पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/678

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५८ एकनाथी भागात. प्रकृतीचेनि योगें जाण । शुद्धासी बोलिजे जीवपण । पुरुपू हेही अभिधान । त्यासीच जाण बोलिजे ॥ ५६०॥ करितां प्रकृतिविवंचन । केवळ मृगजळासमान । दिसे परी साचपण । सर्वथा जाण असेना ॥ ६१॥ मृगजळामाजीं जो पडे । तेथ जळ नाहीं मा तो कोठे बुडे । तेवी प्रकृति नसतां जोडे । वोर्डकोडें जीवत्व कोण ॥ ६२॥ जळी बुडाले दिसे व्योम । सत्य मानणे तो मूर्खधर्म । तैसे रूप नाम गुण कर्म । हा मिथ्या भ्रम मायिक ॥ ६३ ॥ प्रकृतिकाळीही जाण । सत्य नाही जीवपण । तेही अर्यांची निजखूण । उद्धया सपूर्ण अवधारीं ॥ ६४ ॥ स्वयें अवलोकिता देर्पण । दर्पणामाजी दिसे आपण । त्तरी आपुलें वेगळेपण । स्वयें आपण जाणिजे ॥ ६५ ॥ तेवी प्रकृतिकर्म करिता । जरी दिसे प्रकृतीआंतोता । तरी मी प्रकृतीपरता । जाण तत्त्वता उद्धवा ।। ६६ ॥ दिसे व्योम जळी बुडाले। परी ते नाही वोले झाले । तेवी प्रकृतिकर्म म्यां केले नाहीं भांखले ममाग ॥ ६७॥ यापरी करितां निर्वाहो । प्रकृतीचा झाला अभावो। तेव्हां जीवशिवनांवे वायो। जीव तोचि पहा हो परमात्मा ॥ ६८॥ जीवाचें गेलिया जीवपण । सहजेचि उडे शिवपण । दोघेही आत्मत्वे जाण । होती परिपूर्ण पूर्णत्वे ॥ ६९ ॥ जीवासी निजस्वरूपआठवो। या नांव जीवाचा परब्रहीं लयो । परमात्मा अज अव्ययो । अविनाश अद्वयो अनंत ॥ ५७० ॥ ब्रह्मी स्फुरेना ब्रह्मपण । तेथ 'मी तूं' ह्मणे कोण । परमानंद परिपूर्ण । उरे जाण उद्धवा ।। ७१ ॥ ऐसा परमानंद झणसी कोण । तो मी अज अव्यय श्रीकृष्ण । आनंदस्वरूप तो मी जाण । मजवेगळे स्थान असेना ॥७२॥ ज्या स्वानंदा नाव श्रीकृष्ण । ते तुझें स्वरूप उद्धवा जाण । तेथ नाहीं गा मीतूंपण । परम कारण उर्वरित ॥ ७३ ।। उद्धवा जीवाचा जीव मी श्रीकृष्ण । मज तुज नाहीं वेगळेपण । यालागी जीवाची हे निजखूण । परम कारण सांगीतले ।। ७४ ॥ जगाचा आत्मा श्रीकृष्ण । त्या माझा आत्मा तूं उद्धव पूर्ण । हे ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धय जाण गजवजिला ।। ७५॥ कृष्ण मज हाणे आपुला आत्मा । परी मी नेणे कृष्णमहिमा । अगाध लीला पुरुपोत्तमा । ते केवीं आह्मां आकळे ॥ ७६ ॥ नाथिलेचि उद्धवपण । माझ्या अगी जडले जाण । कृष्ण विवेक पाहता पूर्ण । माझें मीपण दिसेना ॥ ७७ ॥ मज उद्धवपण साडितां । कृष्ण निजधामा जाईल तत्त्वतां । ते न साहवे अवस्था । सखेदता सप्रेम ॥७८ ॥ हे उद्धवाची अवस्था । कळो सरली श्रीकृष्णनाथा । तेचि अर्थीची हे कथा । शब्दार्थता निरूपी ॥ ७९ ॥ एवमन्वीक्षमाणस्य कथ वैकल्पिको भ्रम । मनसो हदि निठेत योनीवार्कोदये तम ॥ २८ ॥ प्रकृतिपुरुपविवंचन । आदि मध्य अवसान । तुज म्यां दाविले एकपण । तेथ का भिन्नपण कल्पिसी वायां ।।।५८० ।। उत्पत्सिआदि ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीसी तेचि कारण । जग जन्मले जे सगुण । तेंही ब्रह्मरूपं जाण दाविले तुज ॥ ८१॥ आणि प्रळयाच्या अंती । ब्रह्मचि उरे निजस्थिती । तेही "विखीची प्रतीती। तुज म्या निश्चिती दाविली ॥८२॥ प्रकृतीहूनि पुरुप भिन्न । प्रकृति स्वातंत्र्य मिथ्या जाण । ऐसे प्रकृतिपुरुप ज्यासी १सर्ग जाण २ प्रकृतीचा विचार ३ आवडीने ४ प्रवत्तिकाळी ५ भारसा ६ मायेम ये ७ भरले ८ खोटी, प्या ९ अवशिष्ट, शिल्क १. आधारी. ११ गोंधळरा १२मायिक नसत १३ स्थिति १४ रोदयुक्त १५ लाही विषयाचा अनुभव