पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(४) कष्ट करणाऱ्या आपल्या बांधवांची काय दुर्दशा उडत आहे हे त्यांस दिसत नाही हे होय.आमच्यातील बहुतेक सुशिक्षित तज्ज्ञांचे डोळेहि ते कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना व पुढे नोकरी करतांना असेच दिपत असल्यामुळे आंधळे झालेले असतात व ज्या योगाने आपल्या देशबांधवांचे दिवसेंदिवस पण कायमचे नुकसान होणार अशा प्रकारचा सल्ला त्यांच्याकडून कित्येक वेळा तरी दिला जातो व आम्ही सुशिक्षित मंडळी अनेक अंतस्थ कारणांमुळे त्यांचे म्हणणे डोळे झाकून मान्य करितों. माझ्या विचाराची बरी वाईट दिशा अशा प्रकारची असताना रावसाहेब देशपांडे यांच्या या प्रयत्नास पोषक अशी प्रस्तावना माझ्या हातून लिहिली बाईल किंवा नाही याबद्दल माझी मलाच शंका वाटू लागल्यामुळे मी पहिल्या प्रथम त्यांची विनंति नाकारली. परंतु पुढे त्यांचा विशेष आग्रह दिसल्यावरून या पुस्तकास प्रस्तावनेदाखल चार शब्द लिहिण्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांनी लिहिलेले पुस्तक समग्र वाचून पाहतां त्यांच्या पुस्तकाचा एकंदर रोख, विशेषेकरून गरीब व मध्यम स्थितीतील लोकांस आपली घरें काटकसरीने सुखसोयीची बांधून त्यांत राहुन आरोग्यसंवर्धन करितां यावे या गोष्टीकडेच असल्याचे पाहून विशेष आनंद झाला. आपला देश पूर्वीच्या काळात फार सुधारलेला होता व आज वे नाना प्रकारचे शास्त्रीय शोध लावले जात आहेत. त्यांपैकी पुष्कळांची माहिती आपल्या पूर्वजांस होती हे नेहमी सांगण्यात येते. मधल्या कालामन्ये आपल्या देशांतील हे ज्ञान का लुम झाले याबद्दलचा विचार केला असता आपले ज्ञान व आपले अनुभव ही आपल्या पुढील पिढीस पूर्णत्वाने मिळत गेली नाहीत व त्यामुळे पूर्वीच्या आपल्या ज्ञानात भर न पडता ते दिवसेंदिवस लुप्तप्राय होत गेले असेंच दिसून येईल. पूर्वोचा काळ सोडून दिला तरी अलीकडील इंग्रजी अमदानीमध्ये नानाप्रकारच्या शास्त्रीय विषयांमध्ये आपल्यांत अनेक तज्ज्ञ झाले व त्यांनी मोठमोठ्या नोकऱ्या केल्या. पैसा व लौकिक मिळविला व ते कालवश झाले. भगर त्या पथास लागले. परंतु आपल्या पुढील पिढीस आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा थोडातरी फायदा मिळवून देऊन पुढील मार्ग जास्त जोराने आक्रमण्यास मदत करण्यासाठी किती बांनी प्रयत्न केले हे पाहिले असता त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्या- इतकी भरेल किंवा नाही याची शंकाच आहे. या दृष्टीने रावसाहेब देशपांडे यांचा प्रयत्न स्तुत्य व अनुकरणीय आहे यांत संशय नाही.