________________
एकनाथी भागवत. अध्याय विसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐ नमो सद्गुरु चित्समुद्रा । मुक्तमोतियांचा तुजमाजी थारा । ज्ञान वैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥१॥ तुझी खोली अमर्याद । माजी चिद्रलं अतिविविध । देखोनि निजप्रबोधचांद । भरतें अगाध तुज दाटे ॥२॥ उलथेल्या स्वानंदभरत्यासी । गुरुआज्ञामर्यादा नुल्लंघिसी । स्वानंदलहरी चढोवढीसीं । तुज माजी अहर्निशी उसळती ॥ ३ ॥ ब्रह्मविद्या महाबंदर । तेथ निजभक्ती हे तारूं थोर । त्यासी वागविता तूं कर्णधार | प्रेमाचे साचार चढविशी शीड ॥४॥ तेथ भक्त सत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार । त्याची मागुती येरझार । सत्य साचार खुंटली ॥५॥ एक लावूनि कासेसी । भवसागरी वागविशी । बुडण्याचे भय त्यासी । महाकस्पेंसी वाधीना ॥ ६ ॥एक बुडाले भक्तिसमरसीं । ते घातले छोपायनापाशीं । एक वैसविले अढळतेसी । ते ब्रह्मादिकांसी न ढळती ॥७॥ तुझ्या सागरत्वाची परी । विजोतीय तिळभरी । राहों नेदिसी भीतरी । हे अगाध थोरी पै तुझी ॥ ८॥ अत्यंत प्रळयीं जै हा चढे । ते ससार हे नांवहि बुडे । वैकुंठकैलासावरता चढे । मागेपुढे हाचि हा ॥९॥ ऐशिया सद्गुरुसमुद्रोदकी । एकाएकपणे हरीतकी । भीतरी पडता आवश्यकी । अगीकारी की जनार्दन ॥ १० ॥तो जनार्दन स्वयें देखा । एकादशाची करी टीका । तेणें अभंगी घालूनि एका । कवित्व लोकां ऐकवी ॥११॥ जनार्दना आवडे एक । तो मी एका भेटताचि देस । निजात्मभावे पडिलें ऐक्य । आपुले निजसुखें बोलघी ॥१२॥ निजसुखाची कथा । त्यासी आपण होय श्रोता । मग अर्थाच्या यथार्थतां । समाधानता देतसे ॥१३॥ यापरी गा जनार्दनें । एकादश मन्हाटा करणे । नव्हे माझे युक्तीचे बोलणे । हे स्वयें सज्ञाने जाणिजेल ॥१४॥ त्या एकादशाची गतकथा । एकुणिसावा संपतां । गुणदोषाची काही वार्ता । उद्धवासी तत्त्वता सांगीतली ॥१५॥ गुणदोप जो देखणें । तोचि महादोप जाणणे । गुणदोप स्वयें न देखणे । तो गुण म्यां श्रीकृष्ण मानिजे ॥ १६॥ हे ऐकोनि देवाचे उत्तर । उद्धव चमत्कारला थोर । काय गुणदोपाचा विचार । घरोघर लोकी केला ॥ १७ ॥ तुझींच वेदमुखें आपण । प्रकटिलें गुणदोपलक्षण । ते तुमचे वेदवचन । केवीं अमान्य करावे ॥१८॥ऐसे विधिनिषेधलक्षण । विचारिता तें वेदवचन । का पा निषेधी श्रीकृष्ण | उद्धव तो प्रश्न स्वये पुसे ॥१९॥ विसावे अध्यायीं निरूपण । सागावया गुणदोपलक्षण । भक्ति ज्ञान कर्म जाण । तिन्ही अधिकार भिन्न सागे न ॥२०॥ उद्धव ह्मणे हे श्रीकृष्ण । तूं वेदरूपें आपण | बोलिलासी दोपगुण । तें परम प्रमाण आह्मी मानूं ॥ २१ ॥ हा विधि हा निषेध । हे दाविताहे तुझा वेद । तो वेदानुवाद विशद । ऐक प्रसिद्ध सागेन ।। २२॥ । १ चतन्यसागरा २ ज्ञानरनें. ३ आत्मज्ञानरूपी चद् ४ शुद्ध भानदाचें भरतें उसळले असता ५ बदामादान, कामागून एक अशा ६ व्यापाराची मोठी जागा जहाज ८ नावाडी. ९ चेगळी १० बाळहर्तकी. ११ ब्रह्मानुभव १२ भोगची १३ प्राकृत, मुलभ, महाराष्ट्र. १४ चकित झाला ।