पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/728

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. प्रकटे अभेदवोध । तेणे बोसडे परमानंद । स्वानंदकंद स्वयंभ ॥ ५ ॥ माझे स्वस्वरूपा नाहीं अंत । यालागी नांवे मी अनंत । वाप भकभाव समर्थ । तेणे मी अनंत आकळिलो ॥ ६॥ ऐसे ज्याचे प्रेम गोड । त्याचे सेवेचें मज कोड । त्याचें सोशी मी साकड। निचाडो चाड मज त्याची ॥७॥ देव सप्रेमें भुलला । ह्मणे मी त्याचाचि अकिला । जीवेर्भावे तया विकिला । मी त्याचा जाहला तिहीं लोकीं ॥ ८॥ एथवरी भक्तां माझी प्राप्ती । अवचटें झाल्या सत्सगती । मा सद्भावे जे साधु सेविती । त्यांची निजगतीन बोलवे ॥९॥ ऐसा सतमहिमा चानितां । धणी न पुरे श्रीकृष्णनाथा । तोचि संतमहिमा मागुता । होय वानिता चौ श्लोकीं ॥ ४१० ॥ यथोपश्रयमाणस भगवन्त विभावमुम् । शीत भय तमोऽप्येति साधून मसेवतन्तथा ॥ ३१ ॥ जेवी वैश्वानर तेजोमूर्ती । त्याची सेवा जे करू जाणती । त्याचे शीत-तम-भयनिवृत्ती। जो करी निश्चिती उद्धवा ॥ ११॥ शीत निवारी सन्निधी । तम निवारी तेजोवृद्धी । भय निवारी भगवद्बुद्धी । जेवीं त्रिशुद्धी विभावसू ॥ १२ ॥ तैसीच जाण सत्सगती । सगे त्रिविध ताप निवारती । तेचि अर्थीची निजयुक्ती । ऐक उपपत्ती उद्धवा ॥ १३ ॥ शीत मणिजे द्वबाधू । तो समूळ निवारिती साधू । तम हणिजे अज्ञानाधू । त्यासी करिती प्रवोधू निजज्ञाने ॥ १४ ॥ भयांमाजी श्रेष्ठ मरण । ते निवारिती साधु विचक्षण । दूर करिती जन्ममरण । कृपाळु पूर्ण दीनांचे ॥ १५ ॥ अग्निसमान ह्मणणे साधू । हाही बोल अतिअवद्ध । अग्नीहूनि अधिक साधू । तोचि प्रबोधू हरि सांगे ॥ १६ ॥ अग्नीपाशी प्रबळ धूम । साधु निष्क्रोध निर्धूम । अग्नि 'पोळी अधमोत्तम । साधु सर्वसम सुखदाते ॥ १७ ॥ साधूची धन्य धन्य सगती । सगें जडजाज्य तोडिती । कर्माचे कर्मठत्व मोडिती । बुडत्या तीरिती निजसमें ॥ १८ ॥ निमज्योन्मजता घोरे भवान्धो परमायनम् । सन्तो ब्रह्मविद शान्ता नाईदेवाप्सु मजताम् ॥ २२ ॥ प्रतिक्षणी अधिक वृद्धी । अमर्याद वाढी भवाब्धी । तेथ उचकल्या चुवकल्या त्रिशुद्धी। अधर्मबुद्धि जनासी ।। १९ ॥ अधर्म निर्मंजन नरकात । स्वधर्मे उन्मजन स्वर्गात । ऐसे भोगिती आवर्त । स्वर्गनरकात ससारी ॥ ४२० ॥ यापरी संसारी जन । पावता उन्मजन निमज्जन । त्यासी तरावया भवान्धि जाण । साधु सज्जन दृढ नोव ॥ २१॥ पडल्या जकार्णवामाझारी । जेवी अँच्छिद्र नाव तारी । तेवीं पडता भवसागरी । सुखरूपं तारी सज्जननाव ॥ २२ ॥ कामक्रोधरहित शाती। हेचि नावेची अच्छिद्र स्थिती । ब्रह्मज्ञाने संपुरती । सुखरूप निश्चिती या हेतू ॥ २३ ॥ कामक्रोधादि साँवजासी । वळे ध्याचया आविसासी । कदा न येववे नावेपाशीं । सगें सकळासी तारक ॥ २४ ॥ नवल ये नावेची स्थिती । जुनी नव्हे कल्पांतीं । बुडवू नेणे धारावर्ती । तारक निश्चिती निज. १ उचवळे, उतास येतो . मोठा, पराम्मी ३ वाधिला गेलो ४ आवड ५ निष्कामारा ६ सवस्व तृप्ती ८थडी, अधमर प भीती यांचा नाश ९ अनि १० शीतोष्ण, मुसदुस, इत्यादि द्वद्वापासून होणारी पीडा ११मूळ अज्ञान १२ प्रकाश १३ धूर १४ जाळतो १५ साधु कमजाध्य, ससारभय व मुलाशान नाहीशी करितोच, पण निघूम व सुस दायकही आहे, यामुळे अमीचा दृष्टात साधुपुट फिका पडतो १६ बुडणे १७ वर येणे १८ फर १९ नोका २० साधूचं निर्दोपरख व निष्पलकस्व अच्छिद्रशद करून मचविले २१ पूण, भरपूर २२ प्राणी, मासे, वगैरे. यास २३ आमिपास, मांसाचे रुपये २४ मोठ्या प्रवाहात व भोवऱ्यात