Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/596

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५७८ एकनाथी भागवत 'अशक्तता | अवस्था नाशीत ये अवस्था । तेथ 'मी तोचि हे तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥ ८९ ॥ ऐसे कल्पील तुझें मन । ते अर्थाचे निरूपण । अखंड स्फूर्तीचे कारण । स्वये श्रीकृष्ण सांगत ॥ ४९० ॥ सोय दीपोऽचिपा यद्वत् स्रोतसा तर्हिद जरम् । मोऽय पुमानिति नृणा मृपा गी(मंपायुपाम् ॥ ४५ ॥ । दीपज्वाळा होती जाती । अग्नि जैसा पूर्वस्थिति । यालागी तोचि दीपू मणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥ ९१ ॥ प्रवाह वाहती कलोळ । परी अखंड एकचि जळ । यालागीं ह्मणती सकळ । तेचि जळ या हेतू ॥ ९ ॥ तेवी देहीं वयसा होती जाती । आत्मा अखंड अनुस्यूती । तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥ ९३ ॥ ह्मणसी मीपणे अहकार रूढ । तोही अज्ञानत्वे जडमूढ । त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणे अखड वस्तुत्वे स्फुरे ॥ ९४ ॥ येथ देहासीचि जन्मरण । आत्मा अखंडत्वे परिपूर्ण । येयं देहात्मबुद्धीचे जे मीपण । ते याचा जाण अतिमिथ्या ॥ ९५ ॥ विपयाची 'विपयसिद्धी । देही जे काही देहबुद्धी । तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधी स्थापक ॥९॥ कर्मभूमी नरदेहाऐसें । निधान लाधले अनायास । तेथींचेनिही आयुष्ये । जे विषयविलासें विगुंतले ॥९७ ॥ तो अमृत विकूनि कांजी प्याला । रने देऊनि कोडा घेतला । पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥ ९८ ॥ डोळे फोडोनि काजळ ल्याला । नाक कापूनि शिमगा खेळला । तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥ ९९ ॥ वेंचिता धन लक्षकोटी । आयुष्यलक्षणाची नव्हे भेटी । तेही वैचिले विपयासांठी । हतीयु करटी अतिमूढे ॥ ५०० ॥ मुख्य देहोचि काल्पनिक जाण । तेथील कारपनिक अभिमान । ते हे देहबुद्धीचे मीपण । लाथी दृढ बंधन जगासी ॥१॥ तें साडिता देहाचे मीपण । कैचे जन्म कैचे मरण । तेव्हा ससारूचि नाही जाण । भवबंधन मग कैचे ॥२॥ जैसा मिथ्या वागुलावा भेवो । वाळके सत्य मानिला पहा हो । तैसा मृपा काल्पनिक देहो । सत्यत्वे पहा हो मानिला ॥३॥ मिथ्या देहो आणि देवुद्धी । त्यासी पुढे कैसी जन्मसिद्धी । मिथ्याभूतासी नव्हे वृद्धी । तेविखींची विधि हरि बोले ॥ ४॥ ___ मा म्नस्य कर्मवीजेन जायते सोप्यय पुमान् । म्रियते वाऽमरो भ्रा त्या यथाग्निारसयुत ॥ ४५ ॥ देहात्मवादें देहाभिमान । जनी वासनावीज गहन । तेणे स्वसकल्ये आपण । मानी जन्ममरण नसतेंची ॥५॥ तेणे देहाभिमाने आपण । अहं कर्म कर्ता क्रियाचरण । निष्कर्मा कर्मबधन । अमरी जन्ममरण आरोपी ॥६॥ थिल्लराचेनि जाहलेपणे । त्यांत सूर्याचे जन्म मानणे । थिल्लरनागे सूर्याचे जिणे । नासले ह्मणे, पाळक ॥७॥ तेवी अजन्म्यासी जन्मकर्म । मानिती तो मायिक भ्रम । येचिविपयीं 'पुरुषोत्तम । दृष्टात सुगम मागतः ॥ ८॥ जैसा अनि अजन्मा अव्यक्त । त्यासी काठी जन्मला ह्मणत । दिसे काष्ठाकारें आकारवंत । काष्ठनागें मानीत नाश त्यासी ॥९॥ येय देहासोंच जन्मनाश । आत्मा नित्य अविनाश । देहअवस्था नवविलास । स्वय हृषीकेश सागत ॥५१०॥ १ होतो २ अराडपणे सर्वन सुचलेला ३ टेवा ४ पेज ५जवळचा हत्ति देऊन मोबदला वीट घेण ६ आत्मघातकी ७ भीती ८ साविषयींची प्रकार १० मृत्युरहिताला ११ डवके साचल्यावर १० अप्रकट, गुप्त -