Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/632

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१४ एकनाथी भागवत निजमानसीं । सुख सर्वासी होये येणें ॥ ६३ ॥ देह प्रारब्ध भोगवी जाण । याचा मजसी सबंध कोण । येणे विवेके क्षमापूर्ण । कोणाचें मन दुखवीना ॥ ६४ ॥ जेथ स्वगोत्र सोइरे स्वजन । जिहीं दीधला अतिसन्मान । त्यादेखता अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥ ६५ ॥ त्यापाशी शांति सपूर्ण । उद्धवा निश्चयेंसी जाण । ज्याचें लोकेपणे लाजे मन । अशाति जाण ते ठायीं ॥ ६६ ॥ ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो। त्या सन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवाधिदेवो सागत ॥ ६७॥ एष स भौतिक दु ख देहिक दैविकं च यत् । भोक्तव्यमारमनो दिष्ट प्राप्त प्रासमबुध्यत ॥ ४ ॥ भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धे वाधले लोक । तेणे भोगणे पडे आवश्यक । रावो रक सुटेना ॥ ६८॥ भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक । देही उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥ ६९ ॥ यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झाले जनक । तें भोगिता मानी असुख । तो केवळ मूर्स अतिमंद ॥ ५७० ॥ जे भोग आले प्रारब्धेसी । तेथे साह्य केल्या हरिहरांसी । भोग न चुकती प्राण्यासी । हे जाणोनि सन्यासी क्षमावंत ॥७१॥ कृष्ण साह्य पाडवासी । ते भोगिती नष्टेचर्यासी । तेथें साह्य केल्या हरिहरासी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥७२॥ परिभूत इमा गाथामगायत नराधमै । पातयनि म्मधर्मस्थो प्रतिमास्थाय साविकीम् ॥ ४२ ॥ दुर्जनाच्या उपद्रवाहाती । निजशांति न साडीच यती । धरोनियां सात्विकी धृती । स्वधर्मस्थिति न ढळेचि ॥७३ ॥ तेणे भिक्षनें गायिली गाथा । ते तुज मी सागेन आता। उद्धवा अतिसावधानता । तो वोध तत्त्वता अवधारी ।। ७४ ॥ तो वोधू धरितां चित्ती । द्वंद्वसाम्या पावे स्थिती । सहजे उल्हासे निजगाती । सायुज्यमुक्ति घर रिघे ॥ ७५ ॥ जगी उद्धवाचे भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान । काय बोलिला भिक्षु आपण । ते निरूपण अवधारीं ॥ ७६ ॥ द्विज उवाच-नाय जनो मे सुखदु खहेतुन देवतारमा ग्रहकर्मकाला । मन पर कारणमामनन्ति ससारचक परिपतयेद्यत् ।। १३ ।। सुजन दुर्जन साधारण । ऐसे जे त्रिविध जैन । माझ्या सुखदुःखासी कारण । सर्वथा जाण ते नव्हती ॥ ७७ ॥ जन तितुके पांचभौतिक । माझाही देहो तोचि देख । जनांसी मज सहजें ऐक्य । उपजे सुखदुःख मनापाशी ॥ ७८ ॥ देवता सुखदुःखदायक । ऐसे ह्मणावे आवश्यक । ती दैवतें मनःकाल्पनिक । त्याचे सुखदुःख मजसी न लगे ॥ ७९ ॥ देवतारूपें मन आपण । मने कल्पिले देवतागण । ते जै सुखदुखें देती जाण । ते मुख्य कारण मन झाले ॥ ५८० ॥ जेथ जैसा मनाचा सद्भावो । तेथ तद्रूपें भासे देवीदेवो । जेय मनाचा विकल्प पहा हो । तेय थिता देवो दिसेना ॥ ८१॥ यालागी सकळ देवता । त्या जाण मन कल्पिता । त्यापासाव सुखदुःखव्यथा । ते मनाचे माथां निश्चित ॥८२॥ आत्मा सुखदु.खासी कारण । हे समूळ मिथ्या वचन । आत्म्याचे ठायीं द्वैत १ भोगी २ मनाला उद्वेग न वाटता ३ लौकिक प्रतिष्ठा किंवा मोठेपणा यामुळे ४ सचित, क्रियमाण, व प्रारब्ध ५ राज्यभश चनवास अज्ञानवास इत्यादि ६ धैर्य ७ मुरादु सादि द्वाची समता ८ उत्सास पावते ९ शत्रु, मित्र २ उदासीन किंवा मुट, दुष्टय तटस्थ असे विविध जन १०जाण, ११ मनाने कल्पिलेली १२ असरेला, १३ त्यापासून. 1 -


-