________________
८१६ एकनाथी भागवत. पिष्ट करितां जाण । उरला अवशेष लोहकण । तो समुद्री जाण टाकिला ॥ १५॥ तो पडतांचि समुद्रजळी । त्यातें मीन सगळेचि गिळी । त्या मीनाते जराव्याध गळीं। जाळ्यामेळी आकळित ॥ १६ ॥ व्याध करी मीनविदारण । तंव निघाला तो लोहकण। त्याचा जराव्याधे केला वाण । तेणे कृष्णचरण विधिला ॥ १७ ॥ मत्स्योदरींचा लोहधन । त्याचा केलिया दृढ वाण । थोर पारधी साधे सपूर्ण । व्याधे जाणोनि वाण तो केला ॥१८॥ भेदावया श्रीकृष्णचरण । मूली ब्रह्मशापचि कारण । यालागी जराव्याधाचा वाण । कृष्णचरणी पूर्ण खडतरला ।। १९ ।। व्याधे अवचिते विधिला । परी कृष्ण नाहीं दचकला । बाण सत्राणे खडतरला । तेणे सुखी झाला श्रीकृष्ण ।। २२० ॥ चतुर्भुज त पुरप दृष्ट्वा स कृतकिरियप । भीत पपात शिरसा पादयोरसुरद्विप ॥ ३४ ॥ वाण श्रीकृष्णी भेदला । जैराव्याधाचा हात पूर्ण निवाला । ह्मणे म्यां मोठा मृग विधिला । ह्मणोनि धावला धरावया ॥ २१॥ देखोनि चतुर्भुज पुरुषासी । भय सुटले जराव्याधासी । मज घडल्या महापापराशी । परम पुरुषासी विंधिलें ॥ २२ ॥ हाणे केदकटा रे अदृष्टी । आचरविले को दुष्टा । ऐशिया मज महापापिष्ठा । दुःखदुर्घटा कोण वारी ।। २३ ॥ जगाचा परमात्मा श्रीहरी । तो म्या विधिला वाणवरी । माझ्या पापासमान थोरी । नाही ससारी आनासी ॥ २४ ॥ भये सुटला थोर कंप । मज घडलें हैं महापाप । जगाचे जे ध्येय स्वरूप । त्यासी सताप म्या दिधला ॥ २५ ॥ ज्याचे अमर बंदिती चरण । ज्यासी सत येती लोटांगण । त्या श्रीकृष्णासी विधिला वाण । पाप सपूर्ण मज घडलें ॥२६॥ अवचटें आत्महत्या घडे । तें पाप कदा न झडे । जगाचा आस्मा कृष्ण वाडेकोडें । ते आत्महत्या पड़े मस्तकी माझे ॥ २७ ॥ जगाचे आत्महनन । कर्ता मी एक पापी पूर्ण । त्या पापाचे पुरश्चरण । सर्वथा जाण दिसेना ॥२८॥ प्रमा ब्रह्महत्या घडे । तेणे पापें तो समूळ वुडे । ते पूर्ण ब्रह्म म्यां पुढें । सदृढ़ें विधिले ॥ २९ ॥ पापकर्मा मी व्याधरूप । तेणे म्यां जोडले पाप अमूप । कृष्ण परमात्मा चित्स्वरूप । त्यासीही सताप दिधला म्यां ॥ २३० ॥ येणे अनुता तप्त पूर्ण । धावोनि घाली लोटागण । श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकी जाण दृढ धरिले ॥ ३१ ॥ मर्दी दैत्यांचा अभिमान । मधुद्देष्टा मधुसूदन । त्याचे दृढ धरूनि चरण । करी रुदन अट्टहासे ॥३२॥ चरणी घातली परम मिठी । उठवितां कदा'नुठी । मज क्षमा करी कृपादृष्टी । कृपालु सृष्टी तूं एक ॥३३॥ : अज्ञानता कृतमिट पापेन मधुसूदन । क्षन्तुमर्हसि पापस उत्तमश्लोक मेऽनघ ॥ ३५ ॥ अतिभीत जराव्याध । ह्मणे मी पापात्मा अतिअशुद्ध । नेणतां धड़ला हा अपराध । लिंगभेद मज घडला ॥ ३४ ॥ जो ईश्वरमतिमा उच्छेदी । तो महापापी लिंगभेदी । त्या तुज ईश्वरासी म्या दुर्बुद्धी । अहविधी विधिलें ॥ ३५ ॥ ऐसा मी पापी पापकर्मा । महापापी जो पापात्मा । माझा अपराध करावा क्षमा । पुरुषोत्तमा कृपालुवा ॥३६॥ AN १ पीठ २ माशाचे पोट फाढणे ३.लागला, शिरला ४ जयनामक पारभ्याश ५ हाय हाय रे ६ देवा ७ मोठ्या बाणान ८ निवारणाचे साधन ९ अतिशय, अपरिमित १. भामोशाने, विलाप करून ११ पहावं क्षमाद्दटी. १२ वरप्रतिमागेद १३ भमकरणारा १४ दुर्दैवाने १५ जसम केली. .