पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० एकनाथी भागवत. हाणे मी परमहंसु । जेवी नटाअंगी राजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥ १२ ॥ तेवी आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा । तशीच जातीचीही कथानघे माथां भक्तोत्तम ।। १३ ।। जाति उंच नीच असख्य । परी तो न ह्मणे हे माझीचि एक । जेवीं गंगातीरी गांव अनेक । परी गंगा माझा एक गाव न ह्मणे ॥ १४ ॥ तेवीं जन्म कर्म वर्णाश्रम जाती । पूर्ण भक्त हाती न धरिती । बहूं देहांची अहंकृती । स्वमीही न धरिती हरिभक्त ॥ १५॥ आशंका ॥ ॥ तरी काय वर्णाश्रम जाती । भक्त निःोप सांडिती । त्यात असोनि नाहीं अहंकृती । ते हे उपपत्ती चोलिलो राया ॥१६॥ तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती। तेव्हां त्यासवें नाही वर्णाश्रम जाती। जन्मअभिमाने माथां घेती। कुळगोत जाती माझी ॥१७॥ ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती । वाढवितां वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमाने ॥१८॥ ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती। सोडूं नेणे गा कल्पांती । सज्ञान ठेकिजेती निजाभिमाने ॥ १९ ॥ येथे भक्ताच्या भाविकस्थिती । अभिमान तुटे भगवझती । ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ।। ७२० ॥ समूळ देहाभिमान झडे । तो देहीचि देवासी आवडे । ते भक्त जाण वाडेको । लडवाळे हरीचे ॥२१॥ते जें जें मागती कौतुके । तो देवोचि होय तितुकें । त्याचेनि परम सतो । देव सुखावे सुखें दोदिले होये ॥ २२ ॥ जो जिकडे जिकडे जाये । देव निजागे तेउता ठाये । भक्त जेउती वास पाये । देव ते ते होय पदार्थ ॥ २३ ॥ त्यासी झी कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढे माग | त्यासभोंवत्ता सर्वांगें । भक्तीच्या पांग भुलला असे ॥ २४ ॥ निरभिमानाचेनि नावे । देव निजागे करी आघवे । जेवीं का तान्हयाचेनि जीवे । जिवे भाव निज जननी ॥ २५ ॥ एवं रासता निजभत्तासी । तरी देव धोके निजमानसीं । हा जरी आला निजऐक्यासी । तरी हे "प्रीति कोणासी मग करावी ॥२६॥ कोणासी पाहो कृपादृष्टी । कोणा सागो निजगोष्टी । कोणासी क्षेम देवो मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥ २७ ॥ या काकुळती श्रीअनतु । ऐक्यभावे करी निजभक्त । मग देवो भक्त दोहीआतु । देवचि नांदतु स्वानंदें ॥२८॥ एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीती । हेंचि निरूपण वेदांती । अद्वैतभक्ति या नाच ॥ २९ ॥ त्यासी चहू भुजी ऑलिगितां । हाय न वाणेचि भगवंता । मग रिघोनिया आतौता । परमार्थता आलिगी ॥ ७३० ॥ ऐसे खेबांचे मीस करी । तेणे भक्त आणी आपणाभीतरी । मग आपण त्यां आतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोदाटे॥३१॥ नवल आवडीचा निर्वाहो । झणी यासी लागे काळाचा घावो । यालागी निजभक्तांचा देहो। देवाधिदेवो स्वये होये ॥३२॥ ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजी भक्तोत्तम । यापरी भागवतधर्म। पुरुषोत्तम वश्य करी ।। ३३॥ ऐशिया उत्तम भक्ता । भेदाची समूळ नुरे वार्ता । तेचि भक्तअभेदकथा । ऐक । नृपनाथा सांगेन ॥ ३४ ॥ १ स्थूल, सूक्ष्म, कारण, महापारण हे चार देह २ युक्ति ३ तत्वन मिथ्या ४ राहतात ५ फमले जातात अल्पत कौतुकाने, आवदते ७ पुट ८ वाट पाहतो, इच्छा धरितो ९ पराधीनपणामुळे १० भितो ११ प्रतीति १२ या मसार घाबरा होऊन १३ तृप्ता १४ पूर्णपणे अनुभवास येत नाही १५ आलिंगनाचे १६ निमित्त, मांग १७ भरून राहतो १८ प्रेमाची वागणूर १९ न जाणो, कदाचित ० राडका, प्रिय