पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/763

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अहाविसावा. निरभिमान भावार्थे ॥ ३२ ॥ सद्भाचे अनन्यशरण । तो गुरुकृपा पावे आपण । पाहोनि अधिकारलक्षण । गुरु गुद्याज्ञान उपदेशी ॥ ३३ ॥ सर्वही निष्टंक परब्रह्म । हे श्रुतिगुह्य उत्तमोत्तम । एष भाग्य जो सभाग्य परम । त्यासचि सुगम ठसावे ।। ३४ ।। गुरुवचन पडता कानीं । वृत्ति निजात्मसमाधानी । विनटोनि ठेली चिद्धनीं । सुखसमाधानी स्वानः ।। ३५ ॥ तयासी पुढती साधन ! अथवा कर्माचे कर्माचरण ! तेथ बोलो शके कोण । वेदी मौन घेतले ॥३६ ॥ जेथ इंद्वाची निमाली स्फूर्ती । सकळ दुःखाची समाती । देहीं विदेहवस्तुप्राप्ती । प्रत्यक्ष लणती या नांव ॥ ३७ ॥ पुसूनिया विसराचा ठायो । आठवेंवीण नित्य आठवो। अखंड स्वरूपानुभवो । प्रत्यक्ष पहा हो या नाव ॥६॥ मी आत्मा स्वानंदकंद । ऐसा अखंडत्वें परमानंद । प्रत्यक्ष पदाचा हा निजबोध । स्वयें गोविद बोलिला ॥ ३९॥ हाचि बोध सांग्याकडे । श्रवणमाने आंतुडे । एका भनने जोडे । एका सापडे निदिध्यासे ॥ २४० ॥ एकासी गा प्रत्यंगावृत्ती हा वोध उसावे चित्तीं । एका माझिया अद्वैतभक्ती । मी सगळा श्रीपति आतुडें ॥ ४१ ॥ निजबोध साधावया पूर्ण । उद्धवा हेंचि मुख्य साधन । एवं साधलिया निजज्ञान । फळ कोण तें ऐक ॥ ४२ ॥ जो मी सृष्टिआदिअतू । नित्यमुक्तत्वें अहेतू । तो मी भवमूळा मूळहेतू । सृष्टिवजिता अच्युत स्वलीला ॥४३॥ तेथ रजोगुणाचिये स्थिती निष्टरूपं मीचि पुढतीं। अद्वैती दावी अनेक व्यक्ती । सृष्टिउत्पत्तिकर्ता तो मी ॥४४॥ बुद्धिबळे एका काष्ठाचे पोटी। तेथ राजा प्रधान पशु म्यादा उठी । त्यांसी पूर्वकर्म नाहीं गाठी । तेवीं निष्कम सृष्टिप्रकाशिता मी ।। ४५ ॥ निष्कम जग समस्त । सजिता मीमासकमत । ठकोनि ठेलें निश्चित्त । जग सदोदित निष्कर्मबह्म ॥ ४६॥ जैसें मूवीण सफळ झाड । वाढविले निजागी गोड । तेची सृष्टिसरक्षणी कोड । मज निचोडा चाड प्रतिपालनी ॥४७॥ जेवीं बुद्धिबळाचा खेळू । अचेतनी युद्ध प्रवलू । तेवीं लोकरक्षणी कळवलू । सृष्टिप्रतिपाळू मी कर्ता ॥४८॥ प्रकृतीच्या जडमूढ सौरी । पुरुपाचेनि सचेतन निर्धारी। काळफासे घेऊनि करीं । खेळविता चराचरी मी एक विष्णु ॥ ४९ ॥ तेथ अचेतना जुझरी । न मरत्या महामारामारी । एका जीत एका हारी । उभयपक्षातरी खेळविता मी ॥२५० ॥ सोंगटी निमालियापाठी । कवण पुण्यात्मा चढे वैकुठी । कोण पडले नरकसकटीं । तैसा जाण सृष्टी वंधमोक्ष ॥ ५१ ॥ तेवी न मोडता एकलेपण । त्या खेळाच्या ऐसें जाण । जगाचे करीं मी पालन । दुजेपण नातळता ॥ ५२ ॥ दोराचा सर्पाकार। सबळ वळें मारी वीर । तैसा सृष्टीसी सहार । मी प्रळय रुद्र पै कर्ता ॥ ५३ ॥ स्वमी भासलें जळ सपूर्ण । तेथूनि जागा होता आपण । स्वप्न निर्दळिता कष्ट कोण । तैसा मी जाण'प्रळयकर्ता ॥ ५४ ॥ सृष्टीसी उत्पत्ति स्थिति निधन । आत्मा आत्मस्व अखड पूर्ण। १ निराया २ बिवते ३ वृत्ति चिद्धनाच्या ठिकाणी रमून स्थिरावली ४ विदेहत्वाची प्रासी ५खानुभय ६ खानदाचा बादा हरि हा भागदाच कद' ७ परिपूर्ण ८ देववानाला ९प्रास होतो १० खखरूपाकार वृत्तीच्या योगार्ने ११वीचा आदिमी व अतही मीच १२ भी नित्यमुक असल्यामुळे या खटाटोपीपासून मला काही साध्यही फरापयाचे नाही १३ सष्टय पति ही माझी केवळ लीला माहे १४ चाड नसलेल्या-निष्कामा-मा १५ सोंगट्या १६ युद्धात १७ महामारी १८ जय व पराजय १६ मेल्यावर