पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/730

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७०२ एकनाथी भागवत. लबलाहो । पावतां सूर्यातें ग्रासी राहो । साधु ग्रहांचा पुसोनि ठावो । स्वानंदें पहा हो नादती ॥४७॥ धुई दाटतां प्रबळ । तेणें आच्छादे रविमंडळ । तम धूम मोहपडळ । साधूंसी अळुमाळ वाधीना ॥४८॥ सूर्य निजकिरणे सर्वात तावी । साधु निजांगे जग निववी । सूर्य सर्वात क्षयो दावी । साधू अक्षयी करी निजवोधे ॥४९॥ सूर्यो साह्य झालिया दृष्टी । दृश्याकार उघडे सृष्टी । सत्सग साह्य झालिया सृष्टी । चिन्माने सृष्टी ठसावे ॥ ४५० ॥ विवेके विचारितां देख । सूर्याहूनि साधु अधिक । साधु धरातळी ज्ञानार्क । भवाब्धितारक निजसंगियां ॥५१॥ पृथ्वीतळी देवता साधू । साधु दीनांचे सखे बंधू । साधुरूपं मी परमानंदू । जाण प्रसिद्ध परमात्मा ॥ ५२ ॥ देवां दीजे वळिमवदान । तेव्हा देव होती प्रसन्न । कृपातारक निजसज्जन । दयालु पूर्ण दीनांचे ॥५३॥ सुहृद सखे सगोत्र बंधू । द्रव्यलो) भजनसंबंधू । निर्लोमें कृपालु साधू । सखे बंधू दीनांचे ॥५४॥ सत केवळ कृपेचे दीप । सत ते माझे निजस्वरूप । यालागी सत्संगें फिटे पाप । होती निप्पाप साधक ॥ ५५ ॥ निप्पाप करूनि साधकांसी । ब्रह्मस्वरूपता देती त्यांसी । ऐसे कृपाळुत्व साधूंपाशीं । जाण निश्चयेंसी उद्धवा ॥ ५६ ॥ मी निर्गुणत्वे ब्रह्म पूर्ण । साधू चालतेवोलतें ब्रह्म जाण । तयासी रिघालिया शरण । जन्ममरण वाधेना ।। ५७ ॥ साधूंसी सद्भावे शरण । रिघाल्या नुरे जन्ममरण । साधु शरणागतां शरण्य । सत्य जाण उद्धवा ॥ ५८ ॥ भावे धरिलिया सत्संगती । संसारिया होय निर्मुक्ती। हे प्रतिज्ञापूर्वक श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥ ५९ ॥ सद्भावेसी सत्संगती । धरितां घरी ये ब्रह्मस्थिती । हें निजवर्म उद्धवाप्रती । देवें अध्यायाती निरूपिले ॥४६० ॥ परम विरक्तीचे कारण । ते हे पुरूरवाप्रकरण । उपसंहारें श्रीकृष्ण ! अध्यायू जाण संपवी ॥६॥ वैतसेनस्ततोऽप्येवमुर्वश्या लोकनि यह । मुक्तसको महीमेतामारमारामश्वचार ह॥ ३५ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कन्धे ऐलगीत नाम पदिशोऽध्याय ॥२६॥ पूर्वी सूर्यवंश प्रसिद्ध । तेथ सोमवंशाचा संबंध । 'वैतसेन' श्लोकींचें पद । लावूनि गोविट बोलिला ॥ १२॥ उमावनी अतिएकात । तेय उमा आणि उमाकात । विगतवासेसी क्रीडत । स्वानंदयुक्त स्वलीला ॥६३॥ तेय शिवाचे दर्शनासी । अवचटें आले सप्तऋपी । लज्जा उपजली पार्वतीसी । तिणे त्या वनासी शापिले ॥ ६४ ॥ जो पुरुप या वनाआत । येईल तो हो स्त्रीरूप एथ । ऐसा शाप क्रोधयुक्त । बदली निश्चित जगदंवा ॥६५॥ तेय राजा सुद्युम्न सूर्यवंशी । नेणोनिया शापप्रभावासी । पारधी आला त्या वनासी । सकल सेनेसी सन्नद्ध ॥६६॥ रिघताचि त्या वनाआत । पुरुषत्व पालटले तेथ । चाप शापाचे सामर्थ्य । झाले समस्त स्त्रीरूप ॥ ६७ ॥ तेथ पुरुषत्वाची आठवण । निःशेप विसरलें मन । आपण पूर्वी होतों कोण । हेही संपूर्ण विसरले ॥ ६८ ॥ अव झाले अश्विनी । हस्ती झाले हस्तिणी । पुरुप झाले कामिनी । तत्क्षणी त्या वनात ॥ ६९ ।। तेथ पुरुपकामें कौमासक्ती । अनेक अनेका पुरुषाप्रती । स्त्रिया गेलिया त्या समस्ती । १ धुर्वे २ ताप देतो ३ पृथ्वीवर ४ ज्ञानरूप सूर्य ५ गेल्यास ६ सहज प्राप्त होते ७ पुरुरव्याचे आरम्यान ८ ऐल, पुरूरवा ९ पार्वतीच्या क्रीडावनात १० शकर ११ वस्त्र फेडन, ना १२ सहज, १३ तयार, सन १४ प्रवळ, १५ पोख्या १६ मुदर लिया. १७ सकाम होऊन