________________
७६४ एकनाथी भागवत. रांची वनफळें । खासी कृपावळें सप्रेम ॥ ३३ ॥ ऐसे भक्तांचे निजप्रेम । तो तूं प्रतिपाळिसी मेघश्याम । त्या तुजमाजी नाहीं विपम । तूं आत्माराम जगाचा ॥ ३४ ॥ 'एतदशेपयधों तूं अतयोमी निजसखा । परमात्मा हृदयस्थ देखा । तुजमाजी भूता भौतिकां । भिन्न आवाका असेना ॥ ३५ ॥ तूं जडाते चेतविता । मूढातें ज्ञानदाता । सकळ जीवां आनंदविता । तुझियाचि सत्ता जग नादे ॥३६॥ मातापित्याचें सख्यत्व देखा । तो प्रपंचयुक आवाका । तूं हृदयस्थ निजसखा । सकळ लोका सुखदाता ॥३७॥ ऐसा तूं सर्वांचा हृदयस्थ । सर्ववंद्यत्वे अतिसमर्थ । जाणसी हृदयींचा वृत्तात । स्वामी कृपावंत दीनांचा ॥ ३८ ॥ यापरी गा हुपीकेशी । दीनदयाळु निजभक्तासी । ऐशिया साडूनि स्वामीसी । कोण धनांधांसी भजेल ॥ ३९ ॥ त स्वाऽखिलात्मदयितेश्वरमाश्रिताना सर्वायद स्वकृतविद्विसूजेत को नु । को वा भजेत् किमपि विस्मृतयेऽनु भूत्यै फि या भवेश व पादरजोजुपान ॥५॥ विधाता आणि हरि हर । हे मायागुणों गुणावतार । तू मायानियंता ईश्वर । भक्तकरुणाकर सुसदाता ॥ १४०॥ त्या तुझी करिता निजभक्ती । चारी पुरुषार्थ चारी मुक्ती । भक्तासी लोटागणी येती। एवढी अर्थप्राप्ती निजभक्ता ॥४१॥ निजभक्तांचे मनोगत । तु सर्वज्ञ जाणता भगवंत । भक्तहदयींचें हगत । जाणोनि सर्वार्थ तूं देसी ॥४२॥ भावार्याचे भोक्तेपण । जाणता तूं एक श्रीकृष्ण । तुजवेगळे हे लक्षण । आणिका जाण । कळेना ॥ ४३ ॥ ऐसा स्वामी तूं उत्तमोत्तम । तुझेनि साधका सुख परम । आणिक नाही तुजसम । तूं स्वामी पुरुषोत्तम सर्वांचा ॥ ४४ ॥ तूं सर्वाचा स्वामी होसी । तूं कृपाळु निजभक्तांसी । अग्निविपादि नानावाधेसीं । तुवा प्रहादासी रक्षिले ॥ ४५ ॥ तुज भक्तांची कृपा प्रबळ । उत्तानचरणाचें ताने वाळ । करोनिया वैराग्यशील । वासी अंडळ तुवां केले ॥४६॥ शत्रुबंधु विभीपण । तुज आला अनन्यारण । त्याचे कृपेस्तव जाण । सकुली रावण उद्धरिला ॥ १७ ॥ छळूनि वाधिले वळीसी । शेखी कृपा उपजली कैसी । त्याचे द्वारी द्वारपाळ होसी । निजलाजेसी साडूनि ॥४८॥ ऐशी भक्तकृपां तुजपाशीं । भक्तहगत तूं जाणसी । ऐशा सांडूनि निजस्वामीसी । कोण धनाधासी सेवील ॥४९॥ देहादि इंद्रियां जे सुख भासे । तें तुझेनीच सुखलेशे । तो तूं सकळसुखसमावेशे । प्रसन्न अनायासे निजभक्ता ॥ १५० ॥ साधु जाणती तुझा महिमा । तूं ज्ञानियाचा अभेद आत्मा । भक्तप्रिय पुरुषोत्तमा । तुझा सुखाचा प्रेमा अप्रमेय ॥५१॥ तुझे सेवेचिया सत्तोखें । भक्त सुखावले निजसुसें । त्यासी देहदद्वजन्मदुःखें । स्वप्नीही समुखें कदा नव्हती ॥ ५२ ।। तुझ्या भजनसुखें तुझे भक्त । विपयीं होऊनि विरक्त । ते राज्य समुद्रवलयाँकित । थुकोनि साडित तुच्छत्वे ॥ ५३॥ सकळभोगवैभवेसी । स्वर्ग आलिया भक्तापाशी । ते उपेक्षिती तयासी । जेवीं राजहंसी चिल्लर ।। ५४ ॥ जे विनटले भजनाच्या १ टॉल, बेत, उभारणी , "ईश्वर सर्वभूताना हृद्देशेऽर्जुन तिष्ठति"-गीता अ० १८-६१ ३ सवा वद्य ४ सपत्तीत उमत झालेल्यास ५ मायेवरही सत्ता चालविणारा ६ धर्मार्थकामादि चार पुष्पार्थ ७वाधापासून ८ उत्तानपाद राजाचे रंगरूभव ५ वैराग्यविशाळ १० निधळ पद दिलेस ११ रावणाचा भाऊ १२ मुख्यासकट १३ भकाच्या हृदयातला भाव १४ सर्व साख्यासह १५ भक्ताशी अमेद दासविण्यासाठी गीतेत भगवताना 'ज्ञानी त्वात्मक में मतमू अमं दाटर मारे १६ सावभौमपद १७ व १८ रगरे, तन्मय झाले