Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/654

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

17 एकनाथी भागवत. __.. " : : अध्यायं चोविसावा... ! ; श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐ नमो जी गुणातीता । व्यक्तिरहिता अव्यक्ता । तुजमाजी नाही द्वैतकथा । अद्वैततारहिवासी ॥१॥ तुझा अद्वैत निजनिर्वाहो । तेथ नाहीं देवी देवो । उदयअस्तांचा अभावो । रविचंद्रांसी ठावो असेना ॥२॥ तेथ सशब्द हारपला वेदू । वुद्धीसी मिथ्या बोधू । तिळभरी नाही भेदू । अद्वयानंदू एकला ॥ ३ ॥ ऐशिया अद्वैतपणी । प्रकृतिपुरुपाची कहाणी । सांगिजे केवळ अज्ञानी । ज्ञातेपणीं चातुर्ये ॥४॥ जेथ मीतूंपणा नाही ठावो । तेथ प्रकृतिपुरुषां केवी निर्वाहो । ज्याचा नाहीं गर्भसंभयो । त्याचें जातकै पहा वो वर्तविती ॥५॥ जे जन्मलेंचि नाही । त्याचे श्राद्ध करावे. कायी । हे ज्ञात्यासी पुसता पाहीं । ठेवितां ठायीं तुकेना ॥६॥ वांझेच्या पुत्रांचा विवाहो। समारभ चला पहा हो । नेणा साच जाणा चावो । तैसा निर्वाहो प्रकृतिपुरुषां ॥७॥ ऐसे नसतेचि नाथिलें । साचाचे परी नांदविले । एकी अनेकत्व दाविले । एकपण संचलें, न मोडतां ॥ ८॥ ऐसा एकपणे एकुलता । तोचि आपण आपली झाला कांता । आपुले कातेचा आपण भर्ता । अतिलाघवता अतयं ॥ ९ ॥ जेवीं अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेवीं प्रकृति पुरुष ससारी । एकाकारी नांदत ॥ १०॥ तो पुरुष ते पतिव्रता । दोघां अनन्य प्रीति एकात्मता । येरयेरां वेगळीकता। पाऊल सर्वथा न घालिती ॥११॥ दोघां एकत्र सदा असणे । दोघांसी एकचि नेसणे । दोघां एके सत्ता वैसणें । दोघे एकचि प्राणे वर्तती ।। १२ ।। दोघां एकचि देखणे । दोघां एकचि चाखणें । दोघां एकचि बोलणे । दोघा करणे एकचि ॥१३॥ कैशी दोघां प्रीति अलौलिक । येरयेरावीण न घेती विख । येरयेरांवीण न चाखिती उदक । येरयेरेवीण देख आंधळी ॥ १४ ॥ नवल वाइलेचे करणे । नपुंसका पुरुपत्व इणे देणें । 'मग तिचेनि अधीनपणे । पुरु नादणे सर्वदा ॥ १५॥ मग हा तिचेनि डोळां देखे । मग हा तिचेनि बोले मुखें । तिचेनि भोगी हा सुखदुःखें । वधमोक्ष चाखे तिचेनि ॥ १६ ॥ तिचेनि ह्मणवी मी ब्रह्म । तिचेनि करी हा कर्माकर्म । तिचेनि भोगी हा मरणजन्म । धर्माधर्मविभागें ॥ १७ ॥ तिचेनि यासी पाप-घडे । तिचेनि यासी पुण्य जोडे । तिचेनि हा महत्त्वा चढे । तिचेनि पडे अधःपाती ॥ १८ ॥ एथवरी अतिप्रीती । वाढविली निजप्रकृती । प्रकृति पातिव्रत्यस्थिती । वश्य निजपति तियें केला ॥ १९ ॥ नवल दोघांची सोयरिकी । दोघी भावंडे होती सखी । तो चाप ते त्याची लेकी । पाहता विवेकी तो पुत्र तिची । २०॥ यापरी अगम्यागमन । तिही दोषी करूनि जाण । वाढविले अनेक जन । तिसरेपण नातळता ॥ २१ ॥ ऐसा अव्यभिचारी व्यभिचारू । करूनि वाढविला ससारू । तो अतिअतक्ये अगोचरू। अगम्य दुर्धरू शिवादिका ।।-२२ ॥ हा-निजशक्तिप्रकृतिमेलें । भोगी शिवत्वाचे सोहळे । L १शदाराइ २ थाती ३जमपनिमा ४ व्यर्थ ५ खोट, मिथ्या ६ पणवान व्यापून राहिले ५शकराच्या ठायीं ८ पयमापाचून ९ नरकात १० आप्तपण ११ पापमुलक सयोग १२ मुक्ताबाईचं पुढील पद चिंतनीय आहे " बा' मी परी झालेंपदर माध्याचा विसरलें ॥१॥ माझा भ्रतार मज व्याला । तो म्या प्रातान दादला क्ला ॥ २ ॥ भागा यात्रा का लाला। नित्य भागिरी तयाला ॥३॥ऐशी मक्ताई झाली वेसी । फेदी अपचलगह ॥ ४ ॥