पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/647

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेनिसावा. ६२७ धाडी । निमाळि पाडी धवळारें ॥ ४९ ॥ बैसवूनि सातवाकडी । असंडधारा डोळा नुघडी । जीवमात्रा तेणे पीडी। पडे साकडी अन्नाची ॥ ८५० ॥ अन्नाचिया चिंडाणीं । पीडती पशुपक्षिप्राणी । ते काळी सुसदुःख न मानी कोणी । दुःखदाता जनीं निजकाळू ॥५१॥ अतिताप अतिशीत । सोडूनिया अतिवात । काळ जगाते खात । जग कापत काळासी ॥ ५२ ॥ ऐकोनि काळाची गोठी । देव कांपती उठाउठी । इतराची कायसी गोठी । धाके पोटी विधाता ॥ ५३॥ अतिवृष्टि अनावृष्टी । जैन पीडी नाना संकटी। शेसी पळयो करी उठाउठी। दुःखदाता सृष्टी महाकाळ ॥५४॥ऐसे बोलती ज्ञाते लोक । ते ज्ञातेपणे झाले मूर्ख । काळ तोचि ईश्वरू देखे । सुखदायक सांसी ॥ ५५ ॥ ईश्वराहूनि काळ भिन्न । झणे तो जड मूढ अज्ञान । काळ तोचि ईश्वर जाण । कृपालु पूर्ण विश्वात्मा ॥५६॥ काळ स्वकाळी वर्षोनि जीवन । सुखी करी सतप्त जन । पृथ्वी निव. चूनिया जाण । नव धान्य वाफवी ॥ ५७ ॥ ते काळी जे शीत न वाहे। ते वाफिले धान्य राख होये । तेव्हा शीतकण वर्षानि पाहें । करी लवलाहें सफळित धान्ये ॥ ५८ ॥ती आर्द्र धान्य भूतासी । उपेगा न येती समहासी । यालागी उष्ण काळेंसीं । काळ शोपी आर्द्रता ॥ ५९ ॥ यापरी शीतोष्णपर्जन्यासी । काळ उत्पादी भूतहितासी । तेचि कठिण वाटे त्यासी । देहभ्रमासी भुलोनी ॥ ८६० ॥ हिरोनि अतिजीर्ण वस्त्रासी । नवीं नेसवी जो साक्षेपेसी । ऐशिया हितकारिया काळासी । वैरी पिशी" ह्मणताती ॥ ६१॥ तेनी जराजर्जरित विकळ । तें देह निर्दळी सकाळं काळ। आणिक नवे दे तत्काळ । ऐसा कृपाळू काळ जनासी ॥ ६२ ॥ जुनें घेऊनि दे नव्यासी । ऐशा उपकारिया काळासी । अपकारी ह्मणती पिशीं । देहमोहेंसी 'लोमिटे ॥ १३ ॥ जन जैशिया निजभावना । जे जे धरी दृढ वासना । काळ कृपाळू तत्क्षणा । ते ते देह जाणा त्या देत ॥ ६४ ॥ महामहोत्साहें पिता पुत्रासी । साडवूनि जीर्ण वासासी । नवी वस्त्रे दे तयासी । तेवीं जगासी मळयकाळ ॥६५॥ तेवीं प्रळयकाळी जगासी । काळ जीर्ण देह नाशी । मग नूतन देह सर्वांसी। अतिकृसी गौरवी ।। ६६ ॥ यापरी काळ कृपालू । त्यामी वैरी झणे जन चर। जगाचा निजात्मा स्वयें कालू । तो दुःखाचा सलू कोणासी नेदी ।। ६७ ॥ जनाचा देहीं दृढ भावो । भावनानुसार काळ पहा हो । देहापाठी उपजवी देहो । जन्ममरणनिर्वाहो तेणें चाहे ॥ ६८ ॥ जो साचार बाछी विदेहभावो । त्याचा काळ निर्दळी अहंभावो। निजानम्र निवडूनि स्वयमेवो । जन्ममरणाचा ठावो विभाडी ॥ ६९ ॥ जैशी ज्यासी होय बुद्धी । काळ तैसी दे त्यासी सिद्धी। हें नेणिजे देहमोहाधी । काळ त्रिशुद्धी कृपाळ ॥ ८७० ॥ काळ तोचि निजात्मा जनीं। ऐसे जाणे जो निजज्ञानी । ते कोणाचे दुस कोण का मानी। दुसरें कोणी असेना ॥७१।। मी एक एयें दु.खदाता। पैले तो एक , निमाळिके लणजे तीनमजली व धवळारे झणजे चुनेगची वाडे "तरी निमाळिक धवळार । पराची का"-ज्ञाश्रिरी अध्याय ५-११४, २ एकसारखें पावसाचें सातेरै असून होणारी अति घृष्टी ३ वाणीने ४ जना पाडी ५ आपण ६ कालोऽस्मि लोकक्षयकृत् गीता अध्याय ११३२ ७ पेरिवतो ८ दवाचे तुपार ९ ओली १० जुनी धने घेऊन मोठ्या काळजीन नवीं देतो, झणजे जीर्ण देहापासून जीवाला सोडवन नवीन देहात घालनो ११ पेडी १२ योग्यशाली १३ लोमी १४ वस्त्राना १५ घडवड्या, मूख १६ छळ १५ निर्वाहो-व्यवस्था १८ जो मनापासून विदेहस्थितीची इच्छा परितो १९ नाहीमा करितो. २० पलीकडे