________________
अध्याय दुसरा. यथा विचिनम्यसनाद्भवद्धिर्विश्वतो भयात् । मुच्येमजसवाद्धा तथा नः शाधि मुनत ॥ ९॥ मायाजले भवसागरू । भरला असे अतिदुस्तरू । त्याचा उतरावया पैलपारू । होय तूं तारूं मुनिराया ॥ ९१ ॥ याचें सकळ जळ क्षार । माजी सावंजे अनिवार । एकएके चराचर । मिलिले साचार निजशक्ती ।। ९२ ॥ लाटांचरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा । आदळती अविवेकतदा । धैर्याचिया काठा पाडित ॥ ९३ ॥ अहंकुवावो वाजता थोरू । अवघाचि सवळे सागरू। मीमाझेनि गजरें घोरू । अति दुर्धरू गर्जत ॥ ९४ ॥ नाना वासनाचा वळसा । पाहं पा भवताहे कैसा । येथ तरावया विसा । नव्हे सहसा सुरनरा ॥ ९५ ॥ क्रोधाचे प्रबळ भरते । भरे द्वेपाचिया तरियातें । असूयातिरस्काराची तेथे। चिडाणी उते अनिधार ॥ ९६ ॥ कामपर्वताची शिखरें । विषम भासती अपारें । आशेइच्छेची वरी योरे । झाडे विपयाकुरे वाढलीं ॥ ९७ ॥ सकल्पविकल्पांचे मीन । निदेच्या सुसरी दारुण । ब्राद्धपाचे नक पूर्ण । सागरी जाण तळपती ॥ ९८॥ एवढाही हा भवसागरू। शोपिता तूं अगस्ती साचारू । तुझेनि भवाब्धिपैलपारू । पावेन हा निर्धारू जाला आहा ॥ ९९ ॥ याचा विश्वतोभय हेलावा । तो आमा न वाधी तुमच्या कणवी । अप्रयासे नारददेवा । मरणार्गवा मज तारी ।। १००॥ पायर्या उतरून भवसागरू । साक्षात् पावे परपारू । ऐसा भागवतधर्मविचारू। तो निजनिर्धारू प्रबोधी॥१॥ ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चित्तीं।तोचि अभिप्रावो परीक्षिती। शुक स्वमुखें स्थिति सागत ॥२॥ श्रीशुक उवाच-राजीव कृतप्रभो वसुदेवेन धीमता । प्रीततमाह देवपिह रे ससारितो गुण ॥१०॥ सागता वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाला स्वानंदपूर्ण । नारदु वोळला चैतन्यधन । चित्सुनजीवन मुमुक्षां ॥३॥ श्रीशुक ह्मणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा । ऐकोनि प्रश्नंसुहाना । तो ह्मणे वमुदेवा धन्य वाणी ॥ ४॥ परिसता हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण । ऐसे वोलता नारद जाण । स्वानंदें पूर्ण बोसडला ॥५॥ रोमाच उचलले अगी। स्वेद दाटला सर्वांगी। आनदाश्रु चालिले वेगी । स्वानंदरगी डुल्लतु ॥ ६ ॥ सप्रेम मीनलिया श्रोता । जे पूर्ण सुखावेना वक्ता । ते तो जाणावा अवघा रिता । कथासारामृता चवी नेणे ॥ ७॥ ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुसाबे पूर्ण । मग स्वानंदगिरा गर्जीन । काय आपण बोलत ।।८।। नार उपाच-सम्यगेतन्यासित भवता सापतपभ । यस्पृच्छसे भागवता-धास्त्र विश्वभावनान् ॥ ११ ॥ नारद झणे सात्वतश्रेष्ठा । वसुदेवा परमार्थनिष्ठा ।धन्य धन्य तुझी उत्कठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥ ९॥ ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हें विश्व अवघेचि उद्धरे । हे विचारिले तुवा वरे । निजनिर्धारे श्रीकृष्णजनका ॥ ११० ।। तुझेनि प्रश्नोत्तरे जाण । साधक निस्तैरती सपूर्ण । साधकाचे नवल कोण । महापापी पाचन येणे होती ॥११॥ १ पान २ जलचर ३ पुढाल मायासागरावरील रूपकाशी ज्ञानेश्वरी अध्याय ७ मधील ओव्या ६८-६०० अवश्य ताइा पाहाव्या अहकाररुपी प्रतिकूल पारा ५ मी आणि माये अगा गजनेत ६ भरा ७ धर्य ८ देवार आणि मनुप्यास ९ साचमढग्यास १० काटेर ११ शद, सा,रूप, रम, गव, हे कॉम १२ मासे १३ हिटतात १४ चह कडा भीति देणारा १५ कृपे। १६ भवसमुद्रापासून (मृयु हा जन्मावाचून शक्यच असल्यामुळे 'मृत्यु' गददात जगाचाही मतभाष झाला आहे १७ मोल १८ नारद हाच ज्ञानम्प मेध, खाने प्रपन होऊन वमुदेवरूप चातकावर प्रदानदारूप उदद्वाचा वपाव केला १९ एक झाला २० गोड प्रश्न २१ भरून गेला २० सोमवशीय चदुरागाचा पुन , जा मोटा साच्या पशातल्या पायुराजाचा पुन जो सात्वत, सा कुळातील श्रेष्ठा २३ तरून जातात