पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/608

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"५९० एकनाथी भागवत. विषय प्रकृति मन । या चहूंचे समाधान । चहूं अध्यायीं विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल.॥ २९ ॥ यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान । श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरूपी ॥ ३० ॥ बादरायणिरवाच-स पुवमाशसित उद्धथैन भागवतमुख्येन दशाईमुरय । ।। समाजयन् भृत्यवचो मुकुन्दस्तमाबभाषे श्रवणीयवीर्य ॥१॥ शुक ह्मणे परीक्षिती । ऐकोनि उद्धवाची विनंती । वचनें संतोपला श्रीपती । तो उद्धवामती संबोधी ॥३१॥ कोटि जन्मांती केवळ । द्विजत्व पाविजे सुकुळ । हे महापुण्याचे निजफळ । तेंचि निष्फळ हरिभक्तीविणे ॥ ३२ ॥ सदा सफळ आंब्याचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख । तो सफळहि निष्फळ देख । तैसे उत्तम लोक भजनेंवीण ॥ ३३॥ ते स्थिति नाही उद्धवापासीं । उत्तम जन्म यादववंशीं । सभासदता आल्याही हातासी। श्रीमदासी भुलेचिना ॥३४॥ झालियाही राज्यसपत्ती। जो विसवेना भगवनती। भागघतमुख्यत्वाची प्राप्ती । त्यासीच निश्चिती महाराजा ॥ ३५ ॥ सगुण सुंदर पतिव्रता । अनुकूल मिळालिया कांता । जो विसवेना भगवदा । भागवतमुख्यता त्या नांव ॥३६॥ इंहीं गुणी अतियुक्त । विवेकेंसी अतिविरक्त । श्रीकृष्णचरणी अनुरक्त । मुख्य भागवत उद्भवू ॥३७॥ वयें धनें में श्रेष्ठपण । तें श्रेष्ठत्व अतिगौण । भगवत्प्राप्ती ते श्रेष्ठ जाण । तेणे भाग्य परिपूर्ण उद्धवू ॥ ३८ ॥ जो श्रीकृष्णाचा विश्वासी । श्रीकृष्ण ऐकांत करी ज्यासी । गुह्य ज्ञान सांगे ज्यापाशी । त्याच्या भाग्यासी केवीं वायूँ ॥ ३९ ॥ परब्रह्म में का साक्षात । जे उद्धवासी झाले हस्तगत । त्याच्या पोलामाजीं वर्तत । भाग्ये भाग्यवंत तो एक ॥ ४० ॥ उद्धवभाग्य चानित वानित । शुक झाला सद्गदित । स्वानंदें वोसडला तेथ । ठेला तटस्थ महासुखें ॥४१॥ उद्धवभाग्याचा उद्रेक । सांगतां योसंडला श्रीशुक । ते देखोनि कुरुनायक । जाहला आत्यंतिक विस्मित ॥ ४२ ॥ ज्याचें निजभाग्य सागतां । श्रीशुकासी होतसे अवस्था । उद्धव भाग्याचा तत्त्वतां । मजही सर्वथा मानला ॥ ४३ ॥ तंव शुक ह्मणे रायासी । परम भाग्य तें उद्धवासी । तेणें विनवितां हपीकेशी । बचनमा सी तुष्टला ॥ ४४ ॥ उद्धवासी शातीची चाड । तो प्रश्न श्रीकृष्णासी झाला गोड । त्याचे पुरवावया कोडे । निरूपण वाड सांगेल ।। ४५ ॥ परम शांतीचा अधिकारी । तूंचि एक निजनिर्धारीं । ऐसे उद्धवप्रेमपुरस्करी । शांति 'श्रीहरि सागत ॥ ४६॥' श्रीभगवानुवाच-बार्हस्पत्य स वै नात्र साधु दुर्जनेरितै । दुरुक्कैर्भिन्नमारमान य समाधातुमीश्वर ॥ २ ॥ उद्धवा तूं में बोलिलासी । मीही सत्य मानी त्यासी । दुर्जनी केल्या अपमानासी । सहावया कोणासी शाति नाही ॥ ४५ ॥ देव पादुका वाहती शिरसी । मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसी । अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी । ब्रह्मज्ञान ज्यापाशी वर्चनांकित ॥४८॥ ऐसा देवगुरु बृहस्पती । त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती । यालागीं शातीच्या साधक युकी। तूंचि निश्चिती जाणसी ॥ ४९ ॥ शाति आकळावया उद्धवासी । आदरें सत्कारी हपी १ उपदेशी २ वृक्ष ३ बाडगूळ ४ सभ्याचा अधिकार ५साहीत नाही ६ भक्तिमार्गास ५ सप्रेम तरसर ८ विश्वासपान ९ सालमसलत १० बचनात ११ मूक, शब्दरहित १२ अतिशय १३ प्रेमरसान तुडुप भरला १४ परीक्षिति १५ उस्कठा, उत्सुकता, गहिचर १६ भावड. १७ उद्धवाच्या प्रेमाचा पुरस्कार करून १८स्वये १९ पदी होऊन राहते. २० शातिरइस पळाहाणन. ।। । mu- 4 dte