पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/738

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१० एकनाथी भागवत. निजगुह्य जाण । प्रतिपदी सुखसंपन्न । साधक स्वयें होती चिद्धन । हे तेचि उपासन उद्धवा ॥ १८ ॥ ऐसे ऐकतां कृष्णवचन । उद्धव स्वानंदें झाला पूर्ण । धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । ह्मणे समूळ निरूपण मज सांग ॥ १९ ॥ तंव देव ह्मणे स्थिर राहें । जे हे आगमोक्त गुह्य आहे । ते माझे कृपेवीण पाहे । प्राप्त नोहे साधका ॥ १२० ॥ आगमोक्त गुह्य गहन । असो हे माझें गुप्तधन । तुवां पुशिले पूजाविधान । ऐक सावधान उद्धवा ॥ २१॥ लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसी करावेंना स्नान । इतरां मूर्तीसी नेपन । यथाविधान करावे ॥२२॥ द्रव्ये प्रसिद्धर्मद्याग प्रतिमादिप्यमायिन । भक्तस्य च यथाल धेरैदि भायेन चैर हि ॥ १५॥ ___ पूजक सकाम होय चांग । तै पूजाद्रव्य व्हावे साग । पूजासाधन झालिया व्यंग । फळ निव्यंग उपजेना ॥ २३ ॥ भक्त निष्काम वाकोडें । तै पूजाद्रव्याचे साकडें। सर्वथा कांही न पडे । भक्तभावो आवडे भगवंता ॥ २४ ॥ तेथ अनायासे में प्राप्त । तेणे भगवत होय तृप्त । तोचि पूजायाग यथोक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ २५ ॥ निष्कामवृत्ती फल मूल । दूर्गाकुर का निर्मळ जळ । इतुकेन पूजायाग सकळ । होय अविकळ मदावे ॥ २६ ॥ जेथ माझा सद्भाव दृढ । तेथ उपचाराचा कोण पाड । भक्कांचा भावचि मज गोड । सुख सुरवाड मद्भक्ती ॥ २७ ॥ वाह्य उपचार जे कां देहीं । ते प्रतिमामूर्तिपूजेसी पाही । मानसपूजेचे तंव ठायीं । वाणी नाही उपचारा ॥ २८ ॥ तेथ मनचि होय माझी मूर्ती। मनोमय उपचारसपत्ती । निलोंमें जे मज अर्पिती । तेणे मी श्रीपति सतुष्ट ॥२९॥ प्रतिमादि अष्टौ पूजास्थान । यथोक्त पूजेचे विधान । तुज मी सांग सागेन । देई अव. धान उद्धवा ॥ १३०॥ सानालकरण प्रेष्ठम यामेव उद्धव । स्थण्डिले तत्वनिन्यासो वहावाज्यप्लुत हवि ॥१६॥ ___ सूर्ये चाभ्यहणं प्रेष्ठ सलिले सलिलाटिभि । प्रतिमामूर्ति पूजास्थान । ते मूर्तीस जे महास्नपन । या नांव बोलिजे स्नान । साङ्ग भूपण मुकुटादी ॥ ३१ ॥ जे लोकी उत्तम प्रकार । का आपणासी जे प्रियकर । जे जे अनर्घ्य अळंकार । तेणे श्रीधर पूजावा ॥ ३२ ॥ स्नान भोजन अलकार । साझ पूजा सपरिकर । हा प्रतिमापूजाप्रकार । ऐक विचार स्थडिलाचा ॥ ३३ ॥ स्थंडिलीं में पूजास्थान । तेथ तत्त्वाचे धरोनि ध्यान । करावे तत्वविन्यासलेखन । पूजाविधान या हेतू ॥ ३४ ॥ आत्मतत्त्वादिविवंच । स्थंडिलीं विवचूनि साच । हृदय शिर शिखा कवच । नेत्र अस्त्र दिशंचं निजपूजा ॥ ३५ ॥ अग्नीचे ठायीं जे पूजन । तेथ माझें करूनि ध्यान । आज्यकृत हविहवन । हे पूजाविधान अग्नीचें ॥ ३६॥ अग्नि देवाचे वदन । येणे विश्वासे सपूर्ण । हविर्द्रव्य करिता हवन । अग्निपूजन या हेतू ॥३७॥ सूर्याच्या ठायीं प्रकाशमान । मंडळात्मा सूर्यनारायण । तेय सौरमंत्र उपस्थान । पूजाविधान या हेतू ॥ ३८ ॥ विचा• रिता श्रुतीचा अर्थ आपोनारायण साक्षात । येथ पजाविधान यथोक्त । जळी जळयुक्त १शानात सागितलेल २ स्नान ३ कमी ४ पूर्ण ५सकट निष्काम पूजकोनी पूजासामग्री सहजगत्या जी मिळेल विच्या योगानेच पूजा करावी ६ निर्दोष स्था, पर्वा ८ काहीं ९ तोटा १० सविस्तर ११ महतपण १२ यात्मतत्त्वादिकांचा विचार १३ दिग्वधन, १४ मुरा १५ स्तवन