पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/674

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५४ एकनाथी भागवत. अनेक । तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरूपीं ॥ ४७० ॥ जेवीं कां जळी क्रीडतां जळा । उपजवी तरगांच्या माळा । तेवीं वस्तूचिया स्वलीका । जगदादि मेळा प्रकाशे ॥७१॥ तरंगा आदिमध्यअवसानी । जेवीं पाणीपणे असे पाणी । तेवीं उत्पत्तिस्थितिनिदानीं । वस्तु वस्तूपणी अनश्वर ॥७२॥ ब्रह्म सत्य प्रपंच वायो । ही साधका साधाचया निर्वाहो । कार्यकारणअभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥ ७३ ॥ कार्य कारणी अभिन्न । तै ब्रह्मीं माया कैची भिन्न । जगद्रूपें ब्रह्म परिपूर्ण । अन्योपदेशे जाण दाविले ॥ ७४ ॥ ब्रह्म माया काळगती । ये तिन्ही अनादि ह्मणती । तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थी हरि बोले ॥ ७५॥ मकृतिहसोपादानमाधार पुरुष पर । सतोऽभिव्यक्षका कालो ब्रह्म तत्रितय स्वहम् ॥ १९॥ ।। । ब्रह्मावेगळी माया । सर्वथा न ये ऑया । ते ब्रह्माधारे वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥ ७६ ॥ मायानियंतें ब्रह्म आपण । यालागी थासी पुरुपपण । पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अर्भिधान या हेतू ॥ ७७ ॥ ब्रह्माहून पुरुप भिन्न । हे सर्वधा मिथ्या वचन। ब्रह्म पुरुप नामाभिधान । एकासीचि जाण आले असे ॥ ७८ ॥ माया प्रकृति अभिधान। दोही नावी मायाचि पूर्ण । आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ।। ७९ ॥ माया ब्रह्मीची शक्ति जाण । तेही ब्राँसी असे अभिन्न । वेगळी नव्हे 'अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेसी ॥ ४८० ॥ जेवीं शूराची शौर्यशक्ति पूर्ण । शूरांहोनि नव्हे भिन्न । तेवीं ब्रही मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ।। ८१॥ माया ब्रही असतां जाण । क्षोभ वीण नव्हे संर्जन । मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ।। ८२ ॥ प्रेमींची सत्ता तो काळ जाण । प्रकृति क्षोभवूनि आपण । दाधी उत्पत्ति स्थिति निदान। तो काळही अभिन्न ब्राँसी ॥ ८३ ॥ जेवी रायाच्या राजपुत्रासी । राजाचि दशके त्यासी । तेवीं झाले जे प्रकृतीचे कुशी । तें निजसत्तेसी निर्दळी ॥ ८४॥ विवेकदृष्टी पाहतां जाण । काळ परमात्मा दोन्ही अभिन्न । प्रकृति पुरुप काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥८५ ॥ ब्रह्म-माया-काळसबंध । हे तिनी मूळीचि अभेद । दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अवद्ध मिथ्यात्वे ॥ ८६ ॥ वस्तु एकलीचि आपण । प्रकृतिपुरुप काळरूपं जाण । अखंडत्वे दाविता पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ।। ८७ ॥ उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीचे मी वीज आदिकारण । स्थितिकाळी मी ब्रह्मरूप जाण । एकी अनेकपण स्वये दावीं ॥ ८८ ॥ स्वलीला सृष्टीचे प्रांती जाण । प्रळयी उरे मी ब्रह्म परिपूर्ण । तेचि अर्थाचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ८९ ॥ ___ सर्ग प्रवर्तते तावत्पी पर्येण निरयश । महान गुणविसर्गार्थ स्थिस्यन्तो यावदीक्षणम् ॥ २० ॥ महान मणिजे अतिथोरू । पितृपुत्रप्रवाहें ससारू । अनवैच्छिन्न निरतरू । अतिदुधेरू पाढला ॥ ४९० ॥ अतिशयेंसी दुर्धरू । कैसेनि बाढला ससारू । तेही अर्थीचा विचारू । शाङ्गेधरू सागत ॥ ९१ ॥ विपयोचिये आसक्ती । वासनानिष्ठ झाली वृत्ती । ते देहात्मता १ पक्कि २ लाटाच्या 'नम सल जगत् मिध्या' हा सिद्धात साधकास कळावा ह्मणून ४ युक्ति ५ आकाराला यत नाही, असूच शकत नाही ६ व ७ ब्रह्मात लान होऊा राहाणारी ८ चेतविल्यावाचून काळ गुणाचा क्षोभ करून भास्कायास व्यवस्व आणतो ९ सृष्टि, उत्पत्ति १० नहीं चित्सत्ता ११ नारा १२ खोटा १३ ब्रह्म. १४ शेवटी १५ भापरण्यासारखा अपरिमित १६ पासोच्या अधी.