पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/584

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६८ एकनाथी भागवत. तेणें जीव होती अज्ञान ॥६९॥ करितां विषयांचे ध्यान । जीव होय मनाअधीन । त्यास मन करी हीनदीन । अतिकृपण जड, मूढ ॥ २७० ॥ ऐसे केवळ जीव जे अज्ञान । ते तुझ्या कृपाकटाक्षं जाण झाले गा ज्ञानसंपन्न । हे कृपा पूर्ण पैं तुझी ॥७१॥ तुझी कृपा झालिया परिपूर्ण । करूनि मायेचे निर्दळण । जीव होती ब्रह्म पूर्ण । तुझेनि जाण श्रीकृष्णा ॥ ७२ ॥ ह्मणशी माझे गांठी जाण । नाहीं ज्ञान ना अज्ञान । तरी तूं ज्ञानदाता आपण । झालासी पूर्ण तें ऐक ॥ ७३ ॥ धातासवितासनत्कुमारांसी । नारदमहादअवरीपांसी । काली उपदेशिले अर्जुनासी । ऐसा तूं होशी ज्ञानदाता ॥ ७४ ॥ ह्मणशी वहुत असती सज्ञान । त्यासी पुसोनि साधावे ज्ञान । तुजवेगळे मायेचे नियमैन । त्यांचेनि जाण कदा नोहे ॥ ७५ ॥ मायेची उत्पत्तिस्थिती । मार्यानिर्दणी गती । तूं एक जाणता निजगतीं । यालागी श्रीपति कृपा करीं ॥७६ ॥ यापरी उद्धवे विनंती । करूनि प्रार्थिला श्रीपती । तो प्रकृतिपुरुपविभाग युक्ती । उद्धवाप्रती सागेल ॥ ७७ ॥ जेवी सूर्यापाशीं मृगजळ । कां गगनीं उपजे आभाळ । कांचभूमिके दिसे जळ । तैशी प्रकृति सवळ पुरुंपापाशी ॥८॥ यापरी स्वयें श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुपनिरूपण । समूळ सांगताहे आपण । तो ह्मणे सावधान उद्धया ॥ ७९ ॥ श्रीभगवानुवाच-प्रकृति पुरुपश्चेति निक्रप पुरपर्पभ । एप वैकारिक सौ गुणव्यतिकरात्मक ॥ २९ ॥ । प्रकृति पुरुप हे दोनी । सदा अत्यंत वेगळेपणीं । जैसा दिवस आणि रजनी । एक लोपोनी एक प्रवळे ॥ २८० ॥ दिवस लोपतांचि जाण । अंधकारेंसी परिपूर्ण । घेऊनियां ताराग्रहगण । रात्री आपण उल्हासे ॥ ८१॥ तेवीं लोपतां पुरुपाचं भान । घेऊनि कार्यसी कारंणगुण । ज्ञानाज्ञानेसी परिपूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥ ८२॥ येय मुख्यत्वे जो देहाकार । तेंचि प्रकृतीचे दुर्ग थोर । तेथें ठेविला ठाणेदार । देहअहंकार- महायोद्धा ॥ ८३ ॥ जो जिवलग विश्वासाचा । प्रकृतीस विश्वास त्याचा । तो नेटका झुंझार दुर्गांचा । भरभार तेथीची तो वाहे ॥ ८४ ॥ तेथ अभिमाने आपण । प्रकृतीस निर्भय देऊनि जाण । घालूनि सामग्रीविकारभरण । दुर्ग दारुण चळकाविले ॥८५ ॥ ऐक उद्धवा पुरुपश्रेष्ठा । निजप्रकृतीचिया निष्ठा । देहँदुर्गों अभिमान लौठा । जाहला, वरिष्ठा या हेतू ॥ ८६ ॥ देहदुर्गी गुण अहंकार । दुर्गसामग्रीविकार । अवघी प्रकृतीच साचार । तदाकार भासत ॥ ८७ ॥ गगनी गंधर्वनगर जाण । माड्या गोपुरे वन उपवन । तैशी प्रकृति आपण । नानाकारे जाण भासत ॥ ८८ ॥ जैशी मृगजळाची सरिता । दुरोनि दिसे प्रवाही । तेवीं प्रकृतीची सर्वथा । नानाकारता आभासे ॥ ८९ ॥ ऐसें प्रकृतिदुर्ग महाथोर । तेथें नाना सामग्रीविकार । जे जे घाली अहंकार । ते ऐक साचार सागेन ॥ २९० ॥ . ममाङ्ग माया गुणमय्यनेकधा विक्पबुद्धीय गुणैर्विधते। वैकारिकत्रिविधोऽध्यात्ममेकमथाधिदेवमधिभूतमन्यत् ॥ ३० ॥ माझी माया गा आपण । सर्वांगें जाहली तिनी गुण । तेही अभिमानें आपण । निज १ ब्रह्मदेव २ सूर्य ३ आकलन, निर्दळण ४ मायेच्या नाशाची ५ अम्रपटल ६ फाच मढवरेल्या जमिनीवर ५ देहादिकाशी ८ सत्व, रज, इ० ९ प्रबळ होते १० रक्षक, किल्लेदार ११ जवायदारी. १२ त्याचा. १३ देहरूप विण्याच्या ठिकाणी, १४ मोठा. १५भासे दारुण, १६ प्रवाहरूपार्ने