पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/808

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८० एकनाथी भागवत. परचक्र । तेणें रायासी सतोप थोर । गुढी उभारूनि साचार । करी निजगजर स्वानंदें ॥ ९२ ॥ तानयाचे लळे पुरवणे । हे व्याली तेचि वेदना जाणे । का शिप्यासी स्वानुभव देणे । हे स्वयें जाणे सद्गुरू ॥ ९३ ॥ निजपुत्र लाधल्या निधान । पिता सत्तोपे आपण । तेवीं उद्धवाचेनि अनुभव जाण । स्वयं श्रीकृष्ण सतोपे ।। ९४ ॥ कृष्णसुखें सुखरूप नित्यता । तोही शिष्यानुभवे सर्वथा । लाहे सुखाची परमावस्था । हे गुरुगम्यता अगम्य ॥ ९५ ॥ शिष्यासी उपदेश करितां । गुरूसी नसती सुखावस्था । तरी उपदेशपरंपरता । नव्हे तत्त्वता इये लोकीं ॥ ९६ ।। गुरु सांगे जै उँचगलेसाठीं । ते ते शिप्यासी बोधेना गोष्टी । मा निजानुभयाची भेटी । केवीं निजदृष्टी देखेल ॥ ९७ ॥ जेवी वाळा लेणे लेववितां । ते नेणे परी सुखावे माता । तेवीं शिप्यासी अनुभव होता । सुखावे तत्त्वतां सद्गुरुरावो ।। ९८॥ ऐसा उद्धवाचा ब्रह्मभावो । देखोनि सुखावे कृष्णदेवो । माझा उद्धवो जाहलो निःसदेहो । यासी ब्रह्मानुभयो आकळिला ॥ ९९ ॥ उद्धवाची ब्रह्मनिष्ठता। अनुभया आली निजात्मता । हे कळो सरले श्रीकृष्णनाथा । परोपदेशार्थी शिकवित ॥५०० ॥ तूं पावल्या ब्रह्मज्ञान । तेथ शिष्योपदेशलक्षण । पात्रशुद्धीचे कारण । तेही वोळखण हरि सांगे ॥१॥ नेतत्वया दाम्भिकाय नास्तिकाय शठाय च । अशुश्रूपोरभक्ताय दुर्विनीताय दीयताम् ॥ ३० ॥ शठ नास्तिक दंभयुक्त । अशुश्रूषु आणि अभक्त । ज्याची स्थिति दुर्विनीत । ते शिष्य निश्चित त्यागावे ॥ २ ॥ जेणे लोकरूढी होय गहन । तें तें वाह्य कर्माचरण । विपुल धन आणि सन्मान । यदर्थी जाण अतितृष्णा ॥ ३॥ ऐसे ज्याचे दाभिक भजन । त्यासी हे एकादशीचें ज्ञान । बोसणतां गा आपण । स्वमींही जाण नेावे ॥४॥ मोहममतेचे आधिक्य । तेणे निर्दळिलें निजआस्तिक्य । वेदी शास्त्रीं दृढ नास्तिक्य । देवचि मुख्य नाही ह्मणती ॥५॥ नास्तिक्यवादाचिया बंडा । या ज्ञानाचा ढोरकोंडा । लागों नेदी त्याचिया तोंडा । त्याचा भाव कोरडा नास्तिक्ये केला ॥ ६॥ नास्तिक्यवादापुढे । ज्ञान कायसें वापुडे । अनीश्वरवादाचें वंड गाढे । तें त्यागावे रोक. आस्तिक्यवादी ॥ ७ ॥ अनन्यभावे न रिघे शरण । मिथ्या लावूनि गोडपण । धूर्तवाद घेवों पाहे ज्ञान । तेही शैठ जाण त्यागावे॥८॥ शठाची ऐसी निजमती । पुढिलाची ठकूनि घे युक्ती । परी आपुली व्युत्पत्ती । पुढिलामती सागेना ॥ ९ ॥ काया वाचा आणि मन । जो गुरूसी करी वंचन । जो गुरूचे पाहे दोपगुण । तोही शठ पूर्ण त्यागावा ॥ ५१० ॥ माझे अतिथोर महिमान । गुरुसेवा केची करू आपण । सेचा न करी मैहिमेमेण | तोही शिष्य जाण त्यागावा ॥ ११ ॥ सद्गुरूपासी समर्थपणे । जो आपली मिरवी जाणीव जाण । जो १ पताका २ जन्मदा माता ३ अशाच अर्थाची ओंवी ज्ञानेश्वरीत आहे " देसा बाळकाचिया धणी वाइजे । का शिष्याचेनि जाइलेपणे होइजे । हे सद्रूचि एकलेनि जाणिजे । का प्रसवतिया "ज्ञानेश्वरी अ० ८-५५ ४ ठेवा ५ या टोखी ६ फटाळून ७ समानत नाही ८ अलकार ९ गतसदेह झाला आहे १० आत्मानुभव झाला आहे ११ सेवा न फरणारा (५२० ओपी पहा ) १२ मक्किहीन १३ उद्धट १४ वरकाती १५ वरळता १६ देऊ नये १५ खस्यरूपाच विस्मरण हा मोह व देहाच्या ठायी आसक्तिही ममता १८ टरफलही, भूससुद्धा १९ मोठ २० भाविकानी. २१ शरणा पतीची भावना नसून पोटात शिरून मा तेवढ काढून घेणारे ते शठ २२ हे कपटी आपरे विचार मात्र सागत नाहीत. २३ टकबाजी, प्रतारणा २४ आपल्या मोठेपणास माध येईल या भीतीने २५ मोठ्या तोयान २६ शब्दहान +