पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/636

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. समाहिसं यस्य मन प्रशान्त दानादिभि कि पद सस्य कृस्यम् । भमयत यस्य मो विनश्यहानादिभिश्वेवपर किमेमि ॥ ५७ ॥ : जेथ ज्या पुरुषांचें मन । ठाकी आपुलें जन्मस्थान । त्यासी दानादिकांचे कोण । प्रयो. जन साधनीं ॥ ६५० ॥ पूर्णतृप्तापाशी जाण । ओगरलिया सदन्न । तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवी साधन अमनस्का ॥५१॥ गंगा उतरावया महापूरी । अतिप्रयासी ताफा करी । तोचि पूर चोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥ ५२ ॥ तेवीं कामक्रोधादि वेगशून्य । ज्याचे निर्विकल्पी निश्चळ मन । त्यासी दानादिकी प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥ ५३ ॥ जेवीं सूर्योदय झाल्यापाठीं । उपेगा न ये लक्ष दिवटी । तेवीं निर्विक ल्पता मनीं उठी । तै साधने कोटी सुनाट ॥ ५४॥ एवं समाहित ज्याचें मन । त्यासी दानादि नाना साधन । करावया नाहीं प्रयोजन । कल्पना पूर्ण निमाल्या ॥ ५५॥ ज्याचे नेम न मनी चित्त । जें सदा विवेकरहित । जे अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधने ॥ ५६ ॥ जेवीं मदगजांच्या लोटीं । सैन्य पळे वारा वाटीं । तेवीं विपयासतापाठी । साधने हिंपुटी होऊनि ठाती ॥ ५७॥ जो विषयासक्तमना । तो सर्वथा नातळे साधना । करी ते तेथेही जाणा । विषयकल्पना सकल्पी ॥५८ ॥ स्वयें करिता पै साधना। जे जे फळ वांछी वासना । तें तेणेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥ ५९॥जेवी कां बुद्धिवळाचा वारू । त्यावरी बैसला निर्वळ नरू । तो त्यासी सर्वथा अनावरू । नव्हे स्थिरू अणुमात्र ॥ ६६० ॥ तैसे ज्याचें अतिदुर्भन । सदा कामक्रोधी परिपूर्ण । जो स्वये झाला मनाचे अधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोही ॥ ६१ ॥ तेथ साधनचि करी कोण । करी ते मोहास्तव जाण । तेणे पाढे तमोगुण । मनोनियमन घडेना ॥ ६२ ॥ श्रवणादि इंद्रियवंधन । करूनि करिता साधन । तेणे वश्य नव्हे मन । मनाअधीन इंद्रिये ॥ ६३॥ मनोवशेऽन्ये भवन्स देवा मनश्च नान्यस्य चश समेति । भीष्मो हि देव सहस सहीयान् शुझ्यावशे स स हि देवदेव ॥ ४८॥ . . मने आकळिले सर्वांसी । परी मन नाकळे कोणासी । मने छळिले देवासी । ते केवी इंद्रियासी आटोपे ॥ ६४ ॥ चंद्र अधिष्ठाता मनासी । मने छळिले चंद्रभ्यासी । व्यभिचारोनि गुरुपलीसी । क्षयरोगी त्यासी मनें केले ।। ६५ ।। ब्रह्मा अधिष्ठाता बुद्धीसी। मनचि ब्रह्मयाची वुद्धि भ्रशी। निजैपुत्री वारिता त्यासी । स्वकन्येसी अभिलापी॥६६॥ चित्ती वासुदेवाचे अधिष्ठान । त्यातही हळू ठेकी मन । लावूनि वृंदेचें ध्यान ! श्मशानी जाण पाडिला ॥ ६७ ॥ रुद्र अधिष्ठाता अहकारी । त्यातही मन सितरी । अभिलाषिता ऋपिनारी । शापिला ऋपीश्वरी लिगपाते ॥ ६८॥ ऐसे देवा दुर्जय जै मन । त्यासी आवरी इतर कोण । ह्मणाल इद्रियें नेमित मन । ते मनाधीन इंद्रिये ॥ ६९ ।। 5 इंद्रियें धरोनि हातीं । मने एकाग्र होइजे अर्थी । तेव्हा इतर इंद्रियाची स्थिती । राहे निश्चिती १ वाटल्यास २ मनोजय करणाऱ्याला ३ तराफा ४ उतरून गेल्यावर ५ निष्फळ ६ समाधिरत, शात ७ ज्याचे गन दानात राहात नाहीं ८ हा झाला ममता ९ कष्टी, उदास १० उलगडा, हिशेब, उप्राणी, वसूल ११ घोडा 1. मनाची नियामर देवता चद १३ व्यभिचार करून १४ आपल्या कन्यौ १५ गोत्यात पाहते १६ फसवित । - - - - ---