। १६६ ६ ________________

टिळक म्हणत असत त्याप्रमाणे, कुठल्याही तत्वज्ञानाचा कस शेवटी कुरुक्षेत्रावर लागत असतो, भोजनाच्या ताटावर नाही. कुरुक्षेत्र लांब नाही. एकात्म मानववादी तत्वज्ञानाचे उपासक या कुरुक्षेत्रावर केव्हा दाखल होतात, कशी व्यूहरचना करतात यावर शेवटी या तत्वज्ञानाचे यशापयश अवलंबून राहणार, हे उघड आहे. २५ सप्टेंबर १९७८ । बलसागर ।। १६७ ________________

राष्ट्रवाद ही आजच्या काळातली सर्वांत प्रभावी अशी शक्ती ठरलेली आहे; परंतु मूठभरांच्या वर्तुळातच बंदिस्त राहिली तर ती पराभूतही ठरते असा सर्व ठिकाणचा अनुभवही आहे. अखेरच्या माणसापर्यंत ती पोचली पाहिजे, समाजातल्या सर्व वर्गाना, वर्णाना, धर्मपंथांना, विभागांना तिचा स्पर्श व्हायला हवा. आपल्याकडील हिंदी आणि हिंदू हे दोन्ही राष्ट्रवाद या कामी आजवर अपुरे पडले; म्हणून एवढी प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गसमृद्ध असा प्रचंड भभाग असूनही आपला राष्ट्रवाद अद्याप पराभूत वाटतो; तो | आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होत नाही. राष्ट्रवाद भाणि सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक समतावाद या दोन प्रेरणांचा मिलाफ आणि योग्य समन्वय घडून | आल्याशिवाय ही आत्मनिर्भरता, हे स्वावलंबी राष्ट्रजीवन उभे राहूही शकणार नाही. ‘बलसागर भारत' हे स्वप्न तोवर अपुरेच राहील. गेल्या सुमारे वीस वर्षांत देशामध्ये घडलेल्या काही ठळक राजकीय, सामाजिक घटनांवरील भाष्ये श्री. ग. मां. नी ‘साप्ताहिक माणूस 'मध्ये वेळोवेळी नोंदली, त्यापैकी निवडक ‘ बलसागर 'मध्ये एकत्र आली आहेत. विविध विचारधारांना खुल्या मनाने लेवक येथे सामोरा जात आहे. त्यांचं सुस्पष्ट व तर्कसंगत विश्लेषण येथे आहे आणि आजच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादाची नवी मांडणी करण्याचा प्रयत्नही आहे. राष्ट्रवादी भूमिकेतून नवी क्षितिजे शोधणा-या सर्वांना म्हणूनच हे पुस्तक वाचावेसे वाटेल. त्यातील प्रतिपादनावर, | मांडणीवर विचार करावासा वाटेल. II I IIIIIIII राजहंस प्रकाशन,