Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/652

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत सादर ॥ ६३ ॥ साक्षेपें निग्रहनि मनासी । जो सांडवी मनोजन्य भेदासी । शांति सांडूं नेणे त्यासी । जेवी तान्हयासी माउली ॥ ६४ ॥ निजशांति वाणल्या शुद्ध । त्यासी न वाधी कोणी द्वंद्व । हाचि योगैसंग्रहो प्रसिद्ध । बोलिले सिद्ध महायोगी ।। ६५ ॥ साडूनि संसारस्फूर्ती । चित्स्वरूपी जडे वृत्ती । जीव शिव एकत्वा येती । योगसग्रहस्थिति या नांव ॥६६॥ ऐशिया योगसग्रहशांती । साधका द्वंद्वे न वाधिती । हे असो जया भिक्षुगीतभकी । इंद्वनिर्मुक्ति तया लाभे ॥ ६७॥ य एता मिक्षुणा गीता ब्रह्मनिष्ठा समाहित । धारयन् प्रावयन् शृण्वन् द्वन्द्वैननाभिभूयते ॥ १२ ॥ इति श्रीभागवत महापुराणे भगवदुदयसवादे त्रयोविशोऽध्यायः ॥ २३ ॥ साधावया शांतीची प्राप्ती । कोटिसाधनें न लभे शांती । हा भिक्षुगीतार्थ धरितां चित्तीं । शांति आपैती साधका ॥ ६८ ॥ योगनिष्ठा ब्रह्मज्ञान । ते हे भिक्षुगीतानिरूपण । ज़ो हृदयीं धरी सावधान । शाति आर्दैण तयाची ॥ ६९ ॥ ये 'भिक्षुगीतेचा गीता) । जो जीवीं धरी समाहितू । त्यासी द्वंद्वांचा न वाधी घातू । अतिशांतू निजवोधे ।। ९७०॥ भिक्षुगीतार्थे समाधान । हे सांगता नवल कोण । जो सादरें करी श्रवण । त्यासी द्वंद्वे जाण न बाधिती ।। ७१॥ परदेशा गेला बहुकाळ भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके काता । तैशिया अतिएकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ।। ७२ ॥ निघोनि गेलिया पुत्रासी । त्याची शुद्धि ये मातेपाशीं । ऐकोनिया उणस्तुणेसी । चरफडी जैसी 'विव्हळ ॥ ७३ ॥-तीजवळ ज्या सोया असती । त्याही स्नेहें कळवळती । परी माता जैसी तळमळी चित्ती । ते आणिकाप्रती असेना ॥ ७४ ॥ तैसे भिक्षुगीताश्रवण । करितां द्रवे ज्याचें मन । जो सात्त्विके वोसडे पूर्ण । तो इद्धांसी जाणं नाटोपे ॥ ७५ ।। असो नव्हे सादरेंश्रवण । तरी करिता याचे नित्य पठण । भिक्षुगीताप्रतापेंकरून । द्वंद्व जाण नातळती ॥७६॥ पडतां पंचाननांची घाणी । मदगजां होय महापळणी। तेवी भिक्षुगीतापठणीं । होय भंगणी द्वंद्वाची ॥७७ ॥ निर्लोभ होऊनि मानसी । बैसोनि साधुसज्जनापाशीं । जो निरूपी भिक्षुगीतेसी । द्वंद्व त्यासी नातळती ॥ ७८ ॥ अथै पाठे श्रवण करिता । इंद्रे निवारी भिक्षुगीता । हे वर्म कळलेसे श्रीकृष्णनाथा । तो सांगे हितार्था उद्धवा ॥ ७९ ॥ ज्या भिक्षुगीतेची फळश्रुती । स्वमुखें सागताहे श्रीपती । त्या भिक्षुचे भाग्य वायूँ किती। धन्य त्रिजगतीं तो एक ॥ ९८०॥ विवेकवैराग्यसमरसीं । जो साहे अतिद्वंद्वांसी । तोचि पढियंता हुपीकेशी । हे उद्धवासी दाविलें ॥ ८१॥ जगासी उद्धवाचा उपाकार । गुह्य ज्ञान परात्पर । उघडूनि श्रीकृष्णे भांडार । भिक्षुगीतासार प्रकटिलें ॥ ८२ ॥ उद्धव न पुसता जे शाती । तें है का सांगता श्रीपती । कृष्णासी उद्धचाची प्रीती । त्यासी नाना उपपत्ती उपदेशी ॥ ८३ ॥ हेंचि जडजीवा उद्धरण । येणे उपाय तरती दीन । जग तारावया जगज्जीवन । उद्धवमिपं श्रीकृष्ण बोलिला ॥८४॥ श्रीकृष्ण वोलिला भिक्षुगीत । जे वेदशा १ निमहान २ सिद्धयोग ह्मणतात तो हाच ३ सहज प्राप्त होते ४ दासी ५ खस्थचित्ताने ६ मोठ्या उत्सुकतेन ७ निघून जाण्याचा हेतु ८ नातलग ९ सिंहाच्या अगाची घाण झणजे दर्प येताच मदोन्मत्त हत्तो भेदरून पळून जातात, याप्रमाणे मिभुगीत गाऊ लागल्यास अहकार, भेद, आणि द्वि मावळून जातात १० विवेक व वैराग्य अगी जडत्यान मुगद्दादि कशी सहन करितां येतास रंभिक्षुगीताची कहाणी सागते ११ युतिप्रयुक्तीन