पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/834

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८०२ एकनाथी भागवत. रामृतप्राशन । उद्धवे करोनियां जाण । पावला परम समाधान । ऐसा कृपालु जाण श्रीकृष्ण ॥ ७२ ॥ कृष्णउद्धवसंवाद पूर्ण । भक्तिसारामृत गुह्यज्ञान । याचें जो करी सेवन । श्रवणमनननिदिध्यासे ।। ७३ ॥ ऐसे जो करी कथासेवन । त्याभेणे पळे भववं. धन । स्वप्नी न देखे जन्ममरण । हाही नव्हे जाण नवलावो ॥ ७४ ॥ जे लागोनि त्याचे सगती । हूँढावले ये कथेचे भक्ती । त्यांसी भवभयाची प्राप्ती । न बाधी कल्पांती कुरुराया ॥ ७५ ।। ज्यासी या कथेची श्रद्धा पूर्ण । ज्यासी या कथेचें अनुसंधान । ज्यासी ये कथेचे अनुष्ठान । तो उद्धरी जाण जगाते ॥ ७६ ॥ जो सूर्याचे घरीं राहिला । त्यासी रात्रीचा यावा देला । मा जो त्याचे गावींच वसला । तोही मुकला रात्रीसी ॥ ७७ ॥ सूर्यासी रात्रीच नाही । मा दिवस उगवे कही । तेवीं स्वरूपाच्या ठायीं । बंधमोक्ष पाहीं असती मिथ्या ॥ ७८ ॥ तेवीं ये कथेचे अनुष्ठान । न घडोनि ज्याते घडे श्रवण । त्यासीही भवबंधन । सर्वथा जाण वाधेना ॥ ७९ ॥ असो न घडे कथाश्रवण । जो हे आवडी करी पठण । त्याचे दुःखदोपाचे दहन । श्लोकश्लोकी जाण होतसे ।।९८०॥ नन्हे श्रवणपैठणआटाटी । या ग्रंथींच्या निरूपणगोष्टी । जेणे बांधल्या जीवाच्या गांठी । तो वंद्य सृष्टी सुरनरां ।। ८१ ॥ ये कथेची ज्यांसी प्रीती । ये कथेची ज्यांसी भक्ती । त्यांची आवडे ज्यासी संगती । त्यातें बंदिती यमकाळ ।। ८२ ॥ जे कथेची श्रद्धा संपूर्ण । तेचि कथेचे मुख्य सेवन । जो श्रद्धेने करी श्रवण मनन । त्यापाशी श्रीकृष्ण परता नव्हे ॥८३॥ भाळ्याभोळ्या ऐकता गोष्टी । ज्यासी या कथेची श्रद्धा उठी । कृष्ण प्रकटोनि त्याच्या पोटीं ।छेदी उठाउठी भवपाश ॥८४॥ यापरी श्रद्धाळ्या जाण । कृपाळु स्वामी श्रीकृष्ण । त्यालागीं श्रीशुक आपण । करी मनन अतिश्रद्धा ॥ ८५ ॥ भवभयमपहन्तु ज्ञानविज्ञानसार निगमतदुपजहे भृङ्गबवेदसारम् । अमृतमुदधितचापाययदत्यवर्गान्पुरुपमृपभमाघ कृष्णसई नतोऽसि ॥ १९ ॥ इति श्रीमहागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोधसवादे एकोननिशोऽध्याय ॥२९॥ ससारभयें त्रासले । जे कृष्णासी शरण आले । त्याचे भवभय हरावया वहिले । जेणे मथन केले वेदार्या ॥८६॥ मथूनि उपनिपद्धार । काढिले ज्ञानविज्ञानसार । ज्यालागी शिणले ज्ञाते नर । तयासी पैले मेरै ठाकेना ॥ ८७ ॥ ह्मणसी निगम मथितां । वेदासी जाहली परम व्यथा । कृष्ण वेदाचा आदिकर्ता । तो दुःख सर्वथा हों नेदी ॥८८॥ जेवीं स्वयें वासरू गायी दुहिता । बाहला न लगे सर्वथा । तेवीं श्रीकृष्ण वेद मथिता। वेदासी व्यथा बाधीना ।। ८९ ॥ जो सर्वज्ञ हुपीकेश । वेदार्थसार राजहंस । तेणे नेदितां दुःखलेश । वेदसाराश काढिला ॥९९० ॥ एवं वेदार्थनिजमथित । ज्ञानविज्ञानसारीमृत । कृष्णे काढूनि इत्थंभूत । भृत्यहितार्थ कृपा अपी ॥ ९१ ॥ जेवी अळुवारपणे पटपद । काढी सुमनमकरंद । तेवीं मथूनिया वेद । श्रीकृष्णे सार शुद्ध काढिले ॥१२॥ श्रीकृष्ण निजमता. त्याच्या भीती ३ नपल, आश्चर्य ४ गडून गेले, रंगरे ५ हे परीक्षिते ६ ध्यास, चितन ७ रानीचा प्ररंग नाहीसा झाला ऐकण्याची व वाचण्याची पटपट ९ र १. शीघ्र ११ परतीर १२ वेदा या सभाग १३ पायदोर, भाला १४ मककल्याणासय १५ टका न लावता १६ अमर १७ फुलातला मध