Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा. समाहुर्यासुदेवांश मोक्षधर्मविवक्षया । भातीण सुतशत तस्यासीद्वेदपारगम् ॥ १६ ॥ ऋषभ वासुदेवाचा अशु । ये लोकी मोक्षधर्मविश्वासु । प्रवर्तावया जगदीशु । हा अशाशु अवतार ॥ ३३ ॥ त्याचे पंचमस्कंधी चरित्र । सांगितले सविस्तर । त्यासी जाहले शत पुन । वेदशास्त्रसपन्न ॥ ३४ ॥ त्यांहीमाजी ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र । ऐक त्याचे चरित्र । अतिविचित्र मागेन ।। ३५ ॥ तेपा वै भरतो ज्येष्टो नारायणपरायण । विख्यात वर्षमेतघताना भारतमतम् ॥ १७ ॥ जो ज्येष्ठपुत्र भरत जाण । तो नारायणपरायण । अद्यापि भरतवर्पउच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥ ३६ ।। जो मनसा वाचा कर्मणा । अखंड भजे नारायणा । असताही राज्यधर्मी जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥ ३७॥ जेवी मार्गी चालता । पाउले घही टाकितां । दैववशे अडखुळता। आश्रयो तत्वता भूमिकाचि ॥ ३८॥ तेवींचि तयासी असता । राज्यधर्म चाळितां । यथोचित कर्म आचरता । निजी निजात्मता पालटेना।। ३९॥ या नाय बोलिजे अखड स्थिती । जे पालटेना कल्पातीं। जेथ असता सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥ १४ ॥ ऐसे करी सदाचरण । आणि नारायणपरायण । आईक त्याचेही व्याख्यान । विशद करूनि सागेन ॥४१॥ नराचा समुदाय गहन । त्यासी नार ह्मणती जाण । त्याचे अयन झणजे स्थान । ह्मणोनि ह्मणती नारायण आत्मयासी ॥ ४२ ॥ त्याच्या ठायीं परायण । हणिजे अनन्यत्वे शरण । निवदुनिया आपुले अहंपण । तद्रूप जाण राहिला ॥४३॥ ऐसा तो ऋपभाचा पुत्र । जयासी नांच भरत । ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजी ।। ४४॥ तो भरतु राहिला भूमिकेसी । ह्मणोनि भरतवर्ष मणती यासी । सकळ कारभी करिता सकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताति ॥ ४५ ॥ ऐसा आत्माराम जन्ही झाला । तन्ही विपयसग नव्हे भला । यालागी त्याचा वृत्तातु पुढिला । सागेन सकळा आइकें ॥ ४६॥ नामें ख्याती केली उदड । यालागी त्यातें ह्मणती भरतखड़ । आणीकही प्रताप प्रचड । त्याचा वितंड तो ऐका ॥४७॥ ___ स भुक्तभोगा सक्वेमा निर्गतस्तपसा हरिम् । उपासीनतत्पदवीं लेभे घे जन्ममिथिमि ॥ १८ ॥ तेणे दिग्मंडळ जितिले । समुद्रवलयाकित राज्य केले । नानाविध भोग भोगिले । जे नाही देसिले सुरवरी ॥ ४८ ।। अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र । अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ।। ४९॥ऐसे भोग भोगिलियापाठीं। साडूनि वलयाकित राज्यसृष्टी । स्वये निघाला जंगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥१५० ॥जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती । भरते केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥५१॥ तो तेणेचि जन्में जाण । होआवा मोक्षासी आरोहण । परी जाहलें जन्मातरकारण । तेंही विंदाणे सागेन ॥५२॥ सनिहितप्रसूतिकाळी । मृगी जळ मागिता जळीं । ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडाली तत्काळी अतिसंत्राणे ॥ ५३॥ धाकै गर्भ तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळी । देखोनि कृपालु कळवळी । काढी तत्काळी दयालुत्वे ॥ ५४॥ मृगी नयेचि परतोन । मातहीन हे अतिदीन । भरत पाळी भूतदयेन । मोक्षधर्मा २ ईश्वरनिष्ठ ३ हिंदुस्थानाला भरतवर्ष दिवा भरतगड असे याच्यामुळेच ह्मणतात ४ खसी ५ पाग्याचा ६ स्वखरूपी निमग्न अघटित ८ देवानींही ९ जगात श्रेष्ठ १० पुनजन्मास कारण ११ कौशल्य (इतित) १२ सिंहाची १३ वेगान, सवेग ("सत्राणे उहाणे हुकार वदनीं" ही श्रीसमपकृत मारतीची आरति प्रसिद्धच आहे) ए भा ४