पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/664

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४४ एकनाथी भागवत. लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ३२ ॥ सकळ ब्रह्मांडावाहेरी । मायाआवरणाभीतरीं । वैकुंठ कैलास हरहरी । स्वलीलेकरी निर्मिजे ॥ ३३ ॥ सकळ जीवां सुखकरू । कैलासी वसे शंकरू । जो का पार्वतीपरमेश्वरू । जो योगेश्वरू योगियां ॥३४॥ जटाजूटी गंगाधर । पिनाकपाणी पंचवक्त्र । कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥ ३५ ॥ निमात्रातीत व्यंवक । त्रिपुटी त्रिपुर त्रिपुरांतक । त्रिविधतापउच्छेदक।तिनीलोकसुखकारी ॥ ३६ ॥ नागभूपणी शोभे लीला । रुद्राक्षयुक्त रुंडमाळा । नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोलूलिधूसर ॥ ३७ ॥ त्रिशूळंडमरांकितकर । त्रिनेत्र व्याघ्राजिन अंवर । रामनामी अतितत्पर । करी निरतर जपमाळा ॥ ३८ ॥ सहस्रबाहु वळिपुत्र वाण । श्रंगी भंगी चंडी पार्षद पूर्ण । साठी सहस्र रुद्रगण । काठ्या त्रिशूळ जाण झेलिती ॥ ३९ ॥ गणेश स्वामिकार्तिक । नंदी पंचमुख पण्मुख । वीरभद्र सेनानायक । जेणे लाविली सीक दक्षासी ॥ २४० ॥ भूत प्रेत पिशाचक । महाप्रमथ ज्याचे सैन्यक । अवघे शिवांकित देख । शिव• नामें घोप गर्जती ॥ ४१ ॥ शंभु शिव शूली शंकर । उमाकांत कर्पूरगौर । भव भैर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥ ४२ ॥ हरहरशंकरनामोच्चारी । धार्के कळिकाळ पळे दूरी । शिवनामें गर्जे सदा गिरी" । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥४३॥ जेथ शिवनामाचा उच्चार । तेथ सुखेंसी तिष्ठे शंकर । भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्या ॥४४ ॥ निजदासाचे त्रिगुण वैरी । छेदावया सदा त्रिशूळ करीं । निजडमरूच्या गजरी । पापाची उरी उरों नेदी ॥४५॥ कैलासी तृण तरु समस्त । पशु पक्षी जे जे तेथ । ते अवघेचि शिवाकित । सर्वरूपें समस्त शिबू नादे ॥ ४६ ॥ यापरी ब्रह्माडाबाहेरी । शिवू स्वलीला निर्माण करी । नेमूनिया कैलासगिरी । भैचू राज्य करी भवानीशी ॥४७॥आता वैकुंठीची स्थिती । ऐक सागेन तुजप्रती । जे ऐकता चित्तचित्तीं । स्वानंदस्फूर्ति वोसडे ॥ ४८ ॥ ऊस गाळूनि काढिजे सार । त्याची आळूनि कीजे साकर । तिचेही नाना प्रकार । करिती नानाकार अतिकुशळ ॥ ४९ ॥ तेवीं चैतन्यचिनिश्चितें । मुसावूनि श्रीभगवंतें । वैकुंठ रचिलें तेथे । निजसामर्थ्य नादावया ॥ २५० ॥ स्वलीला सगुण साकार । सुकुमार अतिसुंदर । घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥५१॥ शंख चक पद्म गदा । चारी भुजा सायुधा । डोळे लाचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥ ५२ ॥ मुकुट कुंडले मेखळा । कासे पिवळा सोनसळा । कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥५३॥ चरणींची गंगा अतिपुनीत । जे जगाते पवित्र करित । ते माथां वाहे उमाकात । निजस्वार्थ देखोनी ॥ ५४ ॥ त्या श्रीहरीचे पदद्वंद्वै । यानिता मुका झाला वेद । अगम्य हरी, निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥ ५५॥ पाहता मुकुंदाचे श्रीमुख । फिक झाले जी पीयूख । डोळ्या झाले परम सुख । धन्य श्रीमुख हरीचे॥५६॥ ज्याचे निर्मपाध १पिनाक नावाच धनुष्य आहे हातात ज्याच्या असा २ पाच मराचा ३ अकार, उकार, मकार या तीन मानाच्या पलोपडचा ४तीन रोकाना सख देणारा ५ मनुष्याच्या शिराच्या माळा भस्मरेपनाच्या योगान मालन दिसणारा निमालय टमरू ज्यांच्या हातात आहेत असा ८ शिक्षा ९ शर्व १० गौरी ११ भक्तास १२ वाका १३ शभु. १४ चित्तप्रकृती १५ भाटवन १६ मुशीत घालन १७ पिवळा पीतावर १८ दोनी पाय १९ अमृत २० निामपन टोम्पाची पापणी लवण्यास जितका वेळ लागतो ते निमिप