हे पुस्तक शहारांतील सुखवस्तु लोकांस, वास्तुशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांस, तसेंच कंत्राटदार वैगेर लोकांस विशेष उपयोगी पडणार आहे. घरासंबंधीची कामें सर्वस्वी किंवा अंशतः कॉन्ट्रेक्टनें देणे जरी सोयीचे पडते तरी अननुभवी मालकांस त्यांतील अचुक माऱ्याची ठिकाणे माहीत नसल्यामुळे पुष्कळ वेळा घरकाम संपतें न संपतें तोच त्याच्या दुरुस्तीची पाळी येते. अशा वस्तुस्थितीपासून व मजूर लोकांच्या अंगचोरीपासून सावध राहून आपला तोटा होऊ न देण्यास या पुस्तकाची मालकास पुष्कळ मदत होणार आहे. सदर पुस्तकांत घराचा पाया घालण्यापासून तों तहत दुमजली किंवा तिमबली इमारतीच्या छपरापर्यंत सर्व विषय क्रमाक्रमाने घेतले आहेत. त्याच प्रमाणे घराच्या अंतर्गत व्यवस्थेचा-कोणत्या ठिकाणी कोणते पदार्थ ठेवावयाचे (पलंग, कोच, कपाटे वगैरे ) यांचा सुद्धा पूर्वी विचार करून घराच्या नकाशाबरोबर याहि नकाशाची किता जरूर आहे याचे पुढे उत्पन्न होणाऱ्या गैरसोयीचे दाखले देऊन सप्रमाण विवेचन केले आहे. घरकामाकरितां लागणारी आधुनिक व प्राचीन साधनसामग्री कशी पारखून घ्यावी व ती कच्च्या मालापासून कशी व कोणत्या प्रमाणांत तयार करावी याचे शास्त्रशुद्ध विवेचन ग्रंथकाने केले आहे. उदाहरणार्थ, पृष्ट ८ वर विटांकरितां माती कशी शोधावी यासंबंधाचे विवेचन व तदनंतर कोणत्या विटा टिकाऊ आहेत हे ठरविण्याच्या निरनिराळ्या प्राच्य व अर्वाच्य त हा या पहाव्या. जी पद्धति येथे पाहावयास मिळते तीच पुढे पृष्ठ ३४८ वर ड्रेनेजच्या नळाची कशी परीक्षा करावी तेथेहि पाहावयास मिळते. ग्रंथ. कर्त्याने सर्वसाधारण साधनसामग्री कशी तयार करावी येथपासून तो तहत प्रत्येक काम करावयास लागणाऱ्या मजुरीचे प्रमाण, त्याचप्रमाणे निरनिराळ्या धातूंच्या, लांकडांच्या, लहानमोठ्या आकाराच्या दगडी, मातीच्या किंवा विटांच्या कामाचीं भारवाहक शक्तीची प्रमाणे बांधकामाच्या घन फुटावर किती असावी याचे विवेचन केले आहे, तें नवख्या मनुष्याला खास मार्गदर्शक व देखरेख करणान्यांस उपयुक्त होईल. असो. रावसाहेब देशपांडे यांचे पुन्हा एकवार अभिनंदन करून त्यांच्या प्रयत्नाचे चीज लोकांकडून चांगल्या प्रकारे व्हावे अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करून ही प्रस्तावना पुरी करितों. पुणे, ५ मार्च १९३० शंकर रामचंद्र भागवत.
पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/११
Appearance