________________
८०८ एकनाथी भागवत. धूमकेतू । शिखाकेतू अतिअद्भुतू । दिवसाही दिसतू सर्वांसी ॥ ५९ ॥ धरा कांपोनि अतिगजरी । भूस्फोट झाला नगरद्वारीं । भूकंप तीन दिवसवरी । घरोघरी आदोळ ॥ ६० ॥ वारा सुटला झडा. । समूळ उन्मळती झाडें । द्वारकेमाजी धुळी उडे । डोळा मुघडे जनांचा॥६१॥अतरिक्षी नग्न भूतें। धांवती खाखाते खिंसाते । रुधिरवृष्टि होय तेथें। अकस्माते निरभ्रीं ॥ ६२ ॥ रविचंद्राचे मंडळ । खळे करीत सर्वकाळ । ग्रह भेदिती ग्रहमंडळ । क्रूरग्रहमेळ शत्रुदमीं ॥ ६३ ॥ सन्मुख आकाशाचे पोटी । दिग्ढाह देखती दृष्टी । अङ्ग्रवीण कडकडाटी । पड़ती वितंडी महाविजा ॥६॥ धारी झडपिती साणे । जेविता पुढील नेती भाणे । दिवसा दिवाभीत धुंगांणे । राजद्वारी श्वाने सधैं रडती ॥ ६५ ॥ वैसल्या सुधर्मासभेप्रती । सकल्पविकल्पाची निवृत्ती । ते सभेसी वीर वोसणती । मारी मारी ह्मणती परस्परे ॥ ६६ ॥ ते ऐकतां उत्तर । दचकती महाशूर । सुधमासभेसी चितातुर । यादववीर समस्त ॥ ६७ ॥ यादव वैसले सभेसी । छाया देखती वीणैशिसी । सुधर्मासभेपाशीं । अरिष्टं ऐशी उठती ॥ ६८ ॥ ऐशी अरिष्टें अनिवार । दुःखसूचके दुस्तर । देखोनि यादव थोरथोर । विघ्नविचार विवंचिती ॥ ६९ ॥ द्वारकेचे विघ्ननिर्दळण । करूं ठेविलेसे सुदर्शन । ते द्वारकेमाजी महाविघ्न । काय कारण उठावया ॥ ७० ॥ जंव पातया पाते लवे । तंव चक्र एकवीस वेढे भवे । ते द्वारकेसी विघ्न सभवे । देखोनि आघवे अतिचकित ॥७१ ॥ सर्व विघ्नाचे आकर्षण । करी या नाव ह्मणिपे कृष्ण । तो कृष्ण येथे असतां जाण । उत्पात दारुण का उठती ॥ ७२ ॥ एवं विचारारूढ यादवासी । चिंतातुर देखोनिया त्यासी । बुद्धि सागावया त्यांपाशी । काय हृषीकेशी वोलत ॥७३॥ श्रीभगवानुवाच-पुते घोरा महोत्पाता द्वार्थत्यां यमकेतव । मुहूर्तमपि न स्थयमन नो यदुपुङ्गया ॥ ५ ॥ जो जगाचा सूत्रधारी । जो मौयायंत्रीचा यंत्रकारी । तो यादवांप्रती श्रीहरी । आलोच करी विघ्नाचा ॥ ७४ ॥ यादवकुळासी आला प्रांत । हे जाणे श्रीकृष्णनाथ । याचा द्वारकेसी होऊ नये घात ! यालागी समस्त प्रभासा धाडी ॥ ७५ ॥ द्वारावती सातवी पुरी । येथील मरण मोक्षोपकारी । यादव समस्त देवाधिकारी । यालागी ते वाहेरी श्रीकृष्ण काढी ॥ ७६ ॥ कुळनाशाचें मूळ देखा । प्रभासी निघालीसे एरिका । हाचि कृष्णाचाही आवाका । तो धाडी सकळिका प्रभासासी ।। ७७ ॥ यादवासी ब्रह्मशाप । घडलासे घोररूप । यालागी द्वारकेमाजी सताप । उत्पातरूप उठती ।। ७८ ॥ उत्पात उठले अनेक । हे अनिवार अरिष्टसूचक । अविलं तात्काळिक । परम दुख पावाल ॥७९॥ यालागी तुहीं आवश्यक । येथे रहावे ना । स्त्रिया पुत्र सुहृद लोक । तात्कालिक निघावें ॥ ८॥ ह्मणाल यादववीर उनट । आह्मासी काय करील अरिष्ट । ऐशा गर्दै अतिअनिष्ट । परम कष्ट पावाल ॥८१॥ ब्राह्मणाचे शापापुढे । कायसे गौयें वापुडें । तुहीं न विचारिता मागेपुढे । आताचि रोकडे निघावे ।। ८२ ॥ द्वारके १घ २ मेष नसता शत्रसदनी ४ दिनाचा भडका ५ अचड ६ वेगाने ७ ताट ८ घुपडपक्षी ९ घू घू साता १० अविराय, पुष्कळ ११ परन्तात १० पाचरतात १३ शिररहित १४ विचार करू लागले १५मायाचकघाटा १६ चासक, सूत्रधार, यत्र निमाण करणारा १७ आपल्या मनाशी विचार करिता झाला १८ शेवट १९ नमाम मटा २० मुफिदायक २१ लव्हाळा २० हेतु ०३ दोन घटका मुद्धा २४ मोठे शुर योद्धे