Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/676

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५६ एकनाथी भागवत. चिराण्मयाऽऽसायमानो लोककल्पविकल्पक । पञ्चस्वाय विशेषाय कापते भुवा' सह ॥२॥ " ', • चतुर्दशभुवनेंसी ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड । तें स्थितिकाळी पाळूनि अड । अंती नाशाचे बंड आदरी काळू ॥ १८ ॥ तो तूं काळ ह्मणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण । तेणे काळें म्यां प्रळयईक्षण । केले जाण सृष्टीसी ॥ १९ ॥ पंचभूतांचे भिन्न भाग। काळसत्ता राखिले विभाग । ते सत्ता म्या आवरितां सांग । खवळे लगेवग पंचत्वाची ॥ २० ॥ जैसा उत्पत्तीचा उपक्रम् । तैसाचि प्रळयाचा अनुक्रम् । भूती भूतलयो सुगम् । पुरुषोत्तमू सागत ॥२१॥ भन्ने प्रलीयते मर्यमनं धानासु लियते । धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥ २२ ॥ ' म्यां पाहिल्या प्रळयदृष्टी । पडोनि ठाके अनावृष्टी । तेणे अन्न क्षीण होय सृष्टी । अन्नापाठी शरीर ॥२२॥ येथ असे 'अन्नमय प्राण' । हे वचन प्रत्यक्ष प्रमाणात अन्न होतांचिक्षीण। अन्नासवे प्राण प्राण्यांचे जाती ॥ २३ ॥ अन्नवृद्धि खुंटल्या धान्य । वीजमात्र राहे आपण। तेही पृथ्वीसी होय लीन । तत्काळ जाण उद्धवा ॥ २४ ॥ तंव द्वादशादित्यमेळा । एकत्र होय रविमंडळा । तो पीठे करी पर्वतशिळा । तेही त॒णसाळा उरो नेदी ॥ २५ ॥ तेणें तापलें सप्तपाताळ । पोळले शेषाचे कपाळ । तो वमी विपाग्निकल्लोळ । महाज्वाळा धडधडीत ॥ २६ ॥ तो सकर्षणमुखानळ । पार्थिव जाळी सकळ । ब्रह्माड जाळोनि तत्काळ । पृथ्वी केवळ भस्म करी ॥ २७ ॥ तेव्हां पृथ्वीचे पृथ्वीपण सरे । तें गंधमात्रस्वरूपें उरे । तोही गंधू जळी विरे । तेचि शाधिरे सागिजे ॥२८॥ अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे । लीयते ज्योतिपि रसो ज्योती रूपे प्रलीयते ॥ २३ ॥ तेव्हां प्रळयमेघांचा मेळा । शुंडदिंडधारा प्रबळा। शत वरुपें वर्पता जळा । सशसमुद्रमेळा एकत्र जाहला ॥ २९ ॥ तेणे जळ कोडले सुबद्ध । ते जळी पृथ्वीचा विरे गंध। तेव्हा जळचि एकवद । प्रळयी प्रसिद्ध उधंवले पैं ॥ ५३० ॥ सावर्तक मेघाचे लक्षण । सिधु एकत्र करिती पूणे । पृथ्वी विरवूनिया जाण । ते जळी आपण विरोनि जाती ॥३॥ ते काळी अतिदुर्धर । सावर्ताग्नि खवळे थोर । तो जळ शोपी सर्वत्र । उरे रसमात्र अवशेप ॥ ३२ ॥ रसमात्र जळ उरे तेही । लीन होय तेजाचे ठायीं । तेव्हां तेजचि दिशा दाही । कोंदोनि पाहीं वोसडे ॥ ३३ ॥ सांवर्तकानीची मातू । जळ शोपूनि राहे निवातू। जाळिती शक्ति स्वयें जाळितू । या नाव निश्चितू सावर्तकानी ॥ ३४ ॥ तेणेचि काळे 'झंझामारुत । उठी तेजातें शोपित । तें तेज शोषितां समस्त । उरे तेय रूप मान ॥ ३५ ॥ रूप वायौ स च स्पो लीयते सोऽपि चाम्बरे । अन्दर शब्दतन्मान इन्द्रियाणि स्वयोनिषु ॥ २५ ॥ । तेजाचें में उरे रूप । ते वायु शोपूनि करी अरूप । तेव्हा वायूचि एकरूप । अतिअमूप कोंदाटे ॥ ३६॥ कोंदाटल्या वायूसी । गगन जेथीचे तेथे ग्रासी । तेव्हा वायू प्रवेशे स्पर्शी । तो उरे अवशेपी स्पर्शमात्र ॥ ३७॥ उरल्या वायूच्या स्पशासी । लयो तत्काळ १ सहार करण्याच्या इच्छेनें अवलोकन २ गडबड, गोंधळ ३ पाऊस न पडणे ४ अमावरोवर ५ भस्म ६ गवत, साध्ये, यगरेंरा, तृणशरा ७ पृथ्वीचा विकार ८ हत्तीच्या सोंडेसारख्या मुसळधारा ९एकपटरेल १० उसळलें, वर मार्ल, उररें ११ प्रलयकालच्या मेघाचे १२ प्रलयामि. १३ सोसाव्याचा वारा