Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/814

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ॥ २२॥ नाना साधनाभिमान । सांडूनियां ये जो मज शरण । त्यासीही स्वरूपप्राप्ति पूर्ण । उद्धवा जाण सुनिश्चित ॥ २३ ॥ भक्त सकाम जरी चित्ती । तो करी अनन्यभक्ती । ते काम पुरवूनि मीदें मुक्ती । भक्ता अधोगती कदा न घडे ॥ २४ ॥ वाळके थाया घेऊनि कांहीं। मिठी घातल्या मातेच्या पार्टी। धन वेचोनि अपी तेही । परी जीवे कांहीं मारीना ॥ २५ ॥ तेची माझी करिता अनन्यभक्ती । जो जो काम भक्त वांछी चित्ती । तो तो पुरवूनि मी दे मुक्ती । परी अधोगतीं पडों नेदी ॥ २६ ॥ देखोनि बाळकाची व्यथा । जेवीं सर्वस्वी कळवळी माता । तेवीं निजभक्तांची अवस्था । मजही सर्वथा सहावेगा ।। २७ ।। काम पुरवूनि द्यावया मुक्ती । काय माझे गांठीं नाहीं शकी। मी भक्तकैवारी श्रीपती । त्यासी अधोगती कदा न घडे ॥ २८ ॥ माझें नाम अवचटें आल्या अतीं । रंक लाहे सायुज्यमुक्ती । मा माझी करितां अनन्यभक्ती । भक्तां अंवगती मग कैंची ।। २९॥ माझा भक्त जयाकडे कृ पाहे । तोही माझी भक्ति लाहे । मा मद्भक्ता अवगति होये । हा बोलू न साहे मजलागीं ॥ ६३० ॥ सोसूनिया गर्भवासासी । म्यां मुक्त केला अवऋपी । विदारूनि हिरण्यकशिपूसी । प्रल्हादासी रक्षिलें ॥ ३१॥ चक्र घेऊनियां हाती । म्या गर्मी रक्षिला परीक्षिती। तो मी भक्तांसी अधोगती। कदा कल्पाती होऊ नेदीं ।। ३२ ॥ माझिये भक्तीचेनि नांवे । तृण तेही म्या उद्धरावे । भक्तां केवीं अवगती पावे । जे जीवेभावे मज भजले ॥ ३३ ॥ काया वाचा मन धन । अवंचूनि अनन्यशरण । त्यांचा भोग मोक्षही जाण । मी श्रीकृष्ण स्वयें सोशी ॥३४॥ असा अनन्यभक्तीचा महिमा । सांगतां उत्साह पुरुपोत्तमा । तेणें उद्धवासी लोटला प्रेमा। 'स्वेद रोमा स्वरवित ॥ ३५ ॥ ऐकोनि भक्तीचे महिमान । देखोनि उद्धवाचे प्रेम पूर्ण । श्रीशुक सुखावला आपण । स्वानंदपूर्ण डोलत ॥ ३६॥ हरिखें ह्मणे परीक्षिती । धन्य हरिभक्त त्रिजगतीं । ज्यासी सर्वार्थी मुक्तौ । स्वमुखें श्रीपति बोलिला ॥ ३७॥ जैसे भक्तीचें महिमान । तैसेचि उद्धवाचे प्रेम गहन । तै उद्धवाचे प्रेमलक्षण । श्रीशुक आपण सांगत ॥ ३८ ॥ श्रीशुक उवाच ॥ से एवमादर्शितयोगमार्गलदोत्तमश्लोकपचो निशम्य । यहाअलि प्रत्युपरखकण्ठो न किशिदृचेऽथुपरिहताक्ष ॥ ३५ ॥ विष्टभ्य चित्त प्रणयावपूर्ण धैर्येण राजन् बहु मन्यमान । कृताञ्जलि माह यदुमवीर शीणा स्पृशस्तचरणारविन्दम् ॥ ३६॥ जो ज्ञानियाचा ज्ञाननिधी । जो निजयोधाचा उँदधी । जो आनंदाचा क्षीराब्धी । तो श्रीशुक स्वानंदी तोपला वोले ॥ ३९ ॥ ऐक वापा परीक्षिती। श्रवणसौभाग्यचक्रवर्ती । ज्यातें सुर नर असुर वानिती । ज्याची कीजे स्तुति महासिद्धी ॥६४०॥ ज्यातें वेद नित्य गाती । योगिदी वानिजे कीर्ती । तेणे श्रीकृष्णे स्तविली भक्ती । परम प्रीती अचंबित ॥४१॥ अनन्यभक्तीपरतें सुख । आन नाहींच विशेख । सर्व सारांचें सार देख । मद्भक्ति समान २ पतन ३भाळ, ह ४ घागरते ५दु रास्थिति ६ पदरी, सग्रहीं अकल्पित, सहज ८य कधिसही ९ तर मग १० वाईट गति, ११न ठकवून, निष्कपटणे १२ सर्व रोम घरासन त्यावर धर्मविदू चमकू लागले १३५एम. १४ सागर १५भवणरूप परम ऐश्वर्य भोगणान्यांमधला भमणी १६ अधिक