पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/766

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३८ एकनाथी भागवत. आभासे ॥ ९६ ॥ ब्रह्म स्वयें अकारण । स्वप्रकाशे प्रकाशमान । तेचि प्रपंचाचें महाकारण । प्रकाशक जाण स्वयें झाले ॥ ९७ ॥ जेवी छायामंडपीच्या नाना व्यक्ती । तद्रूप भासे दीपदीप्ती । तेवीं जगदाकारें स्वयंज्योती । भासे मी चिन्मूर्ति परमात्मा ।। ९८ ।। एवं प्रपचाचे जे स्फुरण । तें स्वप्रकाश ब्रह्म पूर्ण । हे होतवसूनि ब्रह्मज्ञान । विकल्पच्छेदन हरि सांगे ॥ ९९ ॥ पन स्फुट मा विवेकहेतुमि परापचादेन विशारदेन । हिरवाऽऽत्मसन्देहमुपारमेत स्वानन्दतुष्टोऽखिलफामुकेम्य ॥२३॥ पूर्वी बोलिलो यथानिगुती । ब्रह्मज्ञान नानायुक्ती । ते करतलामलस्थिती । प्रकट प्रतीती प्रमाण ॥ ३०० ॥ वेद विवेक अनुमान । ब्रह्मउपदेशाचे लक्षण । ज्ञानाज्ञानाचें फळ पूर्ण । तुज मपूर्ण सागितले ॥१॥ तेथे देहेंद्रियांचे मिथ्यापण । देहात्मभावाचे निराकरण । ब्रह्म अद्वयत्वे परिपूर्ण । तेही गुह्य ज्ञान प्रकाशिले ॥२॥ म्या प्रकाशिले पूर्ण ज्ञान । जे दुर्लभ दुर्गम दुप्पाप जाण । हेचि सिद्धाचे समाधान । हेचि साधन साधकां ॥ ३ ॥ जे म्या सागीतले ब्रह्मज्ञान । हेंचि उपदेशशस्त्र तीक्ष्ण । साधक साधूनियां पूर्ण। मशय जाण छेदिती ।। ४ ।। म्या सांगीतले ब्रह्मज्ञान । तेथ सदेह मानी मन । तेणे सदेहेंसी देहाभिमान । येणे शस्त्रे जाण छेदिती॥५॥यापरी सदेहच्छेदन । करूनि देताची बोळवण । निर्दाळूनिया मीतूपण । स्वानदी निमन्न साधक ॥ ६ ॥ वर्णाश्रम कुळ जाती। जीवशिवादि पदस्थिती । याची स्फुरेना अहंकृती । या नाव उपरति उद्धवा ॥ ७ ॥ इहामुत्रादि फळे समस्ते । कोण कामी त्या कामाते । विषयो विषयी विषयभोगातें । सर्वथा तेये असेना ॥८॥ यापरी नित्य निष्काम । साधक झाले आत्माराम । परमानंदी निमन्न परम । पावले उपरम येणे योगें।॥ ९ ॥ देहेंद्रिये असता प्राण । कैसेनि गेला देहाभिमान । उद्धवा ऐसें कल्पील मन । तेचि निरूपण हरि सागे ॥ ३१०॥ नारमा पपु पाथिमिन्द्रियाणि देवा द्यसुर्वायुजल हुताश । मनोऽनमान धिपणा च सत्वमा कति स क्षितिरथसाम्यम् ॥ २४ ॥ देह आत्मा नव्हे पार्थिवपणे । इंद्रियें आत्मा नव्हती येणें गुणे । ते तंव देहाची उपकरणे । एकदेशीपणे व्यापार ॥ ११ ॥ इद्रियअधिष्ठाते देव । तेही आत्मा नव्हती सर्व । त्यासी इंद्रियाचा अभाव । आत्मपदी ठाव त्या कैचा ॥ १२ ॥ देह चाँळिता जो प्राण । तोही आत्मा नव्हे जाण । प्राण केवळ अज्ञान । करी गमनागमन देहवशे ॥ १३ ॥ प्राण जरी आत्मा होता । तरी तो देहासवे न वचती । यालागी प्राणासी निजात्मता । जाण सर्वथा-घडेना ॥ १४ ॥ आत्मा पृथ्वी नव्हे जडपणे । जळ नव्हे द्रवत्वगुणे । अग्नि नव्हे दाहकपणे । चचळपणे नव्हे वायू ॥ १५ ।। आत्मा नभ नव्हे शून्यपणे । मन नव्हे सकल्पगुणे । अतःकरण नव्हे नश्वरलक्षणे । चित्त चितने नव्हे आत्मा ॥ १६ ॥ आत्मा १ भासणे २ हस्तगत करुन, रतनगमळ करून 'हाववसण' ह क्रियापद आहे पुटील ऑवीत 'करतलामलक स्थिति वा पदान त्याचा अथ नाथानींच मुचविला आहे, देहात वसुन ३ ब्रह्मा ह जगाचे प्रकाशक आहे व कारण आहे, कारभारणाहन भिन्न नाही य इदिय, शब्दादि विषय, मन, देवता पचभूतें, इत्यादि भाराराणी तेच भासत आहे, ह यथाध जागण हर ब्रह्मशार आहे ४ पुढे देवादिकाचा उत्कृष्ट निरास सांगितला आहे ५ माधा ६ अहंभाव ७साटचाल करविणारा नजाता ९ आत्मा आकाश नव्हे. कारण आकाश शून्याकार आई १० मा ह सक्त्पति फयमर आहे आत्मा संपरपातीत आहे