________________
एकनाथी भागवत. निषेध त्याचा दासु । देवोनि निजभजनविलासु । स्वयें जगनिवासु सुखावे ॥ ३८ ॥ भागवतधर्म राहे कर्म । तंव तंव सुखावे पुरुपोत्तम । सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥ ३९॥ कर्म करूं पावे प्रमादु । तंव प्रमादी प्रगटे गोविदु । यालागी विधिनिपेधु । न शकती वायूं हरिभक्तां ॥३४०॥ अजामिळा कर्मवाध । यमपाशी वांधितां सुवद्ध । तेथे प्रगटोनि गोविद । केला अतिशुद्ध नाममानें ॥ ४१ ॥ स्वधर्म कर्म हेच दोनी । निज सत्ता भोयी करूनी । जो पैहुडे भजनसुखासनी । तो पड़े ते दंडणी स्वधर्मकर्मा ॥ ४२ ॥ भजनप्रतापसत्तालक्षणे । स्वधर्मकर्मा ऐसे दडणे । वर्णाश्रमांचा ठावो पुसणें । होळी करणे कर्माची ॥४३॥ एव भागवतधर्म जे सेवक । स्वधर्मकर्म त्याचे रकात राहो न शके त्यांसन्मुख । मा केवी वाधक हो शकेल ॥ ४४ ॥ कसे कैसे भागवतधर्म । केवी भगवंती अ कर्म । हे अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥ ४५ ॥ कायेन याचा मनसेन्द्रिय उमामा घाऽनुसृतः स्वभावानाकरोति यद्यत्सकर परसै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥३६॥ हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक । भगवंती अ सकळिक । या नांव देख भागवतधर्म ॥ ४६ ॥ उदकी तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ । तैसे भक्ताचे कर्म सकळ । अर्पे तत्काल भगवंतीं ॥ १७॥ ये श्लोकीचे व्याख्यान । पहिले मानसिक अर्पण । पाठी इंद्रिय बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥४८॥ भागवतधर्माची निजस्थिती। मन बुद्धि चित्त अहंकृती । आदिकरूनि इंद्रियवृत्ती । भगवती अर्पिती ते ऐक ॥४९॥ बाधू न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचे वर्म । मनी प्रगटला पुरुपोत्तम । अतिनिःसीम निजबोधे ॥ ३५० ॥ ह्मणोनि सकल्पविकल्प । अवघे जाहले भगवद्रूप । यालागी भक्त नित्य निष्पाप । सत्यसकल्प हरिदास ॥५१॥ जेवी बुद्धिवळाचा खेळ । राजा प्रधान गज दळ । अवघे काष्ठचि केवळ । तेवीं सकल्प सकळ भगवद्प ॥५२॥ जो जो सकल्पकाी कामू । तो तो होय आत्मारामू । तेथ भजनाचा सध। अतिनि सीमू स्वये चाढे ॥५३॥ जागृती सुषुप्ती स्वम । तिही अवस्था होय भजन । तेथ असंड अनुसधान । निजबोधे पूर्ण ठसावे अगी ॥५४॥ मना होता समाधान । समाधाने अधिक भजन । पूर्ण वाणले अनुसधान । ध्येय ध्याता ध्यान समरसें भजे ॥५५॥ तुर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगवद्भजनीं । जववरी अवस्था आपणी । आपआपणा मुकल्या नाही ॥ ५६ ॥ ऐसा भावनेवीण उपजे भावो । तों तो तत्काळ होय देवो । मग अर्पणाचा नवलायो । न अर्पिता पहावो स्वयें होय ।। ५७॥ स्वरूप मिथ्या केले स्वप्न । जागृती सोलूनि काढिले ज्ञान । निघडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहीते पूर्ण एकत्र केले ॥५८॥ तये स्वरूपी सगळं मन । स्वयचि करी निजात्मार्पण । तेथींचे सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥ ५९॥ यापरी मानसिक जाण । सहज स्वरूपी हो अर्पण । आता इद्रियाचे समपण । होय ते लक्षण ऐक राया ॥ ३६० ॥ दीपु लाविजे गृहीभीतरी । तोचि प्रकाशे गंवाक्षद्वारी । तेवी मनी प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियातरी भजनानदु ।। ६१ ॥ तेचि इंद्रिय करूनि २ पालनी वाहणारे ३ निजतो ४ भजमरूप पालखीत. ५ सतलक्षणे ६ बामनिक ७ निकाम, ८ नतर ९हे दोन्ही मनाचे धम आहेत १० उल्हाग ११ जात्मस्वरूपाच्या ज्ञानाने १२ ठसाचले १३ निपुटीच्या एफपणान १४ आश्चर्य १५ आपणच आपणाला समर्पण करणे १६ धरान १७ खिडक्यातुन