पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/602

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८४ एकनाथी भागवत. श्रोता दुसरा वका पाहीं । यालागी येही उपाये ॥ २३ ॥ जेवीं एकटा क्रमेना पंथ । मी राजा करी मनोरथ । परचक कल्पूनि तेथ । होय उद्यत युद्धासी ॥ २४ ॥ तो युद्धआवेश कडकडाट । तेणें संत्राणे उडे उद्भट । अडखळूनि आदळे पोट । ह्मणे मी घायवेट पडिलों कीं ॥२५॥ मिथ्या भ्रमें पडला भुली । चालता चालतां मृगजळीं । उतरावया पैलतीरीं। बुडी वहिली देतसे ॥२६ ॥ गंधर्वनगरी प्रचंड । माड्या सोपे उदंड । क्षणामाजी विरस चंड । वितंड करी निर्वाळा ॥ २७ ॥ तेवी ससार हा काल्पनिक । तेथील सुख आणि दुःख । मिथ्या केवळ मायिक । जाण निष्टंक निजभक्तां ॥२८॥ दाशाहवंशी जन्मलासी। तू उत्तम दशा पावलासी । यालागी ह्मणे हपीकेशी । उद्धवासी दाशार्ह ॥ २९ ॥ जेवीं का स्वमभोग जाण । स्वामी सत्य मानी आपण । तेवीं ससार हा दीर्घ स्वप्न।मायिक जाण मिथ्यात्वें ।। ६३० ॥ जागा झालिया स्वम वृथा । निरहंकारी ससार मिथ्या । हे ब्रह्मज्ञानाची मुख्य कथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१॥ संसार तो कल्पनामान ! आत्मा निर्विकार चिन्मात्र । जेवीं मृगजळ भरी भास्कर । तेवीं ससार करी आत्मा ॥ ३२ ॥ उद्धवा तूं ह्मणशी आता । ऐकता तुझे मुखीची कथा । ससार मिथ्या तत्त्वता । तरी साधनावस्था का सोसावी ॥ ३३ ॥ जेवीं वंध्यापुत्राचे लग्न करावया कोणी न करी यल। का मृगजळी बांधोनि धरण । पाट जाण कोणी काढीना ॥३४॥ तेवों मिथ्या ससारवंधन । तेथ श्रवण मनन चिंतन । विवेक वैराग्य ज्ञान ध्यान ।वृथा कां जन सोशिती ॥३५॥ उद्धवा वागुलाचे भय खोटें । परी वाळकासी सत्य वाटे । तेवीं मिथ्या ससारकचाटें। जीवीं प्रकटे वद्धता ॥३६ ॥ तेचि अर्थीचा दृष्टात । स्वयें श्रीकृष्ण सांगत । मिथ्या सांसारिक येथ । भ्रमें वाधीत भ्रातासी ॥ ३७॥ ___ अर्थे विद्यमानेऽपि समृतिनं निवर्तते । ध्यायतो रिपयानस्य स्वमेऽनर्थागमो यथा ॥ ५५ ॥ विचारे पाहता मिथ्या स्वम । तेथील विषयसेवन । सुखदुःखें बाधिती गहन । ऐक लक्षण तयाचे ॥ ३८ ॥ स्वप्नीं पुत्रलाभ राजसन्मान । तेणे सुखें 'ओसडे आपण । का झालिया धनहरण । तेणे दुःखें दारुण आनंदे ॥ ३९ ॥ त्यासी जागें न करिता । स्वमसुखदु.खवाधकता । निवर्तेना सर्वथा । जाण तत्त्वता उद्धवा ॥ ६४० ॥ तेवीं विषयासक्त जन । ज्यासी अखंड विपयध्यान । ज्यांचे विषयीं सदा मन । देहाभिमान गोंवीत ॥४१॥ तयांसी देखावया उपावो । जया विपयासक्ति होय वायो।येचि अर्थीचा दृष्टात पहा वो। स्वयें सांगे देवो उद्धवासी ॥ ४२ ॥ न करिता श्रवण मनन । न साधिता विवेकज्ञान । न धरिता वैराग्य पूर्ण । भवभय जाण तुटेना ॥४३॥ ससार मिथ्या तोंडे ह्मणता । न तुटे सुखदुःखभयव्यथा । जन्ममरणादि अवस्था । अहंममता सुटेना ॥४४॥ ऐसे जे अज्ञान जन । तिहीं अवश्य करावे साधन । विवेके वैराग्य धरिता पूर्ण । भवबंधन निवारे ।। ४५॥ यालागी उद्धवा जाण । सकळ साधनाचे कारण । जेणे हाता चढे ब्रह्मज्ञान । तें वैराग्य पूर्ण साधावे ॥४६॥ ऐक विरक्तीची मांगी। जैशी घडधडीत आगी। १ शत्रुसैन्य २ यळाने, आवेशान ३ वर उच ४ जखमी होऊन ५ तावडतोच ६ शहरातील मोठमोमा इमारतीसारसे दिसणा-या मेघात ७ मोठा ८ प्रचड, मोठा ९ (खुन्याखोल्याचा निर्णय, निवाडा १० यदुवंशातल्या प्रमुख ११ सय ११ समस्ता. १३ पूर्णपणे मरून माह लागतो १४ ही ओंवी पैठणच्या प्रवीत नाही १५ मार्ग,