पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१६ एकनाथी भागवत. स्वर्गाचे बांदवडी । ते वांछिती आवडी नरदेहातें ॥ २५॥ नरकयातना महाथोर । जिहीं भोगिले भोग घोर । ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥ २६ ॥ नरदेह परम पावन । जो भक्तिज्ञानाचे आयतेन । जेणे साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥२७॥ जेणे नरदेहे जाण । निःशेप खुंटे जन्ममरण । जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥ २८ ॥ज्या नरदेहाचे संगती । होय अविद्येची निवृत्ती । लामे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ।।२९॥ ज्या नरदेहाची प्राप्ती । प्राणिमात्र वांछिती। प्राणी वापुडे ते किती। स्वयें प्रजापती नरदेह वाछी ॥ १३० ॥ ऐसे नरदेहाचे श्रेष्ठपण। येथ साधे भक्तिज्ञान । परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥३१॥ ___ न नर स्वर्गति कालेनारकी वा विचक्षण । नेम लोकं च काहेत देहावेशारामाद्यनि ॥ १३ ॥ झालिया नरदेहाची प्राप्ती । अधम होय नरकगती । कां सचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥ ३२ ॥ स्वर्गे होय पुनरावृत्ती । नरकी घोर दुःखप्राप्ती । सांडोनि देहाची प्रीती । नरदेही आसक्ती धरूं ह्मणसी ॥ ३३ ॥ मनुष्यदेहाची आवडी । तेचि देहबुद्धि रोकडी । जेथ कामक्रोधांची पडे उडी । प्रमाद कोडी क्षणक्षणां ॥ ३४ ॥ नरक स्वर्ग इहलोक । यांची प्रीती सांडूनि देख । साधावे गा आवश्यक । ज्ञान चोख का निजभक्ती ॥ ३५ ॥ ज्ञान साधावयालागी जाण । कष्टावें न लगे गाआपण । सप्रेम करितां माझे भजन । दैवडिता ज्ञान घर रिघे ॥ ३६॥ गव्हांची राशी जोडल्या हाती । सकळ पकाने त्याची होती । तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥ ३७॥ द्रव्य झालिया आपुले हाती । सकळ पदार्थ घरास येती । तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥ ३८ ॥ ह्मणसी करिता भगवद्भक्ती । विघ्ने छळावया आड येती । मी सुदर्शन घेऊन हाती । राखें अहोराती निजभक्ता ।। ३९ ॥ पक्ष्याचेनि नामोच्चारें। म्यां वेश्यां तारिली चमत्कारें । पाडूनि विघ्नाचे दातीरें । म्यां व्यभिचारी उद्धरिली ॥ १४०॥ यालागीं नरदेह पावोन । जो करी माझें भजन । तोचि ससारी धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥ ४१ ।। भावे करितांमाझे भक्तीसी । भाविक उद्धरी मी हपीकेशी। जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥ ४२ ॥ साधितां माझी भक्ति का ज्ञान । ज्यासी चढे ज्ञानाभिमान । तो म्या आपुलेनि हाते जाण । दीधला आंदण महादोपा ॥ ४३ ॥ उद्धवा तूं ऐसे मणशी । ते कां दीधले यमहातेशी । तो जाचूनिया महादोपियांसी । ज्ञानाभिमानासी साडवी ॥४४॥ यालागी सांडूनि देहाभिमान । भावे करिता माझें भजन । पूर्वील साधु संज्ञान । नरदेहे जाण मज पावले ॥ ४५ ॥ एतद्विद्वान्पुरा मृत्योरभवाय घटेस स । अप्रमत्त इद ज्ञात्वा मयंमध्यर्थसिद्धिदम् ॥ १४ ॥ केवळ अस्थि चर्म मून मळ । पाहतां देहो अतिकश्मळ । परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हैं निर्मळ फळ येणे साधे ॥ ४६॥ ऐसें नरदेहाचे कारण । जाणोनि पूर्वील सज्ञान । साडोनिया देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥४७॥ देह निंद्य ह्मणोनि सांडावा । १ फंदपान्यात • स्थान, आश्रय ३ सर्व जीव ४ सचय होता ५ पुनर्जन्म ६ बुका, दोप ७ बाहेर लोहन दिलें "तरीही आपण होऊन ज्ञान घरी येते ८ या नावाचे चक ९जारिणी ली १० दातुडी, दातखिळी, दाता. ११ निश्चमानें १२ माविकउदरी. १३ स्वाधीन केले. १४ वक्षीस १५ ज्ञानसपन्न. १६ घाणेरडे, दुर्गधियुक्त -