________________
एकनाथी भागवत. ८२६ श्रीशुक उवाच-अथ तनागमद्रमा भवान्या च सम भवः । महेन्द्रप्रमुसा देवा मुनयः समजेश्वरा ॥॥ पितर सिद्धगन्धर्वा विद्याधरमहोरगा । चारणा यक्षरक्षांसि किनराप्सरसो द्विजा ॥ २ ॥ जो व्यासाचे निजजीवन । जो योगियांचें चूडारत । तो स्वयें श्रीशुक आपण । श्रीकृष्णनिर्याण निरूपी ॥ २१॥ शुक ह्मणे परीक्षिती । निजधामा निघतां श्रीपती । देव । दर्शनासी येती । विमानपंकीसमवेत ॥ २२॥ ब्रह्मा सत्वर आला तेथ । भव भवानीसमवेत । इंद्रमुख्य देव समस्त । स्वगणी युक्त ते आले ॥ २३ ॥ सनकादिक मुनिपंक्ती। आले दक्षादि प्रजापती । अर्यमादि पितर येती । कपिलादि धांवती महासिद्ध ॥२४॥ आले गंधर्व विद्याधर । यक्ष चारण किन्नर । विभीपणादि राक्षस थोर । वेगी श्रीधर पाहों येती ॥ २५ ॥ पहावया श्रीरंग । आले पाताळीचे पन्नग । ज्यांतें हाणती महोरग। तेही सवेग पै आले ॥ २६ ॥ द्विज आले दत्तात्रेयादिक । नारद' पाहों आला कौतुक । द्विज पक्षी गरुडममुंख । सत्वर देख ते आले ॥ २७॥ रभा उर्वशी मेनका । अप्सरा ज्या अष्टनायिका । कृष्णदर्शना आवाका । धरोनि देखा त्या आल्या ॥ २८ ॥ कृष्णस्वरूप पहावया । नयनी थोर घेतला थायाँ । यालागी देवसमुदाया । येणे लघलाह्यां जाहले एवें ॥ २९॥ ___टुकामा भगवतो निर्माण परमोत्सुका । गायन्तश्च गृण-तश्च शौरे फर्माणि जन्म च ॥ ३ ॥ कृष्ण पहावया आवडी । दृष्टी धांवे लंवडसवडी । होत डोळ्यां आडाडी । अभिनव गोडी कृष्णाची ॥ ३० ॥ श्रीकृष्णाचे निर्याणदर्शन । पाहावया उत्साहपूर्ण । सत्वर आले मुरंगण । पुढती कृष्णादर्शन आह्मां केचे ॥३१॥ सौदर्याची निजसीमा । घनश्याम सुंदर प्रतिमा । तो कृष्ण गेलिया निजधामा । दर्शन आह्मां भग कैचें ॥ ३२ ॥ श्रीकृष्णदर्शनाची गोडी । सुरनरा लागलीसे गाढी । यालागी अतितातडी । आले आवडी दर्शनार्थ ॥ ३३ ॥ कृष्णकम स्वयें वर्णित । कृष्णचरित्रे गीती गात । मिळोनि सुरवर समस्त । आले दर्शनार्थ सत्वर ॥ ३४ ॥ ववर्ष पुष्पवर्षाणि विमानापाले मिनभ । कुर्वत सङ्कुल राजन् भक्त्या परमया युता ॥४॥ विमानश्रेणी आकाशीं । तेथ दाटलिया चौपाशीं । संमुख देखोनि हपीकेशी । जयजयकारासी तिही केले ॥ ३५ ॥ देखोनि श्रीकृष्णनाथ । भैत्युद्रिक्त जाहले चित्त । दिव्य सुमनातें वर्पत । मिळूनि समस्त समकाळें ॥३६॥ दिव्य सुमनाचा रोळी । कृष्णा चौंपाशी विसुरला । तेणें कृष्ण शोभला त्या काळां । घनश्यामलीळा साजिरी ॥ ३७॥ भगवान् पितामह वीक्ष्य निभूनीराममनो निभु । सयोज्यात्मनि चारमान पभनेो न्यमीलयत् ॥ ५॥ देव पावले शीघ्रगतीं । ब्रह्मा देखिला समुखस्थिती । सदाशिव समविभूती । त्यातही श्रीपति देखता जाहला॥३८॥इंद्रादिक निविभूती । त्यातें देखोनि श्रीपती । स्वनेत्र पझंदला. कृती । ते सहजस्थिती झाकिले ॥३९॥ झाकिले उघडे नयन।परी स्थिति नाहीं अधिकन्यून। शकर २ मार्यतीसहित ३ सर्प ४ द्विज झणजे दत्तानेयादि ब्राह्मण किंवा गरुडलोवी राहणारे पक्षी ५उलठा ६५२ ५ पार गयी ८ उत्सठा, गडवर ९ देनाचे समुदाय, १० भायत ११ अत्यत लगयगीन. १२ विमानाच्या पाक १३ चारी यारी यानी १४ भत्तीन आई १५ स्वगीय पुष्पाना १६ वर्षाव, गच, ढीग, १७ पसरला, सहा राला १८ ऐपयोगह १५ भारलेच अरा, २० कमलपनासारखे