पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/614

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

, एकनाथी भागवत. मज उद्धरी दीनातें ॥५७॥ कृष्णा माधवा मुरारी । अच्युता अनंता श्रीहरि । गरुडध्वजा गोवर्धनधारी । मज उद्धरी दीनाते॥५८ ॥तुवां रक्षिले प्रह्लादासी।अंबरीपासी गर्भवासी। उदरी राखिलें परीक्षितीसी । 'तैसे मज दीनासी उद्धरीं ॥ ५९॥ तुवा तारिलें अहल्येसी । उद्धरिले नेष्टा अजामिळासी । उड़ी घातली गजेंद्रासी । तेणे वेगेसी मज तारों ॥१६० ॥ महादोपांची श्रेणी । नामें तारिली कुंटिणी । तेणे लावे चक्रपाणी । मज दुष्टालागोनी उद्धरीं ॥६शा जळो जळो हा धनकाम । गेले वृथा माझें जन्म । फुकाचे जे रामनाम । ते मी अधम न ह्मणेचि ।। ६२ ॥ रामनामाच्या प्रतापासाठी । जळती महापापाच्या कोटी । थोर अधम मी एक सृष्टी । नाम वाक्पुटी न ह्मणेचि ॥ ६३ ।। ऐसा मानोनि अपराध । अनुतापें करितां खेद । उपजला अतिनिर्वेद । तेंचि गोविंद स्वयें सांगे ॥१४॥ स चाहेदमिद कष्ट वृथामा मेऽनुतापित । न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृश ॥ १४ ॥ हात चुरूनि ह्मणे कटकटा । ब्राह्मणदेहो मोक्षाचा वांटा । तो लोहोनि मी अतिकरंटा । धनलोभचेष्टा नाडलों ॥ ६५ ॥ जेणें देहें लाभे मोक्षसुख । त्या देहासी म्यां दीधले दुःख । धनलोमी मी परम मूर्ख । मजऐसा आणिक असेना ॥६६॥न वेचितां धर्मकामासी । अर्थ जोडिला सायासी । त्या अर्थाची दशा ऐसी । अतिदुःखेंसी मज फळला ॥६॥ वोप धनलोभाचे कवतिक । नाहीं इहलोक ना परलोक । थिते अंतरले मोक्षसुख । भोगवी नरक अनिवार ॥ ६८ ॥ देखे ज्या नरकाचे ठायीं । आकल्प बुडतां ठावो नाही । धनलोभ घाली तैसे ठायीं । तें म्यां नरदेहीं जोडिले ॥ ६९ । जो जन्मला ब्राह्मणदेहीं । तो पूज्य होय लोकीं तिहीं । मोक्ष लागे त्याच्या पायीं । म्या अभायीं नाशिला ॥ १७० ॥ लोभ जे धन संचिलें। तें निःशेप नासोनि गेले । परी मजलागीं अतिदुःखी केले। बांधोनि दीधले महानरका ॥ ७१ ॥ उत्तम देहो झाला प्राप्त । तो धनलोभे केला व्यर्थ । आयुष्य गेले हातोहाते । अतिसतप्त अनुतापें ॥ ७२ ॥ धनलोभेचे अचाट । वृथा गेले माझे कष्ट । वैराग्य उपजले उन्ट । अतिचोखट सविवेक ॥ ७३ ॥ धनलोभी जो कां नर । तो सकळ दुःखांचे भांडार । धनवद्धक तो पामर । स्वमुखें साचार निदित ॥ ७४ ॥ प्रायेणार्या कदाणा न सुखाय कदाचन । इह चारमोपतापाय मृतस्य नरकाय च ॥ १५ ॥ प्रायशा जे धनवर्द्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख । धनरक्षी अतिदुःख । तें जाता देख प्राणात ॥७५ ॥धनागमनी अतिकष्ट । धनरक्षर्णी कलह श्रेष्ठ । धननागे होय हृदयस्फोट । इहलोकी कष्ट धनलोभ्या ॥ ७६ ॥ यापरी इहलोकी दुःख । अधर्मे खुंटला परलोक । मरता उरी आदळे नरक । आवश्यक धनलोभ्या ॥ ७७॥ जो धर्म करीना स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्य होये । त्यासी चढते वाढत दुःख पाहे । नाहीं सुखसोये कदया ॥ ७८ ॥ लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वीही सुख नाहीं। लोभ अतिशयें निंद्य पाही । ते आपण स्वमुखेंही सागत ॥ ७९ ॥ १तेणे वेगसी मज तारी १ पातकी ३ माळा, पक्ति ४ पिंगला ५ कौतुकाने, लीलेने ६ मुसाने ७ पश्चाताप, वीन पेराग्य ८ चोळून ९ मिळून १० सचिल्याशिवाय ११ प्रयासाने १२ मोठे, जबर १३ असलेलें १. महामउयापर्यंत. १५ मौलता मोलता, शीघ्रगतीने १६ महतकरून १७ धनठोगी १८ छाती फाटून जावे