________________
एकनाथी भागवत. ज्याचेनि तुटे भवबंधन । ज्याचेनि वोले होइजे पावन । त्या सद्गुरूसी अबोला जाण । धनाभिमान धरवित ॥ ९७ ॥ धनाभिमानाचा घडिवार । सद्गुरूमाजी पाडी पैर । धनाभिमानी अणुमान । नव्हे निर्वैर कोणासी ॥ ९८ ॥ जे सागीतले निरूपण । त्या नांव वैर संपूर्ण । हे दहावे अनर्थलक्षण । अविश्वासी धन ते एक ॥ ९९ ॥ धनाभिमानाचा विलास । न मानी पित्याचा विश्वास । पूर्ण बंधूचा अविश्वास । केवीं सुहृदांस पातेजे ॥३००॥ 'आत्मा वै पुत्रनामासी' । जो साचार धणी सर्वस्वासी । त्या पातेजेना निजपु. त्रासी । अतिअविश्वासी धनलोभ ॥ १ ॥ धर्म अर्थ काम संपूर्ण । त्रिसत्य सत्यें अवंचन । पूर्वजाची भाक निर्वाण । देऊनि आपण जे पर्णी ॥२॥ जिणे जीयू प्राण सर्वस्वसी । साचार अर्पिला भ्रतारासी । ऐशियेही धर्मपलीसों । अविश्वासी धनलोभ ॥३॥ जे उदरी वाहे नवमासी । जे सर्वदा विष्ठामूत्र सोगी । धनलोभाची जाती केशी । तेही मातेसी न विश्वासे ॥४॥धनाभिमान ये जयापाशी । तो विश्वासेना सद्गुरूसी । इत. रांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥ ५॥ अविश्वासाचे मुख्य कारण । धन आणि दुसरी स्त्री जाण । तेथ मोहावले ज्याचे मन । तो अतिसपन्न अविश्वासे ॥ ६ ॥ जो धनमानी आणि स्त्रीजित । त्यासी विमुख होय हृदयस्थ । त्याते सद्गुरूही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासे ॥ ७ ॥ सकळ दोपां मुकुंटमणी । अविश्वास बोलिला पुराणी । जो प्रकटता अर्धक्षणीं । करी धुळेदाणी वृत्तीची ॥ ८ ॥ अविश्वासा अभिमान भेटे । तै मुक्ताची मुक्तता तुटे । मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटे देहवंदी ॥९॥ अविश्वासे कैवळिल्या चित्ता। अभिमाने ह्मणे मी ज्ञाता। तेव्हां उभउभ्या पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ ३१० ॥ अविश्वास येतां पहा हो । सकुटुंब पळे सद्भावो । मग लोकत्रयी अभावो। नादवी निर्वाहो विकल्पकरूनी॥१॥ वौडे कोडें अविश्वासी । चिकल्पू नांदे अहर्निशी । जेथ रिगाँव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ।। १२ ॥ अगोवागी अविश्वास । परमार्थराष्ट्र पाडी वोस । सद्रूचेही दावी दोप । न मनी विश्वास ब्रयाचा ॥ १३ ॥ यालागी सकळ दोपाचा राजा । अविश्वासाहूनि नाही दुजा । तो रिगोनियां निजपैजी । विभाडी वोजी महासिद्ध ॥१४॥ जिकडे अविश्वासे चाली केली । तिकडे परमार्या पळणी झाली।विकल्पाची वाडी आली । ते सधी नागवली वहुतेके ॥१५॥ सिद्धाचे गेलें सिद्धिभूपण । साधक संपाई नागवली जाण । रानभरी झाले साधारण । श्रद्धेचे उद्यान छेदिले ॥१६॥ यमनियमांची नगरें जाळी । क्रोधू तापसी करी होळी । मोक्षफळे सफलिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥ १७ ॥ शमदमाचे घरटे । खाणोनि साडिले आव्हाटे । बोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥ १८॥ व्रतोपवास यांची साजिरी । निष्काम उपवने चौफेरौं । ती जाळिली उपराउपरी । नानापरी विकल्में ॥ १९ ॥ ऐशिया अविश्वासासी । ज्ञानाभिमानी आला भेटीसी । विकल् अभय देऊनि द्वेप, वारडेपण २ प्रताप ३ विश्वासावे ४ पुन हा प्रत्यक्ष भापला भात्माच होय अशी श्रुति माहे ५ 'धर्मे चार्थे च कामे च' ही विवाहप्रसगाची शपथ ६ परिणिली, भायी केली ७ धनलोभू ८ श्रीमतीचा गर्न धरणारा. एवाइलबेटा १० प्रमुस ११ नासाडी १२ पेरलेल्या १३ आवडीने १४ प्रवेश १५ परमार्थाचा प्रात १६ घनघोर प्रावता यरून, निश्चयारे १७ मोठ्या पराकमान झगडतो १८ स्लारी १९ हल्ला. २० सर्वस्वी, यच्चयावन् २१ तपाची २२ आडवाटेवर २३ चव्हाटे २४ चहू बाजूची.