Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/809

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकोणतिसावा ७८१ सेवा न करी गर्ने पूर्ण । तो शिष्य जाण त्यागावा ॥ १२॥ मी धनदानी अतिसमर्थ । नीचसेवेसी न लावी हात । ऐसाही जो गर्वयुक्त । तोही निश्चित त्यागावा || १३ || जो लौकिक लाजेमेण । गुरुसेवा न करी आपण । ज्यासी लौकिकाचा अतिअभिमान । तोही शिष्य जाण त्यागावा ॥ १४॥ गुरुगृहीं, नीच कृत्य । न करी मानूनि मी समर्थ । तो मान्यताअभिमानयुक्त । जाण निश्चित त्यागावा ॥ १५॥न करी गुरुसेवा नीचवृत्ती । आहा अखंड ध्यान हेचि गुरुभक्ती । ऐशी सेवायचक ज्याची युक्ती । तोही निश्चिती त्यागावा ॥१६॥ नीच सेवा न करी आपण । ह्मणे मागाल ते देईन धन । ऐसा धनगी शिष्य आपण । सर्वथा जाण न करावा ॥ १७ ॥ धरुनि धनाची आस । गुरु शिप्यासी देत उपदेश । ते ब्रह्मज्ञान पडले वोस । वाढले असोस धनलोभ ॥ १८ ॥ अथवा वेचूनिया धन । जो घेईन ह्मणे ब्रह्मज्ञान । ऐसा धनाभिमानी शिष्य जाण । सर्वथा आपण न करावा ॥ १९॥ यथाकाळ जाहली प्राप्त । गुरुसेवा जे कालोचित । न करी जो अशुश्रूपु ह्मणत । तोही निश्चित त्यागावा ।। ५२०॥ करिता सद्गुरूची भकी। मी उद्धरेन निश्चिती । ऐसा भाव नसे ज्याचे चित्तीं । तो शिष्य हाती न धरावा ॥२१॥ सद्भुरु तोचि ब्रह्ममूर्ती । ऐसा भाव नाहीं ज्याच्या चित्ती । मूळीच विकल्पाची वस्ती । तोही शिप्य हाती न धरावा ॥२२॥ गरुहोनि ब्रह्म भिन्न । ऐसे ज्याचे निशित ज्ञान। ते निश्चयेंसी अभक्त जाण । त्यासी शिष्य आपण न करावे ॥ २३ ॥ मनुष्य मानूनि सद्गुरूसी । जो उल्लघी गुरुवचनासी । तो जाण पडला अपभ्रंशी । त्या शिष्यासी त्यागावे ॥ २४॥ सद्रूहोनि अधिकता । शिष्य आपुली मानी पवित्रता । तो अभक्तामाजी पूर्ण संरता । त्यासी तत्त्वता त्यागावे ॥ २५ ॥ गुरूच्या ठायीं ब्रह्मस्थिती । ज्यासी श्रद्धा नाही चित्ती । याचेि नाव गा अभक्ती । जाण निश्चिती उद्धया ।। २६ ।। का ये ग्रयाच ब्रह्मज्ञान । ज्यासी निश्चयें नाहीं जाण । त्यासी केव्हाही आपण । झणे विसरोन शिष्य करिसी ।। २७ ॥ये ग्रथीची ब्रह्मास्थिती। वक्ता जो मी परब्रह्ममूती । त्या माझ्या ठायीं नाही ज्याची भक्ती । तो शिष्य निश्चिती त्यागावा ॥२८॥ ये ग्रथोंचे आवडे ज्ञान । गुरूच्या ठायी श्रद्धा पूर्ण । परी ज्याचे उद्धत वर्तन । तो शिप्य जाण त्यागावा ।। २९ ॥ माझ्या निजमूर्ति सत सज्जन । माझे भक्त माझे जीवप्राण । त्याचे जो करी हेळण । दुर्ति नीतपण या नाव ॥५३०॥ माझ्या भक्तामाजील रक जाण । त्याचे सर्वस्त्रं यदान चरण । हे ज्यासी नायडे सपूर्ण । दुर्विनीतपणा या नाय ।। ३१॥ साधुसजना मेटों जाये। शठ नम्रता वंदी पाये । त्याचे गिवसोनि दोपगुण पाहे । दुर्मिनीतता राहे ते ठायीं ॥ ३२ ॥ दुष्टबुद्धीची जे विनीतता । ती नाव बोलिजे दुनिीतता । ऐशी ज्या शिष्याची अवस्था । ते जाण तत्त्वता त्यागावे ॥३३॥ ऐसें हैं ऐकोनि निरूपण । झणसी मी शिष्य न करी जाण । जो शुद्ध उपदेशी ब्रह्मज्ञान । तो आत्मा जाण 4 माझा ॥ ३४ ॥ जो अतिशय ३ भक्ति, खा ३ पुतीची ४ स्थिती ५ गुरूपासून ६ गुहनि देव मोटा । जयाप बाटे तो शिप्न फरंटा । फुटला वैभवाचा फाटा । सामर्यपिसे' असें समय अगतात ७ न करी विस्त र दापित ११ उम्मसपणाचे १२ उपहास, निंदा १३ दरिद्री १४ दुर बुद्धीयो की विजीतता सग पटन्तिको दिलाया आविर्भाव साचें नाव दार्षिनीतता