पोशिंद्याची लोकशाही

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchपोशिंद्यांची लोकशाहीशरद जोशी
जनशक्ती वाचक चळवळ

  प्रकाशकाचे मनोगत


 शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त समग्र लिखाण प्रकाशित करण्याचा प्रकल्प जेव्हा हाती घेतला. त्यावेळी राजकीय लेखांची संख्या इतकी जास्त असेल असं वाटलं नव्हतं. शेतकरी संघटनेची राजकीय भूमिका सगळ्यांत जास्त टीकेची बळी पडली. त्यावर एक छोटीशी पुस्तिका (१९९४) अजित नरदे यांनी मोठी मेहनत घेऊन प्रकाशित केली होती. त्यामध्ये शेतकरी संघटनेच्या अधिवेशनांमधील राजकीय ठरावांचा समावेश होता. स्वतः शरद जोशी यांनी केलेलं लिखाण समाविष्ट नव्हते. स्वतंत्र भारत पक्षाच्या संदर्भात केलेले लिखाण आणि त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीचं केलेलं विश्लेषण या सगळ्यांमधून एक अतिशय प्रगल्भ सर्वव्यापी आणि देशाचा मूलभूत विचार करणारी अशी मांडणी समोर येते. हे सर्व लेख एकत्र असणे आम्हाला आवश्यक वाटले. अभ्यासकांनी हे लिखाण डोळसपणे अभ्यासले, तर शेतकरी संघटनेच्या राजकीय भूमिकेबाबत जी अकारण आणि अप्रस्तुत टीका केल्या गेली, ती चूक आहे हे लक्षात येईल. आम्ही नियोजिलेला समग्र शरद जोशी प्रकाशनाचा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण होत आहे. नजर चुकीने काही लेख राहून गेले असतील, तर ते पुढील आवृत्त्यांमध्ये समाविष्ट केले जातील. सर्वसामान्य वाचकांनी या आधीच्या चौदा पुस्तकांना अतिशय चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमधून आणि विविध नियतकालिकांतून या पुस्तकांवर परीक्षणं प्रकाशित झाली त्या सर्व संपादकांचे आभार.


श्रीकांत अनंत उमरीकर