पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/832

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ततस्तमन्तहदि सनिवेश्य गतो महामागवतो विशालाम् । यथोपदिष्टा जगटेकबन्धुना तत समाथाय हरेरगाद्गतिम् ॥ ७ ॥ जगाचे विश्रामधाम । जो पुरुषांमाजी पुरुषोत्तम । तो हृदयी धरोनि आत्माराम । उद्धव सप्रेम निघाला ॥ २७ ॥ कृष्णाची पूर्ण कृष्णस्थिती । हृदयीं धरोनि सुनिश्चितीं । उद्धव विशालतीर्थामती । स्वानंदगती निघाला ॥ २८ ॥ उद्धव स्वानंदस्थितिपूर्ण । जेथे जेथे करी गमन । ते ते लोक होती पावन । भक्तिज्ञानवैराग्ये ॥ २९ ॥ जैसजैसी विवेकविरक्ती । तैसतैशा वोधकशक्ती । उपदेशित ज्ञानभक्ती । चालिला त्रिजगती उद्धरितू ॥ ९३० ॥ ज्यांसी उद्धवासी जाहली भेटी । त्यासी हरिभजनीं पडे मिठी । भवभय पड़ों नेदी दृष्टी । वोधक जगजेठी उद्धव ॥ ३१ ॥ जे जे भगवद्भक्ति करित । ते ते भागवत मणिपत । मुक्तीही वरी भजनयुक्त । महाभागवत उद्धव ॥ ३२ ॥ उद्धवे आदरिली जे भक्ती । तिची किकर नित्यमुक्ती । यालागी महाभागवतस्थिती । बोलिजे निश्चिती उद्धवा ॥ ३३ ॥ निजशांतता अतिनिर्मळ । आत्मानुभवे अतिप्राजळ । मोक्षाहीवरी भजनशीळ । भक्त विशाळ उद्धव ॥३४॥ ऐशी उद्धवाची विशाळता । तोही पावला विशालतीर्था । विशाल मणावयाची कथा । ऐक आतां सांगेन ॥ ३५ ॥ जेथ श्रद्धामाने चित्त. शुद्धी । स्मरणमात्रे निर्विकल्प वुद्धी । नारायणनामें मोक्षसिद्धी । विशाल या विधी वदरिकाश्रम ॥ ३६॥ जेथ जनहिता नारायण । अद्यापि करितो अनुष्ठान । मोक्षमार्गाची प्राप्ति पूर्ण । यापरी विशालपण वदरिकाश्रमा ॥ ३७॥ जेथ अल्प तप पळे प्रवळ । अल्प ध्याने आकळे सकळ । अल्प विरक्ती मोक्ष केवळ । ऐसे फळे विगाळ बदरिकाश्रम ॥३८॥ जो अतर्यामी गोविंदू । जो जगाचा सुहृद बंधू । जो आत्माराम प्रसिद्धू । ज्याचेनि निजबोधू उद्धवा ॥ ३९ ॥ जैसा कृष्णे केला उपदेश । तैसा बदरिकाश्रमी रहिवासू । उद्धवे केला निवासू । तोचि जनासी विश्वासू परमार्थनिष्ठे ॥ ९४० ॥ जैसी उद्धवाची स्थिती गती । जेपी उद्धवाची ज्ञानशक्ती । जसी उद्धवाची विरक्ती । तोचि जनाप्रती हितोपदेश ।। ४१ ॥ जेथें गुरूसी विषयासक्ती । तेशिष्यासी कैंची विरक्ती । जेथ गुरूसी अधर्मप्रवृत्ती । तेथ शिप्यासी निवृत्ति कदा न घडे ॥४२॥ यालागी उद्धवाचे आचरित । तेंचि आचरती जन समस्त । एव परोपकारार्थ । उद्धव विरक्त बदरिकाश्रमी ॥ ४३ ॥ जैसे शिकवूनि गेला कृष्णनाथ । तैसेचि उद्धव आचरत । त्याचेनि धर्मे जन समस्त । जाहले विरक्त परमार्थी ॥४४॥ परब्रह्म ब्रह्ममाप्ती । दृढ करूनि गेला श्रीपती । तेचि उद्धवासी ब्रह्मप्राप्ठी । अहोराती अखंड ॥ ४५ ॥ बसता बैसता घालनि आसन । का करिता गमनागमन । उद्धवाचें ब्रह्मपण । सर्वथा जाण मोडेना ।। ४६ ॥ ॥४६॥ विरक्ती आणि भोगासक्ती । दोनी देहावरी दिसती । या दोहींहूनि परती। परब्रह्मस्थिती उद्धवी ॥४७॥ विरक्तीमाजी नव्हे विरक्त । भोगी नव्हे भोगासक्त । या दोहीहून अतीत । ब्रह्म सदोदित उद्धय ।। ४८॥ तेथ प्रारब्धक्षयें जाण । त्या देहासी येता मरण । उद्धच ब्रही १ विश्राविम्यान • विवेकयुक्त वैराग्य ३ प्रयोधशतीच्या द्वारे ४ गाठ, आलिंगन, छद् ५ जगात श्रेष्ठ ६झाटले जातात ७ मागून घेतली, स्वीकारली दासी ९सरळ १० थोरवी ११ कृपा १२ कळते, ग्रहण होत १३ आत्मशान १४ रसती १५ जाण्यायेण्याचं व्यापार १६ पलीकडची, वरची १७ अविकार व भसह