Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/668

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४८ एकनाथी भागवत. ण त्याचे घरीं सायुज्य नांदे ॥ ३३० ॥ मीचि एक एकला । एकपणेंचि संचला । ज्यासी द्वैताचा दुकाळ पडिला । सत्य पावला सायुज्य ॥ ३१॥ एवं भावार्थाच्या अतिप्रीती । जें जें निजभक्त वांछिती । तें तें मी पुरवी श्रीपती । चारी मुक्ती भक्तांसी ॥३२॥ यावेगळे माझे प्रिय भक्त । भक्तिप्रतापे प्रतापवंत । भजनशौर्य अतिअद्भुत । निष्काम,निरत मभजनीं ।। ३३ ।। आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या कल्पना न धरोनि हातीं । नित्य निष्काम अतिप्रीती । मज भजती महाभाग ॥ ३४ ॥ नेघे सालोक्य सामीप्य सरूपता । शेखी न मागती सायुज्यता । निष्काम भजती भगवंता । भक्ति तत्त्वतां या नांव ॥ ३५ ॥ नवल भजनाची परवडी । आवडीते प्रसवे आवडी । क्षणोक्षण चढोवढी । नित्य नूतन गोडी प्रेमाची ॥ ३६ ॥ माझिया आवडी तत्त्वता । सर्वस्वे वेचित जीविता । कदा पालट नव्हे चित्ता । भावार्थता विश्वासी ॥ ३७ ॥ मीच एक देवाधिदेवो । सर्वभूती माझाचि भावो । विकल्प विकृति सदेहो । घालितां पहा हो उपजेना ॥ ३८ ॥ नवल भावार्थाची थोरी । मद्भावे देखे नरनारी । श्वानसूकरादि आकारी । नमस्कारी मद्भावे ॥ ३९ ॥ नवल त्याची भजनख्याती । सायुज्यतादि चारी मुक्ती माझ्या नांवावरूनि ओवाळिती । भक्ति पढियंती येणे पाडें ॥ ३४० ॥ मांडल्या अतिविघ्न साकडें । ग्लानी न करिती आणिकाकडे । जाणती रामनामापुढें । विघ्न वापुढे ते कायी ॥४१॥ गगन पड़ों पाहे कडाडें । पृथ्वी उलथावया गडबडे । ऐसे मांडलिया सांकडें । नाम पढे श्रीहरीचें ॥ ४२ ॥ ऐशी देखोनि अन्यय प्रीती । मी सर्वस्वे भुललो श्रीपती । मग न पाहता कुळ जाती । त्याच्या घराप्रती मी धांवे ॥४३॥ ते न घेती वैकुंठींची वाट । त्याचें घरचि भी करी वैकुंठ । तेथे चिन्मा. ने फुटे पाहाट । पिके पेंठ सताची ।। ४४ ॥ उपनिपदें येती तयांपाशी । स्वधर्म ये सुखवस्तीसी । नारदादि सनकादिकासीं । तया घरासी अतिप्रीती ॥ ४५ ॥ गर्जती नामाचे प्रवाडे । माझी कीर्ति गाती वाकोडें । माझ्या रामनामापुढें । इदाचे उडे वाधकत्व ॥४६॥ ऐशी देखोनि माझी भक्ती । वोरसोनिया निजशाती। धायोनि ये तयाप्रती । घोळेली मागुती जावों विसरे ॥ ४७ ॥ त्यासी छळो ये जे जे दूपण । ते ते त्यासी होय भूपण | माझे भक्तीचे प्रसन्नपण । जाण सपूर्ण या नांव ॥४८॥ तेय सायुज्यादि चारी मुक्ती । त्याचे सेवेसी स्वयें येती । ते जेथ विषय सेवू जाती । तेथ सायुज्यमुक्ती सेवा करी ॥४९॥ ऋद्धिसिद्धि त्याच्या घरी । होऊनि राहती कामारी । तरी तो सिद्धींची चाड न धरी । माझे भकीवरी निश्चयो ॥ ३५० ॥ ऐशी देखोनि निश्चयें भक्ती । मीही करी अनन्य प्रीती । भक्त जेउती वास पाहती। तेउता मी श्रीपति स्वयें प्रकटें ॥५१॥ भक्त स्वभावें पोलों जाये। त्याचे बोलणे मीचि होयें । त्याचे बोलण्या सवाों। मीचि राहें शब्दार्थं ॥५२॥ तो कौतुर्के खेळे खडे । ते खडेचि मज होणे घडे । तो कृपाळु पाहे जयाकडे । त्याचे छेदी मी गाढे भववध ॥ ५३॥ तो वास पाहे जेणे मोहरी । तेउती मी सुखाची सृष्टी करी । तो ह्मणे जयातें उद्धरी । तो मी स्वपदावरी बैसवीं ।। ५४ ॥ त्यासी अल्पही विचं→ पावे । तो सांगें मी करूं धांवें । त्याचें नाम जिहीं स्मरावें । त्यासी . पुण्यात जीव २ ज्ञानरलेचा उदय होतो ३ स्नेहाचा पाहा फटन ४ एकदा भाल्यावर प्रेमबद्ध होत ५ दासी जिस समवपारा ८ज्या मागांकदे. मोदर खणजे मार्ग... ९ संकट हा शब्द मागे २३-३९८ मध्य पहा