पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/672

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५२ एकनाथी भागवत. नि हेतसी । भकिरहस्यासी बोलविले ॥ २४ ॥ जेवीं कां निजवाळकाते । माउली चोल बोलची त्यातें । तेवीं भक्तीने मज केले येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥ २५॥ माउलीचे लोभाळूपण । प्रकट करी तो मूर्ख जाण । याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥२६॥ उडिदी काळे जेथींच्या तेथें । तेवीं चुकलेपण माझे येथें । चुकीचि मानावी निश्चितें । हेही गुरुनाथें वारिलें ॥ २७ ॥ चुकलेपणचि मानितां । मी हो पाहें कवि कर्ता । मीपण नावडे गुरुनाथा । तेणे ते तत्त्वतां सांडविले ॥ २८ ॥ सागे झालिया कथाकथन । तेणे श्लोघे न घ्यावे मीपण । तंव गुरूंनी दावूनि निजखूण । मीतूंपण उडविले ॥ २९ ।। हेही हो बोल बोलता । मी नव्हे नव्हें गा सर्वथा । मी नन्हें कवि कर्ता । हें गुरूचे तत्त्वता गुरु जाणे ॥ ४३० ॥ तंव श्रोते ह्मणती चमत्कार । भक्तिसुखाचें सुखसार । भक्ति परमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥ ३१ ॥ भागवत मुख्य भक्तिप्रधान । जे भक्तीचें सुख सनातन । तें करतळामळ करूनि जाण । तुयां परिपूर्ण दाविलें ॥ ३२ ॥ तुवा हा थोर केला उपकार । तरावया स्त्रियादि शुद्र । जगव्हावया भजनतत्पर । भागपत निजसार काढिले ॥३॥ भागवती, गुप्त पीर्यख । तें त्वां प्रकटिले भक्तिसुख । तेणे सत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥ ३४ ॥ तुज संतोपोनि श्रीपती । दीधली आपली निजभकी । यालागी तुकां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थिती वर्णिली ।। ३५ ।। तुझे भक्तीचा एकेक बोल । ब्रह्मसुखेसी सखोलें। त्याहीमाजी प्रेमाची वोलें।येतात डोल चित्सुखें ॥३६॥ तुज वाखाणिता निजभक्ती । प्रेमें 'वोसडे चित्तवृत्ती । विसरोनिया ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥ ३७॥ निजआवडी वौडकोडें ।' वानिता भक्तीचे पवाडे । तुज नाठवे मार्गेपुढे । प्रेम गाडे जाणवले ॥ ३८ ॥ जंव जंव भक्तीचे निरूपण । अधिकाधिक वाढता जाण । तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे हाणेल ॥३९॥ व जंव निरूपणा वाढी । तंव तंव भक्तीची अधिक गोडी । तेणे श्रोत्याचीही आवडी । चडोवढी वाढली ॥४४॥ करितां भक्तिसुखनिरूपण । श्रोते वक्त लाचायले जाण । होतां अमृताचे आरोगण । पुरे कोण ह्मणों शके ॥४१॥ यापरी गा अतिप्रीती । वाढली निरूपणी भक्ती । ते आवरूनिया स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थी प्रवर्तत ॥४२॥ हे ऐकोनि सतवचन । केले साष्टांग नमन । भली दीधली आठवण । येरवी निरूपण नावरतें ॥४३ ।। 'भक्तियोगस्य मद्गती'। ये पदाची पदव्युत्पत्ती । निरूपिली भगवद्भक्ती । जेणे भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥४४॥ हे न करितां भगवद्भक्ती । त्रिगुणगुणी जीवपंक्ती । वाधिल्या ससारी उन्मजती । तेही स्थिती हरि सागे ॥ ४५ ॥ मया कालरात्मना धात्रा कर्मयुक्तमिद जगत् । गुणप्रवाह एतसिन्नन्मजति निमजति ॥ १५ ॥ मुख्य मूळी मी जगाचा धरिता । स्रष्टरूपें मीचि जिता । विष्णुरूपे मी प्रतिपाळिता । मीचि सहर्ता रुद्रूपें ॥४६॥ हे त्रिगुण काळाची काळसत्ता। तो मी निजकाळ तत्त्वता । सजिता पाळिता सहतो । गुणावस्थाविभाग ॥४७॥ जना, वासनाकर्म विचित्र । तेचि १ दोप, २ निवारण केले ३ सपूर्ण ४ अभिमानाने ५ भागवत अथात भक्ति मुख्यत्व प्रतिपादिली आहे६अनादि, शाश्वत ७ तळहातींच्या आवळ्याप्रमाणे सुगम ८ अमृत ९ गमीर १०जिव्हाळा, वेल ११ झोके. १२ भरून जात. १३ लडिवाळपणाने १४ पृद्धि, याउ १५ भोजन १६ जन्मती १७ उत्पन्न करणारा