पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/688

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. पुरपं सत्वसयुक्तमनुमीयाच्छमादिभिः । कामादिभी रजोयुक्त क्रोधाधैस्तमसा युतम् ॥९॥ इंद्रियनिग्रहो यथोचित जो शमदमी सदा क्रीडत । शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्विक ।। ५७ ॥ जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख । द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥ ५८ ॥ ज्यासी स्वधर्मी नाही रती। आवडे अधर्मप्रवृत्ती । क्रोधलोमें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चिती तामसू ॥ ५९॥ एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुपलक्षण । या नांव गा अनुमान । विवेकसपन्न जाणती ॥१६०॥ सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतले निरूपण । हे न कळे ह्मणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥ ६१ ॥ ___यदा भजति मा भक्त्या निरपेक्ष स्वकर्ममि । त समप्रकृति विद्यारपुरुष स्त्रियमेव वा ॥ १० ॥ स्वकर्मों वांछित फळ । तेंचि मायेचें दृद पडळ । ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपी ।। ६२ ॥ करूनि फळाशेचे शून्य । स्वधर्मे करिती माझें भजन । पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्वसंपन्न निश्चित ॥ ६३ ॥ देहावयवलिगदर्शन । तेणे स्त्रीपुरुपनामाभिधान । परी आत्मी आत्मा नाही जाण । जीवत्व समान स्त्रीपुरुषी ॥ ६४ ॥ चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण । तेथ निरपेक्ष ते माझे भजन । स्वधर्म सपूर्ण या नांव ॥ ६५ ॥ ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रकटे माझी भक्ती । ते ते सात्विक प्रकृती । जाण निश्चिती उद्धवा ॥६६॥ ॥ आशंका ॥ ॥ कर्म करिता फळाशा वाढे। तो फळभोग भोगणे पडे । स्वकमै भक्तिकेवीं घडे । कर्म ते कु. अत्यंत ।। ६७ ॥ कर्म करिता फळ वाधक । न करितां प्रत्यवाय नरक । कर्म कर्मवद्ध लोक । केले देख ससारी ॥'६८ ॥ जीव होता जो स्वतंत्र । तो कर्मे केला परतंत्र । एवढे कर्माचें चरित्र । अतिविचित्र वाधक ।। ६९॥ स्वकर्मे भगवद्भक्ती । ह्मणशी घडे कैशा रीती । तेचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपति सागत ॥ १७० ॥ सर्प धावोनि धरिल्या तोंडी । तो सर्वागी घाली आदी। तेणें धार्के जो सोडी। तरी तो विभांडी महाविखें ॥७१॥ ते सपेवाधेची सांकडी। निवारी मंत्रवादी गारुडी । तेवीं कर्मी कर्मवाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥ ७२ ॥ रिघता सद्गुरूसी शरण । कर्म करवी ब्रह्मार्पण । हेचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥७३ ।। ब्रह्म कर्माचे प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक । हेंचि मदर्पण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥ ७४ ॥ सर्वेद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मीची ब्रह्मशती। ऐसेनि निश्चयें कर्मस्थिती। स्वकर्मभक्ति या नाव ॥ ७५ ॥ ऐसेनि स्वकर्म स्वाभाविक । जे मज भजती भाविक । ते ते शुद्ध सात्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ७६ ॥ स्वधर्म सर्वथा निष्फळ । ह्मणती ते मूर्ख केवळ । स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दली ॥ ७७ ॥ एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी । त ते राजसे वापुडीं। केवळ वेडी विषयार्थी ।। ७८ ॥ विपयफळ वांछिता देख । देह धरण आवश्यक । देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी॥ ७९ ॥यापरी जनीं दुःखदाता। राजसतामसप्रकृती । ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सागेन ॥ १८०॥ १च २ बाच्छादणारं पटस ३त्रीपुरुप हा भेद देहावयवाच्या चिन्हायरून समजायाचा, तसा आत्मा,भारमा, ससा पाम्पाच्या टाची लिंगभेद नाहीं खोटं ५ प्रायश्चित्ताई दोष पिटीमाण बेटा. वटाळ ८ घातक विपान नारा पागा, मागला जातो निष्कामपणात सधमाचरणान भगवत्सेवारण हा रालगुण, १० देहाची उत्पत्ति. ११ पट