Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/651

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेविसावा, घावो । पुरुषासी नाही भय संदेहो । तेवीं दुर्जनी दडितां देहो । नाहीं दुःखभेवो निरहंकारा ॥ ४२ ॥ देहासी होता नाना व्यथा । आपुली जे देहातीतता । तेचि भिक्षुने गायिली गाथा । ते तुज म्यां आता निरूपिली ॥४३॥ येथ सुखदुःखासी कारण । आपला भ्रम आपणा जाण । येचि अर्थीचे निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥४४॥ सुखदुः मप्रदो मान्य पुरपसारमविभ्रम । मित्रोदामीनरिपच ससारस्तमस कृत ॥ ६॥ आविद्यक जे निजअज्ञान । तेथें मनपणे उठी मन । मनें भेद करूनिया पूर्ण । सुखदुम्से जाण भोगवी ॥ ४५ ॥ आत्मा केवळ भेदशून्य । तेथ शत्रु मित्र उदासीन । भने कल्पूनिया जाण । मन सपूर्ण स्वयें चाळी ॥ ४६॥ ऐसे भेदी ठसावले मन । तेंचि पुरुषाचे अज्ञान । तेणें द्वंद्वदुःसेंसी जाण । ससार दारुण संभ्राता॥४७॥ मन सुखदुःखासी कारण । मनःकल्पित ससार जाण । त्या मनाचे निग्रहण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥४८॥ तसात्सर्यात्मना तात निगृहाण मनो धिया । मच्यावेशितया युक्त एताचान् योगममह ॥ ६ ॥ जो नासू पाहे संसारदुःख । तेणे मन नेमाँबे आवश्यक । मनावेगळे दुखदायक । नाही आणिक त्रिलोकी ।। ४९ ।। मन अतिशयें चंचळ । तें सहसा नव्हे निश्चळ । त्यासी विवेक धावा मोकळ । अभेदशील अहर्निशीं ॥ ९५० ॥ मन सिंतरील विवेकासी । यालागी हातकडिया दोहीसी । करूनिया अहर्निशीं । येरयेरापाशी राखावी ॥५१॥ मन जेथ विकल्पंधावे । तेथ महामारी विवेकू पाये । मन जेध अधर्म सभवे । तेथ विवेक धावे हाकित ॥ ५२ ॥ मन जाय कामक्रोधापाशीं । विवेक ओढी धरोनि केशी । मन रिघता निदेपाशी । विवेक त्यासी बुकाली ॥२३॥ मन ह्मणे विपय सुटी । विवेक हाणे वैराग्यकाठी । मन धावता कल्पनेपाठीं । विवेक उठाउठौं झोटोळी ।। ५४ ॥ परदारा परधन । अभिलापू धावे मन । तेथ विवेक पावोन । रणकंदन आरभी॥ ५५ ॥ ऐसा मनाविवेकाचा झगडा । गा-हाणे आले सद्गुरूपुढा । तेणे करावया निवाडा । अद्वैतवाँडा कोडिली ।। ५६ ॥ तो दृष्टी देखताचि डावो । मनाचा मोडला स्वभावो । देहींचा साडोनि अहभावो । विवेकेंसी पहा हो ऐक्य केले ॥ ५७ ॥ तेथ मनाचे गेले मनपण । विवेक विसरला आळण । जीवाचें विराले जीवपण । वस्तु सपूर्ण अद्वय ।। ५८ ॥ जेवीं सुवर्णाची नागभूषणे । फडा पुच्छ मिरवी नागपणे । तें न मोडिता नागत्वाचे लेणे । सोने सोनेपणे नागत्व विसरे ॥ ५९ ॥ तेवीं जाणोनि वस्तु पूर्ण । न मोडिता जग जाण । जीव विसरला जीवपण । मनत्वा मन मूकले ॥ ९६० ॥ ऐशिया विवेकयुक्ती जाण । माझे स्वरूपी प्रवेशे मन । जेय मनपणे नुठी मन । मनोनिग्रहण या नाव ।। ६१ ।। ऐक चतुरचित्तचिंतामणी। विवेकचक्रवर्तिचूडामणी । उद्धवा भक्तशिरोमणी । मनोनिहणी प्रवर्त ॥ ६२ ॥ आवडी भुलला कृष्णनाथ । तो उद्धवासी मणे तौत । मनोनिग्रही 'तूं एथ । होई साक्षेपयुक्त ११दु साचं भय २ घर प्रेम उपलक्षण स्वये चाळी. ३ दृढ झाले ४ अनिधयी ५ शत्रु, मिन, उदासीन, हा सारा संसार केवळ अज्ञानाने मनाचा रचिटेला खेळ होय, वास्तव नव्हे ६ नियमन, ताब्यात राखणे ७ जिंकावे, साधीन देवाय ८ मनावरोयर विवेक मोकळा सोडावा मागे अ० २. ओं० २१. पहा : मन विवेकाला चुकवून जाईल ह्मणून मन आणि विवेक याना हातबेध्यानी एकन बाधाये १० मनाला जबर ठोक देणारा ११ ठोसे मारतो १२ केक पकन भोहितो १३ अद्वैताच्या वाड्यात साना कोंडून ठेविली १४ मनाला आवरण्याची क्रिया मुद्धा विक विसरला १५ सर्पाकार मुवर्णाचे अलकार १६ अलकार १५ मनपणाला १८ प्रवृत्त हो, १९ बाबा