पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/640

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२२ एकनाथी भागवत. ऐसेनि परिपक्क विश्वासी । येऊनि सद्गुरुचरणांपाशी । तनु मन धन सर्वस्वेसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥ पूर्ण विश्वासाचे लक्षण । होतां गुरुवाक्यश्रवण । परिसीं लोह पालटे जाण । तैसे अतःकरण पालटे ॥ ४३ ॥ गुरुवचन सागोन राहे । परी मनींचे मनन न राहे । कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासे ॥ ४४ ॥ तेव्हां कमनीय कामिनी धन । तें देखे विष्ठेसमान । निंदा द्वेप मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशी ॥४५॥ धन्य धन्य मनाची मैत्री विश्वास धरोनि निर्धारी । जन्ममरण जीवे मारी । जीवातें करी अजरामर ॥४६॥ ऐसी मनाशी करिता मैत्री । मन परम उपकारी। जीवातें धरूनि निजकरी । स्वानंदसागरी वुडी दे ॥४७॥ तेथ मनाचे मनपण सरे । जीवाचे जीवपण विरे । बंधमोक्षांची धाव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥४८॥ मनाचे मित्रत्व यापरी । आपुले कुळ स्वयें सहारी । आपणही मरे मित्रोपकारी । मन मित्रोचारी अवंचक ॥ ४९ ॥ ऐसे मैत्रीसी मन सादर । जवळी असतां निरतर । त्यात वोसडूनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ॥ वैर करोनि मनचि मारावे । मित्रत्वे मनें मन साधावे । इये दोनी जैन सभवे । तै उपेक्षावे मनातें ॥ ५१ ॥ मन ह्मणेल तें न करावे । मनाते हाती न धरावे । मनाते काही नातळावे । जीवेभावे निःशेप ॥५२॥ मन ह्मणेल जे सुख । तें सांडावे आवश्यक । मन ह्मणेल जे दुःख । तेही निःशेख त्यजावे ॥ ५३ ॥ ऐसे उदास मन देख । जो करी आवश्यक । तरी तो झाला अमनस्क । शांति अलोलिक ते ठायीं ॥ ५४॥ शत्रु मित्र उदासीन । करूनि वश्य न करी मन । जो धरी देहाभिमान । त्याचे भवभ्रमण सरेना ॥ ५५ ॥ देह मनोमात्रमिम गृहीत्वा ममाहमिस्यन्धधियो मनुप्या । एषोऽहमन्योऽयमिति मेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥५०॥ आत्मा विदेही चिद्धने । तेथ मी देही हे मानी मन । त्या देहासवे मीमाझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥ ५६ ॥ आत्मा नित्यमुक्त विदेही । तो मनाची एकात्मता पाही । विदेही तो ह्मणवी देही। शेखी देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७ ॥ मी देह हे मानी मन। तेणे दृढ होय देहाभिमान । तेव्हा देहचि होय आपण । मीमाझेपण ते ठायीं ।। ५८ ॥ मी सच्चिदानंद परिपूर्ण । हे आपले विसरे आपण । मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूर्ख सज्ञान मी एक ॥ ५९ ॥ मी रोडका बोडका कुन काण ! मी धाटा मोटा विचक्षण । हे नाथिले घेऊनि देहगुण । माणुसपण स्वयें मिरवी ॥ ७६० ॥ स्वमामाजी सन्यासी । आपणा देखे अत्यजबंशी । तो आतळो भी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ ६१ ॥ स्वयें परमात्मा भेदशून्य । तेथ मी माझे स्त्री पुत्र धन । स्वजन दुर्जन उदासीन। त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वें मानी ॥ १२॥ ऐसी देहात्मभावसिद्धी । सत्य मानितां भेदविधी । जीवाची निजात्मवुद्धी । झाली त्रिशुद्धी आधळी ॥ ६३ ॥ जैसा स्वप्नीचा मिथ्या वेव्हार । तैसा मन कल्पित ससार, गित च । देहअहंकार दृढ झाला लोसह परिसाला लागलें झणजे सोने १३ म५ ओसरून जातं ५ मैनीत परावाफसवी न करणारे ६ टाकून ७ मन - १. धीट ११ मिथ्या, मिलेटे १२ शियायला मिती १३ भेदप्रकार.