पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/680

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६० एकनाथी भागयत. भावो । निःशेप 'अहं' सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥७॥ विचारितां सांख्यज्ञान । जगातें गांवी अहंपण । अहंपाशी जन्ममरण । दुःख दारुण अहंभावों ॥८॥ऐसा अहंभावो कठिण । सांडितां न सांडे आपण । येचि गुंतीचे कारण । सर्वथा जाण कळेना ॥ ९॥ हे पुसों जावे देवापाशीं । तेणे विशद सांगीतलें सांख्यासी। आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आझांसी कळेना ।। ६१० ॥ येचि अर्थी श्रीकृष्ण । पंचविसावे अध्यायी जाण । सगुणनिर्गुणविभागें पूर्ण । गोड निरूपण सांगेल ॥११॥ ते सुरस रसाळ मधुर कथा । जेथ श्रीकृष्णाऐसा वक्ता । उद्धव शिरोमणि श्रोता। अनुपम स्वादुता ते ठायीं ॥ १२ ॥ त्या स्वादाचे गोडपण ! सांगावया समर्थ श्रीकृष्ण । सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥ १३ ॥ ते देवभक्तसंवादगोडी । वेदशास्त्रे न जोडे जोडी । आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥१४ ॥ आतुडाचया ते निजगोडी । जैं भाग्य भावार्थे जोडे जोडी । भावार्थाचे निजआवडीं । जिव्हारीची गोडी देवो दे भक्तां ॥१५॥ एवं भावार्थापरतें कांहीं । देवासी आवडते नाहीं । तो भावो नाही ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥ १६ ॥ त्या बाळकाचा धन्य भावो । खापरे माडूनि ह्मणती देवो । तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसदेहो विश्वास ॥ १७ ॥ बाळके दूध मागावयासाठी । भावार्ये लागला देवापाठी । कांक्षीराब्धि करूनि वाटी । उपमन्यावोठी लाविली ॥ १८ ॥ एवं भाविकू देवाचा लाही । देवो भाविकांचा आदणा । भावेवीण देवो जाणा । कधी कोणा न भेटे॥१९॥ यालागी जेथ भावार्थ । तेथचि जोडे सुखस्वार्थ । भावार्थ तेथ परमार्थ । साग साद्यंत सांपडे ॥ २० ॥ ऐसा वाढविल्या भावार्थ । तेणे जोडे निर्गुणनिजस्वार्थ । तेचि अर्थीचा वृत्तात । पुढिल्या अध्यायात हरि सागे ॥ २१॥ ते कथेचे गोडपण । अमृतास विसरवी जाण । ऐसे रसाळ निरूपण । सादरें श्रीकृष्ण सागेल ॥ २२ ॥ ते श्रीकृष्णकथापीयूखै । श्रोत्याचें पावे श्रवणमुख । एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥ २३ ॥ श्रीभागवत अत्यादरें । श्रीकृष्णकथा सविस्तरें । अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थअळंकारें साळंकृत ॥ २४ ॥ तेणे संत सज्जन सोयरे । गौरवीन श्रवणादरे । एका जनार्दन कृपाकरें। आविष्करे सामर्थ्य ॥२५॥ गौरविले सोयरे सज्जन । हाणाल, उपेक्षिले इतर जन । जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थे जाण गौरव ॥ २६ ॥ भावार्थासारिखें गौरवण । एका जनार्दन जाणे जाण । एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥ ६२७॥ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारटीकायां प्रकृतिपुरुपसाख्ययोगो नाम चतुर्विशतितमोऽध्यायः ॥ २४ ॥ ॥श्रीकृष्णापेणमस्तु ॥ ॥मूळश्लोक ॥ २९॥ ॥ ऑव्या ।। ६२७ ॥ चतुत्वाभिमान २गुतपित ३ मार्य ५ लाभ अवलोकन केले असता प्राप्त होत नाही ८ अत. तिला मूमे, १० दुधाचा समुद्र ११ ऑठाला १२ आवडता, खाधीन १३ भगवचारतका अमृत १४ प्रष्ट होते १५ सन्मान करणे.