Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत बुद्धि । दीनदयाळ त्रिशुद्धी । तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधि सांगेन ॥ ७० ॥ तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिले गुंह्यज्ञान । ध्रुव वाळक अज्ञान । स्मणोनि जाण नुपेक्षिसी ॥७१ ॥ प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न ह्मणसी तेव्हा । तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनासी ॥ ७२ ॥ केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक । महाकवि केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥ ७३ ॥ देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसडे सदाशिवासी । ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥७४॥ वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि साडविशी त्याचे पाप । शेसी सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयालुवा ।। ७५ ॥ तुह्मी अच्युतात्मे निजनिर्धारी । ह्मणोनि देवो तुमचा आज्ञाधारी । तुह्मी हाणाल त्याते उद्धरी । ये हवी हाती न धरी आनाते ॥ ७६ ॥ ऐसा तूं दीनदीक्षागुरू । ब्रह्मज्ञाने अतिउदारू।तरी पुसेन तो विचारू । निजनिर्धारू सागावा ॥७७॥ प्रास्तथापि गृच्छामो धर्मान्भागवतास्तव । यान् श्रुत्वा श्रदया मर्यो मुच्यते विश्वतो भयात ॥ ७ ॥ आदरें हाणे देवऋषी । आजि सकल पुण्ये आली फळासी । मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥ ७८ ॥ कृपा केली मागील शिष्या । तेचि कृपेचा घाली ठसा । मज तुझा पूर्ण भरवसा । सोडवी भवपागापासूनी ॥ ७९ ॥ तुझेनि दर्शने कृतकृत्यता । जन्ही मज जाली तत्त्वता । तन्ही भागवतधर्मकथा । कृपेने तत्त्वता सागावी ॥ ८॥ ऐसे सागावे भागवतधर्म । जेणे निरसे क्रियाकर्म । श्रद्धेने ऐकता परम । जन्ममरण हारपे ॥ ८१ ॥ भवभय अतिदारुण । त्याचें माया निजकारण । ते समूळ होय निर्दळण । ऐसे धर्म कृपेने सागावे ॥ ८२ ॥ मज नाहीं अधिकार पूर्ण । ऐसे विचाराल लक्षण । तेविषयींची हे विनयण । सावधान अवधारीं ॥ ८३ ॥ अह फिल पुराऽनन्त प्रजार्थो भुनि मुक्तिदम् । अपूजय न मोक्षाय मोहितो देवमायया ॥ ८ ॥ मज अधिकार नाहीं पूर्ण । हे मीही जाणतों आपण । मार्ग म्या केले भगवद्भजन । ते तूं कथन अवधारी ॥ ८४ ॥ म्या पूर्वी आराधिले देवराया । ते भजन ममता नेले वाया । प्रलोभविलो देवमाया । पुत्रस्नेहालागूनी ॥ ८५ ॥ मज देव तुष्टला प्रसन्नपणे । मागसी ते देईन ह्मणे । तेथे मायेने उकिले मजकारणे । माझा पुत्र होणे मी मागें ॥८६॥ तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सागे ब्रह्मज्ञान । तोचि बंदी माझे चरण । हाणे वाळक पूर्ण मी तुझें ॥ ८७ ॥ यापरी श्रीकृष्णापाशी । ज्ञानप्राप्ति नव्हे आह्मासी । कष्ण परमात्मा हपीकेशी । हें निश्चयेंसी मी जाणे ।। ८८ ॥ श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशी । ह्मणोनि श्रद्धा आहे मजपाशी । तेणेचि तूं तुष्टलासी देवनापी । तरी निजकृपेसी उद्धरी ॥ ८९॥ जे मायेने ठकिलों वाँडेकोडें । ते माया समूळ झडे । ऐसे सागिजे रोकडें । बहु घोलोनि पुढे काय काजै ॥ ९॥ । १च्यासादि ब्रह्मज्ञान ३राट ४ वाटमान्या ५ सुसाचे भरते येई, सुसाचा पूर येई ६ आधार, भानय भनमा कवासा किया कोंसा अशी या शब्दाची तीन र आहेत "अर्जुन मैनियेचा कुवासा" नाने० अ०६-१२५ "जो भकाचा कौवसा"-दासबोध द. ० स० ५, विसावा ७ सोटा, वरपगी ८ ससारवधनापासून ९ साथरता १. नाहीसे होते ११ जन्ममरपाला वारणा होणारं पुण्यपाप, क्रियाकर्म १२ ममते, मायेने (तृतीया) १३ आयत (अव्यय), अगर कपटाने (तृतीया विभक्ति) १४ काम, उद्देश